MB NEWS-परळीत साकारणार 'सेवागड़':सोमवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन
*बोले तैसा चाले... ना.धनंजय मुंडेंनी केली बंजारा समाज बांधवांना दिलेल्या शब्दाची पूर्ती* परळीत साकारणार 'सेवागड़':सोमवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन ⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛ परळी (दि. 19) - : बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, या उक्तीप्रमाणे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाला दिलेल्या शब्दाची पूर्तता केली आहे. परळी शहरातील बसवेश्वर कॉलनी परिसरात बंजारा समाजासाठी स्वतंत्र व सुसज्ज अशा सभागृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. 'सेवागड़' या नावाने उभारण्यात येणाऱ्या या सभागृहाच्या निर्माणसाठी ना. धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास विभागा कडून २५१५ या हेड मधून 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. या सभागृहाच्या बांधकामाचे सोमवार दि. 21 फेब्रुवारी रोजी ना. मुंडे यांच्या हस्ते व पोहरादेवी गड महंत जितेंद्र महाराज व मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात येणार आहे. 🏵️ *शिवरायांना कलात्मक वंदन:युवा चित्रकाराचे सर्व स्तरातून कौतुक.* परळी मतदारसंघातील बंजारा समाज बांधवांना विविध धार...