पोस्ट्स

फेब्रुवारी ४, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्या उपस्थितीत दि.13 रोजी होणार अमृताश्रम स्वामी महाराजांचा शासनातर्फे सन्मान

इमेज
  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्या उपस्थितीत दि.13 रोजी होणार अमृताश्रम स्वामी महाराजांचा शासनातर्फे सन्मान परळी वैजनाथ, प्रतिनिधी....             मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्या उपस्थितीत दि.13 रोजी मुंबईत धर्मगुरु प.पू.अमृताश्रम स्वामी महाराजांचा शासनातर्फे सन्मान होणार आहे.            बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकर आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी)नवगण राजुरीकर   यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार 13-02-2024 रोजी मुख्यमंत्री श्रीएकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार व  सुधीर मुनगंटीवार  (सांस्कृतिक कार्य मंत्रालय) यांच्या हस्ते दिला जाणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र अमृत आश्रम स्वामी महाराज यांचा यास समारंभात गौरव होणार आहे या पुरस्कारासाठी श्री महाराजांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

इमेज
  ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        शहरातील एका ज्युस सेंटरमध्ये आलेल्या  ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त झाले.या ज्युस सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका युवकाने या मुलींचा व्हिडिओ फोटो घेण्याचे हे ग्रहणास्पद हे कृत्य केल्याने मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले.दरम्यान मध्यवर्ती ठिकाणीच हा प्रकार घडल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व बघ्यांची गर्दी झाली होती.        प्राप्त माहितीनुसार, परळीतील उपजिल्हा रुग्णालयाजवळ मुख्य रस्त्यावरच असलेल्या लोकमान्य ज्युस सेंटरमध्ये दोन युवती बसलेल्या असताना याच ज्युस सेंटरमध्ये काम करणारा एक युवक वारंवार त्यांच्या टेबलजवळून मोबाईल हातात धरुन ये-जा करत होता. ही बाब एका मुलीच्या लक्षात आल्याने तिने आपल्या पालकांना ही बाब कळवली.पालकांनी  येउन शहानिशा केली असता  या ज्यूस सेंटर मध्ये काम करणाऱ्य  मुलाने या   युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट केल्याचा प्रकार समोर आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटली.काही वेळातच या घटनेने नागरिक संतप्त झाल्याने

स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा कायम

इमेज
  महाराष्ट्र विद्यालयाचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा कायम परळी / प्रतिनिधी ग्रामीण भागातील उपक्रमशील, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळख असलेल्या परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय ने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत(NMMS) घवघवीत यश संपादन करत शाळेतील 4 विद्यार्थी या परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये पार पडली. या परीक्षेत विद्यालयातील एकोणतीस विद्यार्थी सहभागी झालेले होते या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत विद्यालयातील 4 विद्यार्थी उत्तीर्ण होत शिष्यवृत्ती करिता पात्र झाले आहेत. ही परीक्षा भारत सरकार तर्फे आयोजित केली जाते. या परीक्षेत जे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरतात त्यांना वर्षाला बारा हजार रुपये याप्रमाणे चार वर्षात 60 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील कु.अमृता दत्ता शिंदे, चि.सलगर वरद बाबुराव, चि.विश्वजित दत्तात

राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे शानदार उद्घाटन

इमेज
  कलेमुळे कामगारांचे आरोग्य चांगले राहते-संचालक मोहिनी केळकर लोकनृत्य कलेला  कामगार कल्याण मंडळाने मोठे व्यासपीठ दिले- कल्याण आयुक्त रविराज इळवे परळी (प्रतिनिधी) :  कलेमुळे कामगारांचे आरोग्य चांगले राहते, कामावर ताणतणाव कमी होण्यास मदत होते असे प्रतिपादन ग्राईंड मास्टर टुल्सच्या संचालक मोहिनी केळकर यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी तापडिया नाट्यमंदिर येथे झाले. यावेळी मोहिनी केळकर बोलत होत्या. व्यासपीठावर अतिरिक्त संचालक मानव संसाधन, लोकमत वृत्त समुहचे बालाजी मुळे, कल्याण आयुक्त रविराज इळवे, सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांची उपस्थित होती. जुन्या पिढीची कला परंपरा जपण्याचे काम कामगार  मंडळ करत आहे. संगित, नृत्यामुळे वजन नियंत्रणात राहून आरोग्य उत्तम राहते असे यावेळी लोकमत वृत्त समूहाचे अतिरिक्त संचालक बाळाजी मुळे म्हणाले. लोकनृत्य कलेला  कामगार कल्याण मंडळाने मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामुळे कलाकारांना प्रोत्साहन मिळत आहे. कामगार कल्याण मंडळामुळे अनेक कलावंत, खेळाडू घडले आहे असे कल्याण आयुक्त रविराज

