पोस्ट्स

अर्भक लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
हलगीच्या तालातून थेट देशसेवेपर्यंत! हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या तरुणाची अग्निवीर जवानपदी निवड; परळीच्या साठेनगरमध्ये जल्लोष परळी वैजनाथ ,प्रतिनिधी :       परळीच्या साठे नगर मधील ज्या घरात दोन वेळच्या जेवणाची चिंता होती, ज्या वडिलांनी हलगी वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, त्या कष्टकरी कुटुंबातील संतोष चौरे या तरुणाने आज भारतीय सैन्यात अग्निवीर जवान म्हणून निवड मिळवत संघर्षावर यशाची मोहोर उमटवली आहे. या अभिमानास्पद यशामुळे परळी शहरातील साठेनगर परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून प्रथमच साठे नगर परिसरातून देशसेवेत निवड झाली असल्याने नागरिकांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले. आर्थिक संकट, अभाव आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत वाढलेल्या या तरुणाने लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न पाहिले होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक अडचणी त्याच्या वाट्याला आल्या, मात्र त्याने परिस्थितीसमोर कधीही हार मानली नाही. कठोर परिश्रम, नियमित सराव आणि जिद्दीच्या बळावर त्याने भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत यश संपादन केले. मुलाच्या निवडीची बातमी समजताच कष्टाने...

MB NEWS-नवजात मयत अर्भक आढळले

इमेज
  नवजात मयत अर्भक आढळले बीड, सिमेंट बंधार्‍याच्या कडेला एक नवजात मयत पुरुष जातीचे अर्भक सोमवारी (दि.11) दुपारच्या सुमारास आढळले. सदरील अर्भक हे एका पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले होते. ग्रामीण पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेत मयत अर्भक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरु आहे.  बीड तालुक्यातील कपिलधारवाडी परिसरामध्ये एका सिमेंट बंधार्‍याच्या कडेला पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले मयत अर्भक गुराख्याला दिसले. त्याने याची माहिती पोलीसांना दिली. माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास आवारे, अंमलदार प्रल्हाद चव्हाण, आनंद मस्के, चालक कृष्णात बडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी पांढर्‍या कपड्यामध्ये गुंडाळलेले मयत पुरुष जातीचे अर्भक दिसून आले. त्यावर कुठेही जखम झालेली नव्हती. हे अर्भक एक दिवसाचे असल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. सदरील अर्भक हे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत. 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या