पोस्ट्स

डिसेंबर ५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-*परळी : खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे हस्ते 200 विधवा महिलांना मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप* *रोजगाराची संधी मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर उमटले समाधान!* परळी (दि. 11) ---- : परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मतदारसंघातील 200 विधवा महिलांना खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. यावेळी रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलेले पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 15 जुलै ते 22 जुलै दरम्यान आयोजित सेवा सप्ताहात या महिलांची नाव नोंदणी करण्यात आली होती व आज खा. पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या 200 महिलांना ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व हस्ते तसेच नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. *राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 7 लाभार्थीना धनादेश वितरित* याच कार्यक्रमात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 7 लाभार्थींना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण देखील ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्या सह, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी परळी मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. संगीताताई तुपसागर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ चाचा पौळ, नगरसेवक दिपक नाना देशमुख, वैजनाथ सोळंके, सुरेश टाक, गोविंद कराड, सय्यद सिराज, अनंत इंगळे, चित्रा देशपांडे, अर्चना रोडे, श्रीकृष्ण कराड, नाझेर हुसैन, अनिल आष्टेकर, अझिज कच्छी, जयराज देशमुख, अय्युब पठाण, जाबेर खान पठाण, गोविंद कुकर, राजेंद्र सोनी, केशव गायकवाड, जयप्रकाश लड्डा, किशोर पारधे, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांसह आदी उपस्थित होते.

इमेज
 * परळी : खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे हस्ते 200 विधवा महिलांना मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप* *रोजगाराची संधी मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर उमटले समाधान!* परळी (दि. 11) ---- : परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मतदारसंघातील 200 विधवा महिलांना खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. यावेळी रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलेले पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 15 जुलै ते 22 जुलै दरम्यान आयोजित सेवा सप्ताहात या महिलांची नाव नोंदणी करण्यात आली होती व आज खा. पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या 200 महिलांना ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व हस्ते तसेच नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. *राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 7 लाभार्थीना धनादेश वितरित* याच कार्यक्रमात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 7 लाभार्थींना प्रत्येकी 20 हजार र

MB NEWS-पत्रकार अनंत गित्ते यांचे निधन

इमेज
  पत्रकार अनंत गित्ते यांचे निधन  परळी (प्रतिनिधी): पत्रकार अनंत सुमंतराव गित्ते रा. पांगरी यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. मृत्युसमयी ते सुमारे ४७ वर्षे वयाचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दि.११रोजी दुपारी २:३० वा.अंत्यसंस्कार करण्याता येणार आहेत.          मागील काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराति रुग्णालयात उपचार चालू होते त्यातच त्यांची आज प्राणज्योत मालवली.विविध वृत्तपत्रांसाठी अनंत गित्ते शेती व शेतकऱ्यांच्या समस्या यांवर सातत्याने लिखान करीत होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार चालू होते. उपचाराला प्रतिसाद मिळत असतांनाच आज त्यांना मृत्यू आला.अनंत गित्ते रा. पांगरी हे दै. लोकमंथन व अन्य दैनिकांसाठी प्रतिनिधी म्हणून काम करीत हाेते. त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. गित्ते कुटूंबीयांच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS-महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रीमती ताईसाहेब कदम पुरस्कार प्रा. मधु जामकर यांना जाहीर;परळीत ह्रदय सत्कार

इमेज
  महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रीमती ताईसाहेब कदम पुरस्कार   प्रा. मधु जामकर यांना जाहीर;परळीत ह्रदय सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी)÷ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रकाशित उत्कृष्ट लेखांसाठी देण्यात येणारा २०२० सालचा श्रीमती ताईसाहेब कदम पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक प्रा. मधु जामकर यांना जाहीर झालाबद्दल शहरातील भाजपा जेष्ठ नेते दत्ताप्पा ईटके,वैद्यनाथ अर्बन बॕंकचे जेष्ठ संचालक विकासराव डुबे यांनी शाल, श्रीफळ,हार घालून सत्कार केला. परळी येथून मराठीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले प्रा. जामकर यांचा प्रख्यात साहित्यिक पंडित महादेवशास्त्री जाेशी यांच्या तीर्थरुप महाराष्ट्र खंड १,२ व ३ यावर साहित्य पत्रिकेत विस्तृत लेख प्रकाशित झाला हाेता. या लेखाची उत्कृष्ट लेख म्हणून पुणे साहित्य परिषदेने निवड केली.  यावेळी माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, प्रकाश जोशी, दत्ताभाउ कुलकर्णी, वासुदेव पाठक यावेळी उपस्थित होते.