बीड जिल्ह्यातील दिव्यांगांच्या पहिल्या शिव भोजन केंद्राचे डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

इमेज
  बीड जिल्ह्यातील दिव्यांगांच्या पहिल्या शिव भोजन केंद्राचे डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते  होणार उद्घाटन परळी: प्रतिनिधी   बीड जिल्ह्यातील दिव्यांगाच्या पहिल्या शिव भोजन केंद्राचे दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार असून परळी तालुक्याचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे सतत दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवत असतात आणि दिव्यांगासाठी घेतलेला सामाजिक कार्य करण्याचा त्यांचा वसा ते अविरत जपत असतात.   त्यांच्याच प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून बीड जिल्ह्यातील ह्या पहिल्या दिव्यांगाच्या मराठवाडा  शिवभोजन केंद्राचे बरकत नगर परळी वैजनाथ येथे भव्य शुभारंभ आज होणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली.    अशा या शिव भोजन केंद्राच्या माध्यमातून परळी तालुक्यातील सामान्य आणि गरजू नागरिकांना तसेच दिव्यांगाना अतिशय पोषक व सकस आहार उपलब्ध करून देण्याचे पुण्य कार्य घडणार आहे तरी या भव्य उद्घाटन

क्रिकेट क्षेत्रात बीड जिल्ह्याचे नाव उज्वल करणार - पार्थ हिबाने

इमेज
  शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी अंबाजोगाई च्या पार्थ हिबाने याची निवड;पार्थची निवड बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब - प्रदीप खाडे अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-      शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी अंबाजोगाई येथील पार्थ संजय हिबाने  याची 14 वर्षाखालील गटामधून निवड झाली आहे. पार्थ याची निवड बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा कै.रामभाऊ आणा खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप खाडे यांनी केले. पार्थची निवड झाल्याबद्दल प्रदीप खाडे यांच्या निवासस्थानी आज कौटुंबिक सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.      क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय सोलापूर व शिवरत्न स्कूल अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 ते 5 जानेवारी अकलूज येथे निवड शिबिर घेण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून पार्थ संजय हिबाने निवड झाली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या विभागातून 57 विद्यार्थी येथे खेळण्यासाठी आले होते. छत्रपती संभाजी नगर विभागातून  पाच खेळाडू या शिबिरात सहभागी झाले होते. त्यामधून पार्थ संजय हिबाने याची निवड झाली आहे. पा

राज्यपालांच्या सुचनेनंतर राज्यशासनाचा निर्णय :4थी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर भरवा: शासन निर्णय जारी

इमेज
  राज्यपालांच्या सुचनेनंतर राज्यशासनाचा निर्णय :4थी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर भरवा: शासन निर्णय जारी       राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजता किंवा नऊ वाजेनंतर भरवाव्यात, असे आदेश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या वतीने परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे शाळांना आता चौथी पर्यंतच्या वर्गाचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे. सध्या महाराष्ट्रात मुलांच्या शाळेची वेळ प्राथमिक शाळा वर्ग सकाळी आणि माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरवले जातात.  महाराष्ट्रात प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भरतात. या गटात 3 ते 10 वर्षांचे मुले असतात. या मुलांच्या सकाळी शाळा असंल्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. या साठी या मुलांच्या शाळेच्या वेळ बदलण्याच्या सूचना शिक्षणतज्ज्ञांकडून केल्या जात होत्या. प्राथमिक वर्गच्या शाळा दुपारी आणि माध्यमिक वर्गांच्या शाळा सकाळी व्हावा.या बाबत राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केली. आता प्राथमिक शाळांचे वर्ग  शाळांची वेळ सकाळी नऊ वाजे नंतरची असणार आहे.

