पोस्ट्स

MB NEWS:10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद! मराठा गोलमेज परिषदेत मोठी घोषणा

इमेज
 ‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️                                  -------------------------- 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद! मराठा गोलमेज परिषदेत मोठी घोषणा*                                   -----------------------------------         💥 कोल्हापूर, 23 सप्टेंबर: सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा समाजातर्फे राज्यभर आंदोलनं केली जात आहेत तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात आज (बुधवारी) राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषद झाली.गोलमेज परिषदेत मोठी घोषणा करण्यात आली आहे. येत्या 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी यापुढे 'थोबाड फोडो आंदोलन' करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही, असा इशारा मराठा गोलमेज परिषदेत मराठा समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक यांनी दिला आहे.विजयसिंह महाडिक यांनी सांगितलं की, मराठा समाज आता गनिमी काव्यानं आंदोलन करणार आहे. गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव सर्व सहमतीनं मांडण्यात आले. त्यावर चर्चा सुरू आहे. गोलमेज परिषदेला राज्यभरातील मराठा समाज

MB NEWS:परळी शहराला एक दिवसआड करून पिण्याचे पाणी सोडा―प्रा.विजय मुंडे

इमेज
 * परळी शहराला एक दिवसआड करून पिण्याचे पाणी सोडा―प्रा.विजय मुंडे* *मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी* परळी/प्रतिनिधी...परळी शहराला पाणीपुरवठा करणारे वान धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे चार वर्षापूर्वी वान धरण ओव्हर फ्लो झाले होते परळी शहराला नगरपालिकेच्या वतीने दर पाच दिवसाला पाणीपुरवठा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे केला जात होता परंतु आता वान धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे परळी शहराला एक दिवसाआड करून पाणीपुरवठा करावा व परळी करांची तहान भागवावी अशी मागणी  परळी नगरपालिकेचे  मुख्याधिकारी  यांच्याकडे  निवेदनाद्वारे  परळी मार्केट कमिटीचे  उपसभापती  प्रा. विजय मुंडे  यांनी केली आहे. तसेच शेतीसाठी पाणी मिळणार असल्यामुळे बळीराजा आनंदित झाला आहे.    दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,वान प्रकल्पामध्ये पाणीसाठा हा आगामी काळासाठी आरक्षित सुद्धा राहिला पाहिजे जेणेकरून पिण्याच्या पाण्यासाठी परळी करांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे तसेच शेतकरी सुद्धा आनंदित झाला आहे कारण वान धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतीसाठी सुद्धा  पाणी  मिळणार आहे.     परळीतील सामान्य माणूस हा सर्वस्वी

MB NEWS:वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून १०.७७ कोटींची थकहमी *राजकीय विरोध आपल्या जागी, कारखाना आणि शेतकऱ्यांचे हित महत्वाचे - धनंजय मुंडे*

इमेज
 * वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून १०.७७ कोटींची थकहमी  *राजकीय विरोध आपल्या जागी, कारखाना आणि शेतकऱ्यांचे हित महत्वाचे - धनंजय मुंडे* मुंबई (दि. २३) ---- : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या ३२ सहकारी साखर कारखान्यांना थक हमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बीड जिल्ह्यातील परळी येथील माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास १० कोटी ७७ लाख रुपयांची थक हमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही हमी मिळवून देण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आग्रही मागणी केली होती. एकीकडे एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे देणे थकीत असून दुसरीकडे ऐन विधानसभा निवडणूक काळात कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने कर्मचारी उपोषणाला बसले, त्यामुळे पंकजा मुंडे चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. यावर्षी परळी तालुका आणि परिसरात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर असून कारखाना सुरू होऊन सर्व उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या व अनेक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आपण कारखाना या विषयात राजकारण आणणार नाही, असे धनंजय मुंड

MB NEWS:पीक कर्जाचे शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करणार- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

