MB NEWS- *सात्विकभाव हा आदर्श जीवनप्रणालीचा पाया - ह.भ.प.बाळकृष्ण महाराज वसंतगडकर*
*सात्विकभाव हा आदर्श जीवनप्रणालीचा पाया - ह.भ.प.बाळकृष्ण महाराज वसंतगडकर* परळी वैजनाथ ।प्रतिनिधी....... गीता -भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे असे संतप्रमाण आहे. त्या अनुषंगाने विचार करता संतसंग जीवनाचे परिवर्तन घडवून आणणारा असतो. यासाठी अध्यात्मिक बैठक गरजेची असुन सात्विकभाव व अध्यात्मिक संगती आदर्श जीवनाची पायाभरणी करणारी असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. बाळकृष्ण महाराज वसंतगडकर(सातारा) यांनी केले. परळी तालुक्यातील नंदनज येथील बाबुराव पंढरीनाथ आघाव व जिल्हा परिषद सदस्य प्रा.मधुकर आघाव यांच्या मातोश्री सौ.पंचफुलाबाई पंढरीनाथ आघाव यांच्या गोडजेवणाच्या कार्यक्रमानिमित्त दि. 19 नोव्हेंबर रोजी किर्तन महोत्सव झाला. दुपारी 1 ते 3 वा. बाळकृष्ण दादा वसंतगडकर (सातारा) यांचे किर्तन झाले. याप्रसंगी त्यांनी विविध दृष्टांत व अमोघ वाणीतून तत्त्वचिंतन मांडले.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या "स्वगत सच्चिदानंद मिळोनी, शुध्द सत्वगुणे विणली रे, षड्गुण गोंडे रत्नजडीत तुज, श्यामसुंद...