MB NEWS-२ डिसेंबरला नियोजित संयुक्त चाळणी परीक्षा – २०२२ प्रवेश प्रमाणपत्र एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध

२ डिसेंबरला नियोजित संयुक्त चाळणी परीक्षा – २०२२ प्रवेश प्रमाणपत्र एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शुक्रवार, दिनांक ०२ डिसेंबर २०२२ रोजी नियोजित विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी, सहायक प्रशासकीय अधिकारी व सहायक प्रशासन अधिकारी या सहा संवर्गाच्या संगणक प्रणालीवर आधारित संयुक्त चाळणी परीक्षेकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोडकरुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, उमेदवारांनी परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर...