छायाचित्रकार नेमका कोण असतो?

छायाचित्रकार नेमका कोण असतो? #जोशींचीतासिका असं म्हणतात एक चित्र हजारो, लाखो शब्दांपेक्षा सरस असतं. चित्र प्रकारात पेंटिंग, व्यंगचित्र, छायाचित्र असे वेगवेगळे प्रकार आहेत. सगळे आपापल्या परीने तितकेच ताकदवान आहेत. थोडक्यात आपल्या भावनांना आणि आजूबाजूच्या परिसराला नेमकेपणाने त्याच्या नजरेतून टिपणारा एक जादूगार म्हणजे छायाचित्रकार. आजही मी जेव्हा माझ्या घरी असलेला अल्बम उघडतो तेव्हा तो काळ नजरेसमोर वेगवेगळ्या भावभावनांना सोबत घेऊन एक भावविश्व उभे करतो. सर्व प्रथम माझे ज्यांनी ज्यांनी आजवर छायाचित्रे काढले असतील त्या ज्ञात अज्ञात मंडळींना त्या अनमोल ठेव्यासाठी प्रणाम व धन्यवाद. व्यंगचित्रांचा प्रभावी वापर करून शिवसेना नावाचा अंगार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातला. तितकीच ताकद छायाचित्रात असते. हिरोशिमा नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याने झालेले जागतिक परिणाम विषद करायला एकचं छायाचित्र पुरेसं होतं. वेगवेगळ्या आंदोलनात एक क्षण असा असतो जो कॅपचर करायला अख्ख आयुष्य पणाला लावणारे छायाचित्रकार होऊन गेले. खासकरून वाईल्ड लाईफ फोटोग्राफर तर कमालीचे धाडसी आणि तितकेच संयमी म्...