पोस्ट्स

मार्च ३१, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चेअरमन विनोद सामत यांना वाढदिवसानिमित्त शुभ आशीर्वाद

इमेज
  वैद्यनाथ अर्बन बँकेची राज्यभरात  भरभराट होईल- नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात अव्वल असलेल्या  परळीच्या वैद्यनाथ अर्बन बँकेने सभासद , खातेदार व ठेवीदारांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. बँकेच्या आजपर्यंतच्या  नेतृत्वाने , व चेअरमन संचालक मंडळ ,अधिकारी, कर्मचारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे वैद्यनाथ अर्बन बँक राज्यात अग्रेसर असून या बँकेची प्रगती यापुढे होणार आहे असा आशीर्वाद सोनपेठ श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी दिले. सामान्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी या बँकेने प्रयत्न केले आहे यापुढे करावेत अशी अपेक्षा ही शिवाचार्य महाराजांनी व्यक्त केली.                                          श्री  नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांनी शनिवारी वैद्यनाथ अर्बन बँकेच्या मुख्य शाखेस भेट दिली याप्रसंगी त्यांनी बँकेच्या कामकाजाची माहिती घेतली व बँकेचे चेअरमन विनोद सामत यांना वाढदिवसानिमित्त शुभ आशीर्वाद दिले .यावेळी बँकेच्या वतीने नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांचे स्वागत करण्यात आले .यावेळी आपल्या मनोगतातून बँकेच्या संचालि

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारवाया

इमेज
  परळी पोलिस ॲक्शन मोडमध्ये ! कोम्बिग ऑपरेशन राबवत फरार 18 आरोपी ताब्यात;तीन तलवारी जप्त  परळी (प्रतिनिधी)  परळी शहर,संभाजीनगर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतिने शुक्रवारी (दि.5 एप्रिल) रात्री लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यात गस्त घालुन ठिकठिकाणी तपासणी करण्यात आली.यामध्ये विविध गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या 18 आरोपींना ताब्यात घेण्याबरोबरच तीन तलवारी व हातभट्टी दारु अड्डयावर छापा टाकत गुन्हे दाखल केले.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी पोलिस ॲक्शन मोडमध्ये असुन शुक्रवार दि.5 एप्रिल रोजी रात्री 11 ते पहाटे 4 या वेळेत परळी शहरासह तालुक्यात पोलिस उपाधिक्षक चोरमले,परळी शहर पोलिस ठाण्याचे पोनि.संजय लोहकरे,संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोनि उस्मान शेख,ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोनि मनिष पाटिल यांच्यासह 23 कर्मचारी व आरसीपी ची एक प्लॅटुन अशा फोजफाट्यासह संयुक्त कारवाई करण्यात आली.यात  विविध गंभीर गुन्ह्यातील दोन वर्षांपासुन फरार असलेल्या 18 आरोपीसह टोकवाडी,फुलेनगर या भागातुन तीन तलवारी जप्त करण्यात आल्या.गंगासागर नगर भागात सुरु असलेल्या हातभट्टी अड्डयावर छापा टाकत 2200 रुपयांचे र

नारायण गडावरील बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केला होता विषय

इमेज
शाळकरी मुलींची छेड प्रकरण ;दोन जण सिरसाळा पोलीसांच्या ताब्यात  नारायण गडावरील बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केला होता विषय  सिरसाळा  :  शाळेत जात येत असलेल्या मुलीला रस्त्यात गाठून छेड काढणाऱ्या करेवाडीच्या  दोन रोमिओंना सिरसाळा पोलीसांनी आज (दि. ६ एप्रिल) रोजी ताब्यात घेतले आहे.त्यांच्यावरती कलम ३५४,३४१ भादवी व पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक १ एप्रिल रोजी घडल्याचे समजते आहे. काल मनोज जरांगे पाटील यांनी  नारायणगड येथे मराठा समाज बांधवांच्या झालेल्या बैठकीत छेडछाडीचा विषय मांडला होता .          परळी तालुक्यात माझ्या समाजाच्या मुलींना त्रास दिला जातो, अन्याय केला जातो असे म्हणत या प्रकरणी पालकमंत्री यांनी लक्ष द्यायला हवे अन्यथा आम्ही परळीत घुसू असे जरांगे पाटिल यांनी वक्तव्य केले होते. यानंतर ह्या घटनेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सिरसाळा पोलीसांनी दोन आरोपींना आज ताब्यात घेतले असुन पुढील कार्यवाही सुरु आहे. अधिक तपास सह पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफळे करत आहेत.

बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद

इमेज
  गोंधळी, धनगर, बंजारा, भिल्ल समाजासह अठरापगड जातीची मिळतेयं पंकजाताई मुंडेंना साथ बीडच्या बैठकीत समाजातील कार्यकर्त्यांनी दिली एकमुखी पसंती सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख नेतृत्व पंकजाताई मुंडेच बीड ।दिनांक ०५। बीड जिल्ह्यातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेल्या अभूतपूर्व विकास कामांमुळे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना अनेक सामाजिक घटक आणि राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळतो आहे. बीड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, सुपर वॉरीअर्सच्या बैठकीत याचा प्रत्यय आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात बीड तालुक्यातील गोंधळी समाज,धनगर समाज, बंजारा समाज, भिल्ल समाज आणि लोक कलावंत जिल्हा संघटनेने पंकजाताई मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी सर्व समाज घटकांनी पंकजाताई मुंडे यांचे स्वागत केले. आगामी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने पंकजाताईंच्या पाठीशी मतदान रुपी आशीर्वाद उभे करून त्यांना विक्रमी मताधिक्याने लोकसभेत पाठवण्याचा संकल्प केला, याप्रसंगी पंकजाताई मुंडे यांनी

तुम्ही बुथ मजबुत करा, मी जिल्हा मजबूत करते

इमेज
  बीडमध्ये भाजपा महायुतीचे जिल्हा प्रचार कार्यालय ; पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले उद्घाटन बूथ प्रमुखांसह सुपर वॉरियर्स सोबत पंकजाताईंनी घेतली बैठक बीड ।दिनांक ०५। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बीड येथील जिल्हा मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उदघाटन आज  भाजप महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मोठया उत्साहात झाले. खा. डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्यासह महायुतीचे सर्व जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.  बीड शहरातील जालना रोडवरील संचेती बिल्डींग, एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर, भाजप महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालय सुरू झाले आहे. आता या ठिकाणाहून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने काम केले जाणार आहे. दुपारी पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते फीत कापून या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पंकजाताई यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करत त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.    पकार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी  खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर

परळीत आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल

इमेज
  परळीत आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     परळीत बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शाळकरी मुलींच्या अपहरणाच्या घटनाही घडलेल्या आहेत महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दररोज पोलीस ठाण्यात नोंद होताना दिसून येत आहे आज पुन्हा एकदा एका महिलेने आपल्यावर सातत्याने शारीरिक अत्याचार करण्यात आले व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली या आशियाची फिर्याद दाखल केल्यावरून एका जणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, शहरातील शिवनगर, वडर कॉलनी  येथील मोलमजुरी करणाऱ्या एका गृहिणीने आपल्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आल्याची फिर्यादी पोलिसात दाखल केली आहे.यातील फिर्यादी व आरोपी हे एकमेकाना ओळखत असून आरोपी व फिर्यादी अधून-मधून बोलत असत. नंतर आरोपी हा फिर्यादीस मला तूझ्या सोबत शारीरीक संबंध ठेवायचे आहेत असे म्हणत असे, नकार दिल्यास तूझ्या मूलांना मारून टाकीन अशी धमकी देवू लागला, त्यानंतर दिनांक 30/03/2024 रोजी सकाळी 11.00 वा. सुमारास फिर्यादी घरी एकटीच असताना आरोपीने घरी येवून फिर्यादीसोबत जबरदस्तीने बलात

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, बीडमधून पुन्हा बजरंग सोनवणे

