पोस्ट्स

नोव्हेंबर ५, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खा.डाॅ.प्रीतम मुंडेंच्या प्रयत्नाला यश परळी-परभणी रेल्वे मार्गाचे

इमेज
खा.डाॅ.प्रीतम मुंडेंच्या प्रयत्नाला यश     परळी-परभणी रेल्वे मार्गाचे लवकरच दुहेरीकरण परळी- परभणी या मार्गाचे दुहेरीकरण करावे, या मागणीला आता यश आले आहे. लवकरच परळी- परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. परळी वैजनाथ - परळी- परभणी या मार्गाचे दुहेरीकरण करावे, या मागणीला आता यश आले आहे. लवकरच परळी- परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. परळी-परभणी या मार्गावरुन परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला, नागपूर, अमरावती व लातूर, हैदराबाद, तिरुपती, बिदर, कोल्हापूर, पंढरपूर, पुणे, मुंबई आदी ठिकाणी रेल्वे धावतात. या १६ च्यावर एक्स्प्रेस व पॅसेंजर, मालवाहतूक रेल्वेची ये-जा असते. मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करतात. मात्र, या रेल्वे कधीही वेळेवर धावत नाहीत. परभणीहून येणाऱ्या रेल्वे जवळच असलेल्या वडगाव निळा येथे तासनतास सिग्नलची वाट पाहत थांबवल्या जातात. या रेल्वे स्थानकावरून परळी दिसते; पण तास -दिडतास सिग्नल मिळेपर्यंत रेल्वे येथे थांबतात. परळीहून रेल्वे निघण्याच्या अगोदरपासून ती या स्थानकावरून पुढे जाईपर्यंत रेल्वेला याच स्थानकावर थांबवले जाते. तर, गंगाखेड येथून रेल्व...

हवामान बदलावर आधारित 'शेती' या विषयावर शेतकरी-विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रमास प्रतिसाद

इमेज
 हवामान बदलावर आधारित 'शेती' या विषयावर शेतकरी-विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रमास  प्रतिसाद  अंबाजोगाई (प्रतिनीधी)       हवामान बदल व जागतिक तापमान वाढ हे आज अत्यंत महत्वाचे विषय असून त्यानुसार शेतीमध्ये हवामान बदलावर आधारित आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन पिकांचे नियोजन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. हवामानात होणारा बदल जसे की हरितगृह वायू च्या उत्सर्जनात होणारी वाढ यामध्ये कार्बन डायऑक्साइड, मिथेन, क्लोरोफ्लोरो कार्बन, नायट्रस ऑक्साईड या वायुंचा समावेश होतो.ओझोन थराचा ऱ्हास, तापमान वाढीचा परिणाम म्हणून समुद्र पाणी पातळीमध्ये होणारी वाढ, पावसाचे असमान वितरण, वादळे, पुर,अतिवृष्टी, जंगलतोड, वाढते शहरीकरण, इंधनाचा अतिवापर, दुष्काळ, शेतीमध्ये असंतुलित खतांचा व औषधांचा वाढता वापर इत्यादी कारणांमुळे हवामानात होणारा बदल व त्यामुळे शेती तसेच मानवावर होणारे दुष्परिणामांचा सामना सर्वानाच करावा लागेल, तेव्हा हवामान आधारित शेती व्यवस्थापन करुन वरील समस्या काही प्रमाणात नक्कीच कमी करता येतील. दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई मार्फत निक्रा प्रकल्प...

किसान सभा पुन्हा रस्त्यावर

इमेज
बलीप्रतिपदेच्या पूर्वदिनी बळीराजाचा आक्रोश ◆शेतकऱ्यांच्या विविध मागणीला घेऊन किसान सभा पुन्हा रस्त्यावर परळी / प्रतिनिधी सर्व प्रजेला समतेची अन् ममतेची वागणूक देणाऱ्या व प्रजेच्या सुखातच स्वतःचे सुख मानणाऱ्या महाबली बळीराजाच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून बलिप्रतिपदेच्या पूर्व दिनी दि. १३ नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी ११ वा. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा बळीराजाच्या मिरवणुकीसह बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर ह.भ.प श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे बळीराजाच्या जीवनावर कीर्तन आंदोलन करण्यात येणार असून या कीर्तन आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन किसान सभेकडून करण्यात येणार आल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ.एड अजय बुरांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सत्ता सिंहासनावर बसलेले आधुनिक वामन सर्वपरी सर्वसामान्य रयतेला छळत आहेत, आणि बळीचा वारसा जपणारा खरा शेतकरी मात्र अस्तित्वासाठी धडपडत आहे.सत्ताधारी शेतक-यांचा पुळका दाखवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणाबाजी करतात वास्तवात मात्र उत्पादन खर्चात दुपटीपेक्षा जास्त वाढ...

