पोस्ट्स

अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

MB NEWS:भगवान श्री नृसिंह जन्मोत्सव परळीत उत्साहात साजरा

इमेज
भगवान श्री नृसिंह जन्मोत्सव परळीत उत्साहात साजरा आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाईने मंदिर परिसर सजले परळी वैजनाथ/संतोष जुजगर  येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैजनाथ मंदिरातील पूर्व बाजूस प्राचीन भगवान श्री नरसिंह मंदिरात श्री नरसिंह जन्मोत्सव गुरुवार दिनांक 4 हे रोजी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. श्री नरसिंह मंदिरावर आकर्षक फुलाची सजावट व विद्युत रोषणाईने मंदिर परिसर सजले आहे. प्रारंभी श्री लक्ष्मी नरसिंहदेव जन्मोत्सवानिमित्त पवमान पंचसूक्त,पुरुष सुक्त, श्रीसुक्त या मंत्राने अभिषेक करण्यात आला. डाळ व आंब्याचे पन्हे व नैवेद्य देवास दाखवून मंगलारती करण्यात आली. तसेच बटू पूजन, सुवासिनी पूजन करण्यात आले. यावेळी भाविक भक्तांची उपस्थित होती. -------------------------------------------- Advt ....... Advertise   मागोवा बातम्यांचा.... ● *LIVE: गीता परिवार आयोजित संस्कार शिबीर परळी वैजनाथ.* #mbnews #subscribe #share #like #comments ● *वै.श्री.ह.भ.प.गु. उत्तम महाराज उखळीकर यांचे ६ मे रोजी द्वितीय पुण्यस्मरण ; किर्तन,प्रवचनाचे आयोजन*

MB NEWS:दहिवाळ परिवारांने पुन्हा उंचावली परळीकरांची मान

इमेज
  मराठवाडा आयडॉल सिंगिंग स्पर्धेत प्रा.श्रीकांत दहिवाळ यांनी द्वितीय पारितोषिक दहिवाळ परिवारांने पुन्हा उंचावली परळीकरांची मान परळी, प्रतिनिधी  छञपती संभाजी नगर येथे मराठवाडा आयडॉल सिंगिंग स्पर्धा 2023 संपन्न झाली.या स्पर्धेत प्रा. श्रीकांत दत्तात्रय दहिवाळ यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले असुन पून्हा एकदा परळीकरांनची मान उंचावली आहे. छञपती संभाजी नगर येथे मराठवाडा आयडॉल सिंगिंग स्पर्धा 2023 नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत मराठवाड्यातून सिंगिंग टॅलेंट ऑडिशन साठी  70 ते 80 जणांनी सहभाग नोंदविला होता.त्यात अतितटीचा स्पर्धेत 18 जणांची निवड करण्यात आली होती.यामध्ये परळीचे भुमीपुञ प्रा. श्रीकांत दत्तात्रय दहिवाळ यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे.यावेळी ऍण्ड द विनर श्रीकांत दहिवाळ असं ऐकायला मिळालं तेव्हा फिलिंग तर शब्दात व्यक्त करता येत नाही अस विजेते प्रा.दहिवाळ यांनी सांगितले. श्रीकांत दहिवाळ प्रसिद्ध चित्रकार असून यांची युट्युब वर सुद्धा सुंदर अशी  गाणी प्रेक्षकांना पाहता व ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत.प्रा.श्रीकांत दत्तात्रय दहिवाळ यांनी द्वितीय पारितोषिक मिळाल्या बदल सर्वस्तरातु

MB NEWS:मोहन गोपाळ गायकवड यांना कामगार भूषण पुरस्कार जाहीर

इमेज
  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर  मोहन गोपाळ गायकवड यांना कामगार भूषण पुरस्कार जाहीर  परळी (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सन २०२१-२२ च्या गुणवंत कामगार पुरस्कारांची घोषणा केली आहे.  यात कामगार भूषण पुरस्कारासाठी टाटा मोटर्स लिमिटेड, पिंपरी पुणे येथील कर्मचारी मोहन गोपाळ गायकवाड यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.  तसेच गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी ५१ कामगारांची निवड करण्यात आली आहे.  रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार सन्मान सोहळ्याप्रसंगी या  पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.  यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार  उमा खापरे, आमदार अश्विनी जगताप, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद-सिंगल, कामगार आयुक्त सतिश देशमुख, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, कोकण विभागाचे अपर कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, औद्योगिक सुरक्