इमेज
  राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, बीडमधून पुन्हा बजरंग सोनवणे मुंबई  : शरदचंद्र पवार गटाची बहुप्रतिक्षित दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये बीडमधून पंकजा मुंडे यांच्याविरोधात पुन्हा एकदा बजरंग बप्पा सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर भिवंडीवर काँग्रेसने अखेरपर्यंत दावा करूनही ही जागा मिळविण्यात शरद पवार गटाने बाजी मारली. या जागेवरून बाळ्यामामा म्हात्रे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याविरोधात म्हात्रे दोन हात करतील. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने याआधी पहिल्या उमेदवारी यादीत पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली होती. गुरुवारी पक्षाने दुसरी यादी जाहीर केलेली असून बीड आणि भिवंडीच्या जागेवर उमेदवार जाहीर केलेले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने याआधी पहिल्या उमेदवारी यादीत पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली होती. बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून निलेश लंके, दिंडोरीमधून भास्करराव भगरे गुरूजी तर वर्ध्यातून अमर काळे यांना पक्षाने उमेदवारी दिलेली होती. गुरूवारी पक्षाने आणखी दोन उमेदवारांच्

महाविजय २०२४ : पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या बीड लोकसभा जिल्हा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ व बीड मतदारसंघ कार्यकर्ता बैठक

इमेज
  महाविजय २०२४ : पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या बीड लोकसभा जिल्हा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ व बीड मतदारसंघ कार्यकर्ता बैठक बीड,प्रतिनिधी....          ३९ बीड लोकसभा निवडणुक भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपिनाथराव मुंडे यांच्या हस्ते बीड लोकसभा जिल्हा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आज शुक्रवार दि.५ एप्रिल २०२४ रोजी करण्यात येणार आहे.तसेच बीड मतदारसंघ कार्यकर्ता बैठक होणार आहे.यावेळी खा. डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.        आज शुक्रवार दि.५ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वा. संचेती बिल्डींग, एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर, जालना रोड, बीड येथे पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते बीड लोकसभा जिल्हा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ  करण्यात येणार आहे. यावेळी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना नेते अनिल जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,सचिन मुळूक,रिपाई नेते पप्पू कागदे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजप महायुती प्रचार समितीने केले आहे. • बीड मतदारसंघ कार्

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देणारा

इमेज
  पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ खा.प्रितम मुंडे यांच्या बर्दापूर, राडी गटात भेटीगाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देणारा अंबाजोगाई - दि. ०२ --- भाजप महायुतीच्या उमेदवार तथा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ खा. प्रितमताई मुंडे यांनी बर्दापूर आणि राडी जिल्हा परिषद गटातील  नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. ग्रामीण भागातील तांडे, वाड्या-वस्त्यांचा शहरातील उच्चभ्रू वस्त्यांप्रमाणे विकास करणाऱ्या विकासाभिमुख नेतृत्वाला बहुमताने लोकसभेत पाठवण्यासाठी मतदानरुपी आशीर्वाद दया असे आवाहन खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी याप्रसंगी केले. पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासाठी अभूतपूर्व विकास निधी आणला होता, आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, बीडकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण व सर्वसमावेशक विकासाला गती देण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना संसदेत पाठवायच आहे, याकरिता एकजुटीने आपल्या सर्वांचे आशीर्वाद पंकजाताईंच्या पाठीशी उभे राहतील, पंकजाताईंना उमेदवारी जाही

