MB NEWS:शिवाचार्यांची विशेष उपस्थिती; आशिर्वादासह संसारोपयोगी साहित्य प्रदान

मोठा सामाजिक सहभाग, मंत्रोच्चार व सनई चौघड्याच्या निनादात वीरशैव समाजाचा सामुहिक विवाह सोहळा News by Santosh Jujgar शिवाचार्यांची विशेष उपस्थिती; आशिर्वादासह संसारोपयोगी साहित्य प्रदान प रळी /संतोष जुजगर........ परळी वीरशैव समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वीरशैव समाज सामुहिक विवाह सोहळा आज बुधवार दि.7 जुन रोजी हालगे गार्डन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळयात वधु वरांना आशिर्वाद देण्यासाठी शिवाचार्यांसह समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती. सनई चौघड्यांच्या निनादात अक्षदा कार्यक्रम पार पडला. प.पू.ष.ब्र.श्री 108 तपोरत्न प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांच्या प्रेरणेने वीरशैव समाज परळीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आयोजित वीरशैव समाज सामूहिक विवाह सोहळा बुधवार दिनांक 7 जून रोजी थाटात संपन्न झाला.या सोहळ्यात वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी चार शिवाचार्यांची प्रमुख उपस्थिती होती. ष.ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पुर्णाकर, ष.ब्र.108 शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर, ष.ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर, ष.ब्र...