अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

१०० सीसीटीव्ही कॅमेरे, ३०० पोलीस व कडक सुरक्षाव्यवस्था

 परळी वैजनाथ - महाशिवरात्री पर्व : जय्यत तयारी 


  १००  सीसीटीव्ही कॅमेरे, ३०० पोलीस व कडक सुरक्षाव्यवस्था


परळी वैजनाथ, ......


      महाशिवरात्र पर्वानिमित्त ज्योतिर्लिंग क्षेत्र प्रभू वैद्यनाथ मंदिरात दर्शनार्थी भाविकांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यासोबतच पूर्ण मंदिर परिसर सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून निगरानीत ठेवण्यात येत आहे. महाशिवरात्र पर्वकाळात परळीत सुमारे 5 लाख भाविक दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन तयारी करण्यात आली आहे. पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


         मंदिर परिसरासह शहरात पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. अभिषेक करणाऱ्यांसाठी स्वतंत्र रांग सुद्धा ठेवण्यात आली असून सुमारे 5 लाख भाविक वैद्यनाथ प्रभूंच्या दर्शनासाठी परळी शहरात हजेरी लावतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथ देवस्थान कमिटीने दर्शनार्थींसाठी स्त्री-पुरूष व पास धारक अशा तीन स्वतंत्र रांगा ठेवल्या आहेत. मंदिराच्या पायऱ्यावर भव्य मंडप उभारण्यात आला असून नागमोडी वळण पद्धतीने दर्शनार्थी भाविकांसाठी बॅरीकेटस्‌ उभे करून रांगा लावल्या जाणार आहेत. 


        मंदिर परिसरात 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती देवस्थानकडून देण्यात आली आहे. दरम्यान नेहमीप्रमाणेच मुख्य प्रवेशद्वारात दर्शन रंागेतील भाविकांची तपासणी करून त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. कॅमेरा, मोबाईल, हॅण्डबॅग किंवा पिशवी असे कोणतेही साहित्य मंदिराच्या आत घेवून जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.  दि.8 मार्च रोजी महाशिवरात्र असून आदल्या दिवशी (दि.7)पासूनच रात्री 12 वाजल्यानंतर महाशिवरात्री निमित्त दर्शनार्थी भाविकांची गर्दी सुरू होते. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा रात्रीपासूनच कार्यान्वीत केल्या जाणार आहेत. सुमारे 5 लाख भाविक महाशिवरात्री निमित्त श्रीं चे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतील असे अपेक्षित धरुन तयारी केली जात आहे.


@@@@@


*तयारी पूर्ण.......*


      वैद्यनाथ प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक येणार असून या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणेच दर्शनार्थी भाविकांसाठी स्वतंत्र रांगा लावण्यात आल्या आहेत. पास धारकांसाठी स्वतंत्र रांग असून मंदिर परिसरात बॅंकेच्या काऊंटरवरून भाविकांना पास उपलब्ध करून घेता येतील. आम्ही देवस्थानच्या वतिने भाविकांना दर्शन रांगेत थंड पाणी उपलब्ध करून देणार आहोत. 84 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मंदिर परिसरावर नजर राहणार असून स्थानिक पोलिस व खाजगी सुरक्षा यंत्रणा यांची सुलभ दर्शनासाठी मदत घेतली जाणार आहे. शेवटच्या भाविकांना जास्तीत जास्त अर्ध्या तासात दर्शन घेवून परत जाता येईल अशी यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

                    - व्यंकटेश मुंडे 

 तहसीलदार तथा अध्यक्ष वैद्यनाथ देवस्थान परळी वैजनाथ 


@@@@@


*मंदिर परिसरात सुरक्षेसाठी 300 हुन अधिक पोलीस कर्मचारी असणार तैनात*


     महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी संख्या लक्षात घेवून दर्शन रांगेतील भाविकांना कोणताही त्रास होवू नये, संपूर्ण व्यवस्था सुरळीत व सुरक्षित पार पाडली जावी या दृष्टीकोनातून पोलिसांच्या वतिने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. २० पोलीस अधिकारी,१५० महिला व पुरुष कर्मचारी,१०० होमगार्ड, एक दंगल नियंत्रण पथक (25 कर्मचारी),डीबी पथक,शहर वाहतूक पथक,  अग्निशमन पथक सुरक्षेसाठी तैनात केल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. दरम्यान भाविकांनी दर्शनाला जातांना पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?