मार्गदर्शन शिबिर

इमेज
  अवयवदान हे जीवनदान -डॉ. सुनील कुलकर्णी नांदेड प्रतिनिधी (दिनांक १० नोव्हेंबर २०२३) अवयवदान जनजागृती उपक्रमा अंतर्गत दिनांक 9 नोव्हेंबर 23 रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर मयूर विहार कॉलनीत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  श्रीनिवासजी इनामदार (सेवानिवृत्त मुख्य अभियंता एम एस ई बी) होते तर  प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून डॉ .सुनील कुलकर्णी (अति दक्षता विभाग प्रमुख, अश्विनी हॉस्पिटल नांदेड) व  ज्योतीताई पिंपळे ( नेत्र दान समुपदेशक गुरुगोविंद सिंग जी स्मारक रुग्णालय नांदेड) व जेष्ठ नागरिक  चक्रधरजी साले हे उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरेल सुरुवात सौ.  सुरेखा गाजरे यांच्या गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते  दीप प्रज्वलन व दिवाळी निमित्त धनाची देवता महालक्ष्मी चे  प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर मार्गदर्शन करताना  "आपल्या संस्कृतीमधे दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.दानशुर कर्ण हे आदर्श उदाहरण आहे. अन्नदान, विद्यादान, रक्तदान, विधायक व सामाजिक कार्यासाठी संपत्तीचे दान हे तर महत्वाचे आहेच पण सर्वात श्रेष्ठ दान नेत...

युवकाची संवेदनशीलता: आपघातग्रस्तांचे वाचले प्राण

इमेज
  युवकाची संवेदनशीलता, अपघातातील व्यक्तीला दवाखान्यात उपचारासाठी केले दाखल, वाचले प्राण परळी वैजनाथ दि.०९ (प्रतिनिधी)           परळी-आंबेजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी घाटात गुरुवारी  सायंकाळी ६.३० च्या सुमारास दुचाकीच्या समोर अचानक गाय आली. व जोराची धडक बसून दुचाकीवरील दोघे पडले. येणारे जाणारे फक्त पाहुन पुढे जात होते. संवेदनशील नागरीकांनी दुचाकी बाजूला उभ्या करुन त्यांना रस्त्याच्या बाजूला घेतले पण दवाखान्यात कसे न्यायचे यावर चर्चा सुरू झाली. यात एका युवकांनी आपली दुचाकी उभी करुन तात्काळ त्यांना त्यांच्या दुचाकीवर बसवून स्वतः ती दुचाकी घेऊन दवाखाना जवळ केला. व त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. या युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.             परळी-आंबेजोगाई रस्त्यावरील कन्हेरवाडीच्या घाटात गुरुवारी (ता.०९) सायंकाळी ६.३० च्या सुमारास बबन श्रीखंडे व अरुण श्रीखंडे (दोघे राहणार परभणी) हे दोघे बंधू आपल्या दुचाकीवरून येडशी येथून परळी मार्गे परभणीकडे जात असताना अचानक गाय समोर आली.या गायीला जोराची धडक बसली. यात गाईचे काही नुकसान झाले नाह...

दिव्यांगांसाठी आयुष्य खर्ची घालणार - डॉ. संतोष मुंडे

इमेज
  मुंबईच्या कार्यालयात उत्स्फूर्त स्वागत: डाॅ.संतोष मुंडे यांनी "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे कामकाज घेतले समजुन मुंबईच्या कार्यालयात अनेकांनी केले स्वागत, दिव्यांगांसाठी आयुष्य खर्ची घालणार - डॉ. संतोष मुंडे मुंबई (प्रतिनिधी) दिव्यांगांच्या सेवेसाठी अभियानचे उपाध्यक्ष हे पद माझ्यासाठी खुप महत्वाचे आहे. पदाला न्याय देण्यासाठी मी वचनबद्ध असुन दिव्यांगांसाठी आयुष्य खर्ची घालणार असल्याचे प्रतिपादन "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले. मुंबईच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचारी व दिव्यांगांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.           डॉ. संतोष मुंडे यांनी आज मुंबई येथे दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय मित्तल टॉवर नरिमन पॉईंट येथे  ऑफिसला भेट देऊन कामकाज समजून घेतले. यावेळी दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव अभय महाजन, आयुक्त घोडके यांनी त्यांचे स्वागत करून कामकाजाचे स्वरूप व उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली. सातत्याने ना. धनंजय मुंडेंच्या यांच्या नेतृत्वाखाली समाजातील ...