MB NEWS-राशिभविष्य (दि. ११ डिसेंबर २०२१)

इमेज
  राशिभविष्य (दि. ११ डिसेंबर २०२१) मेष-नव्या जोमाने कामाला सुरुवात कराल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. लाभदायक दिवस. प्रवासाचे योग संभवतात. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. वृषभ-मनासारख्या गोष्टी होतील. प्रयत्नांना यश मिळेल. पदोन्नती होईल. गृहसौख्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मिथुन-रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज. प्रतिष्ठा पणाला लागेल. अनावश्यक खर्च होईल. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. नियोजित कामांमध्ये अडचणी येतील. कर्क-अपयशाने खचू नका. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. वाद-विवादापासून दूर राहा. सिंह-इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. कन्या- आरोग्य उत्तम राहील. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. धनप्राप्तीचे योग संभवतात. संधीचे सोने कराल. तूळ-निर्णय घेताना सावधानता बाळगा. वादविवादापासून दूर राहा. कामांचे नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. एकाग्रता आवश्यक आहे. वृश्चिक-अनावश्यक भीती बाळगू नका

MB NEWS- MB NEWS ला नक्की Subscribe करा.⬛ *दिवसभराच्या घडामोडींचा आढावा.*⬛ *दर्जेदार आणि सकस आशयाची बातमी*⬛ _क्षणाक्षणाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी खालीललिंक वर क्लिक करा._👇👇

इमेज
  MB NEWS ला नक्की Subscribe करा. ⬛ *दिवसभराच्या घडामोडींचा आढावा.* ⬛ *दर्जेदार आणि सकस आशयाची बातमी* ⬛  _क्षणाक्षणाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी खालीललिंक वर क्लिक करा._👇👇👇👇 🕳️ *MB NEWS च्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका.* _नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन➡️🔔 नक्की क्लिक करा._ https://youtube.com/channel/UCrcd4hE8kzoLp5Q67-0nFeg

MB NEWS-हेळंब येथील खंडोबा देवस्थानच्या यात्रेनिमित्त खा.डाॅ. प्रितम मुंडे यांनी घेतले दर्शन

इमेज
  हेळंब येथील खंडोबा देवस्थानच्या यात्रेनिमित्त खा.डाॅ. प्रितम मुंडे यांनी घेतले दर्शन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       परळी तालुक्यातील हेळंब येथील खंडोबा देवस्थानच्या यात्रेनिमित्त आज बीडच्या खा.डाॅ. प्रितम मुंडे यांनी खंडोबाचे दर्शन घेतले.       मौजे हेळंब येथील ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रेस गुरुवारी प्रारंभ झालाआहे. यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलेआहे. हेळंब येथे 09 ते 11 डिसेंबर दरम्यान ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. बोरणा नदीकाठी बोरणाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. आज याठिकाणी बीडच्या खा.डाॅ. प्रितम मुंडे यांनी खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

MB NEWS-लोकनेत्याच्या जयंतीदिनी वैद्यनाथ कारखान्याच्या गळीत हंगामाला ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार शुभारंभ !

इमेज
  लोकनेत्याच्या जयंतीदिनी वैद्यनाथ कारखान्याच्या गळीत हंगामाला ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार शुभारंभ ! परळी वैजनाथ  ...         वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २१ व्या  गळीत हंगामाचा शुभारंभ लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी रविवारी (दि.१२ डिसेंबर) कारखान्याच्या अध्यक्षा  पंकजा मुंडे यांच्या हस्ते  होणार आहे.         वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गाळपास सज्ज झाला आहे. कारखाना पुर्ण क्षमतेने चालवून कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप  करण्याची व्यवस्था करण्यात आली असून तशी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार  दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता कारखान्याच्या चेअरमन पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे.  वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमाला ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मुकादम, मजुर व नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याच्या  वतीने करण्यात आले आहे.