इमेज
  पीक कर्जाचे शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करणार- जिल्हाधिकारी राहुल रेखावार परळी वैजनाथ ,प्रतिनिधी        पीक कर्जाचे शेतकऱ्यांचे कर्ज घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचे बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधान्याने प्रसिद्धीपत्रक काढून हे जाहीर केले आहे.    जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज मात्र शेतकर्‍यांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी एकदाही कर्ज घेतलेले नाही अशा जुन्या व ज्यांनी कर्ज घेतलेले आहे व जे पुन्हा कर्ज घेण्यास पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी संबंधित बँकेकडे खरीप पीक कर्ज मागणीसाठी 30 सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावेत. जे शेतकरी 30 सप्टेंबर 20 20 पर्यंत अर्ज करतील अशा सर्व शेतकऱ्यांचे अर्ज बँकांनी स्वीकारावेत.जे बँक व्यवस्थापक अर्ज स्वीकारणार नाहीत किंवा स्वीकारण्यास टाळाटाळ करतील अशा बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी व शेतकऱ्यांची माहिती तलाठी व सोसायटी यांच्यामार्फत बँकेला दिलेल्या आह

MB NEWS:केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी कायमस्वरुपी उठवावी मागणीसाठी शेतकरी संघटनेने केले खासदार निवासस्थानासमोर आंदोलन

इमेज
  केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी कायमस्वरुपी उठवावी मागणीसाठी शेतकरी संघटनेने केले खासदार निवासस्थानासमोर आंदोलन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - देशात कांदा निर्यात बंदीचा प्रश्न पेटत असताना केंद्र शासनाने कांदा पिक आवश्यक वस्तू कायद्यातून वगळून शेतकऱ्यांवर आन्याय केला आहे. कांद्यावरील निर्यात बंदी ही कायम स्वरुपी उठवावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने खासदार निवासस्थानासमोर आंदोलन केले.        कांदा निर्यात बंदी व कांदा पिकाला आवश्यक वस्तू कायदा यातून वगळने या निर्णयाच्या विरोधात  शेतकरी संघटनेने आज आंदोलन केले.यावेळी शेतकरी संघटना युवा आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास सोळंके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले व लोकसभेत खासदारांनी आवाज उठवावा अशी मागणी करण्यात आली.    या आंदोलनात अशोकराव नरवडे  ( बीड जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना ) कैलास सोळंके (बीड जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना युवा आघाडी ) अॅड राहुल सोळंके (शेतकरी संघटना परळी तालुका अध्यक्ष)  छञभुज नरसाळे शिवप्रसादअप्पा खेञी  धनंजय मिसाळ सुभाष सोळंके कबी

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस् : आज 197 पॉझिटिव्ह तर 1055 निगेटिव्ह

इमेज
  बीड जिल्हा कोरोना अपडेटस् : आज 197 पॉझिटिव्ह तर 1055 निगेटिव्ह*- ------------ * बीड 52 ,अंबाजोगाई 28, आष्टी 20, धारूर 14, गेवराई 8, केज 17, माजलगाव 17, परळी 21, पाटोदा 12, शिरूर 4 तर वडवणी तालुक्यात 4 रुग्ण

MB NEWS:परळी मधील प्रिया नगर भागात अंधाराचे साम्राज्य

इमेज
  परळी मधील प्रिया नगर भागात अंधाराचे साम्राज्य  परळी वै: दि 22 प्रतिनिधी परळी शहरातील उच्चभ्रू नागरी वस्ती म्हणून ओळख असलेल्या प्रिया नगर भागात मागील एक महिन्यापासून पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.रात्रीच्या वेळी पादचारी अंधारात चाचपडत आपला मार्ग शोधीत असल्याने पावसाळयात अनेक वेळा पाय घसरून लोटांगण घतल्याच्या घटना घडल्या आहेत. परळी शहरात लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वास्तव्य असलेल्या प्रिया नगर हा भाग परळी शहरातील उच्चभ्रू,नोकरदार वर्गाची निवासी वस्ती असलेला भाग असून या भागात नागरिकांची मोठी रहदारी असते. या भागात भगवान विद्यालय ही शाळा देखील असून हा भाग नेहमीच नागरी सुविधा देण्यासंदर्भात दुर्लक्षित राहिलेला आहे.यातच भर म्हणून या भागातील पथ दिवे मागील एक महिन्यापासून बंद आहेत. रात्रीच्या वेळी या भागातून पायी चालणे मोठया जिकरीचे बनले असून रात्री जसे जंगलातून जात आहोत असे वाटते यातच भर मनुन पाऊस पडल्यावर या भागात अनेक वेळा अंधारात रस्ता न दिसल्याने पादचारी पाय घसरून पडल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या बाबतीत विद्युत वितरण कपंनीला विचारणा केली असता त्यांनी न