ऊस तोडणी ला मजूर पाठवतो म्हणून ऊसतोड मुकादमाला आठ लाखाला घातला गंडा

इमेज
  ऊस तोडणी ला मजूर पाठवतो म्हणून ऊसतोड मुकादमाला आठ लाखाला घातला गंडा परळी वैजनाथ, प्रतिनिधी          ऊस तोडणीसाठी मजूर पुरवतो म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील एका जणाने परळी तालुक्यातील ऊसतोड मुकदमाला तब्बल आठ लाख रुपयाला गंडा घातल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.           याबाबत ग्रामीण पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी बबन सुदाम कदम वय-49 वर्षे व्यवसाय-ऊस तोड मुकादम रा-नंदागौळ ता- परळी यांनी आरोपी विष्णु उकंडा राठोड वय-29 वर्ष रा-वनवारला ता-पुसद जि-यवतमाळ याच्याशी करार केला होता. आरोपीने फिर्यादी व साक्षीदाराकडून कास्खाण्याला ऊस तोडणीसाठी मजुर पुरवतो असे म्हणुन विश्वासाने 800000/रु (आठ लाख रु) घेतले.पैसे घेऊनही ऊस तोडणीसाठी मजुर पुरवले नाही व फिर्यादीचे पैसे वापसही दिले नाही. त्यामुळे फिर्यादी व साक्षीदार यांचा त्याने विश्वासघात केला म्हणून पोलीस स्टेशन परळी ग्रामीण येथे आरोपीविरुद्ध गुरन. कलम-84/2024 कलम-406 भादवी प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पोह केकाण हे करीत आहेत. 

दुखःद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  भाजपाचे ज्येष्ठ नेते कमलाकर हरेगावकर यांचे अल्पशा आजाराने निधन परळी वैजनाथ/प्रतिनिधी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक कमलाकर (तात्या) हरेगावकर यांचे आज बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यू समयी ते 65 वर्ष वयाचे होते. गुरुकृपा नगर येथील रहिवासी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक कमलाकर सोपानराव हरेगावकर यांचे आज सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. अत्यंत मनमिळाऊ व सुस्वभावी असल्याने ते सर्व परिचित होते. नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांनी विविध विकास कामे केली होती. वीरशैव समाजाच्या विविध धार्मिक सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय असत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, जावई, तीन भाऊ, एक बहीण, नातवंडे असा परिवार आहे.  कमलाकर हरेगावकर यांच्या पार्थिवावर सायंकाळी सार्वजनिक स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

इमेज
  महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग! फेसबुकवरची मैत्री परळीतील गृहिणीली आली अंगलट: ब्लॅकमेलिंग, शारिरीक संबंध, मारहाण ते जीवे मारण्या पर्यंतची फरफट:गुन्हा दाखल परळी वैजनाथ प्रतिनिधी फेसबुक वरची मैत्री आपल्या कधीही अंगलट येऊ शकते विशेषतः फेसबुक वापरणाऱ्या महिलांनी याबाबतीत काळजी घेणे अत्यंत आवश्यक असून फेसबुक वरून मैत्री करून अनेक जण महिलांना आपल्या जाळ्यात ओढतात व त्यानंतर जे घडते ते अंगावर काटे आणणारे असते असाच काहीसा प्रकार परळी शहरातील एका गृहिणी सोबत घडला असून याप्रकरणी या महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाख दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे         पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, परळी वै येथील शारदानगर भागातील 32 वर्षिय गृहिणी महिलेने फेसबुकवर  झालेल्या मैत्रीनंतरआपल्यावर बेतलेल्या प्रसंगाबाबत बीड येथील एका आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. यातील आरोपी अकबर बबन शेख वय 23 वर्षे रा. तेलगावनाका ईंदिरानगर बीड याने फिर्यादि महिलेशी फेसबुक अकाउन्टवर ओळख करुन घेतली. त्यानंतर सततच्या चॅटिंगमध्ये मैत्री पुढे गेली. विविध प्रकारची माह

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान: ई केवायसी करुन घ्या -तहसिलदार व्यंकटेश मुंडे

इमेज
  नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान: ई केवायसी करुन घ्या -तहसिलदार व्यंकटेश मुंडे परळी वैजनाथ तालुक्यातील शेतकरी यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना केंद्रीभूत पध्दतीने थेट लाभार्थी हस्तांतरण प्रणालीमार्फत वितरण करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाआयटी मार्फत विकसीत संगणक प्रणाली मार्फत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात निधी वितरीत सुरू आहे. ज्या पात्र लाभार्थी यांना रक्कमेचे प्रदान झाले नाही अशा शेतक-यांची यादी गांव निहाय डकविण्यात आली आहे. या यादीमध्ये प्रत्येक लाभार्थी यांच्यासाठी एक स्वतंत्र क्रमांक तयार करण्यात आला असून त्यास "विशिष्ट क्रमांक "असे संबोधण्यात येते. हा क्रमांक घेवून संबधित शेतकरी यांनी जवळच्या "आपले सरकार केंद्र" या ठिकाणी जावून आधार क्रमांकाद्वारे आपली ओळख पटवावयाची (E-KYC) करायचे आहे. आधार प्रमाणीकरणाची सेवा शेतक-यांसाठी निशुल्क असेल (E-KYC) केल्यानंतर सात दिवसात मदतीची रक्कम थेट शेतक-याच्या खात्यात जमा होईल. तसेच काही लाभार्थी यांचे आधार बँक खात्याशी संलग्न नसल्याने किंवा त्यांचे खात

