अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

MB NEWS:निखळ शिल्पकार*! *मधूकर गिरवलकर सर

 निखळ शिल्पकार*! *मधूकर  गिरवलकर  सर



............................................................


    "   सुंदर आयुष्य सहज घडत नसतं.

       तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं,

       ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून,

      त्यागातून आणि सर्वात महत्वाचे

      म्हणजे कृतीतून घडतं असतं."

वरील ओळी अतिशय चपखलपणे परळी शहरातील विविध शैक्षणिक व सामाजिक चळवळीचे अधिष्ठान असणाऱ्या  शहरातील    शिक्षक  मधुकर चनबसअप्पा  गिरवलकर  सरांना लागू पडतात.  वीरभद्रेश्वर  विघालयाचे   मुख्याध्यापक  आहेत. ते मुळ पुस येथील  राहिवासी  आहेत. वडील सनबस  अप्पा  गिरवलकर  सर शिक्षक व शिवसेनेने  नेते असल्याने परळीला  वास्तव्यास  आले.  परळी शहरातील शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये त्या काळात कै चनबसअप्पा  गिरवलकर  यांचे सामाजीक,  राजकीय  क्षेत्रात   मोलाचे योगदान आहे.  त्यांनी आपल्या  हातून जे जे समाजासाठी  करता येईल ते कार्य  केले. गरजू लोकांना मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. परंतु केलेली मदत ते कधीही तोंडातून बोलून दाखवत नाहीत. 

         ' नेकी कर दर्या मे डाल '  या म्हणीप्रमाणे  आपल्या वडिलांचा दातृत्वाचा व कर्तुत्वाचा वारसा ते समर्थपणे पूढे चालवून सर्वसामान्य लोकांचे आधारवड बनले आहेत. शिक्षण क्षेञात त्यांनी केलेल्या अतुलनीय व अव्वल दर्जाच्या कार्यामुळे परळी शहरातील शैक्षणिक वर्तुळात त्यांची एक आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे. याला त्यांचे कार्यकर्तृत्व व दातृत्व कारणीभूत आहे. त्यांच्याकडे कोणी मदतीसाठी कोणी याचक आला तर त्या माणसाला  रिकामे हाताने कधीच पाठविले जात नाही. सतत हसतमुख चेहरा, नेहमी  सकारात्मक राहणे हे मधुकर  गिरवलकर  सरांचे वैशिष्ट्य  आहे. त्यांचा  मराठी शाळेचा बाजुला इंग्रजी  माध्यमाची  शाळा होती. अचानक  माझी आणि सरांची भेट झाली अनंतराव ही माझी लावण्याई  पब्लिक स्कुल  आहे. आपण घेउन  जा! सर मला चक्क माझी शाळा घेऊन जा म्हणत आहेत हे माझ्या कानावर ज्यावेळी आढळले त्यावेळी मी खरोखरच क्षणभर स्तब्ध झालो. काहीच कळेना.... सर असं का म्हणताहेत. पुढे नंतर कळालं की सरांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास टाकला आहे. त्यांनी माझ्यावर शाळा मोठी करण्याची जबाबदारी टाकलेली आहे व ती मला इमानेइतबारे पार पाडावयाची आहे. शाळेचे दायित्व माझ्याकडे देताना निश्चितच त्यांनी काहीतरी दूरदृष्टी ठेवून व योजकता सत्यात उतरवण्यासाठी संकल्प केलेला असेल. सरांचे व्हिजन व मिशन सामान्य माणसाच्या खूप पुढे असते. ज्याप्रमाणे शिल्पकार एखाद्या ओबडधोबड दगडातून नको असलेले भाग आपल्या हातोड्याने दूर करतो त्याप्रमाणे सर अनेक माझ्यासारख्या ओबडधोबड दगडांना आकार देण्याचा प्रयत्न करून विविध शिल्प बनविण्याचा प्रयत्न करतात. खरोखरच हे ईश्वरी कार्य आहे. मला त्यांचा खूप मोठा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील शाळा सत्यात साकारणे हे जीवन ध्येय बनविण्याचा मी प्रयत्न करत आहे....

मला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला एवढा मोठा माणूस माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीवर एवढा प्रचंड विश्वास टाकतो हे मला खरे वाटेना. खरोखरच त्यांचे मन खूप मोठे आहे, याचा अनुभव मागील दोन वर्षांमध्ये मी सातत्याने त्यांच्याजवळ राहून घेतला आहे. पुढच्या व्यक्तीवर आपल्या सुशील व सदाचारी वर्तनातून कायमची छाप पाडणे हे त्यांच्या स्वभावाचे गुणवैशिष्ट्य आहे.

त्यांनी माझ्यावर केलेले संस्कार व दिलेली अनुभवाची शिदोरी कधीही संपणार नाही. उतणार नाही, मातणार नाही. घेतलेला वसा मी कधी सोडणार नाही.

      

      आज त्यांचा वाढदिवस माझ्याकडे शब्द सुमनांशिवाय त्यांना देण्यासारखे काहीच नाही...... आम्ही शब्दांचे भोई, आम्हा कडे शब्दाचेच भांडार! सरांना श्री वैद्यनाथ प्रभू दीर्घायु व उत्तम आरोग्य देवो हीच वैद्यनाथांच्या चरणी प्रार्थना.


                         *आपला  लाडका* 

*अनंत कुलकर्णी, परळी*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?