MB NEWS:परळीत मोठ्या संख्येत कामगारांचा मेळावा

इमेज
  संघटीत लढ्यानेच कामगारांचे प्रश्न सुटतील-अॅड. अजय बुरांडे परळीत मोठ्या संख्येत कामगारांचा मेळावा परळी:  कामगारांच्या संघटित लढयानेच कामगारांचे प्रश्न सोडवू असे स्पष्ट मत अँड अजय बुरांडे यांनी 1 मे च्या परळी येथील मेळाव्यात व्यक्त केले.         बीड जिल्हा सीटू च्या वतीने परळी येथील विठ्ठल मंदिरात कामगारांचा मेळावा आयोजीत केला होता. व्यासपीठावर मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून प्रा.बी.जी खाडे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ. प्रभाकर नागरगोजे काॅ. पी. एस. घाडगे, श्री रामराजे महाडीक व कॉ किरण सावजी उपस्थित होते.अँड बुरांडे यांनी आपल्या भाषणात पूढे सांगितले की, कामगारांनी आपल्या संघटित लढ्यानेच जगभर भांडवलदारांची  गुलामी ठोकरली व आठ तासाचा कामाचा दिवस ठरून घेतला. आपल्या संघटित लढ्यानेच कामगारांच्या हिताचे कायदे  करायला सरकारला भाग पाडले. परंतू आता  'मोदी' सरकार भांडवलदारांच्या हिताचे  कायदे करत आहे. लाखो कामगार, शेतकरी व शेतमजुरांनी दिल्लीत मोर्चा काढून सरकारच्या धोरणास विरोध केला आहे." नाशीक येथून  10 हजारपेक्षा जास्त शेतकर्यांनी पायी मोर्चा काढून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या.

MB NEWS:निसर्गरम्य वातावरणात गुरुकुलमध्ये ८ मे पासून "निवासी संस्कार शिबिर"

इमेज
  निसर्गरम्य वातावरणात गुरुकुलमध्ये ८ मे पासून "निवासी संस्कार शिबिर" परळी वैजनाथ दि.२-            शहरी प्रदूषणापासून दूर निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक, आत्मिक व सामाजिक विकास व्हावा आणि त्यांच्या अंगी मानवतेचे संस्कार रुजावेत, या पवित्र उद्देशाने महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा व येथील आर्य समाजाच्या संयुक्त विद्यमाने नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमामध्ये येत्या ८ मे ते १४  मे दरम्यान "मानवता संस्कार व आर्य वीर प्रशिक्षण" शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातून  आरोग्यसंपन्न, सक्षम , सभ्य, प्रामाणिक, नीतिसंपन्न, कर्तव्यदक्ष व संस्कारशील पिढीची निर्मिती होण्यास मदत मिळणार आहे.        आठवडाभर चालणाऱ्या या निवासी संस्कार शिबिरात पहाटेपासून ते रात्रीपर्यंतच्या व्यस्त दिनचर्येत सकाळी व संध्याकाळी व्यायाम, योगासने, प्राणायाम, विविध खेळ यांच्या माध्यमाने विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास साधला जाईल. तर सकाळी संध्या, अग्निहोत्र, प्रार्थना, उपासनेच्या माध्यमाने धार्मिक व आध्यात्मिक संस्कार दिले जातील ,तर सकाळी व दुपारी  प्रतिदिनी ह

MB NEWS:कविता जाधव यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

इमेज
  कविता जाधव यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार औरंगाबाद (प्रतिनिधी)-येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील इन्चार्ज परिचारिका श्रीमती कविता रघुनाथ जाधव नियत वयोमानानुसार एप्रिल अखेर सेवानिवृत्त झाल्या. सेवापुर्ती निमित्त त्यांचा रुग्णालयातील स्टाफ च्या वतीने ह्रद्य सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थानी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड हे उपस्थित होते. याप्रसंगी अधिसेविका विमल केदार, सर्व परिसेविका अधिपरिचारक व परिचारिका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिस्टर सुनिता,कविता व परिसेविकांनी परिश्रम घेतले. Advt ....... Advertise   मागोवा बातम्यांचा....   ● जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांचा एसटी बसद्वारे प्रवास ■ MB NEWS चा नवोपक्रम: 'प्रेरक व्यक्तिमत्वावर बोलू काही'* • *आजचे व्यक्तिमत्व*• >>>>>>>>>>>>>>> *श्री. प्रशांत जोशी: 'नेहमी शांत' व 'स्थिरचित्त' व्यक्तिमत्व.* #mbnews #subscribe #share #like #comments ● *LIVE: गीता परिवार आयोजित संस्कार शिबीर परळी वैजनाथ.* #mbnews #subscribe #share