MB NEWS-परळी : राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष राजकुमार डाके व परिवाराचे धनंजय मुंडेंकडून सांत्वन* *गंगासागर नगर येथील रामदत्त गिरी महाराज यांच्या जळालेल्या घराला पुन्हा उभरण्यासाठी धनंजय मुंडेंनी दिली एक लाख रुपयांची मदत; नगर परिषदेकडून घरकुलही मिळणार*

इमेज
 * परळी : राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष राजकुमार डाके व परिवाराचे धनंजय मुंडेंकडून सांत्वन* *गंगासागर नगर येथील रामदत्त गिरी महाराज यांच्या जळालेल्या घराला पुन्हा उभरण्यासाठी धनंजय मुंडेंनी दिली एक लाख रुपयांची मदत; नगर परिषदेकडून घरकुलही मिळणार* परळी (दि. 10) ---- : परळी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष राजकुमार डाके यांच्या मातोश्री स्व. सरस्वतीबाई डाके यांचे नुकतेच निधन झाले होते, आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजकुमार डाके व त्यांच्या परिवाराची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले.  परळी शहरातील गंगासागर नगर भगत राहणारे रामदत्त गिरी महाराज यांच्या घरास अचानक आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. ना. धनंजय मुंडे यांनी गिरी महाराजांच्या घरी भेट देऊन त्यांना दिलासा दिला तसेच त्यांच्या घराची पुन्हा उभारणी करण्यासाठी त्यांना एक लाख रुपयांची रोख मदत दिली. त्याचबरोबर नगर परिषदेच्या वतीने त्यांना तात्काळ घरकुल मंजूर करून देण्यात यावे असे निर्देशही धनंजय मुंडे यांनी नगर परिषद प्रशासनाला दिले आहेत. यावेळी ना. मुंडे यांच्यासह न.प. गटन

MB NEWS-खा. शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस परळीत साध्या पद्धतीने व सामाजिक उपक्रमांद्वारे होणार साजरा*

इमेज
 खा. शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस परळीत साध्या पद्धतीने व सामाजिक उपक्रमांद्वारे होणार साजरा* *200 विधवा महिलांना पिठाच्या गिरणीचे वाटप तर खा. पवार साहेबांचे 20 हजार चौरस फुटांचे तैलचित्र साकारणार* * खा. शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस परळीत साध्या पद्धतीने व सामाजिक उपक्रमांद्वारे होणार साजरा* *200 विधवा महिलांना पिठाच्या गिरणीचे वाटप तर खा. पवार साहेबांचे 20 हजार चौरस फुटांचे तैलचित्र साकारणार* परळी (दि. 10) ---- : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित  शरदोत्सव हा कार्यक्रम तिन्ही सेनादलांचे प्रमुख जनरल विपीन रावत व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. तीनही दलाचे प्रमुख व सैन्य दलातील अधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू ही देशाची मोठी हानी झाली असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले होते. याच पार्श्वभूमीवर खा. शरदचंद्रजी पवार साहेबांचा 12 डिसेंबर रोजी साजरा होणारा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याच्या सूचना ना धनंजय मुंडे यांनी त्

MB NEWS-हा आहे १२ डिसेंबर चा संकल्प.........! ऊसतोड कामगार, कष्टकऱ्यांच्या समवेत एक दिवस राहून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी करावी- पंकजा मुंडे

इमेज
  हा आहे १२ डिसेंबर चा संकल्प.........! ऊसतोड कामगार, कष्टकऱ्यांच्या समवेत एक दिवस राहून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी करावी- पंकजा मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी–       भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे  या दरवर्षी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी 12 डिसेंबर रोजी एक संकल्प करत असतात. यंदाही त्यांनी एक वेगळा संकल्प केला आहे. याबाबत त्यांनी स्वत: त्यांच्या फेसबुकवर यासंदर्भात व्हिडीओ शेअर केला आहे.       भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती दिनी गोपीनाथ गडावर  वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी ऊसतोड कामगार, कष्टकऱ्यांच्या समवेत एक दिवस राहून गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी करावी असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे सुद्धा या दिवशी ऊसतोड कामगारांसोबत उसाच्या फडावर असणार आहेत. पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, यंदा सेवेचा संकल्प करुयात. यावेळी आपण काही वेगळं करुयात. कष्टकरी, मजुरांकडे जा, त्यांची सेवा करा. त्यांना घरातून डबा बनवून नेत खायला घाला, त्यांच्या डब्यातला तुम्ही खा. ज्यांचं मुंडे साहेबां