वसंतराव नाईक तांडा सुधार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी पप्पू चव्हाण यांची नियुक्ती

इमेज
  पंकजा मुंडे यांनी दिला बंजारा समाजातील युवा कार्यकर्त्यांला न्याय वसंतराव नाईक तांडा सुधार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी पप्पू  चव्हाण यांची नियुक्ती _पंकजाताईंचा विश्वास सार्थ करून दाखवू_ परळी वैजनाथ ।दिनांक ०९। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हया नेहमीच सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या असतात, त्याचीच परिणीती पुन्हा आली. कौठळीच्या बाळासाहेब उर्फ पप्पू चव्हाण यांची वसंतराव नाईक तांडा सुधार समितीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे.  बंजारा समाजातील युवा कार्यकर्त्यांला पंकजाताईंनी न्याय दिला अशी भावना समाज बांधवांनी व्यक्त केली आहे.   वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या अंतर्गत हाती घ्यावयाची कामे जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखालील समितीस सुचविण्याकरिता बंजारा बहुल जिल्ह्यासाठी स्थापन करावयाच्या समितीच्या अध्यक्षपदी कौठळीचे भाजपाचे युवा कार्यकर्ते बाळासाहेब भाऊराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून तसे आदेश आज शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आले.  नियुक्ती नंतर चव्हाण यांनी ...

परळीत विविध ठिकाणी वसुबारस उत्साहात साजरी: रामरक्षा गो शाळेकडून पुजनासाठी गोमाता केल्या उपलब्ध

इमेज
परळीत विविध ठिकाणी वसुबारस उत्साहात साजरी: रामरक्षा गो शाळेकडून पुजनासाठी गोमाता केल्या उपलब्ध परळी/ प्रतिनिधी-           दीपावलीचा पहिला दिवस असलेल्या वसुबारस निमित्ताने परळी शहरात विविध ठिकाणी गोवत्स पुजन उत्साहात करण्यात आले. रामरक्षा गोशाळेच्या वतीने वसुबारसेच्या निमित्ताने पुजन करण्यासाठी गोमाता उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.          वसुबारसेच्या निमित्ताने परळी शहराच्या विविध भागांमध्ये गायी-वासरांचे रितीरिवाजाप्रमाणे विधीवत पुजन करण्यात आले. घरा-घरामध्ये व्यक्तीगत पूजन झाले. त्याचबरोबर ओद्योगीक वसाहत परिसरातील कोठारी यांच्या निवासस्थानी सार्वजनिक गोवत्स पुजन पार पडला. यावेळी गायी-वासरांचे विधीवत पुजन करण्यात आले. या कार्यक्रमास बंसल क्लासेसचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक चंदुलाल बियाणी, औद्योगीक वसाहतीचे चेअरमन रतन कोठारी, वैभव धोंड, हरि मोदाणी, सुनिल फुलारी, दिनेश लोंढे, अनिल जोशी, शैलेष पांडे, सौ. वर्षा जोशी, सागर वेडेकर, अनंत कुलकर्णी, रघुवीर राडीकर आदींसह अनेकजण उपस्थित होते. परळी शहरातील औद्योगिक वसाहत, शंभू महादेव मंदिर,...

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्याने घातली भावनिक साद

इमेज
 "साहेब शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले, आता दिवाळी साजरी करा..." कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्याने घातली भावनिक साद मुंबई दि 9 नोव्हेंबर 2023- महाराष्ट्रातील दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दीपावली पूर्वी पीक विम्याची मदत नाही मिळवून दिली, तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, अशी प्रतिज्ञा करणाऱ्या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना आज शेतकऱ्याने "साहेब पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत, आता दिवाळी साजरी करा" अशी भावनिक साद घातली. दिवाळीची भेट वस्तू देऊन भावनिक पत्र सुद्धा दिले. यावर्षी राज्य शासनाने एका रुपयात पीक विमा देण्याची घोषणा करून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. मात्र पावसाने 21 दिवसापेक्षा जास्त खंड दिल्यामुळे या पिक विमा  योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरले. मात्र अनेक पिक विमा कंपन्यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करत विम्याबाबत चाल ढकल, अपील केले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिल्याशिवाय मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, अशी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती.  याबाबतची सर्व तांत्रिक प्रक्रिया ...