MB NEWS:राजेश गित्ते यांनी उपोषणाचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागे

इमेज
  राजेश गित्ते यांनी उपोषणाचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागे पिककर्ज देण्याबरोबरच अर्ज स्वीकारण्याचे बॅंकांनी केले मान्य परळी (प्रतिनिधी)  जिल्हाधिकार्यांनी सुचना देवुनही परळी तालुक्यातील शेतकर्यांकडुन पिककर्जासाठी येणारे अर्ज घेतले जात नसल्याने भाजपा जेष्ठ नेते राजेश गित्ते यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी,सरपंच यांचे शिष्टमंडळ तहसिलदारांना भेटुन निवेदन दिले.शेतकर्यांचा हा प्रश्न तातडीने मार्गी लावला नाही तर अमरण उपोषण करण्याचा इशारा राजेश गित्ते यांनी देताच प्रशासन खडबडून जागे झाले.तहसिलदार यांनी बॅंके अधिकार्यांसोबत बैठक घेवुन हा प्रश्न निकाली काढला.यामुळे शेतकर्यांचे पिककर्जासंदर्भातील अर्ज स्विकारले जाणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.  परळी तालुक्यातील जवळपास 30% शेतकर्यांना यावर्षी अद्याप पिककर्ज मिळाले नाही.शेतकर्यांची ही मागणी लावुन धरत भाजपा जेष्ठ नेते राजेश गित्ते यांनी अधिकार्यांशी बोलुन निवेदन देवुन ही मागणी मांडली होती.दि.21 रोजी तालुक्यातील शेतकरी,सरपंच व ज्येष्ठांना सोबत घेवुन तहसिलदार विपीन पाटिल यांना निवेदन देत चर्चा केली व शेतकर्यांची ही मान्य झाली नाही त

MB NEWS:नरेंद्र मोदींचा जगात डंका; सर्वाधिक प्रभावी व्यक्तींमध्ये समावेश

इमेज
 -----------------------------------     ⚫ नरेंद्र मोदींचा जगात डंका; सर्वाधिक प्रभावी व्यक्तींमध्ये समावेश -----------------------------------           अमेरिकेतील प्रसिद्ध मॅगजिन टाइमने (TIME 100 Most Influential List) जगातील 100 प्रभावी व्यक्तिमत्वांची सूची जारी केली आहे. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचाही समावेश आहे. पीएम मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प  यांच्यासह सामील करण्यात आलं आहे. या यादीत सामील भारतीयांमध्ये बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना  गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंदर गुप्‍ता आणि शाहीन बाग आंदोलनातील सहभागी बिल्किस यांचीही नावे आहेत.पीएम टाइम मॅगजिनने पीएम मोदी यांच्याविषयी लिहिलं आहे की, लोकशाहीसाठी सर्वात आवश्यक केवळ स्वतंत्र्यपणे निवडणुका घेणं नाही. कोणाला किती मतं मिळाली केवळ हेच यातून समोर येतं. भारत देश गेल्या 7 दशकांपासून जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारतात 1.3 अरब लोकसंख्येत मुस्लीम, शीख, बौद्ध, जैन आदी विविध धर्मांच्या लोकांचा समावेश आहे.     टाइम मॅगजिनने यापूर्वी आपल्या एका लेखात पीएम मोदीं

MB NEWS: विशेष लेख/अॅड.दत्तात्रय आंधळे:श्री केशवराव कुरुडे एक सेवावृत्ती :लोकांसाठी केला सुकर रस्ता

