अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

चित्रपट समिक्षा : #जोशींचीतासिका ✍️ अनिरुद्ध जोशी●नक्की का पहावा OMG2?

 नक्की का पहावा OMG2?

#जोशींचीतासिका


11 ऑगस्ट रोजी प्रामुख्याने तीन चित्रपट प्रदर्शित झाले एक थलाईवा रजनीकांत, सनी देओलचा बहुप्रतिक्षित गदर2 आणि अक्षय कुमारचा OMG2. ह्या तिन्ही अभिनेत्यांच्या चित्रपटाकडून मनोरंजनासोबत प्रबोधन वगैरेची सहसा कोणी अपेक्षा ठेऊ शकत नाही. पण, यंदा अक्षय कुमारच्या चित्रपटाने सुखद धक्का दिला आहे.


तीनपैकी गदर2 आणि OMG2 चित्रपट बघण्यात आले. गदर हा टिपिकल सनी देओलच्या पठडीतील चित्रपट आहे हे सांगायला कोण्या समीक्षक वैगरेची कोणालाही गरज नाही.


OMG2 मध्ये मोठे नावं म्हणून अक्षय कुमार असले तरी सगळा चित्रपट फिरतो तो पंकज त्रिपाठी भोवती. 'लैंगिक शिक्षण' सारखा नाजूक विषय लेखक व दिग्दर्शक म्हणून अमित रायने ज्या खुबीने हाताळला आहे ते बघून नक्कीच तो अभिनंदनास पात्र आहे.


OMG1 & OMG2 यांची तुलना करून मनात कोणतेही पूर्वग्रह ठेवून हा चित्रपट बघू नये असे किमान मला तरी वाटते. चित्रपटात प्रत्येक व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने वावरते ते बघून मजा येते. हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवा.


गेल्या चार दिवसांत जेलरने सुमारे 300 कोटींचा गल्ला जमवला आहे तर गदर2 135 कोटींच्या आसपास पोहचला आहे मात्र OMG2 अजून 50 कोटीही कमावू शकला नाहीये. यावर आपली अभिरुची स्पष्ट होते. कोणी स्वतःचे पैसे व वेळ देऊन काय बघावं ही सर्वस्वी ज्याची त्याची ईच्छा. म्हणणं इतकचं आहे की जर जेलर आणि गदर2 साठी तुम्ही वेळ आणि पैसे खर्च करू शकता तर OMG2 साठी नक्की खर्च करा, पैसे वाया जाणार नाहीत.


मी काही कोणी चित्रपट समीक्षक किंवा चित्रपट सृष्टीशी संबंधित व्यक्ती नाहीये. मी फक्त माझे मत मांडत आहे. पोर्नोग्राफीचे संकट आणि समाजातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटना यावर हा चित्रपट एक उपाय वैगरे आहे असेही माझे म्हणणे नाही. मात्र आजही समाजात वावरताना Sex Education हा शब्द उच्चरला गेला तरी अनेकांच्या लेखी ते पाप असतं, ते निषिद्ध असतं. केंद्र सरकारने सन 2007 मध्ये लैंगिक शिक्षणाचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले होते.


त्यानंतर स्वतःला प्रगत म्हणवणाऱ्या तत्कालीन महाराष्ट्र, गुजरात, खासकरून मध्य प्रदेश सरकारने याचा विरोध केला होता. मध्य प्रदेशात तर शिक्षक, पालकांच्या आणि काही हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटनांच्या दबावाखाली शिवराजसिंह चव्हाण यांनी मध्य प्रदेशात लैंगिक शिक्षण शालेय शिक्षणात समाविष्ट करणार नाही अशी बुरसट भूमिका घेतली होती.


OMG2 चित्रपटात सध्याच्या वेबसिरीजमध्ये पावलोपावली बेड सीन्स दाखवले जातात तसे कोणतेही दृश्य न दाखवता परिणामकारकपणे विषय मांडणी केलीय ती नक्कीच कौतुकास्पद आहे.


लैंगिक शिक्षणाबाबत आजकाल मुलींना त्यांची आई, आजी वैगरे तरी मासिक पाळी सारख्या विषयांत खाजगीत मार्गदर्शन करतात. पण, मुलांना त्यांचे वडील, आजोबा किंवा भाऊदेखील बोलायला कचरतात. कंडोमची जाहिरात लागली तर आपल्याकडे चॅनल बदलले जाते. 'बाई पण भारी देवा' चित्रपटाला महिलांनी जशी गर्दी केली होती. तशीच गर्दी OMG2 ला महिलांसोबत पुरुष पालक वर्गाची व्हायला हवी.


चित्रपटात वकील नसूनही ज्या भन्नाट पध्दतीने पंकज त्रिपाठीने युक्तिवाद केलाय ते बघताना क्रिमिनल जस्टीसमधला माधव मिश्रा पडद्यावर बघतोय असा बऱ्याचदा भास होतो. यामी गौतमनेही तिचे काम चोख बजावलेय.


चित्रपट बघून झाल्यावर मी परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूलमध्ये शिकत असताना विज्ञान विषयाच्या शिक्षिका सौ. छाया देशमुख बाईंना संपर्क साधून सध्या शाळेत लैंगिक शिक्षण आमच्यावेळी होते तसे निषिद्ध आहे का? असे विचारले. तेव्हा मिळालेले उत्तर हे सुखद धक्का देणारे होते. बाईंनी दिलेल्या माहितीनुसार 'शाळेत जेव्हा लैंगिक शिक्षणाबाबत माहिती देण्याचे पाठ येतात तेव्हा शहरातील डॉ. वीणा पारगांवकर, डॉ. शालिनी कराड आदी विषयतज्ज्ञ बोलावून सर्व विद्यार्थ्यांना (मुलं, मुली एकत्रितपणे) धडे शिकवले जातात.' यासाठी शाळेचे व संबंधित डॉक्टर मंडळींचे अभिनंदन. 


माझे सर्व पालक, शिक्षक, शाळा, संस्था चालकांना आवाहन आहे तुम्ही नक्की हा चित्रपट बघा आणि इतरांना प्रोत्साहित करा.


जय हिंद,

अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ

चलभाष क्र. 8983555657

दि. 14 ऑगस्ट 2023


तळटीप :

1. एरवी आपापले एजेंडे रेटण्यासाठी काही चित्रपटांचे स्क्रिनिंग करणाऱ्या विविध राजकीय पक्ष, संघटनांनीसुद्धा जमलं तर बघा OMG2 चे स्क्रिनिंग आयोजित करून बघावेत.


2. चित्रपटाचे पोस्टर जेव्हा रिलीज झाले होते तेव्हा अक्षय कुमारचा अवतार पाहून मी स्वतः खिल्ली उडवली होती. पण, चित्रपट बघितल्यावर Don't judge a book by it's cover हा धडा पुन्हा एकदा मिळाला ही कबुली यानिमित्ताने नक्की देईन.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?