बापाच्या नात्याला काळीमा फासणारी घटनेने जिल्हा हादरला

इमेज
  नात्याला काळीमा:41 वर्षीय पित्याने मुलीवर केला अत्याचार;मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उघड धारूर, प्रतिनिधी.....            धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथील बाळू गायकवाड 41  वर्षीय  नराधमाने आपल्या पोटच्या मुलीवर दारू पिऊन , मारहाण करत अत्याचार केला त्यात मुलगी गर्भवती जाली असून या अत्याचाराची माहिती आईला दिली या  प्रकरणी धारूर पोलीस स्टेशन येथे आरोपी बाळू गायकवाड विरुद्ध मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत            अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथे दारुड्या बापाकडून मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अधिक ची माहिती उमराई येथे गायकवाड कुटुंब हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंब चालवते विशेष म्हणजे हे कुटुंब ऊसतोड कामगार म्हणून इतरत्र कारखान्याला जाऊन आपला उदरनिर्वाह करत असते या यावर्षी अंबाजोगाई तालुक्यातील रांजणी कारखान्याला हे कुटुंब ऊसतोड कामगार म्हणून गेले होते त्या ठिकाणी काम करत असताना मुलीच्या अचानक पोटात दुखू लागल्याने तिला आईला सांगितले असता तिच्या आईने तिला अंबाजोगाई येथे सहा फेब्रुवारी मं

औंढानागनाथ-परळी वैजनाथ- अंबाजोगाई येणार शक्तिपीठ महामार्गावर

इमेज
  'शक्तिपीठ’ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग, ८०२कि.मी. राज्य सरकारने अंतिम आखणीस दिली मान्यता मुंबई :  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या संरेखनास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.या संरेखनानुसार ‘शक्तिपीठ’ मार्ग आता  ८०२ किमी लांबीचा असणार आहे.            राज्यातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एमएसआरडीसीने ४२१७ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग यापैकीच. समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वात मोठा, ७०१ किमी लांबीचा महामार्ग आहे. पण आता समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देण

आमचा पक्ष आणि आमचे चिन्ह,शरदचंद्र पवार -सौ.सुदामतीताई गुट्टे

इमेज
  आमचा पक्ष आणि आमचे चिन्ह,शरदचंद्र पवार -सौ.सुदामतीताई गुट्टे परळी ,प्रतिनिधी काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीरतावादी गटाला पक्ष,आणी चिंन्ह देऊन पुन्हा एकदा लोकशाही चा गळा घोटला असुन महाराष्ट्राची सर्व सामान्य जनता शरदचंद्र पवार यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असुन पक्ष,चिंन्ह जरी गेले असले तरी आमचा पक्ष आणी आमचे चिन्ह शरदचंद्र पवार हेच असल्याची प्रतिक्रिया जेष्ठनेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे यांनी दिली आहे. दिल्लीच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेची मान्यता आणि चिन्ह दिले. त्यानुसार निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीबाबत दिलेला निर्णय आम्हाला अपेक्षित होता. आमचे 1999 पासून चिन्ह घड्याळ हे गेले, याचे आम्हाला दुःख आहे. शरद पवार आणि वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, जे काही चिन्ह घेतील, ते आम्ही घराघरांमध्ये पोहोचवू म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे केवळ चिन्ह नव्हे, तर लोकनेते शरद पवार यांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. चिन्ह आणि नाव गेले तरी शरद पवार आमच्याकडे आहेत,  विचार आमच्याकडे आहे. म्हणूनच, यापुढे तेच हेच आमचे चिन्ह आणि तेच आमचा पक्ष म

परळी- सिररसाळा राष्ट्रीय महामार्गाचे काम बोगस;दर्जेदार काम करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन-फुलचंद कराड

