पोस्ट्स

ऑगस्ट ७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-*ताईंना मंत्रीपद मिळत असेल व या भागाचा विकास होणार असेल तर आनंदच - धनंजय मुंडे*

इमेज
ताईंना मंत्रीपद मिळत असेल व या भागाचा विकास होणार असेल तर आनंदच - धनंजय मुंडे परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा....        पंकजा मुंडे यांना मंत्री पद मिळेल का ? पत्रकारांच्या या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना  मंत्रिपद देणे अथवा न देणे हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे मात्र ताईला मंत्रिपद मिळाले व या भागाचा विकास होणार असेल तर आम्हाला त्याचा आनंदच आहे असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.        धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी नगर परिषदेच्या माध्यमातून वैद्यनाथ कॉलेज वरील डोंगरावर राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ साकारले असून, याठिकाणी मराठवाड्यातील सर्वात उंच, तब्बल 150 फूट उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे. या तिरंगा ध्वजाचे लोकार्पण करण्यात आले.  या समारंभात बोलताना धनंजय मुंडे यांनी सांगितले की,परळी मतदारसंघाचा विकासात्मक व राजकीय दर्जा वाढवून परळीचा नावलौकिक व दबदबा दिल्लीत आणि मुंबईत वाढावा यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत असले तरी आम्ही मात्र काही महिने अगोदरच या विशाल ति

MB NEWS-माझ्या बाबतीतील "नाराजी" दूर करा- पंकजा मुंडे

इमेज
  माझ्या बाबतीतील "नाराजी"  दूर करा- पंकजा मुंडे  परळी वैजनाथ,एमबी वृत्तसेवा...       राज्यात कोणतीही घडामोड झाली, विधान परिषद असो राज्यसभा असो, कोणती निवडणूक असो की अलीकडील मंत्रिमंडळ विस्तार असो या सर्वच बाबतीत नेहमी "पंकजा मुंडे नाराज" अशा प्रकारे माझ्या बाबतीत "नाराजी" शब्द वापरला जातो मात्र ती नाराजी नसते तर ती समर्थकांची आपल्या नेत्याविषयीची अपेक्षा असते. प्रसार माध्यमांना माझी नम्र विनंती आहे की माझ्या बाबतीत वापरल्या जाणारी ही नाराजीची बिरुदावली तुम्ही दूर करा असे आवाहन भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी परळीत प्रसार माध्यमांशी बोलताना केले.          "घरोघरी तिरंगा" अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी भाजपच्या वतीने आज शहरात  तिरंगा रॅली काढण्यात आली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त घरोघरी तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन जनतेला केले आहे, त्याचाच एक भाग म्हणून ही रॅली काढण्यात आली. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंकजा मुंडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून

MB NEWS- *अल्पवयीन मुलीस बळजबरीने पळवून नेवून बलात्कार करणा-या आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व एक लाख रूपये दंड*

इमेज
 अल्पवयीन मुलीस बळजबरीने पळवून नेवून बलात्कार: आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व एक लाख रूपये दंड *अंबाजोगाई* .....येथील अप्पर सत्र न्यायाधीश श्री. डी. डी. खोचे साहेब यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या विशेष बा. लै. प्र. केस नं. २४/२०१७, महाराष्ट्र शासन वि. बाळासाहेब वळसे या प्रकरणातील आरोपीने अल्पवयीन मुलीस बळजबरीने पळवून नेवून तिच्यावर बलात्कार केला. सदर प्रकरणात आरोपीस मा. न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रूपये दंड ठोठावला. या प्रकरणातील आरोपी बाळासाहेब उर्फ खंडू धनंजय वळसे, रा. वळसे वस्ती, ता. केज, जि. बीड याने अल्पवयीन पिडीत मुलगी मेंहदी क्लासला जात असताना आरोपीने तीस बळजबरीने स्कॉर्पिओ जीप तोंड दाबून बळजबरीने बसवून पळवून नेवून तिस पूणे येथे एक महिना ठेवून तिचे सोबत बळजबरीने शारीरिक संबंध केले. वगैरे फिर्यादीवरून दि. २६/०४/२०१७ रोजी पो. ठा. केज येथे गु.र.नं. १९९/२०१७, कलम - ३६३, ३७६ (i), ३४४, ३४ भा.द.वी सहकलम ३, ४ बा. लैं. अ.प्र.का. अन्वये गुन्हा नोंद करून सदर प्रकरणाचा तपास पो. निरीक्षक आर. जी. गाडेवाड यांनी करून दोषारोप पत्र मा. न्यायालयात सादर करण्यात आले..

