पोस्ट्स

ऑगस्ट ३०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS:एस.टी बसची मोटारसायकलला धडकअपघातात दोन तरूण ठार

इमेज
 एस.टी बसची मोटारसायकलला धडकअपघातात दोन तरूण ठार वडवणी हिवरगव्हण येथे मित्राला मोटरसायकलवर सोडून आपल्या उपळी गावाकडे येत असताना बाबी फाट्याजवळील गतिरोधकवर पाठीमागून येणाऱ्या एसटीबसने जोराची धडक देत मोटरसायकल स्वरांना उडवले अपघात एवढा भीषण होता की दोन्ही तरुण जागीच ठार झाले असल्याची घटना आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान वडवणी तालुक्यातील बाबी फाट्याजवळ घडली असल्याची ची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.   याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील उपळी येथील तरुण ऋषिकेश राजु शेळके (वय २३ वर्ष),ओमप्रकाश श्रीमंत राऊत (वय २६ वर्ष) हे आपल्या मोटरसायकलवर हिवरगव्हाण येथील मित्राला सोडुन आपल्या गावी उपळीला येत असताना बाबी फाट्या जवळ असणाऱ्या गतिरोधक जवळ पाठीमागून बीड वरून येणाऱ्या परभणी आगाराची एसटी बस एम एच २० बी.एल ३६१२ क्रमांकांच्या एस टी बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने विना नंबर असलेल्या मोटरसायकल पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये ऋषिकेश शेळके व ओमप्रकाश राऊत या दोन्ही तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली आहे जखमी

MB NEWS: *महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापक विरोधात शेतकरी करणार आंदोलन* _पिक कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन_

इमेज
 *महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापक विरोधात शेतकरी करणार आंदोलन* _पिक कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन_  दिंद्रुड ,प्रतिनिधी  माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक यांच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना बँक शाखा व्यवस्थापकांवर कारवाई करत तात्काळ पीक कर्ज वाटप करून देण्याची मागणी केली आहे.      गेल्या चार महिन्यांपासून दिंद्रुड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री कानडे हे शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत शेतकऱ्यांनी ग्रामीण  बँकेच्या वारंवार चकरा मारूनही नवीन पीक कर्ज न मिळाल्याने व शेती मशागत करण्यास येणाऱ्या अडचणीमुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ नवीन पीक कर्ज  न मिळाल्यास येत्या दिनांक 14 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शाखा व्यवस्थापकाच्या विरोधात कारवाई करेपर्यंत आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हंटले आहे. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनावर नारायण चांदबोधले,दिलीप कोमटवार,अतुल चव्हाण, अखील सय्यद,ज्ञानेश्वर आरणकल्ले, नागेश वकरे, राजाभाऊ क

MB NEWS: *JEE, NEET परीक्षा पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार*

इमेज
 *JEE, NEET परीक्षा पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार* नवी दिल्ली :  वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची 'NEET' तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची 'JEE' परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.४) नकार दिला. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. JEE परीक्षेचे चार दिवसांचे पेपर संपले असून येत्या ६ तारखेपर्यंत ही परीक्षा होणार आहे. कोरोना संसर्गामुळे JEE व NEET परीक्षा घेतल्या जाऊ नयेत. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशी विनंती करीत यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात असंख्य याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर सहा राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिकाही फेटाळली गेल्याने JEE आणि NEET परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला. गैर भाजपशासित सहा राज्यांच्या मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या मंत्र्यामध्ये महाराष्ट्राचे उदय सामंत, प. बंगालचे मोलाय घताक, झारखंडचे रामेश्वर ओरान, राजस्थानचे रघु शर्मा,

MB NEWS:*झोपडपट्टी मुक्तीकडे धनंजय मुंडे यांचे पहिले पाऊल; परळीत राबविणार बारामती पॅटर्न!*