MB NEWS-राशिभविष्य (दि. १० डिसेंबर २०२१)

इमेज
  राशिभविष्य  (दि. १० डिसेंबर २०२१) मेष – प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. आत्मविश्‍वास वाढेल. प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल. प्रवासाचे योग.परस्परांमधे सामंजस्य निर्माण होईल. वृषभ – प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे. व्यावसायिक उन्‍नती. कामाचे कौतुक होईल. मिथुन – संभ्रमित अवस्था होईल. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. नियमांचे पालन आवश्यक आहे. धार्मिक कामांत सहभाग घ्याल. संयम आवश्यक आहे. कर्क – अस्वस्थता राहील. मनाविरुद्ध घटना घडतील. मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. जुने आजार उद्भवतील. आर्थिक नियोजन आवश्यक आहे. सिंह – जीवलगांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. कन्या – नोकरदारांसाठी लाभदायक दिवस. आर्थिक प्रगती होईल. पदोन्‍नतीचे योग. संवादाने प्रश्‍न सुटतील. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल. तूळ – प्रेम प्रकरणात अपयश संभवते. निर्णय घेताना सावधानता बाळगा. संयम आवश्यक आहे. वृश्‍चिक – क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक

MB NEWS-*रेल्वे प्रश्नांसाठी खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी घेतली रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांची भेट* 🕳️ *नांदेड-बेंगलोर हंपी एक्सप्रेस, हैदराबाद-औरंगाबाद एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना घाटनांदूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी निवेदन*

इमेज
  *रेल्वे प्रश्नांसाठी खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी घेतली रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांची भेट* 🕳️  *नांदेड-बेंगलोर हंपी एक्सप्रेस, हैदराबाद-औरंगाबाद एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना घाटनांदूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी  निवेदन* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष श्री.सुनीत शर्मा यांची काल दिल्लीतील रेल्वे भवन येथे भेट घेतली व बीड जिल्ह्यातील रेल्वे विषयक समस्यां संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील रेल्वेमार्गात असलेले पूल आणि त्याखालून जाणाऱ्या रस्त्यांच्या बांधणीत असलेल्या तांत्रिक त्रुटींमुळे स्थानिक नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यासंदर्भात मी संबंधितांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. रेल्वे विभागाच्या वरिष्ठ पातळीहुन देखील याविषयी सूचना देण्यात याव्यात, जेणेकरून नागरिकांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि त्यांचे तत्परतेने निराकरण होईल असे श्री.शर्मा यांना सूचित केले. तसेच नांदेड-बेंगलोर हंपी एक्सप्रेस, हैदराबाद-औरंगाबाद एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस या जलद रेल्वे गाड्यांना  घाटनांदूर रे

MB NEWS-लोकनेत्याच्या जयंतीदिनी गोपीनाथ गडावर रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन* *शिबीरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा - गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आवाहन* _रक्तदान करून गरजू रूग्णांना द्या मदतीचा हात_

इमेज
 * लोकनेत्याच्या जयंतीदिनी गोपीनाथ गडावर रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन* *शिबीरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा - गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आवाहन* _रक्तदान करून गरजू रूग्णांना द्या मदतीचा हात_ परळी । दिनांक ०९। लोकेनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त येत्या १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून गरजू रूग्णांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.    गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि श्रीमान रामभाई शाह ब्लड बॅक बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वा. दरम्यान गोपीनाथ गडावर रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक गोरगरीब रुग्णांना दुर्धर आजारात रक्ताची गरज भासते, अशा वेळेस रक्तदान शिबीरातून झालेल्या रक्तदानाचा त्यांना उपयोग होतो, रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने शिबीरात सहभाग घेऊन रक्तदान केल्यास त्याचा उपयोग

MB NEWS-*लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त वैद्यनाथ कॉलेजमध्ये वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन*