डाॅ.संतोष मुंडेंचा ह्रदय सत्कार

इमेज
  दिव्यांगांसाठी डॉ. संतोष मुंडे म्हणजे देवदूतच -निवृत्त मुख्याध्यापक भागवत कराड डाॅ.संतोष मुंडेंचा ह्रदय सत्कार परळी वैजनाथ ,प्रतिनिधी.....           दिव्यांगाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आणि दिव्यांगांचे प्रश्न ,समस्या, अडीअडचणी यासाठी सदैव तत्पर असलेले दिव्यांगाचे कैवारी म्हणून आपली ओळख निर्माण करणारे परळीतील डाॅ.संतोष मुंडे हे दिव्यांगासाठी देवदूतच असल्याचे प्रतिपादन निवृत्त मुख्याध्यापक भागवत कराड सर यांनी व्यक्त केले.           महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग मंत्रालयाच्या दिव्यांग विभाग उपाध्यक्ष पदावर डॉ. संतोष मुंडे यांना संवैधानिक जबाबदारी देण्यात आली. ही दिव्यांगांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे. डॉ. संतोष मुंडे यांचे दिव्यांगांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या या पदावर त्यांची निवड ही त्यांनी केलेल्या दिव्यांगाच्या सेवेचे फळच आहे असे प्रतिपादन भागवत कराड यांनी व्यक्त केले. या निवडीबद्दल निवृत्त मुख्याध्यापक भा...

परळी - परळी, धर्मापुरी, सिरसाळा, नागापूर, गाडे पिंपळगाव समावेश

इमेज
  बीड जिल्ह्यातील आणखी 8 तालुक्यातील 52 महसुली मंडळांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय; पालकमंत्री धनंजय मुंडेंचा पाठपुरावा यशस्वी तीन तालुक्यांचा याआधीच केला होता समावेश मुंबई (दि.09) - जून पासून पावसाळ्याच्या अखेरपर्यंत पावसाचे पडलेले प्रमाण तसेच कोरड्या दुष्काळाचे मापदंड त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील पाणीसाठे या सर्वांचा विचार करून बीड जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 52 महसुली मंडळांचा आज नव्याने दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीचे आज मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, संदीपान भुमरे आदींसह मदत व पुनर्वसन तसेच महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  बीड जिल्ह्यातील धारूर, वडवणी व अंबाजोगाई या तीन तालुक्यांचा महसूल विभागाने दि.31 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाद्वारे याआधीच दुष्काळग्रस्त तालुक्यांचा यादीत समावेश केलेला आहे....

ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

इमेज
  व्यापाऱ्यांनी भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या पदार्थाची विक्री करू नये:- अनिल बोर्डे गेवराई, प्रतिनिधी...  दिपवाली उत्सवानिमित्त ग्राहकाकडून हॉटेलमधील खाद्यपदार्थाची मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे भेसळ होण्याची शक्यता असते तरी याबाबत भेसळयुक्त निष्कृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री होणार नाहीत याबाबत प्रशासनाने जागृत राहून कारवाई होणे अपेक्षित आहे जेणेकरून आरोग्यास अपाय होणार नाही अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक पंचायत चे प्रमुख अनिल बोर्डे यांनी  जिल्हाधिकारी बीड तहसीलदार गेवराई मुख्याधिकारी नगरपरिषद गेवराई व उपकार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वितरण उपविभाग गेवराई यांच्याकडे मागणी केलेली आहे. तसेच शहरातील व ग्रामीण भागातील दिवाळीच्या कालावधी मध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित केला जातो तरी दिनांक ९/११/२३ ते १५/११/२३ पर्यंत राज्य वितरण मंडळाकडून नियमितपणे वीज पुरवठा करण्याच्या सूचना तात्काळ देणे आवश्यक आहे जेणेकरून दिवाळीच्या कालावधीत वीज पुरवठा खंडित होणार नाही अशी मागणी वितरण विभागाकडे करण्यात आली आहे. तसेच गेवराई शहरात दिवाळीनिमित्त माळी गल्ल...