इमेज
 *झोपडपट्टी मुक्तीकडे धनंजय मुंडे यांचे पहिले पाऊल; परळीत राबविणार बारामती पॅटर्न!* *निवडणुकीपूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्याकडे मुंडेंचे महत्वपूर्ण पाऊल!* *भूमापन सर्व्हे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे परळीकरांना केले आवाहन* परळी (दि. ०४) ---- : निवडणूक काळात परळीकर नागरिकांना दिलेले वचन पूर्ण करण्याच्या दिशेने परळीचे आमदार तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी अत्यंत महत्वाचे पाऊल उचलले असून, परळी शहर झोपडपट्टी मुक्त करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. यासाठी परळीत बारामती पॅटर्न राबविणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. शासनाच्या सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत परळीतील विविध स्तरातील गरीब *नागरीकांचे*, उपलब्ध जागेनुसार सर्वेक्षण केले जाईल व त्यानुसार प्रस्ताव तयार करून तो राज्य *सरकारकडे* मांडण्यात येऊन सादरीकरण करण्यात येईल. यासाठी सर्व्हे करण्यासाठी येत असलेल्या नगर परिषद व नगर भूमापन अधिकारी कर्मचारी यांना सहकार्य करून योग्य माहिती द्यावी असे आवाहनही ना. मुंडे यांनी परळीकरांना केले आहे. घरांच्या व बांधकाम साहित्याच्या किंमती एकीकडे गगनाला भिडत आह

MB NEWS: *कोरोना बाधित रुग्णांच्या तपासणीसाठी 24 तास तपासणी स्वॅब कलेक्शन--जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

इमेज
 *कोरोना बाधित रुग्णांच्या तपासणीसाठी 24 तास तपासणी स्वॅब कलेक्शन--जिल्हाधिकारी राहुल रेखावार* बीड, दि. ४::--कोरोना रुग्णांचा तपासणीसाठी 24 तास स्वॅब कलेक्शन आणि रुग्णांबाबत माहिती मिळाल्यानंतर प्रतिसाद देणारे पथक कार्यान्वित करण्यात येत असून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी संशयित कोरोना रुग्णांची पुढील तपासणी होण्यासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात कळवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक झाली याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे अधिकारी डॉ अमोल गायकवाड , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटना(आय एम ए )चे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत . उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांन

MB NEWS:सातबारा बदलला; ई-लोगोचा सात-बारा*

इमेज
-----------------------------------  *सातबारा बदलला; ई-लोगोचा सात-बारा* -----------------------------------  पुणे – जमिनीच्या मालकी हक्काशी संबधित महत्त्वाचा पुरावा असलेला सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात (7/12) बदल करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आता, नागरिकांना नव्या स्वरुपातील सातबारा उतारा मिळणार आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आजची परिस्थिती लक्षात घेऊन सातबारा उताऱ्यामध्ये बदल करण्यात येत आहे. 50 वर्षानंतर पहिल्यांदाच सातबारा उताऱ्यामध्ये बदल होत आहे. नव्या स्वरुपात येणाऱ्या सातबारा उताऱ्यामध्ये शासनाचा व ई-महाभूमीचा लोगो असलेला वॉटरमार्क असणार आहे तसेच शेती आणि बिनशेतीसाठी वेगवेगळा सातबारा उतारा असणार आहे. राज्याच्या जमिनींच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून सातबारा उतारा वापरला जातो. अनेकदा बनावट सातबारा उतारा दाखवून जमीन लाटणे, त्यांची खरेदी-व्रिकी करणे आदी प्रकार यापूर्वी घडले आहेत आणि घडत आहेत. सातबारा उतारा हा शासकीय भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो समजत नाही. त्यातून हे प्रकार घडतात. त्यामुळे संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्याचा निर्णय महसूल विभागान

MB NEWS:धनंजय मुंडेंचा मुंबईत जनता दरबार; असंख्य लोकांनी मांडल्या समस्या* *फोनवरून, पत्र देऊन अनेक प्रश्न जागीच निकाली*