इमेज
*लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त वैद्यनाथ कॉलेजमध्ये वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन*  परळी - जवाहर शिक्षण संस्था संचालित वैद्यनाथ कॉलेजमध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालयाचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे सभागृहा मध्ये होणार आहे.      स्पर्धेत राज्य  स्तरावरील विविध महाविद्यालयातील इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंतचे वाक्पटु सहभागी होणार आहेत. या  स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या संघास सांघिक पारितोषिक तसेच वैयक्तिक पारितोषिके,  प्रथम रुपये 7000/-, द्वितीय रुपये 5000/-, तृतीय रुपये 3000/-आणि रुपये 1000 चे तीन  उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेचा विषय 'ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे शैक्षणिक उद्दिष्टे साधली जातात /नाहीत' असा आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री एम. एस. मुंडे, पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ व ॲड.हरिभाऊ गुट्टे,  ज्येष्ठ विधिज्ञ,परळी वैजनाथ. उपस्थित राहणार आहेत.        या आयोजित वाद-

MB NEWS-⬛ काल परळी आगारातून बस सुटली आज चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

इमेज
  ⬛  काल परळी आगारातून बस सुटली आज चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       ३४ दिवसांनंतर काल दि.८ रोजी परळी आगारातून बस सुटली.परंतु यामुळे संपांत फुट पडली.काल परळी आगारातून बस सुटली आणि आज एका चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.          एसटी कामगारांच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.३४ दिवसांनंतर काल दि.८ रोजी परळी आगारातून बस सुटली.परंतु यामुळे संपांत फुट पडली.अनेक दिवसांपासूनच्या कामगारांच्या एकजुटीला तोडण्यात प्रशासन यशस्वी झाले.परंतु आज दि.९ रोजी सकाळी वेगळीच घटना समोर आली आहे.काल परळी आगारातून बस सुटली आणि आज चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.परळी आगारातून काल जी बस सुटली होती त्या बसचा हा चालक असल्याची माहिती समोर येत आहे.नेमका आत्महत्येचा प्रयत्न का केला गेला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्या कामगाराला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

MB NEWS-⬛ आजचे राशिभविष्य दिनांक ९ डिसेंबर २०२१

इमेज
  ⬛ आजचे राशिभविष्य     दिनांक ९ डिसेंबर २०२१ मेष – उत्साहाने कामाला सुरुवात कराल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. लाभदायक दिवस. प्रवासाचे योग संभवतात. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. वृषभ – प्रसन्‍नता लाभेल. प्रयत्नांना यश मिळेल. पदोन्‍नती होईल. कौतुकास्पद कार्य होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मान होतील. मिथुन – आहार-विहाराचे नियम पाळण्याची गरज. प्रतिष्ठा पणाला लागेल. अनावश्यक खर्च होईल. व्यवहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. कामांत अडचणी येतील. कर्क – मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे खचून जाऊ नका. आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस. वाद-विवादापासून दूर राहा. सिंह – प्रलंबित कामे पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. व्यावसायिक प्रगती होईल. कन्या – आरोग्याच्या द‍ृष्टीने अनुकूल दिवस. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. धनप्राप्तीचे योग. पदोन्‍नतीचे योग. संधीचे सोने कराल. तूळ – निर्णय घेताना सावधानता न बाळगल्याने परिणामांना सामोरे जावे लागेल. वादविवादापासून दूर राहा. कामा

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेले पत्र प्रचंड व्हायरल*

इमेज
 * लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती* *१२ डिसेंबरला आपण एक सोपा आणि साधा संकल्प करणार आहोत, कराल का साध्य ?* *पंकजाताई मुंडे यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेले पत्र प्रचंड व्हायरल* बीड । दिनांक ०८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वहस्ताक्षरात लिहिलेले पत्र प्रचंड व्हायरल झाले आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी आपण एक साधा आणि सोपा संकल्प करणार आहोत तो साध्य करणार का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. लोकनेते मुंडे साहेब यांची १२ डिसेंबरला जयंती आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी एक पत्र लिहीले आहे. '१२ डिसेंबर, ३ जून आणि 'दसरा' हे 'तीन' दिवस..आपला वचिंतांचा मेळा न चुकता अधिक शक्तीने होतो. याच संपूर्ण श्रेय, तुम्हाला निस्सिम प्रेम करणाऱ्यांनाच जातं. तुमच्या एवढं सच्च अनोखं नात माझ्या जीवनात कोणतंही नाही.  प्रत्येक वर्षी गर्दी, मार्गदर्शन, अनेक सामाजिक उपक्रम आपण घेतो. सामुदायिक विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर, अपंग- दिव्यांग सेवा, रक्तदान शिबीर, कोविड सेंटर, अतिवृष्टीसाठी मदत फेरी..