सलग दोन घटना :शालेय विद्यार्थिनींच्या अपहरणाने पालकांत भितीचे वातावरण

इमेज
  सलग दोन घटना :शालेय विद्यार्थिनींच्या अपहरणाने पालकांत भितीचे वातावरण परळी वैजनाथ, प्रतिनिधी      शालेय विद्यार्थिनींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून परळी शहरात सलग दोन घटना घडल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शाळकरी मुलींचे अपहरण होत असल्याच्या घटनांनी पालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक 30 रोजी थर्मल काॅलनी मधील एका शाळेच्या विद्यार्थिनीच्या अपहरणानंतर आता कंडक्टर कॉलनीतील एका मुलीचे अपहरण झाल्याच्या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे या अपहरणाच्या घटनांनी एकच खळबळ उडाली आहे.           याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शक्तीकुंज वसाहतीत इयत्ता आठवीत  शिक्षण घेणारी विद्यार्थिनी 30 मार्च रोजी सकाळी 10 नंतर अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेले.सदर मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 363 भादवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या घटनेत कंडक्टर कॉलनी येथील एका शाळकरी मुलीचे अपहरण झाले असल्याची फिर्याद या मुलीच्या आईने पोलिसा केली आहे त्यावरूनही संभाजीनगर पोलीस सर गुन्ह्याची नोंद कर

औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्प बचाव कृती समितीचे निवेदन

इमेज
  परळी औष्णिक विद्युत केंद्र संच क्र.९ चे काम सुरू करण्यासाठी परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्प बचाव कृती समितीचे निवेदन परळी /प्रतिनिधी              येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात नवीन संच क्रमांक ९ सुरू करण्यासाठी शासनाने संच क्रमांक ८ च्या वेळी जमिन संपादित केली असून संच क्रमांक ८ कार्यान्वित झाला आहे. मात्र संच क्रमांक ९ च्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही ती सुरू करण्यासाठी परळीऔष्णिक विद्युत प्रकल्प बचाव कृती समितीच्या वतीने येथील बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता डॉ अनिल कोठये व उपविभागीय अधिकारी श्री. अरविंद लाटकर यांना निवेदन देण्यात आले आहे.                येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात सध्या संच क्रमांक ६,७,८ हे कार्यान्वित आहेत. या तीन संचातून ७५० मेगावँट विज निर्मिती केली जाते. येथील संच क्रमांक १ ते ५ बंद करुन स्क्रँप मध्ये काढण्यात आले आहेत.   २००७ मध्ये औष्णिक विद्युत केंद्र संच ८ व ९ साठी १२८ हेक्टर जमीन संपादित केलेली आहे. यातील संच क्रमांक ८ चे काम पूर्ण होवून  २०१६ मध्ये कार्यान्वित करण्यात आलेला

परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा

इमेज
  धनराज आदोडे यांची सहाय्यक संशोधन अधिकारीपदी निवड परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील शारदा नगर भागातील रहिवासी असलेल्या धनराज मारोती आदोडे यांची अर्थ व सांख्यिकी विभाग वतिने घेण्यात आलेल्या परिक्षेत सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब(अराजपत्रित)  म्हणुन निवड करण्यात आली असुन त्यांच्याकडे अर्थ व सांख्यिकी विभाग देण्यात आला आहे.धनराज यांच्या या निवडीने परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.  परळी शहरातील शारदानगर भागातील रहिवासी मारोती आदोडे यांचे चिरंजीव धनराज आदोडे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण परळी येथे पुर्ण झाले.महाविद्यालयीन शिक्षणानंतर आदोडे यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली.या परिक्षेत त्यांना घवघवीत यश मिळाल्यानंतर त्यांची राज्य उत्पादन शुल्क आयुक्तालय मुंबई येथे सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब(अराजपत्रित)म्हणुन नियुक्ती करण्यात आली.त्यांच्याकडे अर्थ व सांख्यिकी विभागाचा कारभार देण्यात आला आहे.सामान्य परिस्थितीतुन आपार मेहनत,जिद्द व चिकाटीने धनराज आदोडे यांनी शिक्षण घेत स्पर्धा परिक्षेची यशाला गवसनी घातली.त्यांचे हे यश परळीतील सामान्य कुटुंबातील शिक्षण घेणार्या व स्पर्धा परिक्

महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष पारिजात पांडे यांची परळी वकील संघास सदिच्छा भेट

इमेज
  महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष पारिजात पांडे यांची परळी वकील संघास सदिच्छा भेट परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री पारिजात पांडे यांची परळी वकील संघास सदिच्छा भेट दिली.        दिनांक२एप्रील रोजी परळी वकील संघात ॲड. पारिजात पांडे यांचा सत्कार परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड प्रदीप गिराम यांनी शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले. त्यांचे समवेत आलेले ॲड अनारसे साहेब,ॲड.कोळपे साहेब, अंबाजोगाई चे सरकारी ॲड.एल.बी.फड यांचाही सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर म्हणून ॲड.पारिजात पांडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ॲड एच.व्ही.गुट्टे, ॲड.प्रकाश मराठे, ॲड,डि.एल‌.उजगरे,ॲड.व्हि.एस.फड, ॲड.टि.के.गोलेर,ॲड.कडबाने, ॲड.एम.व्ही.मुंडे , ॲड.धुमाळ, ॲड.बी.डी.कराड,ॲड,देशमुख, ॲड. सातभाई, ॲड सोपान मुंडे, ॲड.गजानन पारेकर, ॲड.अश्विन साळवे,ॲड.संजय रोडे,ॲड,जेएल आंधळे,ॲड.राहुल सोळंके, ॲड.एम.एस.कराड, ॲड अर्जुन सोळंके,ॲड,सायस मुंडे, ॲड,सोनिया मुंडे,ॲड, कल्पना तौर, ॲड सोनेराव सातभाई, ॲड तिवारी,ॲड.जगतकर ,ॲड उजगरे बंधू, ॲड,डिघोळे ॲड.के.टी.आघाव व बहुसंख्य वकील मंडळी उपस्थित होत

परळीतील अभ्यासू, संशोधक व शेतीनिष्ठ व्यक्तिमत्व प्रा.डाॅ. शांतीलाल लाहोटी यांचे निधन

इमेज
  परळीतील एक अभ्यासू, संशोधक व शेतीनिष्ठ व्यक्तिमत्व प्रा.डाॅ. शांतीलाल लाहोटी यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        परळी- अंबाजोगाई सह संपूर्ण बीड जिल्ह्यात सर्वपरिचित असलेले व्यक्तिमत्व व एक अभ्यासू संशोधक व शेतीनिष्ठ प्रा शांतीलाल लाहोटी यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने परळीतील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील एक अभ्यासू चेहरा हरवला आहे.           योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई येथे अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले परळी येथील सुभाष चौक भागातील रहिवासी प्रा. शांतीलाल लाहोटी यांचे आज दि.2 रोजी पुणे येथे निधन झाले. मृत्यू समयी ते सुमारे 73 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रा.डाॅ. शांतीलाल लाहोटी हे परळी अंबाजोगाई सह संपूर्ण बीड जिल्ह्यात परिचित होते. विविध सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. रोटरी क्लब ,लॉयन्स क्लब, मानवलोक आदी विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांशी व त्यांच्या कार्यात ते संबंधित होते. एक अभ्यासू प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. परळी व अंबाजोगाई य

