अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

स्वातंत्र्य दिन : चिरायू होवो

 यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा



परळी वैजनाथ

नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून 76 वा स्वातंत्र्य  दिन मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात आला.

 15 ऑगस्ट  2023  भारत देशाच्या 76 वा स्वातंत्र्य दिन  देशभर मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात येत असून याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी 8 :10  वाजता राष्ट्रपती महात्मा गांधी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते करून 76 वा स्वातंत्र्य दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या वेळी महाविद्यालयाचे प्रा.ए. ए.मुंडे मॅडम, प्रा.यु.एन.फड, प्रा.एस.आर.कापसे, प्रा.व्ही एन.शिंदे, प्रा.ए.डी. शेख. प्रा.पी.पी. परळीकर, ए. डी.अघाव, एस. बी.आष्टेकर, व्ही एन.शिंदे, जी.व्ही. कांबळे, यु.बी.जगताप, एम.पी.सातपुते, एन.व्ही. दळवी यांच्या सह प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?