मनोज जरांगे पाटील यांचा तिसरा टप्पा: 15 नोव्हेंबरपासून राज्याचा सुरू होणार दौरा

इमेज
  मनोज जरांगे पाटील यांचा तिसरा टप्पा: 15 नोव्हेंबर पासून राज्याचा सुरू होणार दौरा औरंगाबाद,दि.9(प्रतिनिधी) मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणारे मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे.सध्या जरांगे पाटील यांच्यावर  रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  दरम्यान, जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पाटील यांनी आज हा दौरा जाहीर केला आहे. दौरा करून ते संवाद साधणार आहे. मराठा आरक्षणासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जात आहे. मराठा समाजाला त्यांनी आवाहन केले आत्महत्या करु नका. शासनाला 24 डिसेंबरची डेडलाईन दिलेली आहे हा दिवस फार महत्त्वाचा आहे म्हणून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलू नये अशी विनंती त्यांनी केली आहे. युवकांनी आत्महत्या केल्या असल्याने दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला आहे. पाटील यांचा दौरा 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यासंदर्भात जरांगे पाटील यांनी आज रुग्णालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.  यावेळी बोलताना जरांगे...

दिपावलीच्या तोंडावरच अंबाजोगाईत दोघांची आत्महत्या

इमेज
  दिपावलीच्या तोंडावरच अंबाजोगाईत दोघांची आत्महत्या अंबाजोगाई - सर्वत्र दिपावलीची लगबग सुरू असताना अंबाजोगाई शहरातील स्वाराती रूग्णालय परिसरातील पीजीच्या मुलांच्या वसतिगृहांमध्ये लिपिकाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. तर शहर पोलिस ठाण्याच्या समोर असलेल्या व्यापारी संकुलामध्ये मित्राच्या मोबाईल शॉपी मध्ये गळफास घेवून आपली जिवनयात्रा संपविली. यात वैजनाथ अनंतराव काळे (वय 47) रा.कोळपिंपरी ता.सोनपेठ व शरद भागवत जैसवाल (वय 55) रा.गुरूवार पेठ अंबाजोगाई अशी दोघा मयतांची नावे आहेत. दिपावलीचा सन तोंडावर आला असताना अंबाजोगाई शहरातील अशिया खंडात नावजलेले स्वामी रामानंद तीर्थ ग्रामिण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय परिसरातील मुलांच्या वसतीगृहांमध्ये लिपीक पदावर असलेले वैजनाथ अनंतराव काळे, रा.कोळपिंपरी ता.सोनपेठ येथील हे कर्मचारी वसतिगृहामध्ये कामास होते. सकाळी नित्यनियमाप्रमाणे वसतिगृहावर सोबतच्या कर्मचार्‍याला गप्पा मारत कार्यालयीन कामकाजासाठी गेले. परंतु त्यांनी एका खोलीमध्ये जावून पंख्याच्या हुकाला गळफास घेत आत्महत्या केली. काळे हे बाहेर कसे येत नाहीत म्हणून कर्मचार्‍यांनी दरवाजा ठोठाव...

श्री गणेश व मारुती मूर्तींची उत्साहात शोभायात्रा

इमेज
  दि.१० रोजी बसस्थानक परिसरातील गणेश मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा परळी वैजनाथ-(प्रतिनिधी)येथील बस स्थानकाच्या आवारातील श्री गणपती मंदिरातील श्री गणेश व मारुती मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन दि.८ ते १० नोव्हेंबर दरम्यान  करण्यात आले असून  उटीब्रह्मचारी येथील निळकंठेश्वर महादेव मंदिराचे मठाधीपती प.पू.श्री सुरेशजी ब्रह्मचारी महाराज यांच्या हस्ते दोन्ही मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे कलशारोहण संपन्न होणार आहे.          गणेश मंदिराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून शुक्रवार दि.१० रोजी होणाऱ्या ह्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यास राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे व न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने बुधवारी सकाळी श्री गणपती मंदिरापासून मोंढा मार्केट, टावर, जिजामाता उद्यान, घरणीकर रोड , छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे परत मंदिरापर्यंत भव्य  शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक-भक्त सहभागी झाले होते...