MB NEWS- "आधुनिक विज्ञानाचे मूळस्रोत संस्कृत भाषेत ! " संस्कृत दिन समारंभात श्री वसंतराव देशमुख यांचे विचार--

इमेज
  "आधुनिक विज्ञानाचे मूळस्रोत संस्कृत भाषेत ! "  संस्कृत दिन समारंभात श्री वसंतराव देशमुख यांचे विचार                परळी वैजनाथ दि.१२----        जगाच्या पाठीवर संस्कृत ही दिव्योत्तम अशी सर्वश्रेष्ठ भाषा अखिल मानवांचे कल्याण साधणारी असून आधुनिक युगात विज्ञानाचे जे नवनवीन शोध लागत आहे, त्याचे मूळस्रोत संस्कृतभाषेत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते श्री वसंतराव देशमुख यांनी केले.        येथील आर्य समाजात काल (दि.११) सामूहिक स्वरूपात "संस्कृत-दिन" साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्य समाजाचे सचिव श्री उग्रसेन राठौर हे होते. यावेळी व्यासपीठावर वैदिक विद्वान पं. रामनिवास गुणग्राहक, पं.उदयवीर आर्य ,श्री सोममुनी, आचार्य सत्येंद्र, जुगलकिशोर लोहिया आदींची उपस्थिती होती.        श्री देशमुख यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून आधुनिक युगात संस्कृतभाषेचा अभ्यासाचा अभाव होत चालल्याने आपण शाश्वत सुखापासून दुरावत चाललो आहोत, याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले- संस्कृतच्या अभ्यासाने माणूस शहाणा होतो व त

MB NEWS- *हर घर तिरंगा:परळीतील प्रभाग क्र. 5 व 16 मध्ये नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने रॅलीने तिरंगा वितरण*

इमेज
 हर घर तिरंगा:परळीतील प्रभाग क्र. 5 व 16 मध्ये नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने रॅलीने तिरंगा वितरण परळी (प्रतिनिधी) - देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत 10 हजार तिरंगा ध्वजांचे वितरण करून 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत असून, यांतर्गत आज दि. 12 ऑगस्ट (शुक्रवार) रोजी  शहरातील प्रभाग क्रमांक 5 व 16 मध्ये भव्य तिरंगा रॅलीने ध्वज वितरित करण्यात आले.         गणेशपार येथुन या  तिरंगा रॅलीस सुरुवात झाली. गणेशपार, धनगर गल्ली, देशमुख गल्ली, जगतकार गल्ली, प्रबुद्ध नगर, इस्लामपूरा बंगला, हनुमान नगर, नादुरवेस, अंबेबेस, भोईगल्ली आदी भागात ध्वज  व ध्वजसंहिता माहितीपत्रक वितरण करण्यात आले.    यावेळी उत्तमराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, बाजीराव धर्माधिकारी, जाबेर खान पठाण,वैजनाथ सोळंके,प्रा.विनोद जगतकर, श्रीकांत मांडे, वैजनाथ बागवाले,अनिल अष्टेकर, लालाखान पढाण,सय्यद सिराज, गोविंद कुकर,मुन्ना बागवाले,चंद्रप्रकाश हालगे,प्रताप समिंदरसाळवे, नितीन बागवाले,राज जगतकर, राहुल जगतकर, शरद कावरे,शरद चव्हाण, शशी बिर

MB NEWS-भाजप प्रदेशाध्यक्षपदी आ. चंद्रशेखर बावनकुळे

इमेज
  भाजप प्रदेशाध्यक्षपदी आ. चंद्रशेखर बावनकुळे मुंबई- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्या जागेवर आ. चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती पक्षाने केली आहे.तसेच भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी आ आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल अशी चर्चा होती.विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांचा उत्तराधिकारी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान राज्य सरकारच्या झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीन दिवसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राज्य भाजपच्या अध्यक्षपदी माजीमंत्री आ चंद्रशेखर बावनकुळे यांची तसेच मुंबई भाजप अध्यक्षपदी आ आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ------------------------------------------------------- विनंती:  MB NEWS  चे  युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. खालील लिंकवर क्लिक करून बेल आयकाॅन दाबा.👇👇👇👇 https://youtube.com/channel/UCrcd4hE8kzoLp5Q67-