MB NEWS:वैद्यनाथ कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिनानिमत्त प्राचार्य जे. व्हि. जगतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिनानिमत्त प्राचार्य जे. व्हि. जगतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण  परळी, प्रतिनिधी.....  महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1मे रोजी 1960 रोजी करण्यात आली. त्याकरिता महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यासाठी विविध भागात चळवळी घडून आल्या. या चळवळीमध्ये अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले त्यातूनच महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, त्याचबरोबर शेतकरी, कष्टकरी कामगार वर्गानी या चळवळीत सहभाग घेतल्यामुळे हा दिवस कामगार दिन साजरा म्हणून देखील केला जातो. तेव्हापासून या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणूनच महाराष्ट्रात विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयात हा दिवस साजरा केला जातो.  जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ. जे व्हि जगतकर यांच्या शुभ हस्ते करण्यात करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्त्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MB NEWS:.भ.प.नारायण महाराज बारटक्के यांच्या ओजस्वी वाणीतून पारायणास सुरुवात

इमेज
  मिरवट येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के यांच्या ओजस्वी वाणीतून पारायणास सुरुवात परळी वैजनाथ/ प्रतिनिधी परळी तालुक्यातील मौजे मिरवट येथे गुरुवार दिनांक 27 एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच कलशारोहणाच्या कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ प्रमुख श्री ह भ प नारायण महाराज बारटक्के यांच्या रसाळ व ओजस्वी वाणीतून होत असून गाथा भजन प्रमुख सोपान महाराज गवळी नसगाव जालना हे आहेत तसेच कलश पूजन श्री ह भ प कांतादेव महाराज वडगावकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाची सांगता बुधवार दिनांक 3 मे रोजी होणार आहे. परळीपासून जवळच असलेल्या मौजे मिरवट येथे गुरुवार दिनांक 27 एप्रिल ते बुधवार दिनांक 3 मे दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कलशारोहणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे चार ते पाच काकडा आरती, सहा ते सात विष्णू सहस्त्रनाम ,सकाळी सात ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 11 ते तुकाराम गाथा भजन, दुपार

MB NEWS:महात्मा बसवेश्वरांची वचने अमलात आणण्याची गरज- प्रा. डॉ राजशेखर सोलापूरे यांचे प्रतिपादन

इमेज
  महात्मा बसवेश्वरांची वचने अमलात आणण्याची गरज- प्रा. डॉ. राजशेखर सोलापूरे यांचे प्रतिपादन परळी वैजनाथ दि. 30 (प्रतिनिधी) - थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये  त्यांच्या वचन साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले. त्यांनी त्यांच्या वचनांतून माणसाने कर्मकांडे नाकारून विज्ञानवादी व्हावे असा मंत्र दिला. आजच्या काळातही त्याची ही शिकवण अंगीकारण्याची खरी गरज असल्याचे प्रतिपादन लातूर येथील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ.राजशेखर सोलापूरे यांनी केले.                               शहरातील थर्मल कॉलनी मधील सार्वजनिक जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्या वतीने रविवार दि.30 रोजी राम मंदिर येथे महात्मा बसवेश्वर महाराजांच्या 892 व्या जयंतीनिमित्त व्याख्यान व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते.                                 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता एच. के. अवजारे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरुजी, कल्याण

MB NEWS:श्री जनसेवा अभियान एक हात मदतीचा

इमेज
  सद्गुरू प .पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल  अँड मेडिकल ट्रस्ट, ञ्यंबकेश्वर च्या वतीने परळीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन श्री जनसेवा अभियान एक हात मदतीचा परळी (प्रतिनिधी)...    अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशिर्वादाने व आदरणीय श्री चंद्रकांतदादा मोरे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाने दि. 1 मे 2023 महाराष्ट्र दिन व दि. 2 मे 2023 सद्गुरु ब्र.भू. प. पू. मोरेदादा यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 1 मे 2023 सोमवार रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणीत) खंडोबानगर श्री संत सावतामाळी मंदिर जवळ परळी वैजनाथ या ठिकाणी सद्गुरु प. पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट त्रंबकेश्वर यांच्या वतीने दिनांक एक मे महाराष्ट्र दिनी भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तरी   परळी शहर व तालुक्यातील महिला व पुरुष सेवेकरी व स्वामी भक्तांनी तथा रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवार परळी वैजनाथ यांच्या वतीन