MB NEWS-सावधान! आता सोयाबीनची डोळ्यात तेल घालून करावी लागणार राखण ; उभ्या ट्रकमधून 2 लाखाचे सोयाबीन चोरले

इमेज
  सावधान! आता सोयाबीनची डोळ्यात तेल घालून करावी लागणार राखण ; उभ्या ट्रकमधून 2 लाखाचे सोयाबीन चोरले   परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     सोयाबीन ला सध्या चांगला भाव मिळत आहे.त्यामुळे चोरट्यांनी सोयाबीन कडे आपला मोर्चा वळवला आहे.सोयाबीन चोरीच्या घटना समोर यायला लागल्या आहेत.परळीत मध्यरात्रीच्या सुमारास उभ्या ट्रकमधून 2 लाखाचे सोयाबीन चोरले असल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे.        परळी शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद चौकात उभ्या असलेल्या ट्रकमधून 2 लक्ष रुपयांच्या सोयाबीनची चोरी करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत ट्रक ड्रायव्हर रशीद शेख यांच्या फिर्यादीवरून परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येत आहे.जयम लॉजीस्टिक कंपनीचे जवळपास 17 लक्ष रुपयांचे सोयाबीन ट्रक क्रमांक एम.एच.44- यू 1444 या ट्रकमध्ये सेनगाव येथून भरण्यात आले होते. सोलापूर येतील एका कंपनीत हा माल पोच केला जाणार होता. रात्र झाल्याने ट्रक ड्रायव्हर रशीद शेख यांनी परळीत मुक्काम करण्याचे ठरवले. सकाळी पहाटे सोलापूरकडे निघण्याच्या तयारीत असतांना त्यांना गाडीतील सोयाबीनची चोरी झाल्याचे लक्षात

MB NEWS-*हेळंब येथे श्री. खंडोबा मंदिरात तीन दिवसशीय यात्रोत्सव 9 ते 11 डिसेंबर पासून प्रारंभ* *पालखी सोहळा, वाघ्या मुरळी, कुस्त्यांची दंगलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन*

इमेज
  *हेळंब येथे श्री. खंडोबा मंदिरात तीन दिवसशीय यात्रोत्सव 9 ते 11 डिसेंबर पासून प्रारंभ* *पालखी सोहळा, वाघ्या मुरळी, कुस्त्यांची दंगलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  मौजे हेळंब येथील ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रेस गुरुवारी प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने रविवारपासून मंदिर परिसर दुमदुमू लागला आहे.       हेळंब येथे 09 ते 11 डिसेंबर दरम्यान ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बोरणा नदीकाठी बोरणाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे.  या निमित्त गुरुवारी दुपारी १ वा. श्री खंडोबाची पालखी मिरवणुक निघणार आहे. रात्री १२ वाजता शोभेची दारु उडवून अतिषबाजी केली जाणार आहे व २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे. शुक्रवारी रात्री ८ ते १२ दरम्यान वाग्या मुरळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  शनिवारी, दि.11  डिसेंबर दुपारी २ वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहेत. जंगी कुस्त्यासाठी प्रथम पारितोषिक ७,००१/- ठेवण्यात आले आहे. पोलिस उपविभागीय अधिकार

MB NEWS- *खा. शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त परळीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात 11 व 12 डिसेंबर रोजी शरदोत्सवाचे आयोजन* *विविध सामाजिक उपक्रमांनी होणार खा. पवार साहेबांचा वाढदिवस साजरा*

इमेज
 *खा. शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त परळीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात 11 व 12 डिसेंबर रोजी शरदोत्सवाचे आयोजन* *विविध सामाजिक उपक्रमांनी होणार खा. पवार साहेबांचा वाढदिवस साजरा* परळी (दि. 08) ---- : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तथा नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली 11 व 12 डिसेंबर असे दोन दिवस शरदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यांतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असून, खा. पवार साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या वाहनांचे वितरण, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरी पत्राचे वितरण, तसेच राष्ट्रवादी सेवा सप्ताहात नाव नोंदणी केलेल्या 200 विधवा महिलांना पिठाच्या गिरणीचे वाटप आदी उपक्रम ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राबवले जाणार आहेत.  सुप्रसिद्ध कलाकार मंगेश निपाणीकर यांनी खास तयार केलेल्या खा. पवार साहेबांच

