पोस्ट्स

पंकजा मुंडे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट

इमेज
  मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट        राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप राष्ट्रीय सचिव  पंकजा मुंडे यांनी ट्वीट केले आहे.             मंत्रीमंडळ विस्तार पार पडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी नव्या मंत्र्यांचे ट्विट करत अभिनंदन केले आहे. 'नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे अभिनंदन.... महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे आपल्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा... विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्व जण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना' अशा आशयाचे ट्विट त्यांनी शेअर केले आहे. ------------------------------------------------------- Video News : -------------------------------------------------------- - video news- -------------------------------------------------------- Video News : --------------------------------------------

MB NEWS-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विजय संकल्प सभा: पुर्वतयारीसाठी ठिकठिकाणी पंकजाताईंच्या मॅरेथॉन बैठका

इमेज
  लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात होर्डिंग्ज ! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विजय संकल्प सभा: पुर्वतयारीसाठी ठिकठिकाणी पंकजाताईंच्या मॅरेथॉन बैठका   है दराबाद, एमबी न्युज वृत्तसेवा.....      माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या देशभरात मास लीडर म्हणून ओळखल्या जातात. नेहमीच त्यांच्या लोकप्रियतेची चुणुक विविध प्रसंगांमधून दिसून येते. महाराष्ट्र असो की मध्य प्रदेश, तेलंगणा असो की आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश असो की केरळ कुठेही जाऊ पंकजा मुंडेंची लोकप्रियता दिसून येते. अशाच प्रकारच्या लोकप्रियतेचा नमुना तेलंगणामध्येही दिसून येत आहे. आज दोन व उद्या तीन जुलै रोजी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैद्राबाद येथे होत आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हैदराबाद मध्ये विजय संकल्प सभा होणार आहे.        या संकल्प सभेच्या पूर्वतयारीसाठी तेलंगणाच्या विविध मतदारसंघात भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकारी, नेत्यांच्या उपस्थितीत पूर्वतयारी बैठका घेण्यात येत आहेत. यामध्ये पंकजा मुंडे अग्रेसर दिसुन येत असून ठीक ठिकाणी विजय संकल्प सभेच्या पूर

MB NEWS-दगदगीमुळे अशक्तपणा आहे:धनंजय मुंडे यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल; उद्या पर्यंत रिकव्हर होतील -पंकजा मुंडे

इमेज
  दगदगीमुळे अशक्तपणा आहे: धनंजय मुंडे यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल; उद्या पर्यंत रिकव्हर होतील -पंकजा मुंडे मुंबई-       दगदगीमुळे अशक्तपणा आला आहे.उपचार सुरू आहेत.धनंजय मुंडे यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत.ते उद्या पर्यंत रिकव्हर होतील  अशी माहिती ना.धनंजय मुंडे यांच्या भगिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.        राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बातमी कळताच अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. भाजप नेत्या पंकजा मुंडे  या देखील सकाळीच रुग्णालयात पोहचल्या आणि धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यंनी धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी चुकीची असल्याचं म्हटलं आहे. त्यांना भोवळ आली होती, विकनेस आला होता, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहोत, आम्ही त्यांना भेटलो, ते उद्यापर्यंत रिकव्हर होतील असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.  संबंधित बातम्या Click:*प्रकृती स्थिर-विश्

MB NEWS-पंकजाताई ,भुजबळ शिंगणे आदी नेते पोहचले धनंजय मुंडेंच्या भेटीला

इमेज
  पंकजाताई ,भुजबळ शिंगणे आदी नेते पोहचले धनंजय मुंडेंच्या भेटीला मुंबई, प्रतिनिधी.....     आपले भाऊ मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला भाजप नेत्या पंकजा मुंडे भेटीला पोहचल्या आहेत.     सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला असून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.त्याचबरोबर *खा. सौ. सुप्रियाताई सुळे, युवक नेते पार्थ दादा पवार, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली व बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.    धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला भाजप नेत्या पंकजा मुंडे भेटीला पोहचल्या आहेत.त्याचब

