MB NEWS-तेली समाज दांडीया समितीचे यशस्वी आयोजन

महिलांनी स्वाभीमानाने जगण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे -अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर तेली समाज दांडीया समितीचे यशस्वी आयोजन परळी वैजनाथ दिली.०५ (प्रतिनिधी) महिलांनी स्वाभीमानाने जगण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी व्यक्त केले. त्या तेली समाज आयोजित दांडीया महोत्सवाच्या समारोपात बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होत्या. येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनी मंदिराच्या सभागृहात तेली समाज दांडीया उत्सव समितीच्या वतीने यंदा प्रथमच दांडीया उत्सवाचे आयोजिन करण्यात आले होते. दांडीया उत्सवात आठ दिवस वेगवेगळ्या थिमच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे व शनी मंदिर देवस्थान कमिटीचे विश्वस्त राजाभाऊ शिंदे, श्री.शनैश्चर निधी अर्बन लिमिटेडचे चेअरमन वैजना...