MB NEWS:अट्टल मोटारसायकल चोर जेरबंद; जिल्हा व जिल्ह्याबाहेर चोरी केलेल्या ९मोटारसायकली हस्तगत

अट्टल मोटारसायकल चोर जेरबंद; जिल्हा व जिल्ह्याबाहेर चोरी केलेल्या ९मोटारसायकली हस्तगत परळी वैजनाथ, प्रतिनिधी... मोटारसायकल चोरी करून त्या विक्री करणार्या एका अट्टल मोटारसायकल चोराला जेरबंद करण्यात परळी पोलीसांच्या डीबी शाखेच्या पोलिस पथकाला यश मिळाले आहे.या चोराकडून जिल्हा व जिल्ह्याबाहेर चोरी केलेल्या ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परळी शहरात तहसील समोरील मैदानावरुन शेख शाहेद वाजेद यांची मोटारसायकल चोरीला गेली होती.याबाबतचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल आहे.या गुन्ह्यात तपास सुरू असताना गुप्त माहिती मिळाल्यानंतर संशयित म्हणून मरळवाडी ता.परळी येथील राहणार आरोपी राजाभाऊ रतन ताटे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने मोटारसायकल चोरी केल्याचे मान्य केले.अधिक तपास केला असता त्याने बीड जिल्ह्यात व अन्य नाशिक, जळगाव, पुणे येथे ही चोर्या केल्याचे त्याने कबुल केले.तसेच चोरी करून आणलेल्या मोटारसायकली विक्री ला ग्राहक मिळाले नाही त्यामुळे मरळवाडी शिवारात झाडा झुडुपांमध्ये लपवून ठेवल्याचे उघड झाले.पोलीसांनी ...