MB NEWS-३३ महिन्यांपासून बंद असलेली परळी मार्गावरील पुणे-अमरावती एक्सप्रेस सुरु
.jpeg)
३३ महिन्यांपासून बंद असलेली परळी मार्गावरील पुणे-अमरावती एक्सप्रेस सुरु परळी : ३३ महिन्यांपासून बंद असलेली परळी मार्गावरील पुणे-अमरावती एक्सप्रेस सुरु झाली आहे.यामुळे आता प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. पुणे-अमरावती एक्सप्रेस रेल्वे गाडी चे शनिवारी सकाळी आठ वाजता परळी रेल्वे स्टेशनमध्ये आगमन झाले. ही रेल्वे गाडी पूर्वीप्रमाणे परळी मार्गे अमरावतीकडे धावली. या रेल्वेगाडीमुळे पुण्याहून परळीला येणाऱ्या प्रवाशांची सोय झाली. तसेच अमरावतीहून परळीमार्गे परत पुण्याला जाणाऱ्या अमरावती -पुणे या रेल्वे गाडीमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे 22 मार्च 2020 पासून पुणे- अमरावती व अमरावती -पुणे एक्सप्रेस गाडी तब्बल 33 महिने बंद होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. नांदेड- पनवेल ही पुण्याला परळी मार्गे धावणारी रेल्वेगाडी नेहमी फुल्ल असते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय व्हायची. आता ही गैरसोय दूर झाली आहे. आठवड्यातून दोन दिवस पुणे -अमरावती आणि अमरावती- पुणे रेल्वेगाडी सुरु झाली आहे. या निर्णयाचे प्रवाशांकडून...