🌹अभिनंदन:गायन स्पर्धेत सुवर्णा जंगले प्रथम

इमेज
  नियमित संगीत श्रवण केल्याने मन व शारीरीक आरोग्य निरोगी रहाते-डॉ.शालीनी कराड सुरसंगम संगित विद्यालयाच्या गायन स्पर्धेत सुवर्णा जंगले प्रथम तर कल्पना गायकवाड द्वितीय परळी (प्रतिनिधी)  ज्या व्यक्तीला नियमितपणे संगीत ऐकण्याची,गायनाची आवड असते तो व्यक्ती मनाने प्रसन्न असतो.मन प्रसन्न असले तर शरीरही निरोगी रहाते यामुळे माणसाच्या जीवनात संगीताला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सामाजीक कार्यकर्त्या डॉ.शालीनी कराड यांनी सांगितले.सुरसंगम संगित विद्यालयाच्या वतिने घेण्यात आलेल्या गायनस्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.  महिला दिनाचे औचित्य साधून सुरसंगम संगित विद्यालयाच्या वतिने येथील सुर्वेश्वर मंदिरात गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन संगित विशारद ज्योती नागापुरे,सौ.सुकन्या पंचाक्षरी,सौ.अपर्णा कलशेट्टे,पत्रकार सुकेशिनी नाईकवाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या स्पर्धेत एकुण 35 स्पर्धक महिलांनी सहभाग नोंदवला.यात सौ.सुवर्णा जंगले प्रथम,कल्पना गायकवाड द्वितीय तर अपर्णा ओपळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला शारदा मिसाळ,अंकिता सारडा,हेमा स्वामी यांना उत्तेजनार्थ ब

ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी

इमेज
 स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्था: 74 लाख 9 हजार निव्वळ नफा ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर  वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी परळी वैजनाथ /प्रतिनिधी-दि.    शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्‍वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख कायम ठेवत पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात मार्च 2024 अखेर उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. 74 लाख 9 हजार निव्वळ नफा झाला.        सरत्या आर्थिक वर्षात 31 मार्च 2024 अखेर संस्थेची अर्थिकस्थिती पाहता संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. विषेश म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी- 38कोटी 25 लाख,कर्ज 31 कोटी 72 लाख, गुंतवणूक 13कोटी 32लाख,आर्थिक उलाढाल 130कोटी 93लाख, राखीव निधी 5 कोटी 71लाख,भाग भांडवल-69लाख 97हजार,खेळते भांडवल-48कोटी 97लाख,निव्वळ नफा 74लाख 9 हजार इतका आहे. पतसंस्थेच्या या प्रगतीशील वाटचालीत सर्व खातेदार, ठेवीदार,कर्जदार, हितचिंतक यांचा विश्‍वास हेच पाठबळ आहे असे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले. यापुढेही हा विश्‍वास सार्थ ठरवून वाटचाल करु अशी ग्वाही पतसंस्थेचे अध्यक्षबाजीराव भैय्या धर्माधिकारी