इमेज
 *धनंजय मुंडेंचा मुंबईत जनता दरबार; असंख्य लोकांनी मांडल्या समस्या* *फोनवरून, पत्र देऊन अनेक प्रश्न जागीच निकाली* *जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध - धनंजय मुंडे* मुंबई (दि. ०३) ---- : मंत्रिमंडळातील सदस्य थेट जनतेला व पक्ष कार्यकर्त्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी उपलब्ध व्हावेत या खा. शरद पवार यांच्या संकल्पनेनुसार काल राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दुपारी दोन ते चार या वेळेत घेतलेल्या जनता दरबारास असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या प्रश्न व समस्या मांडल्या.  धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत नागरिकांच्या तसेच पक्ष कार्यकर्त्यांच्या बहुतांश समस्या जागच्या जागीच संबंधितांना फोन करून किंवा आवश्यक पत्र देऊन जागच्या जागीच मिटवले. या जनता दरबारास राज्यातील विविध जिल्ह्यातील असंख्य नागरिकांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी मधील घटक पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावत आपल्या समस्या मंत्री महोदयांपुढे मांडल्या. दरम्यान जनता दरबार ही संकल्पना नागरिक ते थेट मंत्री असा संवाद घडवून नागरिकांच्या समस्यांना थेट मंत्र्

MB NEWS: *परळीत लाखो रुपयांचा गुटखा पकडला;१६बॅग व जीप पोलीसांनी घेतलं ताब्यात*

इमेज
 *परळीत लाखो रुपयांचा गुटखा पकडला;१६बॅग व जीप पोलीसांनी घेतलं ताब्यात* परळी वै.(प्रतिनिधी) संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी (दि.3) रात्री पोलीसांनी जीपमधून वाहतूक केला जाणारा लाखो रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला.  परळीत सातत्याने गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पोलीसांनी जीप ताब्यात घेतली असून पुढील कार्यवाही सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी रात्री संभाजीनगर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चाँद मेंढके व कर्मचार्‍यांनी शहरात एक संशयित जीप शहरातील गंगाखेड रोडवर थांबवून तपासणी केली. या जीपमध्ये गुटखा भरलेल्या 16 बॅग आढळून आल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीसांनी गाडी जप्त केली असून पुढील कार्यवाही सुरु असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक चाँद मेंढके यांनी दिली. दरम्यान परळीतूनच बीड जिल्ह्यात गुटख्याचा काळा धंदा तेजीत केला जात असल्याचे स्पष्ट होवू लागले आहे.  ---

MB NEWS:कोरोना बाधित पत्रकारांसाठी मराठी पत्रकार परीषदेची शासनाकडे मागणी.

इमेज
 *कोरोना बाधित पत्रकारांसाठी राज्यात शासकीय आणि धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारित असलेल्या खासगी रुग्णालयात राखीव बेडची व्यवस्था प्राधान्याने करणेबाबत मराठी पत्रकार परीषदेची शासनाकडे मागणी. *  ...................         याबाबत मराठी पत्रकार परिषदेने मा. मुख्यमंत्री, मा. आरोग्यमंत्री व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पत्रे पाठविली आहेत. या पत्रानुसार, राज्यात दीडशेच्यावरती पत्रकारांना कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यातील बहुतेकजण बरे होऊन घरी गेले असले तरी किमान 11 पत्रकार कोरोना विरोधातली लढाई हरले आहेत. आजही किमान 50 पत्रकार विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. मात्र पत्रकारांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याच्या सातत्यानं तक़ारी येत आहेत. पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचंही योग्य उपचार न मिळाल्यानं निधन झाल्यांची दुर्दैवी घटना पुण्यात घडली. त्यांना वेळेत अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था तसेच ऑक्सिजनही न मिळाल्यामुळे एका तरूण आणि उमद्या पत्रकाराचं निधन झाले, ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही पत्रकारावर अशी वेळ येऊ नये, म्हणून पत्रकारांसाठी राखीव खाटा ठेवाव्यात, अशी मराठ

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस्,: आज एकूण ९५ तर परळीत २५ रिपोर्ट पाॅझिटिव्ह

इमेज
 बीड जिल्हा कोरोना अपडेटस्,: आज एकूण ९५ तर परळीत २५ रिपोर्ट पाॅझिटिव्ह

MB NEWS: *राहुल ताटे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार*

इमेज
 *राहुल ताटे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार* अविष्एकार ज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 या वर्षी   श्री. राहुल विलासराव ताटे यास जाहीर झाला आहहे.