MB NEWS:ॲड.माधव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे धडाकेबाज उद्घाटन

इमेज
  विधानसभा निवडणुकीत परळी सह संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार - छत्रपती संभाजी राजेंची मोठी घोषणा ॲड.माधव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे धडाकेबाज उद्घाटन परळी मतदारसंघात परिवर्तनाची गरज - ॲड.माधव जाधव *■छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांचा वंशज असल्या कारणाने आपण माझा मान सन्मान केला,वंशज असल्याचा मला सार्थ अभिमान■* परळी/प्रतिनिधी दि.३० - पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष परळी सह संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार असल्याची मोठी घोषणा युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.परळीत ॲड.माधव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली.परळी विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर स्वराज्य पार्टीत या अस आवाहन देखील छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी केलं आहे.या जाहीर सभेआधी शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य रॅली काढण्यात आली.या रॅलीसाठी आज रस्त्यावर जनसागर ऊसळलेला दिसून आला.यावेळी नागरिकांनी ठिकठिकाणी राजेंचे उस्फुर्तपणे स्वागत केले.ही रॅली २ तासानंतर सभेस्थळी पोचली. वैद्यनाथ मंदिर परिसरात असलेल्या हाल

MB NEWS:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडीयेथील विद्यार्थिनीचे इयत्ता ५ वी स्कॉलरशिप परीक्षेत यश

इमेज
  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थिनीचे इयत्ता ५ वी स्कॉलरशिप परीक्षेत यश मिरवट केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे ५ व्या वर्गात शिकणाऱ्या कुमारी सुजाता धनराज दहिफळे हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता ५ वी स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवले असून तिला पात्र घोषित करण्यात आले आहे. मागील वर्षी याच शाळेची विद्यार्थिनी इयत्ता ८ वी स्कॉलरशिप मध्ये पात्र झाली, त्यानंतर सलग यश मिळवणारी या शाळेची ही दुसरी विद्यार्थिनी आहे. शाळेतील शिक्षकांसह माय व्हिजन नवोदय ऍडमिशनचे श्री संतोष सुतार, श्री धनराज परगे व श्री गोवर्धन शिंदे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. श्री संतोष फड यांच्या  ThinkSharp Foundation ने  पुरवलेल्या टॅबचाही तिला अभ्यासात मोठा फायदा झाल्याचे तिने सांगितले. तिच्या या यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी श्री कनाके, केंद्रप्रमुख श्रीमती मिश्रा, केंद्र मुख्याध्यापक श्री हडबे, सरपंच श्री बंडू गुट्टे,  मुख्याध्यापक श्री राठोड, शालेय समिती अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे, उपाध्यक्ष श्री हनुमान देवकते यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षकवृंदानी तिच

MB NEWS:बाबासाहेबांनी केवळ भारतालाच नाही तर जगाला दिशा दिली - रानबा गायकवाड

इमेज
  बाबासाहेबांनी केवळ भारतालाच नाही तर जगाला दिशा दिली - रानबा गायकवाड परळी (प्रतिनिधी.)   महामानव, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ भारतालाच नाही तर या जगातील प्रत्येक माणसाला दिशा देण्याचे महान कार्य केले असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, भीमयुगकार रानबा गायकवाड यांनी केले. ते परळी तालुक्यातील इंदपवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.       इंदपवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. शालुबाई फुलचंद मुंडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.  टाकणखार सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाणे, ब्रह्मानंद कांबळे,  नवनाथ जोगदंड, भागवत मुंडे, प्रा. दशरथ रोडे, फुलचंद मुंडे, अभिमान मुंडे, ह. भ. प. भागवत मुंडे, संपत मुंडे, उत्तम रोडे, सोपान जंगले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण घेतले परंतु बाबासाहेबांनी पुढे राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला.  शैक्षणिक संस्था काढून लाखो

MB NEWS:बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचा एकहाती विजय

इमेज
  बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचा एकहाती विजय बारामती (पुणे): बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रयत पॅनेलने सर्व १८ जागांवर एकहाती विजय मिळविला. भाजप मित्र पक्षाच्या शेतकरी विकास पॅनेलला या निवडणूकीत कोणताही करिश्मा दाखवता आला नाही. भाजप - मित्रपक्षांचा पॅनेल राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे करेल असे वाटत होते, परंतु निकालानंतर त्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याचेच स्पष्ट झाले. राष्ट्रवादीची एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली होती. उरलेल्या १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात होते. एका अपक्षाचा त्यात समावेश होता. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकहाती विजय देण्याचे आवाहन केले होते याला सभासदांनी एकहाती पाठिंबा दिला आहे.