पुणे येथील 'आयडियाथाॅन ' स्पर्धेत एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकले

इमेज
  पुणे येथील 'आयडियाथाॅन ' स्पर्धेत एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे  विद्यार्थी चमकले नांदेड दिनांक ८ नोव्हेंबर प्रतिनिधी  अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे( सिओईपी) येथे माईंडस्पार्क या तांत्रिक परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. अभियांत्रिकी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण, सृजनशील तांत्रिक प्रकल्पांचे सादरीकरण करण्यासाठी ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यामध्ये मराठवाड्यातील नांदेडच्या महात्मा गांधी मिशन संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पृहणीय यश संपादन केले आहेत.सदर परिषदेत आयडियाथाॅन या प्रकारात अभियांत्रिकी  विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविणाऱ्या प्रकल्प स्पर्धेत नांदेडच्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातील बी.टेक. संगणकशास्त्र अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणार्‍या  यश महाजन,कोंडीबा जोगदंड, तेजस कोटलवार  आणि अवधूत पाटील या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाला द्वितीय स्थान प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांस वीस हजार रूपयांचे रोख पारितोषिकही प्राप्त झाले आहे. या प्रकल्पांतर्गत विद...

आजचे मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

इमेज
राज्य मंत्रिमंडळ बैठक : संक्षिप्त निर्णय दिनांक ८ नोव्हेंबर २०२३  * धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती.  ( इतर मागास बहुजन कल्याण)  * राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता ( उद्योग विभाग)  * मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार. ( जलसंपदा विभाग)    * अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे  राज्य निवड मंडळामार्फत भरणार  ( वैद्यकीय शिक्षण) * मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा.   ( वस्त्रोद्योग विभाग)    * गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार  ( इतर मागास बहुजन कल्याण ) * विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकाना...

प्रासंगिक लेख: आपल्या शहरातील दुकानांमधूनच सणांसाठी खरेदी करावी

इमेज
  आपल्या शहरातील दुकानांमधूनच सणांसाठी  खरेदी करावी   श्रीमंत असणारे बरेच जण बाहेरील मोठ्या शहरातून खरेदी करत असतात परंतु आपण ज्या शहरात राहतो त्याच शहरातून सणावारांची खरेदी व्हायला हवी. जेणेकरून गोरगरिबांसह  सर्वांचाच सण गोड होईल.  दिवाळीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणावर कपडे, दाग दागिने,अनेक प्रकारच्या गृह सजावटीच्या वस्तू,दिवे,पणत्या, नवीन आस्थापनासाठी लागणारे साहित्य खरेदी आपल्याच शहरातून करायला पाहिजे. ज्यामुळे आपल्या आजूबाजूच्या सर्वच घटकांच्या गरजा भागवण्यास मदत होईल.  आपणास घरकामगार, दुकान,छोटे मोठे उद्योग, कारखाने, आपले विविध व्यवसाय यासाठी  लागणारे सर्व कामगार, आपणास निवडून येण्यासाठी लागणारे मतदार हे बाहेरचे नसून आपल्या शहरातीलच असतात. मग सणावाराची खरेदी आपण बाहेरून का म्हणून करावी..? आपला पैसा हा आपल्या येथील लोकांच्या कामी आला पाहिजे. हि आपली भावना का नसावी..? ज्या ज्या वेळी निसर्गाचा कोप होतो किंवा अपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. त्यावेळी आजूबाजीची माणसेच कामाला येत असतात, पैसा नाही.. त्याकरिता आजूबाजूची माणसं आनंदी राहिली पाहिजेत अशी आपल...

वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांचे झाडावर बसून आंदोलन

इमेज
  वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांचे झाडावर बसून आंदोलन अंबाजोगाई - गेल्या वीस वर्षापासुन वृक्षाची गणणा करावी व वृक्ष संवर्धन करावे या मागणीसाठी गेल्या वीस वर्षापासुन वृक्षमित्र अभियानचे सुधाकर देशमुख यांचे शासन दरबारी लढा लढत आहेत. परंतु या लढ्याला त्यांना अद्यापही यश आलेले नाही. अंबाजोगाई शहरातील रस्त्याचे चौपदरीकरीण होत असल्यामुळे रस्त्यात येणार्‍या वृक्षाचे पुनर्वरोपण करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा न्यायालयासमोरील असलेल्या शेकडो वर्षापासुनच्या वडाच्या झाडावर बसून देशमुख यांनी आंदोलन सुरू केले आहे. झाडाची कत्तल करण्याऐवजी त्याचे पुनर्वरोपन करावे अशी मागणी त्यांनी शासन दरबारी लावून धरली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ममदापुर (पाटोदा) येथील वृक्षमित्र अभियानचे सुधाकर देशमुख गेल्या वीस वर्षापासुन नागरपुर ते मुंबई आधिवेशनादरम्यान कुटूंबा समवेत उपोषण केलेले आहे. या उपोषणामध्ये राज्यातील वृक्ष गणणा करण्यात यावी. महामार्गावरही अडथळा निर्माण करणार्‍या वृक्ष तोड करण्या ऐवजी त्याचे पुनर्वरोपण करण्यात यावे. याचा लढा अद्यापही सुरू आहे. अंबाजोगाई शहरातील संत भगवानबाबा चौक ते छत्रपती शिवाजी महा...

