पोस्ट्स

रासेयो लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-एन.एस.एस. शिबिरात रंगले निमंत्रितांचे कविसंमेलन

इमेज
 "रात्र रात्र जागतेस काळजीत तू सदा,चांदणे नभातले कधीतरी फिरून बघ "..…...!  एन.एस.एस. शिबिरात रंगले निमंत्रितांचे कविसंमेलन         परळी , दि 25/03/2022 (प्रतिनिधी ) कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळी वैजनाथचे एन. एस. एस. शिबीर मिरवट येथे चालू आहे. संस्थेचे अध्यक्ष , मा. संजय देशमुख , सचिव रवींद्रजी देशमुख , कोषाध्यक्ष - प्रा.प्रसाद देशमुख , प्राचार्य डॉ. एल . एस . मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार चालू असलेल्या या एन.एस.एस. शिबिराच्याअंतर्गत आज  दुपारच्या सत्रात निमंत्रितांचे  कविसंमेलन आयोजित केले होते. त्यात कवी अरुण पवार ,दिवाकर जोशी ,सिद्धेश्वर इंगोले या कवींनी सहभाग नोंदविला.आपल्या गोड गळ्याच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असलेल्या कवी अरुण पवार यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून हास्याचे तुषार उडवत उडवत अंतर्मुख करायला लावणाऱ्या सामाजिक कविताही सादर केल्या. ' पांढरं सोनं पिकवलं का मातीमोल विकू  मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू '     या त्यांच्या प्रसिद्ध कवितेबरोबरच नवीन गझल , शेतकरी स्त्रीची दुःख व्यक्त करणारी पण आशावादी असलेली कविता '

MB NEWS-राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर

इमेज
  राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर परळी वै. (प्रतिनिधी) : शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील मौजे ब्रह्मवाडी येथे (दि.२४) मार्च बुधवार रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.         तालुक्यातील मौजे ब्रह्मवाडी येथे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सात दिवसीय विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून (ता.२४) मार्च रोजी मौजे ब्रह्मवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना व आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक व गावकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते यामध्ये रक्त तपासणी विविध आजारांवर मोफत औषध उपचार देण्यात आले.  मोफत आरोग्य तपासणी शिबिरात  आरोग्य विभागातील डॉ.शुभांगी मुंडे , डॉ अमित मलिशे , राजू चव्हाण