इमेज
  श्री केशवराव कुरुडे एक सेवावृत्ती : लोकांसाठी केला सुकर रस्ता ------------------------------------- अॅड.दत्तात्रय आंधळे           सेवानिवृति नंतर  घरात बसून वेळ जात नाही .रिकामा वेळ हाती आहे .त्याचा कसा सदुपयोग करावा.यासाठी मनातच निस्वार्थपणे जनसेवा करायची हि उपजतबुध्दी असलेले एक व्यक्तीमत्व म्हणजे श्रीकेशवराव तुळशीराम कुरुडे हे होत. कांहिजण रस्त्यावर कांटे टाकणारे महाभाग आहेत तर काही जण रस्त्यावर पडलेले काटे वेचणारे.त्याचपैकी एक लोकांच्या सुखासाठी दगडधोंडा वेचून सुखमय पंथ करणारे केशवराव कुरुडे!  परळीचे लोकांसाठी सकाळी फिरायला जाणेसाठी सर्वांना जवळचा एकमेव डोंगर म्हणजे नग नारायण किंवा मेरु गिरी होय.श्री वैद्यनाथ मंदिराचे दक्षिण बाजूला  पौराणिक संदर्भ लाभलेला हा डोंगर.डोंगर चढून जाणेसाठी मोठमोठे  दगड- धोंडे आणि दुर्गम रस्ता .ग्रामीण पोलिस स्टेशनपर्यत रस्ता आहे परंतु जेव्हा  डोंगरावर चढून वर सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाही .डोंगरावर पहाटे साडेचार ते पाच वाजलेपासून वयोवृध्द- तरुण आणि लहान मुले तसेच महिला मंडळीची रेलचेल सतत.पाऊस, चिखल,थंडीचे दिवस कशाचाही विचार न करता

MB NEWS:गजर कीर्तनाचा कार्यक्रमात राधाकृष्ण महिला भजनी मंडळ झळकले

इमेज
  गजर कीर्तनाचा कार्यक्रमात राधाकृष्ण महिला भजनी मंडळ झळकले परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.२२- महाराष्ट्राला लाभलेल्या किर्तनपरंपरेला कानाकोपऱ्यात पोचवण्याचे काम झी टॉकीज वरील गजर कीर्तनाचा या कार्यक्रम करत आहे.परळीत असलेल्या संत जगमित्र महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिरात या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले होते.यात शहरातील राधाकृष्ण महिला भजनी मंडळ या कार्यक्रमात झळकले,अनेक किर्तनकरांनी या कार्यक्रमात कीर्तनरुपी सेवा दिली. आपल्या सुमधुर भजनांमुळे सर्वदूर परिचीत असलेल्या शहरातील राधाकृष्ण महिला भजनी मंडळाने गजर कीर्तनाचा कार्यक्रमात सहभाग नोंदविला.महिला कीर्तनकार शिवलीला पाटील यांना भजनी मंडळाच्या ज्योती नागापूरकर व कल्याणी औटी यांनी साथ दिली तर केंद्रे यांनी सादर केलेल्या कीर्तनात रेखा जोशी,माधुरी जोशी यांनी साथ दिली.या कार्यक्रमातील सहभागाने राधाकृष्ण महिला भजनी मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या चित्रीकरणाचे प्रक्षेपण २६ ऑगस्ट व २१,२२ सप्टेंबर रोजी झी टॉकीज या वाहिनीवर सकाळी ७ ते ९ यावेळेत करण्यात आले.प्रतिवर्षी मकर संक्रातिला मंडळातर्फे केला जाणारा देखावाही सर्वांचे लक्ष वेधणारा असतो,

MB NEWS:भगवान भक्तीगडाच्या विकासाची अपूर्ण कामे तातडीने पुर्ण करा - पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

इमेज
 * भगवान भक्तीगडाच्या विकासाची अपूर्ण कामे तातडीने पुर्ण करा - पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* दस-यापूर्वी मंदिराचे काम पुर्ण करण्याची केली मागणी * बीड दि. २२ ----- राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगांव (ता. पाटोदा) येथील भगवान भक्तीगडावरील विकास कामांसाठी आपण मंत्री असताना २ कोटी ३५ लाख रूपये इतका निधी मंजूर केला होता. या निधीतील विकासाची अनेक कामे अद्याप पुर्ण झाली नाहीत. ही  अर्धवट राहिलेली कामे तातडीने पुर्ण करावीत तसेच दस-यापूर्वी मंदिराचे काम पुर्ण करावे आणि यासंदर्भात आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलवावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना एका पत्राद्वारे केली आहे.   मौजे सावरगांव ता. पाटोदा येथे ’भगवान भक्तीगडाची’ उभारणी झालेली आहे. या ठिकाणी राष्ट्रसंत भगवानबाबा यांची भव्य मुर्ती तसेच ध्यान मंदिर व स्मारकाचे काम पुर्ण झालेले आहे. मराठवाडयासह महाराष्ट्रातील ऊसतोडणी मजूरांचे श्रध्दास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून  या गडाकडे पाहिले जाते.  ऊसतोड कामगारांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टातून (वर्गणीतून) ’भगवान भक्तीग