MB NEWS:बाजार समिती निवडणूक:परळीत 97.50%मतदान; उद्या मतमोजणी

इमेज
  बाजार समिती निवडणूक: परळीत 97.50%मतदान; उद्या मतमोजणी परळी वैजनाथ.....  परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी शुक्रवार दि.28 एप्रिल रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत पार पडलेल्या निवडणुकीत 2163 मतदारांपैकी 2109 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी परळी,सिरसाळा व धर्मापुरी या तीन मतदान केंद्रावरील 8 बुथवर मतदान प्रक्रिया पार पडली.सेवा सहकारी सोसायटी मतदार संघात 647 पैकी 640 मतदारांनी मतदान केले.ग्रामपंचायत मतदार संघात 862 पैकी 849 मतदारांनी मतदान केले.व्यापारी मतदार संघात 382 पैकी 365 तर हमाल मापाडी मतदार संघातील 272 पैकी 255 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.सकाळी 8 वाजता मतदानास सुरुवात झाल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे व भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे हे दोघेही दुपारी 2 वाजेपर्यंत परळी जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्राबाहेर तळ ठोकुन होते.मतमोजणी शनिवार दि.29 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता तहसिल कार्यालयात होणार असुन दुपारी एक वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. Video   Advertise   मागोवा बातम्यांचा....   ● जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांच

बाजार समितीसाठी 92.74 टक्के मतदान

इमेज
  बाजार समितीसाठी 92.74 टक्के मतदान अंबाजोगाई, प्रतिनिधी....       कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष मतदान झाले. या निवडणुकीसाठी  92.74 टक्के मतदान झाले आहे.          याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार अंबाजोगाई  कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी एकूण 92.74 टक्के मतदान झाले आहे या निवडणुकीसाठी सेवा सहकारी संस्था मतदार संघ ग्रामपंचायत मतदार संघ व्यापारी मतदारसंघ हमाल मापाडी मतदारसंघ या चार गटांमध्ये मतदान झाले एकूण 3804 मतदारांपैकी 3528 इतके मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मताची टक्केवारी ही सेवा सहकारी संस्था मतदारसंघात 98.85 टक्के इतकी तर सर्वात कमी मतदान व्यापारी मतदारसंघात 87.13 टक्के इतके झाले आहे. मतदानाची एकूण टक्केवारी 92.74 टक्के इतकी आहे. Video   Advertise   मागोवा बातम्यांचा....   ● जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांचा एसटी बसद्वारे प्रवास ■ MB NEWS चा नवोपक्रम: 'प्रेरक व्यक्तिमत्वावर बोलू काही'* • *आजचे व्यक्तिमत्व*• >>>>>>>>>>>>>>> *श्री. प्रशांत जोशी: 'नेहमी शांत' व 'स्

MB NEWS:ॲड.माधव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन

इमेज
  जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी परळीत सुरु होणार 'माधव भवन' स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे, सौरभ दादा खेडेकर यांच्या उपस्थितीत ॲड.माधव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन ; शोभायात्रेचेही आयोजन परळी/प्रतिनिधी दि.२९- स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे,सौरभ दादा खेडेकर हे परळीच्या दौऱ्यावर येणार आहेत.सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते ॲड. माधव (आप्पा) जाधव यांच्या कार्यालयाचे उद्घाटनाचा सोहळ्याचे आयोजन रविवार दि.३० एप्रिल रोजी करण्यात आले असून यासाठी अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थीती या सोहळ्याला असणार आहे.या सोहळ्याची जय्यत तयारी हालगे गार्डन येथे सुरू असून संपूर्ण परळी तालुक्यासह परिसरातील नागरिकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले आहे.मोंढा परिसरात असलेल्या माधव भवन येथे ॲड माधव जाधव मित्र मंडळाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. ॲड.माधव जाधव मित्र मंडळाचे संपर्क कार्यालय परळी येथे सुरू होत आहे या कार्यालयाचे उद्घाटन स्वराज्य प्रमुख युवराज तथा माजी राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे,संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा ख