MB NEWS-श्रीमती सुनिता कोम्मावार-दिक्कतवार लिखित 'बापमाणसं' (कूळकथा) व 'अंतरंग' (कविता संग्रह) या दोन पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळा

श्रीमती सुनिता कोम्मावार-दिक्कतवार लिखित 'बापमाणसं' (कूळकथा) व 'अंतरंग' (कविता संग्रह) या दोन पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळा परळी वैजनाथ (प्रतिनिधी): येथील लेखिका व अभिजात कवयित्री श्रीमती सुनीता कोम्मावार-दिक्कतवार यांच्या 'बापमाणसं' (कूळकथा) व 'अंतरंग' (कविता संग्रह) या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मराठवाडा साहित्य परिषद परळी वैजनाथ मार्फत आयोजित करण्यात आला आहे. परळी येथील स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,(काळाराम मंदिर), अंबेवेस या ठिकाणी रविवार दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी ११ वा. होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.चंदुलाल बियाणी (अध्यक्ष,म.सा.प., परळी वैजनाथ) असून श्रीमान प्रभाकर साळेगावकर (सुप्रसिद्ध लेखक, कवी, कलाकार व वक्ते माजलगाव) व माननीय सौ. अरुणा दिवेगावकर (सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री,लातूर) यांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख निमंत्रित म्हणून ह.भ.प. डॉक्टर श्री. तुकाराम महाराज मुंडे शास्त्री (सुप्रसिद्ध कीर्तनकार, लेखक व वक्ते परळी वैजनाथ) उपस्थित राहणार असून, नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव मा.श्री....