पोस्ट्स

निवेदन लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  वैद्यनाथ ज्योतीर्लिंग विकासाबाबत  पंतप्रधान मोदींना शिफारस करा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चेतन सौंदळे यांचे निवेदन        द्वादश वैद्यनाथ पाचवे ज्योतीर्लिंग क्षेत्र परळीसह भारत देशातील सर्व ज्योतीर्लिंगाचा विकास पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी करावा याकरिता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिफारस करण्याची मागणी बीड जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती परळीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांनी लेखी निवेदनाद्वारे राज्यपाल प्रभू वैद्यनाथZee] ज्योतीर्लिंगाचे दर्शन करण्याकरिता शुक्रवारी परळी येथे आले असता प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात आली आहे.     भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय अंतर्गत प्रसाद योजनेद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियानाच्या माध्यमातून तसेच राज्याच्या विकासासोबत राष्ट्राचा विकास साधण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी झारखंड राज्यातील बाबा वैद्यनाथधाम,देवघर येथे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी अत्याधुनिक एम्स रूग्णालयसह,विमानतळ,चौपदरी राष्ट्रीय महामार्ग,त
इमेज
 *राज्यपाल कोश्यारी गोपीनाथ गडावर ; लोकनेत्याच्या समाधीचे घेतले दर्शन*  *"मुंडेजी मेरे मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी"* परळी । दिनांक २०। "गोपीनाथ मुंडे मेरे सहयोगी एवं मित्र थे, लोकनेता के रूप में उनकी याद हमेशा आती रहेगी" अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी जाग्या केल्या.     राज्यपाल कोश्यारी यांचे काल परळी शहरात आगमन झाले, त्यांचा चेमरी विश्रामगृहात मुक्काम होता. आज सकाळी लातूरकडे जातांना गोपीनाथ गडाला त्यांनी आवर्जून भेट दिली आणि मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. एका लेकीने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ स्मारक उभा केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचे हे काम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे असं सांगत  "मुंडेजी मेरे सहयोगी और मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी" अशा शब्दांत त्यांनी साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यपालांनी या भेटीत मुंडे साहेबांचा पुतळा आणि    गड परिसराची पाहणी केली.     यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हयातील व तालुक्यातील पदाधिकारी, लोक प्रति

MB NEWS-मराठवाड्याच्या उन्नत परंपरेची प्रतिमा केली प्रदान

इमेज
  महाराष्ट्र अस्मितेची जाणीव व संदेश देणारी राज्यपालांना परळीतील युवकांकडूनअनोखी भेट    मराठवाड्याच्या उन्नत परंपरेची प्रतिमा केली प्रदान  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       आपल्या विविध वक्तव्यांनी वाद ओढवून घेणारे व महाराष्ट्राबद्दल आपल्या वक्तव्यातून महाराष्ट्र अस्मितेची जाणीव नसल्याच्या टिकेचे धनी ठललेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे परळीत आले असतांना त्यांना महाराष्ट्र अस्मितेची जाणीव व संदेश देणारी भेटवस्तू काही युवकांनी दिली.एकप्रकारे ही भेट सकारात्मकता जपत खोचक अशी अनोखी भेट ठरली आहे.            वैभवशाली महाराष्ट्रातील गौरवशाली मराठवाड्याची उन्नत परंपरा दर्शवणारी छायाचित्र प्रतिमा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना काही युवकांनी भेट दिली. राज्यपाल भगतसिंग कोशियारी आज देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील वैद्यनाथाच्या दर्शनाला आले होते.  अनेकांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे व सहकारी युवकांनी राज्यपालांंची भेट घेतली.जाणीवपूर्वक महाराष्ट्र अस्मितेची जाणीव करुन देणारी  व महाराष्ट्राबद्दल आभिमान बाळगा असा अप्रत

MB NEWS-महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेस आक्रमक; नायब तहसीलदार यांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन

इमेज
  महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेस आक्रमक; नायब तहसीलदार यांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन परळी वैजनाथ, प्रतिनिधी..          महसूल प्रशासन काम करताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप काही दिवसापूर्वीच पत्रकार परिषदेत काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई यांनी केला होता. आज काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त होऊन त्यांनी तहसील कार्यालयात आक्रमक आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान नायब तहसीलदार रुपनर यांच्या दालनात बेशरम फेकीत प्रशासनाच्या "बेशरमपणाचा" कार्यकर्त्यांनी निषेध केला असे काॅंग्रेस पदाधिकारी यांनी म्हटले आहे.          महसुलचे अधिकारी पक्षपातीपणे काम करतात असा आरोप पत्रकार परिषदेत  काॅंग्रेस शहराध्यक्ष बहादूरभाई  यांनी केला होता.परळी तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पक्षपाती काम करत आहेत महसूल प्रशासन आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते.गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील रेशन कार्डधारकांच्या मुद्यावर काँग्रेसकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. धान्य न उचलणाऱ्या कार्डधारकांची नवे वगळून ज्यांना धान्य मिळत नाही त्यांना दे