इमेज
  परळी- सिररसाळा राष्ट्रीय महामार्गाचे काम बोगस; दर्जेदार काम करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन-फुलचंद कराड परळी,(प्रतिनिधी):- परळी सिरसाळा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत बोगस होत असून या रस्त्याचे काम दर्जेदार करावे अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी बीड यांना निवेदनाद्वारे भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी दिला आहे.   या बाबत दिलेल्या निवेदनात भाजपा ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ एफ परळी -सिरसाळा-तेलगाव-बीड-खरवंडी मार्गाचे कामपरळी ते सिरसाळा भागात चालू आहे. गेल्या १ वर्षापासून हे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. एका बाजूचे काम करुन एका बाजुने वाहतुक कळणे आवश्यक होते. तसे न करता संपूर्ण रोड खोदून ठेवला आहे. सेंटरला बॅरीकेटही लावलेले नाहीत. मातीने भरलेली सिमेंटची अर्धी पोती लावली आहेत. त्यामुळे अनेक अपघात होवून अनेक माणसे मृत्युमुखी पडली आहेत. धुळीचे लोटामुळे आजुबाजुच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गावात घराघरात धूळ अन्नात मिसळत आहे. रोडवर पाणी टाकल्या जात नाही. टू व्हिलर वापरणारांना गाड

धनंजय मुंडेंची अर्थपुर्ण प्रतिक्रिया

इमेज
धनंजय मुंडेंची अर्थपुर्ण प्रतिक्रिया अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आगोयाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. अखेर अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि पक्षनाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आय़ोगाने दिले आहेत. यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी अतिशय अर्थपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ● धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया....   घड्याळ आणि वेळ दोन्हीही दादांचीच! निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत! या निकालातून आज आमचा निर्णय योग्यच होता हे पुन्हा एकदा नियतीने सिद्ध केले. पक्षातील सर्व मान्यवर नेत्यांचे व सहकाऱ्यांचे अभिनंदन. हा विजय लोकशाहीचा.

बीडमध्ये भुकंप नव्हे, भुगर्भातील आवाज; घाबरू नका, जिल्हा प्रशासनाचे आवाहन

इमेज
  बीडमध्ये भुकंप नव्हे, भुगर्भातील आवाज; घाबरू नका, जिल्हा प्रशासनाचे आवाहन बीड, दि.6 (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यातील बीड, गढी, गेवराई भागात मंगळवारी रात्री झालेल्या गुढ आवाजाने खळबळ माजली आहे. अशातच सदरच्या आवाजाचा भूकंपाशी संबंध नसून पाणी पातळी खालावल्यामुळे कधी कधी भूगर्भातून असे आवाज येतात, सदरील भुकंप नसून भुगर्भातील आवाज आहे, नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बीड शहरात मंगळवारी रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी मोठा आवाज झाला. त्यामुळे खिडक्या, घराचे दरवाजे हादरली व भांडी पडली. अनेकांना भूकंप असल्याचे जाणवले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, सदरचा प्रकार भूकंप नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लातूरच्या भूकंप निरीक्षण केंद्रात कोणत्याही भूकंपाची नोंद झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पाणी पातळी खालावल्याने जमिनीत निर्वात पोकळी निर्माण होते आणि त्यामुळे असे काही आवाज येऊ शकतात. तरी जनतेने घाबरुन जाऊ नये असे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाने केले आहे.
इमेज
  निवृत्त शिक्षिका सुशीलाबाई पाटणकर यांचे निधन  परळी - परळी जिल्हा परिषद शाळेच्या निवृत्त शिक्षिका सुशीलाबाई वसंतराव पाटणकर (वय ८८) यांचे मंगळवारी (दि. ६ फेब्रुवारी) सकाळी सावता माळी मंदिर मार्गावरील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा महेश पाटणकर, सून, नातवंडे, असा परिवार आहे.

मोठी बातमी! अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, निवडणूक आयोगाचा निकाल

इमेज
  मोठी बातमी! अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, निवडणूक आयोगाचा निकाल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.         जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीबरोबर जात उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. त्यांच्याबरोबर काही आमदारही गेले. तसंच, जवळपास ७ मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथही घेतली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले. गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचं प्रकरण प्रलंबित होतं. गेल्या सहा महिन्यांत याप्रकरणी १० सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्या. या प्रत्येक सुनावणीत शरद पवार जातीने हजर होते.         अजित पवार गट आणि शरद प