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस्...... आज 137 करोना पेशंटची होणार सुट्टी

इमेज
  बीड जिल्हा कोरोना अपडेटस्...... आज 137 करोना पेशंटची होणार सुट्टी

MB NEWS:भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडी प्रदेश कार्यकारिणीवर ह.भ प भागवताचार्य तथा कीर्तनकार दिलीप महाराज मुसळे यांची निवड

इमेज
  भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडी प्रदेश कार्यकारिणीवर ह.भ प भागवताचार्य तथा कीर्तनकार दिलीप महाराज मुसळे यांची निवड परळी वैजनाथ, प्रतिनिधी.…..       भारतीय जनता पक्ष अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी सुप्रसिद्ध भागवताचार्य कथा कीर्तनकार दिलीप महाराज मुसळे मोळवणकर यांची निवड करण्यात आली आहे. बीड व परभणी जिल्ह्याचे आघाडीचे प्रभारी म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.         ह भ प भागवताचार्य कथा कीर्तनकार दिलीप महाराज मुसळे मोळवणकर हे सर्व परिचित कीर्तनकार आहेत. अध्यात्मिक क्षेत्रात काम करत असताना अध्यात्माबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. संघटनाची शक्ती व अध्यात्मिक चळवळीमध्ये ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. याची पावती म्हणून दिलीप महाराज मुसळे यांची भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र नुकतेच भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी प्रदान केले आहे. त्याचबरोबर भा

MB NEWS:खाजगी डॉक्टरांकडून होणारी कोरोना रुग्णांची हेळसांड थांबवा-चंदुलाल बियाणी

इमेज
  खाजगी डॉक्टरांकडून होणारी कोरोना रुग्णांची हेळसांड थांबवा-चंदुलाल बियाणी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे, ना.धनंजय मुंडे यांना दिले निवेदन परळी (प्रतिनिधी-) राज्यभरात वाढत चाललेली कोरोना रुग्णसंख्या अत्यंत चिंताजनक असून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने चांगले उपचार दिले जात असतांनाच अधिगृहीत करण्यात आलेल्या खाजगी डॉक्टर व रुग्णालयांकडून मात्र कोरोना बाधीतांच्या उपचारासाठी निर्धारित करण्यात आलेल्या दरपत्रकाऐवजी अत्यंत मनमानीपणे शुल्क आकारणी होत असून अ‍ॅडव्हान्स म्हणून लाख ते दीड लाख रुपये जमा करण्याची सूचना चक्क फलक लाऊन केली जात आहे. आरोग्य मित्र, महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष तथा बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंदुलाल बियाणी यांनी रुग्णांची होणारी अडवणूक व आकारण्यात येणारे चुकीचे शुल्क याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांना बियाणी यांनी या बाबत एक निवेदन दिले आहे.  प्रस्तूत निवेदनात आरोग्य मित्रचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी म्हटले आहे की,राज्यभरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी बेडस् अनेक ठिक

MB NEWS:केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी कायमस्वरुपी उठवावी मांडवा येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे परळी तहसीलदार यांना निवेदन

इमेज
  केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी कायमस्वरुपी उठवावी मांडवा येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे परळी तहसीलदार यांना निवेदन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - देशात कांदा निर्यात बंदीचा प्रश्न पेटत असताना केंद्र शासनाने कांदा पिक आवश्यक वस्तू कायद्यातून वगळून शेतकऱ्यांवर आन्याय केला आहे. कांद्यावरील निर्यात बंदी ही कायम स्वरुपी उठवावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा.अशा आशयाचे निवेदन परळी तहसीलदार यांना देण्यात आले. जिल्हातील सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या परळी तालुक्यातील मांडवा येथील शेतकऱ्यांनी आज कांदा निर्यात बंदी व कांदा पिकाला आवश्यक वस्तू कायदा यातून वगळने या निर्णयाच्या विरोधात परळीचे तहसीलदार डाँ.बिपीन पाटील यांना देण्यात आले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा केंद्र सरकार पर्यंत पोहचाव्यात आशी विनंती उपस्थित शेतकऱ्यांनी केली.यावेळी मांडवा येथील कांदा उत्पादक शेतकरी मोहन साखरे ,प्रमेश्वर साखरे, भाऊसाहेब मुंडे ,मच्छिंद्र मुंडे ,कारभारी मुंडे आदी उपस्थितत होते