परळीतील दुय्यम निबंधक कार्यालयाचे योगेश गार्डन येथे स्थलांतर

इमेज
  परळीतील दुय्यम निबंधक कार्यालयाचे योगेश गार्डन येथे स्थलांतर परळी वैजनाथ, प्रतिनिधी             परळी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे योगेश गार्डन येथील नव्या जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींना कार्यालयात येणे सोयीचे व्हावे. यासाठी दुय्यम निबंधक कार्यालय तळमजल्यावर असावे अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले असल्याने परळी येथील हे कार्यालय योगेश गार्डन या ठिकाणी तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आले आहे. या ठिकाणी हे कार्यालय सुरू करण्यात आले असुन याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.        दुय्यम निबंधक कार्यालय तळमजल्यावर असणे बाबत शासनाचे पत्र क्र. आस्थाप-2021/1620/प्र.क्र.260/म-1 दि. 28/01/2022 नुसार  नोंदणी व मुद्रांक विभागाची जी दुय्यम निबंधक कार्यालये भाडयाच्या जागेत वरच्या मजल्यावर असून तेथे दिव्यांग अथवा वृद्ध व्यक्तिंना सहज पोहोचता येत नाही. तसेच ज्या ठिकाणी मुलभुत सोईसुविधा (उदा. प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, अभ्यागत कक्ष इ.) नाहीत अशी सर्व कार्यालये तळमजल्यावर घेण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करणेबाबत शासनाने संदर्भिय
इमेज
 श्री योगानंद सरस्वती संस्थान आणि  उदगगिरी लायन्स उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन परळी/ प्रतिनिधी- श्री योगानंद सरस्वती संस्थान, गुंज आणि  उदगगिरी लायन्स उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 4 एप्रिल रोजी श्रीक्षेत्र गुंज, ता. पाथरी जि. परभणी येथील भक्त निवास येथे मोफत नेत्रतपासणी व अल्पदरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  श्रीमत्‌ प .प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराज श्रीक्षेत्र गुंज संस्थान यांच्या 96 व्या पुण्यतिर्थी निमित्त डॉ.आर.एन.लखोटीया, अध्यक्ष उदयगिरी लॉयन्स, नेत्र रुग्णालय  उदगीर, यांच्या प्रमुख उपस्थितीत  व राजेशभाई  छनुभाई देसाई, वंशपारंपारिक  विश्वस्त  योगानंद सरस्वती संस्थान, गुंज खुर्द, ता पाथरी, जि. परभणी यांच्या संयोजनातून  श्रीक्षेत्र गुंज, ता. पाथरी जि. परभणी येथील भक्त निवास येथे  गुरुवार दि. 4 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10.30 ते दु. 3 वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी व माफक दरात मोतिबिंदू शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  दरम्यान,या शिबीरात श्री चिंतामणी एज्युकेशन ट्रस्ट संचलित  फाँउंड

ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

इमेज
  ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांद्यापासून बांद्यापर्यंत शिवसेना ठाकरे गटाचे स्टार प्रचारक प्रचार करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली.  उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह  40 जण करणार प्रचार शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यादी प्रसिद्धीसाठी देण्यात आली. स्टार प्रचारकांमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार ॲड. अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांचा समावेश आहे. आदेश बांदेकर, भास्कर जाधव, सुषमा अंधारेंसह 40 समावेश शिवसेना नेत्यांबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन ब

शेतकरी कीर्तन महोत्सव: सामाजिक भान देणारी आध्यात्मिक चळवळ!

इमेज
  शेतकरी कीर्तन महोत्सव: सामाजिक भान देणारी आध्यात्मिक चळवळ! - शामसुंदर महराज सोन्नर  शेतक-यांच्या व्यथा-वेदनांवर संत विचारांची हळूवार फुंकर घालून त्यांचे जगणे सुसह्य करण्याचा प्रयत्न शेतकरी कीर्तन महोत्सवातून होत आहे. व्यवस्थेने केलेल्या अन्यायाची जाणीव करून देत असताना त्याविरोधात लढण्याचे बळ निर्माण करण्याचा प्रयत्न सहजपणे केला जात आहे. या कीर्तन महोत्सवातून शेतक-यांची मानसिक, सामाजिक आणि शारीरिक दुर्बळता दूर करतानाच त्यांच्या जीवनात आनंद पेरला जात आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवाचे औचित्य साधून गेल्या दोन वर्षांपासून धारुर तालुक्यातील कान्नापूर येथे शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. गेल्या वर्षी 14 गावांनी मिळून हा महोत्सव केला होता. या वर्षी त्यात आणखी सात गावांचा समावेश वाढला. किसान सभेचे  अॅड. अजय बु-हांडे यांच्या संकल्पनेतून हा कीर्तन महोत्सव सुरू करण्यात आला असून त्याच्या कल्पकतेचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतूक होत आहे. कमीत कमी खर्चात सर्वांगीन उच्च प्रबोधन या कीर्तन महोत्सवातून होत आहे. सध्या कीर्तन महोत्सव आणि हरिनाम सप्ताहाला एक भपकेबाज स्वरूप आले आ