MB NEWS-मुख्याध्यापक संघ सोनपेठ तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक रामदास मुंढे यांचा मायभूमीत सत्कार

इमेज
  मुख्याध्यापक संघ सोनपेठ तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक रामदास मुंढे यांचा मायभूमीत सत्कार गंगाखेड, प्रतिनिधी....   परभणी जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सोनपेठ तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक रामदास मुंडे यांचा पिंपळदरी या त्यांच्या मायभूमीत ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय पिंपळदरी यांच्यावतीने गावातील नामवंत व्यक्तिमत्व व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सोनपेठ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रामदास मुंढे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती गंगाखेडचे उपसभापती तथा सेवा सहकारी सोसायटी पिंपळदरी चे चेअरमन व सरपंच पंडितराव मुंढे हे होते. कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाई ज्ञानोबा मुंढे यांची विशेष उपस्थिती होती.      या सत्कार सोहळ्यात संत जनाबाई शिक्षण संस्थेचे सचिव एडवोकेट संतोष मुंढे, सेवानिवृत्त डिवाएसपी सुदर्शन मुंढे, सेवानिवृत्त डी वाय एस पी वालचंद मुंढे, से

MB NEWS-हर घर तिरंगा : काय करावे? काय करु नये....अशी घ्या काळजी

इमेज
  हर घर तिरंगा : काय करावे? काय करु नये....अशी घ्या काळजी ⭕घरी फडकावलेला ध्वज सायंकाळी उतरवू नका; ⭕ राष्ट्रध्वज फडकवण्यापूर्वी 'हे' नियम माहिती करुन घ्या..... भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येणारा १५ ऑगस्ट हा 'स्वातंत्र्य दिन' आपण सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात येणार असला तरी ध्वजसंहितेचे पालन होणेही आवश्यक आहे. जिल्ह्यात 'घरोघरी तिरंगा' लावताना काय काळजी घ्यावी , तिरंग्याचा मान राखला जावा, यासाठी काय करावे याबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तर देण्याचा हा प्रयत्न. ⭕ १३ते १५ ऑगस्ट या काळात  नागरिकांनी आपल्या घरावर झेंडा लावावा. ⭕ ध्वज लावताना केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी. ⭕ ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची काळजी घ्यावी. ⭕तिरंगी ध्वजाचा आकार आयताकार असावा. ⭕झेंड्याची लांबी - रुंदीचे प्रमाण ३ X २ असावे. ⭕ कातलेल्या, विणलेल्या, मशिनद्वारे तयार केलेल

MB NEWS-नंदनज येथे रा . से . यो. चे हर घर तिरंगा जनजागरण अभियान वैद्यनाथ कॉलेज, जि . प . प्रा . शाळा, केदारी महाराज विद्या मंदिर शाळा सहभाग

इमेज
  नंदनज येथे रा . से . यो. चे हर घर तिरंगा जनजागरण अभियान वैद्यनाथ कॉलेज, जि . प . प्रा . शाळा, केदारी महाराज विद्या मंदिर शाळा सहभाग परळी -वै : -  तालूक्यातील नंदनज येथे राष्ट्रीय सेवा योजना , वैद्यनाथ कॉलेज, ग्राम पंचायत नंदनज, जि . प . प्राथमिक शाळा, केदारी महाराज विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने चला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू १३ ते १५ ऑगस्ट घरो घरी तिरंगा फडकवू य-  हर घर तिरंगा जनजागरण अभियान दि . ११ ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न झाले . या रॅलीची सुरुवात वैद्यनाथ कॉलेज परळी येथून छ्त्रपती शिवाजी महाराज चौक , बस स्टँड, शक्ती कुंज वसाहत मार्गे नंदनज गावाच्या वस्ती - वस्ती घरो- घरी- तिरंगा मोहिमेच जनजागरण केले . या रॅलीचे उद्घाटन प्राचार्य डॉ . डी . व्ही . मेश्राम, सरपंच अनिल गुट्टे, प्रा . डॉ . माधव रोडे,  उपसरपंच हनुमंत गुट्टे , प्रा . उत्तम कांदे, ग्रामसेवकी पुनम गाडे,  यांच्या हस्ते झाले . या कार्यक्रमात ४०० विद्यार्थीना सहभाग घेतला त्यात १५० मुली व २२५ मुलांनी सहभाग घेतला .   यावेळी एन . एस.एस. वैद्यनाथ कॉलेजच्या वतीने फळांचा आहार  मुख्यध्यापक सुनिल गर्जे, मुख्यध्यापक

