MB NEWS-आषाढी एकादशी निमित्त ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचा विशेष लेख➡️ खेळ मांडियेला

------------------------------------------------------ खेळ मांडियेला... ------------------------------------------------------ महाराष्ट्रीयन समाज मनावर संत विचारांचा खोलवर परिणाम झालेला आहे. संत विचारांचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या प्रथा,परंपरा इतकेच नव्हे सामाजिक चळवळीमध्येही पहायला मिळते. आणखी स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले तर महाराष्ट्रीयन समाज मनाची मशागत समताधिष्टित संतविचाराने केली. म्हणूनच इथे सामाजिक बदलांच्या चळवळी उभ्या राहिल्या आणि त्यांनी समृद्ध महाराष्ट्र उभा केला. या संत विचारांचा जागर आपण करणार आहोत. मध्ययुगीन प्रबोधन चळवळीचा भाग म्हणून संत परंपरेकडे पाहिले जाते. हे संत आंदोलन काही सहज उभे राहिले नाही तर समाजाची एक नीकड म्हणून ते उदयास आले. साधारण बाराव्या तेराव्या शतकाच्या आसपास हे संत आंदोलन उभे राहिले. खरे तर पूर्वापार चालत आलेल्या भक्ती परंपरेला या संत चळवळीने काही धक्के दिले. अर्थात त्यावेळी त्यांनी जे धक्के दिले त्याचे परिणाम तत्काळ जाणवले नसले तरी सामाजिक बदलाची पायाभरणी त्यानी त्यावेळी केली असे म्हणता येईल. त्यांनी त्यावेळी रुजविलेल्या प्रकाश बीजा...