MB NEWS-विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत भारतीय जनता युवा मोर्चा चे महावितरण विरोधात आंदोलन

इमेज
  विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत भारतीय जनता युवा मोर्चा चे महावितरण विरोधात आंदोलन  भर उन्हाळ्यात सुरू केलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - राज्यात सुरू केलेले अघोषित भारनियमयाविरुद्ध आता भाजप आक्रमक झालेले दिसून येत आहे.भाजपा  राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशानुसार भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने परळी येथील महावितरण कार्यालयावर आज विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत  तीव्र आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रतिकात्मक बंद फॅन ची तिरडी बाजार समिती मोंढा येथून व्यापार पेठ,राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथून महावितरण कार्यलयापर्यंत काढण्यात आली.यावेळी महावितरण च्या गलथान कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.भर उन्हाळ्यात सुरू केलेले भारनियमन तात्काळ बंद करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. विशेष बाब म्हणजे राज्यात असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रापैकी 750 मॅगाव्हेट चे प्रकल्प आहेत.या प्रकल्पामुळे होणारे राखेचे प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम परळी परिसरातले नागरिक भोगत आले आहेत.असे असतानाही परळी परिसरात होणारे

MB NEWS-पंकजाताई मुंडेंच्या हस्ते अॅड.दत्तात्रय आंधळे यांचा सत्कार

इमेज
  पंकजाताई मुंडेंच्या हस्ते अॅड.दत्तात्रय आंधळे यांचा सत्कार परळी वैजनाथ( प्रतिनिधी) संत वाड्.मयातील संशोधन व लिखाण   आणि उल्लेखनीय कार्याबद्दल  आद्यकवी श्रीमुकुंदराजस्वामी रचित," सार्थ विवेकसिंधु"ग्रंथ निरूपण आणि संपादन ह.भ.प.ॲड दत्तात्रेय महाराज आंधळे यांनी केले असून त्या कार्याबद्दल भाजपा राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांच्या हस्ते ह.भ.प.ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार करण्यात आला.     त्यांचे ,"सार्थ विवेक सिंधु" ग्रंथाचे नुकतेच प्रकाशन केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते नागपूर जिल्ह्यातील आंभोरा देवस्थान येथे झाले . परळीला अभिमान वाटावा आणि परळीच्या साहित्य व धार्मिक क्षेत्राचे नावलौकिक वृद्धिंगत होईल असे कार्य श्री आंधळे महाराज यांनी केले असून जवळपास ४००पानी ग्रंथ असून यापूर्वी  त्यांची प्रकाशित पुस्तके *ज्ञानदेवांची गुरुगीता *ज्ञानेश्वरी अनुभवावी ही कथा *श्री संत जगमित्र नागा चरित्र *आद्यकवी श्रीमुकुंदराज एक शोध वाट *जाणिवेच्या कळा  असे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.         यावेळी माजी नगराध्यक्ष  जुगलकिशोर लोहिया, वैद्यकीय अधिकारी ड

MB NEWS-८ वर्षिय बालिकेवर बलात्कार ; आरोपीला कठोर शासन व्हावे- पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र

इमेज
८ वर्षिय बालिकेवर बलात्कार ; आरोपीला कठोर शासन व्हावे- पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र *पिडित बालिकेच्या कुटुंबियांनी घेतली पंकजाताईंची भेट* परळी ।दिनांक २६। डोंगर पिंपळा (ता. अंबाजोगाई)  येथील आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्काराची घटना अतिशय संतापजनक आणि घृणास्पद आहे, यातील आरोपींवर जास्तीत जास्त कठोर शासन व्हावे आणि संपूर्ण गुप्तता पाळुन  याचा वेगाने तपास करावा अशी मागणी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, पिडित बालिकेचे वडिल व कुटुंबातील अन्य सदस्यांनी नुकतीच पंकजाताईंची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*    डोंगर पिंपळा येथील आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेला  गावातील तरुण किरण रामभाऊ शेरेकर (वय २३) याने १९ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घरात बोलावुन तिच्यावर बलात्कार केला.   एका गरीब व अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय, संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या घटनेनंतर सदर मुलगी व तिचे आई वडील प्रचंड तणावाखाली

MB NEWS-वैद्यनाथ कारखान्याची 'ऑनलाईन' सर्वसाधारण सभा खेळीमेळीत !