MB NEWS-श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी*

इमेज
  श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी परळी वैजनाथ दि.०८ (प्रतिनिधी)        श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शहर व तालुक्यात विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात बुधवारी  (ता.०८) उत्साहात साजरी करण्यात आली.              श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शहरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील शनिमंदिरात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा,शनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नंतर मान्यवरांनी श्री.जगनाडे महाराज यांचा जिवनपट मांडला. हे संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यातील एक प्रमुख टाळकरी होते. तुकाराम महाराजांनी ज्या रचना रचल्या त्या सर्व जगनाडे महाराजांना मुखोद्गत होत्या. तुकाराम महाराजांच्या रचना व गाथा लिहीण्याचे कार्य संताजी जगनाडे महाराजांनी केले. तेली समाज संताजी महार

MB NEWS- *कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांना स्वारातीम वि.चे एम.ए. इंग्रजीत सुवर्ण पदक*

इमेज
 *कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांना स्वारातीम वि.चे एम.ए. इंग्रजीत सुवर्ण पदक* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत महाविद्यालयीन पदव्युत्तर शिक्षणाचा निकाल जाहीर झाला असून दयानंद महाविद्यालय लातूरच्या विद्यार्थीनी कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांनी एम.ए.इंग्रजी विषयात सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. प्रीती रांजणकर या परळी शहर व सिरसाळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळराव रांजणकर यांच्या कन्या आहेत. भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळराव रांजणकर यांच्या कन्या कु.प्रिती गोपाळराव रांजणकर या दयानंद महाविद्यालय लातूर येथे कला शाखेतील एम.ए.विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत होत्या.सदरील कला शाखेच्या परिक्षेचा निकाल दि.७ डिसेंबर २०२१ रोजी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड ने जाहीर केला असून या निकालात कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांनी कला शाखेच्या एम.ए.पदवी परिक्षेत ८७.८२ टक्के गुण प्राप्त केले आहेत.विशेष बाब म्हणजे त्यांना एम.ए.इंग्रजी या विषयात स्वारातीम विद्यापीठातून सुवर्ण पद

MB NEWS-⬛ आजचे राशिभविष्य दिनांक ८ डिसेंबर २०२१

इमेज
 ⬛ आजचे राशिभविष्य दिनांक ८ डिसेंबर २०२१ मेष – आरोग्य उत्तम असेल. कुटुंबाला वेळ द्याल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. व्यावहारिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस. व्यावसायिक प्रगती होईल. वृषभ – सरकारी कामांना प्राधान्य द्या. निर्णय घेताना घाई नको. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आत्मविश्वास द़ृढ ठेवणे आवश्यक आहे. मिथुन – संभ्रमित अवस्था होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. वरिष्ठांची मतभेद होतील. संयमाने वागा. नियोजित कामांत अडचणी येतील. कर्क – सामंजस्याने प्रश्न सोडवाल. व्यावसायिकांना लाभदायक दिवस. मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल. सिंह – शत्रूंवर मात कराल. नोकरदारांसाठी जबाबदारी वाढेल. भागीदारीमधील व्यवसायात नफा होईल. आनंददायी दिवस. कन्या – प्रेम प्रकरणात अपयश संभवते. वाद-विवादापासून दूर राहावे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. मनःस्ताप होण्याची शक्यता. तूळ- घर, जमिनींच्या कामांत अडचणी येतील. नावलौकिक सांभाळावे लागेल. वाहने सावकाश चालवावीत. आर्थिकद़ृष्ट्या नुकसानकारक दिवस. वादविवादापासून दूर राहावे. वृश्चिक-आत्मविश्वास निर्माण होईल. व्यावहारिक

MB NEWS- *आज शिवाजी नगर (नाथ टॉकीज परिसर) येथे मारोती मंदिर चा "प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारंभ".* *भाविकांनी उपस्थित रहावे-प्रा पवन मुंडे*