MB NEWS:नरेंद्र मोदी सरकारच्या नवीन कृषी विधेयकामुळे कृषी क्षेञातील दलाला ची मक्तेदारी मोडीत निघणार -- उत्तम माने

इमेज
  नरेंद्र मोदी सरकारच्या नवीन कृषी विधेयकामुळे कृषी क्षेञातील दलाला ची मक्तेदारी मोडीत निघणार -- उत्तम माने   भाजपा किसान मोर्चा ने नरेंद्र मोदी यांना पाठवले अभिनंदन पत्र प्रतिनिधी(परळी) भाजपा किसान मोर्चा च्या वतीने परळी येथे लोकनेत्या पंकजा ताई मुंडे व खासदार प्रितम ताई मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली  उपविभागीयअधिकारी यांच्या मार्फत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिनंदन पत्र पाठवण्यात आले. *केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभे मध्ये मंजूर केलेले तिन्ही विधेयक हे शेतकऱ्यांच्या हिताचे असून यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची हमी, किमतींची हमी  व कृषी प्रक्रिया प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर  गुंतवणुकीत वाढ होणार असुन पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सरकारच्या नविन कृषी विधेयकामुळे कृषी क्षेञातील दलालाची मक्तेदारी मोडीत निघणार असल्याचे स्वागत पत्रात नमूद केले आहे.*           *कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य( प्रोत्साहन आणि सुविधा) विधेयकामुळे* बाजार समितीची कोणतेही बंधन शेतकऱ्यांना राहणार नाही. त्यामुळे शेतकरी आपला शेतमाल थेट शहरात, विविध मॉल व प्रक्रिया केंद्र यांना विकू शकतो. तसेच आंतरराज्यीय आणि

MB NEWS:परळीत संशयीत चोर पोलीसांनी पकडला पण हात झटकून गेला पळून

इमेज
  परळीत संशयीत चोर पोलीसांनी पकडला पण हात झटकून गेला पळून परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      सोमवार बाजारात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस बाजाराच्या दिवशी लक्ष ठेवून आहेत.आज बाजारपेठेत गस्तीवर असतांना एक युवक संशयास्पद वाटल्याने पोलीसांनी त्याला पकडले.परंतु काही वेळाने पळून जाण्यात हा संशयीत यशस्वी ठरला आहे.त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.       सोमवारी बाजारात गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल,पर्स चोरीच्या घटना मंध्यंतरी वाढलेल्या बघायला मिळाल्या.या अनुषंगाने पोलीस बाजाराच्या दिवशी प्राधान्याने लक्ष ठेवून आहेत.या संदर्भाने एक युवक संशयास्पद वाटल्याने त्यास पकडले खरे परंतु पोलीस कर्मचारी यांच्या हाताला झटका देत या संशयीताने झुंगारा दिला.पोलीस त्याच्या पाठलाग करण्यासाठी धावले पण तो संशयीत पळून जाण्यात यशस्वी ठरला.आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

MB NEWS:मराठा आरक्षण तात्काळ लागू करा व पोलीस भरती तात्काळ थांबविण्यात यावी या मागणीसाठी आज सिरसाळा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले

इमेज
  मराठा आरक्षण तात्काळ लागू करा व पोलीस भरती तात्काळ थांबविण्यात यावी या मागणीसाठी आज सिरसाळा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले...  सिरसाळा ,प्रतिनिधी... ,मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाजाने आज शांततेच्या मार्गाने निवेदन दिले आहे मात्र आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यास समाजाच्या भावनांचा उद्रेक होईल त्यास फक्त सरकार व प्रशासन जबाबदार असेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चा वतीने सिरसाळा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे. यावेळी उपस्थित बाळासाहेब गरड, अशोक देशमुख,कृष्णा शेंडगे,अर्जुन काळे, किरण देशमुख,योगेश गरड, किरण उंबरे,मेघराज करपे,तेजेश वाघमारे, बाळासाहेब घोडके, अदी समाज बांधव उपस्थित होते.  स्थगिती उठेपर्यंत राज्य सरकारने पोलीस किंवा अन्य नोकरभरती करू नये. आज शांततेच्या मार्गाने निवेदन दिले आहे मात्र मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्यास केवळ सरकारच जबाबदार असेल.  बाळासाहेब गरड,  तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड परळी वै.)

MB NEWS:मराठा आरक्षणासाठी राज्यातील पहिला जिल्हा आज बंद, टायर पेटवून आंदोलनाला सुरुवात

इमेज
 🛑 मराठा आरक्षणासाठी राज्यातील पहिला जिल्हा आज बंद, टायर पेटवून आंदोलनाला सुरुवात सोलापूर, 21 सप्टेंबर : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज नाराज झाला आहे. आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय न आल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. आज सोलापुरात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातली आंदोलनाची पहिली ठिणगी माढ्यात पडली आहे. माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडेपाच वाजताच टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतरचा मराठा संघटनांनी पुकारलेला राज्यातील हा पहिलाच बंद असणार आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, माढ्यातील तरुणांनी भल्या पहाटेच एक मराठा लाख मराठाच्या घोषणा

MB NEWS:विशेष लेख:प्रिय नवरोबा : लेखिका- • कु.मंजुश्री सुरेश घोणे

इमेज
विशेष लेख:प्रिय नवरोबा                                         • कु.मंजुश्री सुरेश घोणे प्रिय नवरोबा , प्रिय वाचून मनात हसला असशील आणि म्हणालाही असशील आज हिला वेड लागलं की काय ? पत्र लिहिले आहे.  पत्रास कारण तुझ्या चेहऱ्यावर आलेलं हे गोड हसू पाहून मी मनोमन सुखावते म्हणून तर तू जाताना तुझ्या खिशात हे पत्र ठेवलं. सप्राईज द्यायचे आणि तुझे गोड हसू पाहण्याचे क्षण फार कमी वेळा मिळतात ना आम्हाला तुझ्या नोकरीमुळे आता आजचंच तुझा वाढदिवस आहे पण तू आमच्या सोबत नाहीस  तर समाजाची सेवा करत भर तळपत्या उन्हात उभा असशील खाकी वर्दी मास्क आणि सॅनिटायझरही सोबत घेऊन. आज कोरोना आजार आलाय म्हणून तू आमच्या सोबत नाहीस असं तर मुळीच नाही. कारण लग्न झाल्यापासून तुझा एकही वाढदिवस आपण त्याच दिवशी साजरा करू शकलो नाहीत. मुलांची नेहमीच इच्छा असायची की बाबाने त्यांच्या वाढदिवसा दिवशी केक कापावा पण ते शक्य नाही झाले. कधीकधी तर तू मुलांच्या वाढदिवसाला ही नसतोस हिरूमुसतात बिचारी पण आता त्यांना कळतंय की आपला बाबा समाजातील वाईट प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी जन्मालाय. समाजाप्रती कर्तव्य हे त्यांच प्रथम प्राधान्य असणार आहे.

MB NEWS: प्रासंगिक लेख/डॉ.अरुण गुट्टे:साधु ओळखावा मरणी.