इमेज
  वैद्यनाथ कारखान्याची 'ऑनलाईन' सर्वसाधारण सभा  खेळीमेळीत  ! सर्व ऊसाचे गाळप करणार;गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर परळी ।दिनांक २४।       वैद्यनाथ साखर कारखान्याने पुढील गळीत हंगाम वेळेवर सुरू करून विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे असे सांगून केंद्रीय सहकार मंत्री ना. अमित शहा यांच्या सहकार्याने साखर उद्योगाला पुन्हा चांगले दिवस येतील असा विश्वास कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी सभासदांसमोर बोलतांना व्यक्त केला. दरम्यान, अनेक अडचणींवर मात करून गळित हंगाम यशस्वीरित्या सुरू केल्याबद्दल शेतकरी व संचालक मंडळाने त्यांचे या सभेत आभार मानले आहेत.             पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन पद्धतीने  उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, त्यावेळी पंकजाताई बोलत होत्या. बहुसंख्य सभासदांनी ऑनलाईन उपस्थित राहुन सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.           प्रारंभी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी पंकजाताई मुंडे या

MB NEWS-सर्व सभासद शेतकऱ्यांचा ऊस गाळप करणार; काळजी करू नये -पंकजाताई मुंडे

इमेज
  सर्व सभासद शेतकऱ्यांचा ऊस गाळप करणार;काळजी करू नये -पंकजाताई मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        गळीत हंगाम सुस्थितीत सुरू आहे.सर्व सभासद शेतकऱ्यांचा ऊस गाळप करणार आहोत शेतकऱ्यांनी काळजी करू नये  अशी ग्वाही वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी दिली.          वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन पध्दतीने खेळीमेळीत आणि उत्साहात पार पडली.यावेळी बोलताना वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, अनेक आर्थिक संकटावर मात करत केवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारखाना सुरू केला आहे. गळित हंगाम सध्या सुस्थितीत सुरू आहे, सर्व सभासद शेतकऱ्यांचा ऊस गाळप करणार आहे, शेतकऱ्यांनी काळजी करू नये असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी संचालक मंडळ उपस्थित होते. ••• •••••••••••• •••••••••••• ••••• 🔸 हे देखील वाचा/पहा 🔸 •••••••••• •••••••••••• •••••••••••• •••••• •••• Click -🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._* Click  - 🔸 *तुकाराम बीज ✍️ भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरे

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी केला नागापूर सेवा सोसायटीवर विजयी उमेदवारांचा सत्कार

इमेज
  पंकजाताई मुंडे यांनी केला नागापूर सेवा सोसायटीवर विजयी उमेदवारांचा सत्कार परळी वैजनाथ दि. 21..        नागापुर सेवा सहकारी सोसायटीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज सत्कार केला. यावेळी मिळालेला विजय हा सर्व कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा विजय आहे. ही विजयी घोडदौड आगामी सर्वच निवडणूकांत कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून काम करावे असे आवाहन त्यांनी केले.       यशश्री निवासस्थानी आज पंकजाताई मुंडे यांनी नागापूर सेवा सहकारी सोसायटीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार केला. यावेळी त्या म्हणाल्या की, कार्यकर्त्यांनी मनावर घेतले तर विजय नक्कीच मिळतो. म्हणून आगामी प्रत्येक निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काम करावे यश नक्कीच मिळेल असा विश्वास व्यक्त करून सर्व विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत केले. विजयी उमेदवारांमध्ये अशोक ज्ञानोबा मुंडे, दिपक विश्वनाथ सोळंके, नागोराव तुकाराम सोळंके, परमेश्वर मोतीराम सोळंके, राहुल मदनराव सोळंके, रत्नमाला रामराव सोळंके, आत्माराम संभाजी मुंडे यांचा समावेश आहे.        यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सतिश म