दीपोत्‍सवाच्‍या स्‍वागतासाठी परळीकर सज्‍ज! बाजारपेठा सजल्या

इमेज
  दीपोत्‍सवाच्‍या स्‍वागतासाठी परळीकर सज्‍ज! बाजारपेठा सजल्या परळी वैजनाथ/प्रतिनिधी  अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्‍या दीपोत्‍सवाच्‍या स्‍वागतासाठी परळीकर सज्‍ज झालेले आहेत. दिवाळीनिमित्त नवीन कपडे, घराची सजावट करण्यासाठी लागणारे साहित्‍यासह अन्‍य खरेदीचा जोर सध्या बघायला मिळतो आहे. सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी आठवडी बाजारा दिवशी शहरातील मुख्य बाजारपेठ मोंढा राणी लक्ष्मीबाई टावर, घरणीकर रोड, बस स्टँड रोड, मेनरोड परीसर ग्राहकांनी तुडूंब भरला होता. दिवाळीच्या सजावटीसाठी आकर्षक असे आकाशकंदील बाजारात दाखल झाले आहेत.आकाश कंदील, दिवे, विद्युत रोषणाईसाठी दिव्‍यांच्‍या माळा असे गृहसजावटीचे भरपुर पर्याय व्‍यावसायिकांनी उपलब्‍ध करुन दिले आहे.तसेच दिवाळीत फराळ हा आकर्षणाचा केंद्र असतो. बाजारपेठेत रेडीमेड फराळाची मोठी मागणी आहे.बाजारपेठ गृहसजावटीच्‍या वस्‍तूंनी सजली आहे. घराला लावण्याच्‍या तोरणाचे भरपुर पर्याय येथे उपलब्‍ध झाले असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.दिवाळीचा सण हा उत्साहात साजरा होत असून बाजारपेठांसहित नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

मराठी रंगभूमी दिन विशेष*

इमेज
  मराठी रंगभूमी: एक चिंतन व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत `थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ हा शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली. वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके,तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आली. मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. त्यानंतर ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली. आद्यनाटककार अश्वघोष,तृतीय रत्नकार महात्मा फुले यांच्या लेखणीतून निर्माण झालेली भारतीय नाट्य परंपरा आजही बहरत आहे. विष्णूदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या ना...

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा दौरा

इमेज
  अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा दौरा  बीड, दि. 05 (जि. मा. का.) :- मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य मा.ना.श्री. छगन भुजबळ, हे दि.5 व 6 नोव्हेंबर 2023 रोजी बीड जिल्ह्याच्या दोऱ्यावर येत आहे.त्यांचा नाशिक-छत्रपती संभाजी नगर-बीड-मुंबई दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. रविवार दि. 5 नोव्हेंबर 2023, दुपारी 3.00 वाजता मोटारीने प्रयाण, 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजी नगर येथे आगमन, राखीव व मुक्काम सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2023, सकाळी 9.00 वाजता मोटारीने प्रयाण 11.00 वाजता हॉटेल सनराईज, बीड येथे आगमन व राखीव ,संपर्क- अॅड. सुभाष राऊत - 9822855742 11.30 वाजता मोटारीने प्रयाण, दुपारी 12.00 वाजता श्री. जयदत्त क्षिरसागर व आ. श्री. संदीप क्षिरसागर यांचेकडे राखीव, 12.30 वाजता मोटारीने प्रयाण, 1.45 वाजता माजलगाव, जि. बीड येथे आगमन व राखीव, संपर्क- मा. श्री. प्रकाश सोळंके-9326734769 2.30 वाजता मोटारीने प्रयाण, 5.00 वाजता छत्रपती सं, 7.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व मोटारीने प्रयाण, रात्री सिद्धगड-बी-6, शासकीय...