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

इमेज
धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या परळी वैजनाथ , प्रतिनिधी...       शहरातील पवनराजे अर्बन निधी या अर्थपेढीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी सात वाजता उघडकीस आली आहे. सध्याच्या परिस्थितीत पतसंस्था, मल्टीस्टेट, पतपेढ्या यांच्या आर्थिक अडचणीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. बीड जिल्ह्यात काही पतसंस्था बाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच आता परळी शहरातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या पवन राजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे.           प्रेम प्रज्ञा नगर येथील एका अपॉर्टमेंट मध्ये प्रल्हाद सावंत यांनी काही दिवसापूर्वीच घर खरेदी केले होते. या घरात अद्याप ते राहयलाही गेले नव्हते. याच घरात आज दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून त्यांच्या खिशात  कागदपत्रे सापडले आहेत. यातून आत्महत्येचे कारण पुढे येण्याची शक्यता आहे. उत्तरीय तपासणीसाठी उप

राष्ट्रीय सेवा योजनेच्या +२ स्तराच्या वतीने लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी साबणे उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्काराने सन्मानित

इमेज
  राष्ट्रीय सेवा योजनेच्या +२ स्तराच्या वतीने लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी साबणे उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्काराने सन्मानित परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)           शिक्षण संचलनालय पुणेच्या वतीने एक उत्कृष्ट स्वयंसेविका व उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी यांची निवड करण्यात येते. २०२२-२३ या वर्षात लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी शिवाजी साबणे हिची निवड करण्यात आली. याचा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (ता.०५) पार पडला. यामध्ये श्रावणीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.                शिक्षण संचालनालय पुणे यांच्या वतीने दरवर्षी राज्यातील सर्व विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातून एक उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी व एक उत्कृष्ट स्वयंसेविका निवडली जाते. हे पुरस्कार राष्ट्रीय सेवा योजनेच्या +२ स्तरावरील राज्यस्तरीय शिबीरात वितरण केले जाते. यंदा शिक्षण संचालनालय पुणे व शिक्षण संचलनालय विभाग अमरावतीच्या वतीने विवेकानंद आश्रम हिवरा (ता.मेहकर, जिल्हा बुलढाणा) येथे ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले होते. या राज्यस्तरीय शिबीरात छत्रपती संभाजी

श्रीमती शांताबाई गोविंदराव आलूरकर यांचे देगलूर येथे निधन

इमेज
श्रीमती शांताबाई गोविंदराव आलूरकर यांचे देगलूर येथे निधन ...... नांदेड दिनांक 6 फेब्रुवारी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा देगलूर येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. सुरेंद्रजी आलुरकर व सेवानिवृत्त वनाधिकारी कृष्णा आलुरकर यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई गोविंदराव आलूरकर (वय 94 वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता देगलूर येथे निधन झाले. वैकुंठधाम स्मशानभूमी,देगलूर येथे दि 6 फेब्रुवारी 24 रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुली, दोन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. परोपकारी स्वभावाच्या,अत्यंत शांत व मनमिळावू स्वभावाच्या, धार्मिक वृत्तीच्या व संपूर्ण आलूरकर परिवाराला मायेने वाढविणाऱ्या आजी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. अंत्यसंस्काराच्या वेळी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य शंकरराव लासुणे( उदगीर ), माणिकराव भोसले ( नांदेड ), वट्टमवार , माजी आमदार सुभाष साबणे , नगराध्यक्ष शंकरराव कंठेवाड, देगलूरच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत रेखावार, स्थान

श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण वाकडे, उपाध्यक्ष संजय गोरे, तर सचिव सचिन मुंदडा

इमेज
  श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण वाकडे, उपाध्यक्ष संजय गोरे, तर सचिव सचिन मुंदडा  परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः-  नागरी सहकारी पतसंस्थेच्या क्षेत्रात परळी वैजनाथ तालुक्यात अग्रगण्य असलेल्या व परळीतील जुनी पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी श्री वाकडे यांनी या पतसंस्थेवर सचिव म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. संस्थेच्या बिनविरोध निवडल्या गेलेल्या नुतन संचालकांची बैठक नुकतीच सहकार विभागाचे अधिकारी निवडणुक निर्णय अधिकारी एस के चव्हाण व श्री भद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी श्री स्वामी समर्थ नागरी संस्थेच्या नुतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी संजय प्रभाकरराव गोरे व सचिवपदी सचिन ब्रिजलालजी मुंदडा यांची निवड करण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक पवनकुमार जैस्वाल, सौ.सुनीता वाघमोडे, श्रीकांत दामा, बालाजी जातकर, रमेश बागवाले, सौ.सुमन चव्हाण, सौ.सुवर्णा जंगले, सौ.विद्या मुंडलिक आदी संचालक उपस्थित होते. या निवडीनंतर नु