MB NEWS-माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ११३ दात्यांचे रक्तदान !*

इमेज
  माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या  धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ११३ दात्यांचे रक्तदान ! 🕳️ * _रक्तदात्यांचा हिरिरीने सहभाग; अनेेकांनी स्वयंस्फूर्त केलं रक्तदान_* परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......      ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे परळी शहरातील कर्तृत्ववान उमदे युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आज (दि.११) रोजी आयोजित रक्तदान शिबिराला  दरवर्षी प्रमाणेच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या  शिबिरात तब्बल ११३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.        राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया  धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 11 ऑगस्ट रोजी स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी वैजनाथ येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सक

MB NEWS-बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक अनिल अष्टेकर यांच्या वतीने स्कुल बॅगचे वाटप

इमेज
  बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक अनिल अष्टेकर यांच्या वतीने स्कुल बॅगचे वाटप परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यनाथ विद्यालय व डॉ झाकेर हुसेन उर्दू शाळा येथे नगरसेवक अनिल अष्टेकर यांच्या वतीने गरजवंत विद्यार्थ्याना स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले.       राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यनाथ विद्यालय व डॉ झाकेर हुसेन उर्दू शाळा या ठिकाणी गरजु विद्यार्थ्यांना स्कुल बॅग चे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा संघटक रमेश चौंडे,माजी सभापती वैजनाथअण्णा बागवाले, राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक संघटना शहराध्यक्ष अजय जोशी सर, जयराज देशमुख,संजय गांधी निराधार समिती सदस्य लालाखान पढाण, इम्रान सर,राहुल ताटे,शशी बिराजदार, चारुदत्त करमाळकर,किरण सावजी,अझमद खान, अभिजित तांदळे, अनिल घेवारे,मझरभाई पढाण,थळकरी चाचा  वैद्यनाथ विद्यालय चे मुख्याध्यापक हंगरगे सर, डॉ झाकेर हुसेन उर्दू शाळेचे मुख्याध्यापिका मुनवरी पढाण म

MB NEWS-गाढे पिंपळगाव येथील जेष्ट नागरिक नारायण आप्पा घेवारे यांचे दुखःद निधन

इमेज
  गाढे पिंपळगाव येथील जेष्ट नागरिक नारायण आप्पा घेवारे यांचे दुखःद निधन परळी वैजनाथ दि.११ (प्रतिनिधी)         तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य नारायण घेवारे (वय ९१) यांचे  वृद्धापकाळाने बुधवारी (ता.१०) सायंकाळी ८ वाजता निधन झाले.             गाढे पिंपळगाव येथील जुन्या पिढीतील जेष्ट नागरिक नारायण गुरुलिंग घेवारे यांचे बुधवारी सायंकाळी राहत्या घरी निधन झाले. ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते.गाढे पिंपळगाव येथील विवेकानंद विद्यालय स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.जुन्या पिढीतील जेष्ट म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर गुरुवारी (ता.११) सकाळी १० वाजता शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. गाढे पिंपळगाव येथील प्रगतीशील शेतकरी रामेश्वर घेवारे यांचे वडील होते.

