पोस्ट्स

पिंपळपान गळालं तर म्हणे पिंपळगाव जळालं !

इमेज
बीड:गृह राज्यमंत्र्यांच्या कथित मोबाईल चोरीचे मिडियाने रेटून चालवलेले प्रकरण: पोलीस अधीक्षकांनी काय केला खुलासा ? परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील घटना, घडामोडी व त्या संदर्भातील चालणाऱ्या बातम्या यामुळे विविध वृत्तवाहिन्यांनी पत्रकारितेचे अनेक वेळा संकेतही मोडल्याचेही समोर आले. कधी कधी काही घटनांमध्ये अतिशयोक्ती तर  कधी केवळ ऐकीव माहितीवर आधारित अतिरंजीतपणाने वृत्तांकन, त्याचे वारंवार, पुनर्वार्तांकन, पुनरावृत्ती अशा पद्धतीने बातम्या प्रसारित करण्यात येत आहेत. एक प्रकारे बीड जिल्ह्यातील काडी इकडची तिकडं झालेली घटनासुद्धा प्रचंड व्याप्तीची कशी आहे हेच बिंबवण्याचा प्रयत्न झाल्याचे अनेक वेळा दिसले. घटनांचे गांभीर्यपूर्वक वृत्तांकन ,बातमीचा विश्वासक स्त्रोत, या बाबी अनेकदा मिसिंग दिसतात. उथळपणा, केवळ कॅची मथळे आणि कोणत्याही बातमीला अतिरंजित स्वरुपात प्रदर्शित करुन केवळ बातमी चालते तर चालवा अन् व्हिव्ज मिळवा हेच प्राधान्य यातून दिसते.        असाच काहीसा प्रकार गृहराज्यमंत्र्य...
इमेज
  श्री योगेश्वरी मल्टिस्टेट को- ऑप क्रेडीट सोसायटी लि. अंबाजोगाईस मार्च २०२५ अखेरीस ६५.३४ लाखांचा निव्वळ नफा अंबाजोगाई (वसुदेव शिंदे) :-  समाजातील प्रत्येक घटकांची उन्नती या उक्तीवर चालणारी श्री योगेश्वरी मल्टिस्टेट को -ऑप क्रेडिट सोसायटी लि.ला आर्थिक वर्ष मार्च २०२५ अखेर रुपये ६५.३४ लाखाचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रिकबचंद सोळंकी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देतांना सांगितले . समाजातील प्रत्येक घटकांची उन्नती हेच या संस्थेचे ध्येय धोरण असून या धोरणावरच  ही संस्था कार्यरत असल्याचे सांगितले. संस्थेस मिळालेल्या या संपूर्ण यशाचे श्रेय हे श्री योगेश्वरी मल्टिस्टेटचे संस्थापक राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेला दिले. तसेच श्री योगेश्वरी मल्टिस्टेटचे उपाध्यक्ष शेख अन्वर शेख वली हसन ,  संचालक सुधाकर हरिश्चंद्र टेकाळे , ऍड लोमटे अनिल संभाजीराव, जाधव विलास सिद्राम, संकाये अप्पासाहेब त्रिंबकअप्पा,ऍड विलास शिवाजीराव लोखंडे, भागवत रामकृष्ण मसने,तसेच शेख मुक्तार फकीर अहमद, संचालिका आशालता विश्वजित वांजरखेडकर,  सौ खडके मंदाकिनी बाजीराव त्याचबरोब...
इमेज
तेजस्वी होण्यासाठी स्वतःला सुर्यासारखं जाळून घ्यायला शिकलं पाहिजे - डॉ.राजेश इंगोले अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)- सूर्य बनने सोपे नाही आपल्याला सुर्यासारखं तेजस्वी व्हायचं असेल तर आधी स्वतःला सुर्यासारखं जाळून घेता आल पाहिजे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी केले. जिजाई इंग्लिश स्कुलच्या विज्ञान प्रदर्शनात ते उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश कदम, सचिव सुरेश कदम, सुशांत कदम, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शीतल मोरे, महावीर गोडभरले, हेमंत धानोरकर, आर डी जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते माजी राष्ट्रपती तथा महान वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम व शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलन व फीत कापून करण्यात आली. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ.राजेश इंगोले यांनी विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांना अनुभव समृद्ध शिक्षण देते. जगात झालेले विविध संशोधन, नवनिर्मिती याचा अभ्यास करून हे प्रयोग प्रदर्शित केले जातात. असे प्रदर्श...