MB NEWS:*इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कर्ज योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी*

इमेज
  *इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कर्ज योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी* बीड, दि. २::-इतर मागास प्रवर्गातील होतकरू लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगार निर्माण करण्याकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित यांचे अल्प व्याजदराने कर्ज वितरित करण्यात येते या योजना ऑनलाईन असून www.msobcfdc.in या संकेत स्थळावर नाव नोंदणी करावी . इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय बीड मार्फत बीड जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील होतकरू लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगार निर्माण करण्याकरिता अल्प व्याजदराने कर्ज वितरित करण्यात येते सन 2020 --21 या आर्थिक वर्षासाठी 20 टक्के बीज भांडवल योजनेअंतर्गत प्रकल्प रक्कम रुपये 2.50 (अडीच) लक्ष रुपये पर्यंत २७ भौतिक उद्दिष्ट  देण्यात आले असून थेट कर्ज योजनेअंतर्गत प्रकल्प रक्कम एक लाख पर्यंत १०० भौतिक उद्दिष्ट देण्यात आले आहे . तसेच दहा लक्ष पर्यंतचे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 50  उद्दिष्ट आहे.  १० ते ५० लक्ष रुपये पर्यंत गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 12 भौतिक उद्दिष्ट देण्यात आले आहेत पात्र ओबीसी प्रवर्गातील गरजू

MB NEWS:*राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या निधनाने समाज बांधवांचे मोठे नुकसान-चेतन सौंदळे*

इमेज
 *राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या निधनाने समाज बांधवांचे मोठे नुकसान-चेतन सौंदळे* *परळी (प्रतिनिधी)* राष्ट्रसंत, वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमपुरकर हे महान तपस्वी व संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे आचार्य होते. त्यांच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी श्रावणमास तपोनुष्ठान सोहळा झाला होता. अहमदपुरकर महाराज हे समाजासोबतच सर्वांसाठी एक दिशादर्शक होते, त्यांच्या निधनाने मोठी हानी झाली या शब्दात नगरसेवक तथा श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयाचे अध्यक्ष चेतन सौंदळे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.  परळी शहरात दोन वर्षापूर्वी भव्य दिव्य स्वरूपातील श्रावणमास तपोनुष्ठान सोहळा पार पडला होता. या सोहळयास डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांची मार्गदर्शनपूर्वक अशी उपस्थिती होती. समाजात आतापर्यंत झालेला व सर्वाधिक भाविकांच्या उपस्थितीने चर्चेच्या ठरलेल्या सोहळयास वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी मार्गदर्शन केले होते. आजही या तपोनुष्ठान सोहळयातील त्यांच्या स्मृती आठवणीत असून राष्ट्र संतांचे पाय आमच्या परळीला लागले, आम्हाला त्यांची सोहळयाचा अध्

MB NEWS:परळीतील प्रसिद्ध व्यापारी श्री.भाऊसाहेब माने यांचे निधन,

इमेज
 परळीतील प्रसिद्ध व्यापारी श्री.भाऊसाहेब माने यांचे मंगळवारी दुःखद निधन, रक्षाविसर्जन आज.. परळी येथील प्रसिद्ध माने किराणा स्टोअर्सचे श्री भाऊसाहेब पंडितराव माने (वय ८३) यांचे मंगळवारी (दि.०१) रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ, भावजयी, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्री विजयकुमार माने व श्री धनंजय माने यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन गुरुवार (ता. ०३) रोजी सकाळी आठ वाजता स्मशानभूमी येथे आहे.