इमेज
 *आज शिवाजी नगर (नाथ टॉकीज परिसर) येथे मारोती मंदिर चा "प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारंभ".*  *भाविकांनी उपस्थित रहावे-प्रा पवन मुंडे* *परळी प्रतिनिधी :* शहरातील शिवाजी नगर,नाथ टॉकीज मागे येथे आज इच्छापूर्ती हनुमान मंदिर ट्रस्ट च्या वतीने येथील मारोती मंदिर च्या *"प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारंभ"* आयोजित केला असून,कार्यक्रमास शहरातील भाविक-भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवाजी नगर मित्र मंडळ व नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे. प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारंभ प्रसंगी आज सकाळी 8 वाजता प्रभू हनुमानाच्या नवीन मूर्ती ची शोभा यात्रा काढण्यात येणार असून तद्नंतर विधिवत पूजा करून मूर्ती ची मंदिरात स्थापना करण्यात येणार असून या वेळी दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान ह.प.भ.विजयानंद महाराज आघाव, दौणापूरकर यांचे कीर्तन होणार असून किर्तनानंतर महाप्रसाद चा कार्यक्रम होणार आहे.तरी परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवाजी नगर मित्र मंडळ व नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.

MB NEWS-पत्रकार दत्तात्रय काळे यांचा सन्मान

इमेज
  पत्रकार दत्तात्रय काळे यांचा सन्मान  परळी (प्रतिनिधी) पत्रकार दत्तात्रय काळे यांनी आयआरडीए च्या परीक्षेत यश मिळवून लागलीच कामाला लागत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. मंगळवारी परळी वैजनाथ येथील रिलायन्स इन्शुरन्स कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परळी वैजनाथ येथील पत्रकार दत्तात्रय काळे यांनी विमा क्षेत्रात दमदार पदार्पण केले आहे. नुकतीच त्यांनी आयआरडीएची पात्रता परीक्षा दिली होती, त्यात त्यांनी यश मिळवले. त्यांच्या या दोन्ही यशाबद्दल परळीतील रिलायन्स इन्शुरन्स कार्यालयात सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, फेटा आणि पुष्पहार देऊन सत्कार करत त्यांचे अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी परळी शाखा व्यवस्थापक राजेश गीते, सहाय्यक व्यवस्थापक श्रीहरी शिवदे, मार्गदर्शक तथा विमा सल्लागार वंदना कांबळे, पत्रकार मोहन व्हावळे, संभाजी मुंडे यांच्यासह रिलायन्स इन्शुरन्स परळी शाखेच्या सर्व कर्मचारी वृंदाची उपस्थिती होती.

MB NEWS- *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र विद्यालयात अभिवादन*

इमेज
 *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र विद्यालयात अभिवादन*  परळी वै: दि. 06 भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र विद्यालय,मोहा याठिकाणी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. या अभिवादन कार्यक्रमास महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.सुदामदादा देशमुख, श्री.सुदाम शिंदे,शाळेचे मुख्याध्यापक श्री.चंद्रशेखर साखरे,पर्यवेक्षक श्री.विनायक राजमाने आदी प्रमुख व्यक्तीगण उपस्थित होते. या अभिवादन कार्यक्रमात शाळेतील सहशिक्षक ब्रम्हानंद देशमुख यांनी डॉ.बाबासाहेब यांच्या जीवन कार्यावर उजाळा देत डॉ.बाबासाहेबांचे जीवन कसे आदर्शवत व अनुकरणीय आहे हे सांगितले तर श्री.मुकुंद चौधरी यांनी डॉ.बाबासाहेबांच्या संविधानामुळे अठरा पगड जाती-धर्माचा आपला देश एकसंघ आहे याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास गिरी तर आभार व्यक्त हनुमंत वाघमोडे यांनी केले.

MB NEWS-*प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तेजस्वी विचार पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे* *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धनंजय मुंडे यांनी केले चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांना अभिवादन*

इमेज
  *प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तेजस्वी विचार पिढ्यान पिढ्या मार्गदर्शक - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे* *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  धनंजय मुंडे यांनी केले चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांना अभिवादन*  मुंबई (दि. 06) ---- : भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व तेजस्वी विचार पिढ्यानपिढ्यासाठी मार्गदर्शक आहेत. समस्त बहुजन समाजाचे उध्दारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करून त्या विचारांवर चालण्याचा निर्धार करू असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. आज देशभरातून आलेले अनुयायी अत्यंत शिस्त व नियमांचे पालन करून अभिवादन करत आहेत, त्या सर्वांना माझे नमन. मुंबई महापालिका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक अनुयाया