विविध योजना अनुदान :एकशे सात कोटी पंचवीस लक्ष त्रेसष्ठ हजार आठशे रुपये वितरित

इमेज
  विविध योजना अनुदान  :एकशे सात कोटी पंचवीस लक्ष त्रेसष्ठ हजार आठशे रुपये वितरित बीड, दि. 05 (जि. मा. का.) :- बीड जिल्हयातील एकुण 11 तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता माहे जुलै 2023 ते सप्टेंबर 2023 अखेरचे प्रती माह प्रती लाभार्थी 1500/- रुपये प्रमाणे अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे. विशेष सहाय्य योजने अंतर्गत सर्व योजनेच्या एकुण 252833 लाभार्थ्यांना एकुण रक्कम रुपये  1072563800/-(एकशे सात कोटी पंचवीस लक्ष त्रेसष्ठ हजार आठशे रुपये फक्त ) अनुदान सर्व तालुक्यांना वितरीत करण्यात आलेले असुन तहसिलदार यांचेमार्फत संबंधित लाभार्थी यांच्या बँक खात्यावर वितरण सुरु आहे. दिवाळी पुर्वी सर्व अनुदान वाटप पूर्ण करण्याच्या सुचना संबंधित बँकाना देण्यात आलेल्या आहेत. तसेच माहे ऑक्टोबर 2023करिता शासनाकडे निधी मागणी करण्यात आलेली आहे. सदरचे अनुदान प्राप्त होताच योजना निहाय लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. बीड-संजय गांधी सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती लाभार्थी संख्या- 11139, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितर...

बीड जिल्हाधिकारी यांचे आदेश

इमेज
  बीड जिल्हयातील पाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी  आरक्षीत : बीड जिल्हाधिकारी यांचे आदेश बीड:प्रतिनिधी... अल-निनोच्या प्रभवामुळे पर्जन्यमान कमी राहून, पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता तसेच सन २०२३ मध्ये पावसाळा सुरु होऊन जास्त कालावधी झाला तरी बीड जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांमधे समाधानकारक जलसाठा झालेला नसल्यामुळे व जलसंपत्तीचा अवैध उपसा हो नये तसेच जिल्ह्याचा अवर्षणाचा पूर्व इतिहास पाहता तसेच अल-निनो समुद्र प्रवाह सक्रियता यामुळे चालू वर्षी संभाव्यतः दुर्देवाने पर्जन्याने ओढ दिल्यास उपलब्ध पाणी साठा जास्तीत जास्त कालावधीसाठी पिण्यासाठी वापरता येईल. यासाठी जतन होणे आवश्यक असल्याने बीड जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी पुढील आदेशापर्यंत आरक्षीत करणे बाबतचे आदेश दि. १४/०८/२०२३ अन्वये निर्गमीत करण्यात आलेले आहेत. Click- ■ *एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, मुख्यमंत्र्यांकडून तातडीने एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था        अल-निनो समुद्र प्रवाह सक्रियता यामुळे चालू वर्षी संभाव्य टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून ...

एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, मुख्यमंत्र्यांकडून तातडीने एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था

इमेज
  एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, मुख्यमंत्र्यांकडून तातडीने एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था मुंबई :   राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. एकनाथ खडसे यांच्या उपचारासाठी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली आहे. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधला होता.त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली. खडसे यांना उपचारासाठी जळगावहून मुंबईला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी आहेत. खडसे यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समजताच त्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली.  Click- ■ *एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, मुख्यमंत्र्यांकडून तातडीने एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था Click- ■ *मराठा आरक्षण प्रश्नावरून जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींचा बहिष्कार कायम;मतदान प्रक्रिया रद्द *

मराठा आरक्षण प्रश्नावरून जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींचा बहिष्कार कायम;मतदान प्रक्रिया रद्द

इमेज
  मराठा आरक्षण प्रश्नावरून जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींचा बहिष्कार कायम;मतदान प्रक्रिया रद्द बीड, एमबी न्युज वृत्तसेवा: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या गावातून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता, यामुळे या ठिकाणची मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. आज जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायत साठी मतदान होत असताना या 18 गावांमध्ये मात्र शुकशुकाट आहे. पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय  येथे नऊ सदस्य व सरपंच पदासाठी निवडणूक होणार होती. परंतु ग्रामस्थांनी बैठक घेऊन या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. आगामी काळातही ज्या निवडणुका होतील त्यामध्ये सहभाग होणार नसल्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे. Click- ■ *एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, मुख्यमंत्र्यांकडून तातडीने एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था Click- ■ *मराठा आरक्षण प्रश्नावरून जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींचा बहिष्कार कायम;मतदान प्रक्रिया...