परीक्षेचे पेपर फोडणारांना आता १ कोटींचा दंड आणि १० वर्षांची जेल , संस्थेवरही कडक कारवाई

इमेज
  परीक्षेचे पेपर फोडणारांना आता १ कोटींचा दंड आणि १० वर्षांची जेल , संस्थेवरही कडक कारवाई … नवी दिल्ली : लोकसभेत पेपर फुटीचे विधेयक मांडण्यात आले असून आता पेपर फुटीसंदर्भात कठोर कारवाई ही केली जाणार आहे. या विधेयकानुसार पेपर फुटी करणाऱ्याला तब्बल 1 कोटी रूपयांचा दंड हा भरावा लागणार आहे. पेपर फुटीच नव्हे तर परीक्षा देणाऱ्या उमेदवाराच्या जागी जर दुसऱ्या कोणी परीक्षा देत असेल तर त्याच्याविरोधात देखील कठोर कारवाई ही केली जाणार आहे. लोकसभेत 5 फेब्रुवारी 2024 रोजी हा पेपर फुटीचा विधेयक मांडण्यात आले. हा विधेयक केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मांडला आहे. जर एखादा व्यक्ती हा पेपर फुटीमध्ये दोघी आढळला तर त्याला तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास होणार आहे आणि 1 कोटी रूपये दंड भरावा लागणार. इतकेच नाही तर पेपर फुटीमध्ये एखादी संस्था सहभागी असेल तर त्या संस्थेला परत परीक्षा घेण्याचा सर्व खर्च हा उचलावा लागेल आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. म्हणजेच काय तर पेपर फुटीमध्ये शाळेचा किंवा महाविद्यालयाचा सहभाग आढळून आला तर कठोर कारवाईला संस्थेला सामोरे जावे लागेल. या नव्या विधेयकानुसार पेपर फुटीम

पतसंस्थांना सरकार देणार मदतीचा आधार !

इमेज
  ठेवीदारांनी खुषखबर: पतसंस्थांना अर्थिक सहाय्य; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय  मुंबई :   सहकारी पतसंस्थांच्या ठेवीदारांमध्ये विश्वासार्हता वाढवण्यासाठी पतंस्थाकडील १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना सुरक्षा कवच पुरवण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. अशा ठेवी संरक्षित करण्यासाठी 'स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजना' सुरू करण्यास दि. ५ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार, या योजनेसाठी परतफेडीच्या अटीवर नियामक मंडळास १०० कोटी रुपये इतका निधी देण्यात येणार आहे. राज्यात जवळपास २० हजार नागरी, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आणि पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत. या पतसंस्थांकडे सुमारे ३ कोटी ठेवीदारांच्या अंदाजे ९० हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवींना संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने सहकार कायद्यातील कलम १४४-२५ अ मध्ये 'स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी' निर्माण करण्याची तरतूद आहे. त्यानुसार राज्यातील सर्व पतसंस्थांनी या निधीमध्ये अंशदान जमा करावयाचे आहे. हा निधी सहकार आयुक्त व निबंधक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या नि

महर्षी दयानंदांचे विचार व कार्य जगासाठी उपकारक -आंतरराष्ट्रीय संघटक विनय आर्य यांचे प्रतिपादन

इमेज
  महर्षी दयानंदांचे विचार व कार्य जगासाठी उपकारक -आंतरराष्ट्रीय संघटक विनय आर्य यांचे प्रतिपादन      परळी वैजनाथ दि.५-   महर्षी दयानंद यांनी अज्ञानयुगात वावरणाऱ्या मानव समूहाला वैदिक ज्ञानाच्या प्रकाशात आणून शाश्वत आनंदाने जगण्याचा मार्ग दाखविला. त्यांच्या  मूलभूत कार्याची व शिकवणीची  नव्याने मांडणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय आर्य समाज संघटक श्री विनय आर्य यांनी केले .         गेल्या तीन दिवसांपासून येथील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात सुरू असलेल्या महर्षी दयानंद द्विन्मशताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्य समाजाचे स्थानिक प्रधान श्री जुगलकिशोर लोहिया हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वैदिक विचारवंत प्रा. सोनेराव आचार्य,पं. प्रियदत्त शास्त्री, पं. राजवीर शास्त्री, वैदिक विदुषी सविता आचार्या, महेश वेलानी,पं. सत्यवीर शास्त्री आदी उपस्थित होते.       श्री विनय आर्य यांनी यावेळी महर्षी दयानंद यांच्या ऐतिहासिक जीवन व कार्यातून समग्र समस्यांचे समूळ निवारण होते, असे सांगून  स्वराज्य, स्वदेशी, गोरक्षण, कृष

दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली !!