इमेज
परळी शहरातील दोन्ही पोलीस ठाण्यांचा गहाळ मोबाईल तपासकामांचा धडाका ! संभाजीनगर पोलीसांनंतर शहर पोलीसांनीही गहाळ   17 मोबाईल शोधून तक्रारदारांना केले परत  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधण्याची उल्लेखनीय कामगिरी परळीतील दोनही पोलीस ठाण्यांनी केली आहे. नागरिकांकडून मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर शहर पोलीस ठाण्याने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. या तपासादरम्यान १७ मोबाईल परत मिळवून त्यांच्या मूळ मालकांना आज (दि.५) सुपूर्द करण्यात आले. कालच संभाजीनगर पोलिसांनी १३ गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत केलेले आहेत.          पोलीस ठाणे परळी शहर यथे नागरीकांचे मोबाईल गहाळ झाले बाबतच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने या तक्रारींच्या अनुषंगाने गहाळ मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेण्यासाठी  परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  रघुनाथ नाचण यांनी पोलीस अंमलदार कैलास कोलमवाड यांना आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे पोलीस अंमलदार कैलास कोलमवाड यांनी तांत्रिक विश्लेषनाव्दारे श...
इमेज
ज्ञानाला अर्थार्जनाचे साधन बनवणे आवश्यक - प्राचार्य आबासाहेब हांगे अमोल जोशी  / पाटोदा - केवळ विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करून स्वस्थ बसून राहण्यात अर्थ नसतो तर प्राप्त केलेल्या ज्ञानाला अर्थार्जन करण्याचे साधन बनवणे आवश्यक असते. विविध वनस्पतींच्या औषधी उपयुक्ततेचे मिळवलेले ज्ञान विद्यार्थ्यांनी अर्थार्जनासाठी वापरावे असे प्रतिपादन प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे यांनी केले. येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित दोन महिने कालावधीच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्र वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. १ एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रोफेसर अनिता धारासूरकर, प्रोफेसर गणेश पाचकोरे होते. 'फार्माकोग्नोसी अँड इथनोबॉटनी' हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या अभ्यासक्रमात २५ विद्यार्थी सहभागी झाले होते. अभ्यासक्रम यशस्विरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात प्रमाणपत्रे वितरित करण्यात...
इमेज
पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध PTNTS परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पाटोदा / अमोल जोशी......           पाटोदा शहरातील नामांकित असलेल्या वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पाटोदा आयोजित १५ वर्षापासून सुरू असलेला उपक्रम पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर होऊन या निकालामध्ये यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा येथोचित सन्मान सोहळा विद्यालयाच्या भव्यप्रांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.       पी टी एन टी एस प्रज्ञाशोध परीक्षेचा १५ वा बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रगती शिक्षण संस्थेच्या सचिव तथा मार्गदर्शिका सौ सत्यभामाताई रामकृष्ण  बांगर तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण वसंत दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आबासाहेब हंगे हे होते यावेळी प्रमुख उपस्थिती परीक्षा प्रायोजक यश कॉम्प्युटरचे संचालक बाळासाहेब मंडलिक, अजित वालेकर सेवाभावी संस्थेचे संचालक सुजित वालेकर, स्वर्गीय जगन्नाथराव सानप यांच्या स्मरणार्थ प्रा.प्रदीप सानप ग्रामविकास फाउंडेशन येवलवाडी ( ना.) चे संचालक नागरगो...
इमेज
सामाजिक जाणिवेचा दृढ संकल्प: वडिलांच्या पुण्यस्मरनार्थ गावातील प्रत्येक कन्या विवाहासाठी देणार १० हजार रु.अर्थिक सहयोग! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     आपल्या वडिलांचा राजकीय, सामाजिक, धार्मिक वसा जपत आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरनार्थ गावातील प्रत्येक कन्या विवाहासाठी १० हजार रु.अर्थिक सहयोग देण्याचा दृढ संकल्प मुलांनी केला आहे.अवास्तव आणि सवंग खर्चिक उपक्रमांपेक्षा सामाजिक जाणिवेचा दृढ संकल्प टोकवाडी येथील मुंडे बंधुंनी राबविणार असल्याचे जाहीर केले आहे.        परळी परिसरातील नामांकित व विविध सामाजिक उपक्रमात संपुर्ण आयुष्यभर अग्रेसर राहिलेल्या टोकवाडीचे माजी सरपंच स्व. दशरथ ग्यानबा मुंडे (आबा) यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम १ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाला.या निमित्ताने ह.भ.प. विशाल महाराज खोले यांचे दुपारी तसेच रात्रौ गुरुवर्य ह.भ.प.गोपाळ महाराज वास्कर यांचे किर्तन झाले.या कार्यक्रमास नामवंत गायक,वादक, भजनी मंडळ सहभागी झाले. आप्तेष्ट, नातेवाईक, हितचिंतक व स्व.दशरथ आबा यांचे स्नेही, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ साम...