MB NEWS-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त परळी शहरात काँग्रेसची 13 रोजी पद याञा

इमेज
  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त परळी शहरात काँग्रेसची 13 रोजी पद याञा जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख,युवानेते अदित्य पाटिल,जिल्हाउपाध्यक्ष राहुल सोनवणेंची राहणार उपस्थिती-बहादुरभाई परळी, प्रतिनिधी  भारताला स्वातंत्र्य मिळुन आता 75 वर्षे पुर्ण होत असतांना देशभरात काँग्रेसच्या वतिने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम घेतले जात असुन याच अनुशंगाने परळी शहरात शनिवार दि.13 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने शहर काँग्रेसच्या वतिने पदयाञेचे आयोजन करण्यात आले आहे.       काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख,युवानेते अदित्य पाटिल,जिल्हाउपाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त परळी शहरात काँग्रेसची  पद याञाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 8 वाजता मोंढा मार्केट येथील काँग्रेस विजय स्तंभावर राष्ट्रीय ध्वजारोहण  जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. नंतर  पदयाञेची सुरुवात छ.शिवाजी महाराज चौक येथुन सकाळी 10 वाजता प्रारंभ होणार असुनउड्डाण पुल,रोडे चौक,राणी लक्ष्मीबाई टावर,गणेशपार,नादुरव

MB NEWS-अभिनव विद्यालयात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा

इमेज
  अभिनव विद्यालयात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा परळी . ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी येथे संस्थेच्या उपाध्यक्षा सौ . गयाबाई साहेबराव फड व संस्थेच्या कोषाध्याक्षा सौ . अंजली साहेबराव फड यांच्चा मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी एकत्र येवून सर्व विद्यार्थीनींनी सर्व विद्यार्थ्यांना राखी बांधून पेढे भरवून हा सण साजरा केला यावेळी संस्थेचे पदाधिकारी तसेच सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षकवृंद व शिक्षीकेत्तर कर्मचारी उपस्थित होते . ------------------------------------------------------- Video News : Clik:  ■ *आज दुपारी चार वाजता आर्य समाज मंदिरात संस्कृत दिन समारोह* Click &watch : ■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट* Click  &watch: *परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली* Video News : Click:  *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू* Click: *मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्या

MB NEWS-बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त शाळांना ग्रंथ भेट उपक्रम*

इमेज
 * बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त शाळांना ग्रंथ भेट उपक्रम*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी       परळी शहराचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वंभर देशमुख यांच्या वतीने शाळांना ग्रंथ भेट उपक्रम राबविण्यात आला.      बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या 41 व्या वाढदिवसानिमित्त गोविंदा गोविंदा इंटरप्राईजेस चे संचालक विश्वंभर देशमुख यांनी शहरातील विविध शाळांना ग्रंथ भेट दिले. शहरातील लावण्याई पब्लिक स्कूल व माय छोटा स्कूल या शाळेतील शिक्षकांना त्यांनी ग्रंथ भेट दिले. यावेळी विश्वंभर देशमुख यांच्यासह डॉ.आनंद टिंबे ,प्रताप धर्माधिकारी , चारुदत्त करमाळकर,अतुल नरवाडकर, गिरीश प्रयाग, प्रमोद औटी, दिनेश लोंढे, अभय लोणीकर, आनंत कुलकर्णी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. ------------------------------------------------------- Video News : Clik:  ■ *आज दुपारी चार वाजता आर्य समाज मंदिरात संस्कृत दिन समारोह* Click &watch : ■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट* Click  &watch: *परळीत पंकजा मुंडे य

MB NEWS-आज दुपारी चार वाजता आर्य समाज मंदिरात संस्कृत दिन समारोह

इमेज
  आज दुपारी चार वाजता आर्य समाज मंदिरात संस्कृत दिन समारोह  परळी वैजनाथ, प्रतिनिधी..        आज दिनांक 11 रोजी सायंकाळी चार वाजता आर्य समाज मंदिर परळी वैजनाथ येथे सामूहिक संस्कृत दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.       दरवर्षी संस्कृत अध्यापक व संस्कृत भाषा प्रेमींच्या वतीने परळीत सामूहिक संस्कृत दिन साजरा केला जातो.  आज दिनांक 11 रोजी सायंकाळी चार वाजता आर्य समाज मंदिर येथे संस्कृत दिन समारोह होणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून भेल सेकंडरी स्कूल चे शालेय समिती अध्यक्ष श्री वसंतराव देशमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आर्य समाज परळीचे प्रधान जुगलकिशोर लोहिया उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रसिद्ध वेद प्रचारक पं. श्री. रामनिवास गुणग्राहक, पं. श्री. उदयवीर आर्य प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.     या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन  संयोजक अग्रसेन राठोड, सहसंयोजक प्रशांत कुमार शास्त्री ,प्रायोजक जयपाल लाहोटी आदींनी केले आहे --------------------------------------------