इमेज
  राणूबाई ज्ञानदेव सोमवंशी यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी         येथील नेहरू चौकातील मेघराज हॉटेलचे मालक भरत सोमवंशी,मेघराज सोमवंशी,शत्रुघ्न सोमवंशी यांच्या मातोश्री राणूबाई ज्ञानदेव सोमवंशी यांचे वार्धक्याने आज दि.5 फेब्रुवारी रोजी सायं.5.30 वा.सुमारास निधन झाले.मृत्युसमयी त्या 95 वर्षे वयाच्या होत्या. पत्रकार महादेव शिंदे यांच्या त्या मावशी होत.       नेहरु चौक भागातील बाजीप्रभुनगर येथील रहिवाशी राणूबाई ज्ञानदेव सोमवंशी  या अतीशय मनमिळाऊ होत्या. वयोमानापरत्वे वयाच्या  95  व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने सोमवंशी व शिंदे परिवाराचा आधारवड कोसळला आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने  सोमवंशी कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.         दरम्यान, दिवंगत राणूबाई  सोमवंशी यांच्या पार्थिवावर मंगळवार दि.6 रोजी सकाळी 10 वा.मोक्षधाम स्मशानभूमी परळी वैजनाथ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाजीप्रभुनगर येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल.

निवड :हार्दिक अभिनंदन!!!!

इमेज
  वंजारी महासंघ परळी शहर उपाध्यक्षपदी अभिमन्यू गुट्टे परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखेच्या परळी शहर उपाध्यक्षपदी अभिमन्यू अंबाजी गुट्टे यांची निवड करण्यात आली आहे.      वंजारी महासंघ, महाराष्ट्र राज्य युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष नितीन सोपानराव ढाकणे यांनी नुकतेच निवडीचे पत्र प्रदान केले आहे. परळी शहर उपाध्यक्षपदी अभिमन्यू अंबाजी गुट्टे हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कला व क्रीडा तसेच अध्यात्मिक क्षेत्रात सतत अग्रेसर राहून काम करणारे परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्व आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन  निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल अभिमन्यू  गुट्टे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

●अभिष्टचिंतन:पत्रकार संतोष जुजगर यांचा विशेष लेख >>>>प्रा.अतुल दुबे यांचे ‘अतुलनिय’ कार्य

इमेज
  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक प्रा.अतुल दुबे यांचे ‘अतुलनिय’ कार्य परळीच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय सहभाग ने तृत्वाचा वारसा अनेकांना चालत येतो. या नेतृत्वात संवेदनशीलपणा असेलच असे नसते. परंतु ज्याला नेतृत्वाचा वारसाही नाही आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर  ज्याला कळवळा येतो असे नेतृत्व हे अपवादानेच उदयाला येते. सर्व सामान्यांतुन उदयास आलेल्या नेतृत्वामध्ये एक प्रकारचे संवेदनशीलता भरलेली असतेच त्याचबरोबरीने आक्रमताही तेवढ्याच तीव्रतेने असते हे दिसुन येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे परळी शहरातील एक युवा नेतृत्व  प्रा.अतुल दुबे सर या धडपडत्या युवकाच्या रूपाने पहावयास मिळते. वेगवेगळ्या माध्यमातून व एक ध्येय समोर ठेवून सर्वसामान्यां प्रती असलेल्या जिव्हाळा अनेक आंदोलने व अनेक प्रश्नांची सोडवणुक करताना त्याच्यातील संवदेनशीलतेचा प्रत्यय नेहमीच पहावयास मिळाला. तसेच परळी शहराच्या सामाजिक धार्मिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अतुलनिय असणारे  प्रा.अतुल दुबे सर यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमीत्त त्यांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा.  प्रा.अतुल दु

दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  शकुंतला माणिकराव धर्माधिकारी यांचे निधन परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.4 - येथील रहिवासी असलेल्या शकुंतला माणिकराव धर्माधिकारी (वय-87) यांचे रविवार दि.4 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.50 वा.लातूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळीतील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश धर्माधिकारी,रमेश धर्माधिकारी,चंद्रकांत धर्माधिकारी यांच्या त्या आई होत तर माजी नगराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी यांच्या त्या आजी होत.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी, सूना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. धर्माधिकारी कुंटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

शिक्षणप्रेमी साहित्य रसिकांना मिळणार अभूतपूर्व मेजवानी

इमेज
  परळीत 11 फेब्रुवारी रोजी रंगणार 6वे  मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन शिक्षणप्रेमी साहित्य रसिकांना मिळणार अभूतपूर्व मेजवानी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या   6 व्या  मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनात साहित्य रसिकांना दर्जेदार साहित्यिकांची साहित्यिक मेजवानी मिळणार असून या एक दिवसीय साहित्य संमेलनास साहित्यिक,शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे मुख्य संयोजक रानबा गायकवाड व स्वागत समितीने केले आहे.       परळी येथे साप्ताहिक शिक्षण मार्गाच्या वतीने 6 वे मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. संत तुकोबाराय साहित्य नगरी, औद्योगिक वसाहत सभागृह येथे होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षण तज्ञ ए.तु. कराड हे आहेत. संमेलनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त लेखक, दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे यांच्या हस्ते होणार आहे. तर नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव व कै. रामभाऊ अण्णा खाडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप खाडे हे स्वागत अध्यक्ष आहेत.      या एकदिवसीय

डॉ. तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई नेहरकर यांची प्रतिवर्षी वामनभाऊंच्या पुण्यतिथी निमित्त सेवा

इमेज
  प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी गहिनीनाथ गडावर नेहरकर दाम्पत्याकडून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी डॉ. तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई नेहरकर यांची प्रतिवर्षी वामनभाऊंच्या पुण्यतिथी निमित्त सेवा पाटोदा (प्रतिनिधी) - संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने डॉ.तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई नेहरकर यांच्या वतीने याही वर्षी संत वामनभाऊ समाधी मंदिरावर हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.  मूळ घाटशीळ पारगाव येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते तथा जागतिक आरोग्य सल्लागार डॉ.तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई तुकाराम नेहरकर या दाम्पत्याने संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हेलिकॉप्टरमधून समाधीस्थळी पुष्पवृष्टी करण्याचा पायंडा सुरू केला आहे.  शनिवारी (दि.03) राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते समाधी स्थळी मानाची महापूजा करण्यात आली, यावेळी प्रथमच वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर हे ही उपस्थित होते.  दरम्यान पुण्यतीथी सोहळ्याची सांगता काल्याच्या हरिकीर्तनाने झाली. यावेळी संत वामनभाऊ यांच्या समाधीवर 11.45 वा नेहरकर दाम्पत्याने आयोजित केलेल्या हेलिकॉप्टर ने पुष्पवृष्टी करण्यात आली. 

ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये लावण्याई पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन: सिनेअभिनेत्री अपेक्षा चलवदेही राहणार उपस्थित

इमेज
  ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये लावण्याई पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन:  सिनेअभिनेत्री अपेक्षा चलवदेही राहणार उपस्थित परळी वैजनाथ ,  प्रतिनिधी......  परळी वैजनाथ येथील डी एस एम प्रतिष्ठान संचलित लावण्याई पब्लिक स्कूलचे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या व लगन या मराठी  चित्रपटातील  सिनेअभिनेत्री अपेक्षा चलवदे (राजनंदिनी) त्यांच्या उपस्थितीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन- 2024 दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होत आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पत्रकार अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.  या कार्यक्रमांमध्ये या शाळेचे चिमुकले विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्याताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला सकारात्मक पत्रकारितेतून महाराष्ट्रात नवा मापदंड निर्माण करणारे बीड जिल्ह्यातील सृजनशील,जेष्ठ पत्रकार दैनिक दिव्य लोकप्रभाचे संपादक संतोष मानूरकर, परळी शहराचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, दिव्यांग