MB NEWS-परळी वैजनाथ: चरणार्या शेळ्यातून दोन पाठी व एक बोकड पळविले!
परळी वैजनाथ: चरणार्या शेळ्यातून दोन पाठी व एक बोकड पळविले! प रळी वैजनाथ: प्रतिनिधी... नदीकाठी शेळ्यांचा कळप चरण्यासाठी सोडलेला असताना त्यापैकी दोन पाठी व एक बोकड पळविले असल्याची घटना घडली आहे.परळी तालुक्यातील सारडगाव शिवारातील कुतरढवा जवळ ही घटना घडली असुन याप्रकरणी काल दि.४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 🏵️ *परळीत भरलं विज्ञान प्रदर्शन.... चिमुकल्यांच्या कल्पना शक्तीला वाव. याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी वाल्मिक महादु केंद्रे या.सारडगाव यांची पत्नी आपल्या सोळा शेळ्यांचा कळप चरण्यासाठी रानात गेलेल्या होत्या.सारडगाव शिवारातील नदीकाठी कुतरढवाजवळ या शेळ्यांचा कळप चरत होता.यावेळी कोणीतरी अज्ञात चोराने या शेळ्यांमधिल दोन पाठी व एक बोकड पळविले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सफौ गित्ते हे करीत आहेत . •••••••••• •••••••••••• •••••••••••• •••••• •••••• •••••• ...