पोस्ट्स

कारवाई लेबलसह पोस्ट दाखवत आहे

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-पाचेश रुपयांची लाच घेताना पं.स.ची महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

इमेज
  पाचेश रुपयांची लाच घेताना पं.स.ची महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात  पाटोदा , आहिल्यादेवी होळकर, जलसिंचन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे सांकेतिक क्रमांक घेण्यासाठी पाटोदा पंचायत समितीतील सहायक कनिष्ठ महिलेने हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडतोजडअंती पाचशे रुपये स्विकारताना बीड एसीबीने सोमवारी (दि.11) रंगेहाथ पकडले. या कारवाईने खळबळ उडाली आहे.  श्रीमती मिरा विलास नागरगोजे (वय 39) या पाटोदा पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदाराकडे  त्यांच्या वडीलांच्या नावावरील आहिल्यादेवी होळकर, जलसिंचन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे सांकेतिक क्रमांक घेण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती पाचशे रुपये लाच स्विकारताना नागरगोजे यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, हनुमान गोरे, भरत गारदे, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली आहे. 

MB NEWS-परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाची गुटख्यावर कारवाई

इमेज
परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाची गुटख्यावर कारवाई दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी;२लाख ११ हजाराचा गुटखा जप्त:४ चार जणां विरुद्ध गुन्हा: एक अटक ३ मोकाट परळी वैजनाथ, प्रतिनिधी... पंकज कुमाववत यांच्या पथकाने परळी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत २ लाख ११ हजार रु. चा गुटखा ताब्यात घेतला असून यात एक जण ताब्यात घेतला आहे ;तर अन्य तिघे फरार झाले आहेत.            पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,परळी येथे सुभाष चौकातील सरस्वती शाळेच्या बाजूला असलेल्या राधेश्याम मुरलीधर लाहोटी यांच्या राघव इन्टरप्राजेस या किराणा मालाच्या दुकानात गुटख्याचा साठा करून ठेवला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळताच; त्यांनी धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते, अनिल मंदे, राजू वंजारे व गृहरक्षक दलाचे जवान पवार यांनी राधेश्याम मुरलीधर लाहोटी यांच्या दुकानात छापा मारला. त्या छाप्यात परळी येथील सुभाष चौकातील सरस्वती शाळेच्या बाजूला असलेल्या राधेश्याम मुरलीधर लाहोटी यांच्या दुकानात धाड टाकली. त्या धाडीत पोलीस पथकाला ग...

MB NEWS-पंकज कुमावत यांच्या पथकाने टाकली धाड : ४९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात

इमेज
  सावधान ! आपण कोणते दुध वापरतो ? केमिकल पावडर पासून होतेय बनावट दुध निर्मिती ! पंकज कुमावत यांच्या पथकाने टाकली धाड : ४९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात केज :- पाटोदा तालुक्यात केमिकल पासून बनावट व आरोग्याला हानिकारक असे दुध तयार करून ते दुधात मिसळून ते डेअरीवर विक्री करीत असल्या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने कार्यवाही केली.          पाटोदा तालुक्यातील नागेशवाडी येथे पावडर पासून दुध आप्पासाहेब हरिभाऊ थोरवे हे केमिकल पावडर पासून मानवी आरोग्याला धोकादायक असे दूध तयार करून ते बनावट दूध त्यांच्या जवळील दुधात मिसळून दूध डेअरीवर विक्री करीत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांच्या पथकातील बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजू वंजारे, विकास चोपणे, महिला पोलीस नाईक आशा चौरे यांना कार्यवाहीचे आदेश दिले. दि. २५ मार्च शुक्रवार रोजी सकाळी ७:०० वा. पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पोलीस पथकाने नागेशवाडी येथे  बनावट व मानवी आरोग्यास धोकादायक दूध बनवीत असलेल्या ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!