इमेज
साधु ओळखावा मरणी 🙏             ●  डॉ. अरूण गुट्टे,परळीवै.             वै.ह.भ.प. निर्गुण महाराज कातकडे ,उंडेगाकर यांना नुकतीच देवज्ञा झाली आणि सारा वारकरी संप्रदाय हळहळला. निर्गुण  महाराज हे साऱ्या वारकऱ्यांचे भुषण होते.पंढरपुरचा पांडूरंग  हे आनंद प्रतितीचे व्यक्त रुप आहे ज्यांच्या संगतीत आनंद प्रतिती प्रेमप्रतीती भोगता येते तो पंढरीचा निका वारकरी  .          निर्गुण महाराज यांची बालपणापासून ईश्वरनिष्ठा असल्यामुळे  त्यांना अनेक संताचा सहवास लाभला, त्यांचे वडील हे पण निष्ठावंत वारकरी होते .त्यांचे गुरु वै.मारोती महाराज दस्तापुरकर. लहानपणी त्यांनी जवळजवळ १२ वर्षे म्हणजे एक तप मारोती महाराजांची गाडी चालवुन त्यांची सेवा केली लहानपणीच त्यांना मिळालेल्या संतसंगामुळे त्यांच्या जीवनावर असा परिणाम झाला कि ते संत झाले, दासांचे दास झाले, आळीची भींगुरटी झाली .          त्यांच्या जीवनात संतसंगामुळे हे परीणाम झाले हे म्हणन बरोबर आहे तरी पण अनेकजण संतसंगती भेटुन सुध्दा संतपदाला जात नाहीत. कोंडोपंत हे तुकाराम महाराजांचे १४ टाळकर्‍यापैकी एक . ते सतत तुकाराम महाराजांच्या सहवासात  होते .पण त्यांना याञेसा

MB NEWS:अन्यथा कोयता चालणार नाही

इमेज
  ऊसतोड कामगारांना सन्मानजनक वाढ द्या, अन्यथा कोयता चालणार नाही पंकजाताई मुंडे यांची साखर संघाच्या बैठकीत आग्रही  मागणी _विमा कवच, कोरोना सुरक्षा यावरही केल्या सूचना_ मुंबई दि. २१ ------ राज्यातील ऊसतोड कामगारांना मजूरीच्या दरात सन्मानजनक वाढ मिळावी यासाठी ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज साखर कारखाना संघाच्या बैठकीत आग्रही भूमिका मांडली. मजूरांना वाढ न दिल्यास कोयता चालणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.    राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालक मंडळाची बैठक आज साखर भवनात पार पडली. पंकजाताई मुंडे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे या बैठकीत सहभाग घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून मागणी संदर्भातील आलेल्या निवेदनांवर यावेळी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.    राज्यातील तमाम ऊसतोड मजूरांची मजूरीच्या दरात वाढ मिळावी आणि ही वाढ सन्मानजनकच  मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे पंकजाताई म्हणाल्या. त्यासाठीचा करार हा तीन वर्षाचाच होईल. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूरांना विमा कवच द्यावे, त्याची जवाबदारी राज्

MB NEWS:पावसाने नुकसान झालेले सोयाबीन घेऊन शेतकरी पोहोचले तहसीलला ; पंचनामे नाही झाले तर करणार उपोषण ! पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकर न्याय द्या- राजेश गित्ते

इमेज
  पावसाने नुकसान झालेले सोयाबीन घेऊन शेतकरी पोहोचले तहसीलला ; पंचनामे नाही झाले तर करणार उपोषण ! पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकर न्याय द्या-  राजेश गित्ते परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    पावसाने नुकसान झाल्याचे तातडीने पंचनामे करावे या मागणीसाठी पावसाने नुकसान झालेले सोयाबीन घेऊन शेतकरी  तहसीलला पोहोचले.पंचनामे तातडीने नाही झाले तर  उपोषण करणार असल्याचा इशारा राजेश गित्ते यांच्या सह शेतकऱ्यांनी दिला आहे.        याबाबत तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक निबंधक विमा कंपनी यांना शेतकर्यांनी  निवेदन दिले आहे.यासंदर्भाने तसेच पीककर्ज व अन्य मुद्द्यांवर तहसीलदार यांनी उद्या बँक अधिकारी यंची बैठक बोलावली आहे.दरम्यान शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे संबंधित विभागाला आदेश देण्यात आले आहेत.शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाहीतर तहसील कार्यालय समोर उपोषणाला बसणार असल्याचे भाजपचे नेते राजेश गित्ते यांनी म्हटले आहे.

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.२१ दुपारी १२.०० वाजता प्राप्त अहवाल....

इमेज
  बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.२१ दुपारी १२.०० वाजता प्राप्त अहवाल.... जिल्ह्यात तब्बल १३३ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. ९५५ अहवाल प्राप्त झाले. परळीत २४ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. जिल्ह्यात ८२२ रिपोर्ट निगेटिव्ह.