MB NEWS:*राज्यात कोरोनामुक्तांची संख्या सहा लाखांच्या उंबरठ्यावर* *आज एका दिवसात बरे झाले १३ हजार ९५९ रुग्ण* - *आरोग्यमंत्री राजेश टोपे*

इमेज
 *राज्यात कोरोनामुक्तांची संख्या सहा लाखांच्या उंबरठ्यावर* *आज एका दिवसात बरे झाले १३ हजार ९५९ रुग्ण* - *आरोग्यमंत्री राजेश टोपे*           मुंबई, दि.२: राज्यात आज १३ हजार ९५९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ५ लाख ९८ हजार ४९६ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४८ टक्के आहे. आज १७ हजार ४३३ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ०१  हजार ७०३ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.   *आज निदान झालेले १७,४३३ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २९२ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू)* : मुंबई मनपा-१६२२ (३४), ठाणे- ३०२ (५), ठाणे मनपा-३०१ (१), नवी  मुंबई मनपा-३७१ (७), कल्याण डोंबिवली मनपा-५०८ (४), उल्हासनगर मनपा-२५ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३६, मीरा भाईंदर मनपा-२१९ (३), पालघर-२५२ (७), वसई-विरार मनपा-१७१ (८), रायगड-४५८ (१०), पनवेल मनपा-२८८ (१), नाशिक-३२७ (६), नाशिक मनपा-६३१ (१४), मालेगाव मनपा-७०, अहमदनगर-३७४ (५),अहमदनगर मनपा-२१२, धुळे-८६ (१), धुळे मनपा-११० (१), जळगाव- ७६२ (१०), जळगाव मनपा-११२ (५), न

MB NEWS:प्रधानमंत्री पथविक्रेत्यासाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा योजना

इमेज
                      प्रधानमंत्री पथविक्रेत्यासाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा योजना बीड, दि,2:- (जि.मा.का.)  लॉकडाऊनमध्ये शहरातील मोडकळीस आलेल्या छोटया व्यवसायिक पथविक्रेत्यानां त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी पथ विक्रेत्यासाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना सुरु केली  असून  बीड शहरातील पात्र पथ विक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.          पथविक्रेत्यांना 10  हजार रुपयापर्यंत खेळते भांडवली कर्ज बँकामार्फत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ही योजना दि. 24 मार्च 2020 रोजी  व त्यापूर्वी शहरामध्ये पथविक्री करीत असलेल्या सर्व पात्र पथविक्रेत्यांना लागू  आहे. पथविक्रते 1 वर्षाच्या परतफेड मुदतीसह 10 हजार रुपये पर्यंतचे खेळते भांडवली कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील.  हे कर्ज विनातारण असून विहित कालावधीमध्ये किंवा तत्पूर्वी परतफेड करणारे पथविक्रते वाढीव मर्यादेसह पुढील खेळते

MB News:शासनाच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

इमेज
 शासनाच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन बीड, दि,2 :- (जि.मा.का.)  संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृतीवेतन योजना शासनाकडून राबविण्यात येतात या विविध योजनांचे लाभार्थी मंजूर करण्याकरिता महाऑनलाईन यांच्या मार्फत संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली असून बीड जिल्हयातील लाभार्थ्यांनी http://mahaonline.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन, उपजिल्हाधिकारी  प्रकाश पाटील बीड यांनी केले आहे.         संजय गांध निराधार अनुदान योजना,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष  पुढीलप्रमाणे आहेत.        अर्ज करण्यासाठी सर्व महा ईसेवा केंद्र, आपले सरकार केंद्र यांच्यामार्फत अर्ज करावेत. ग्राहक सेवा केंद्रामार्फत राष्ट्रीयकृत बँक, पोस्ट बँकमध्ये सध्याच्या सर्व लाभधारकांनी आपले खाते 15 सप्टेंबर 2020 उघडावे, राष्ट्रीयकृत बँके व्यतिरिक्त खाते असल्यास लाभार्थ्यांचे अनुदान पाठविण्यात येणार नाही

MB NEWS:बार्शीतील धक्कादायक प्रकार; चक्क करोनादेवीची केली स्थापना*

इमेज
  🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 *बार्शीतील धक्कादायक प्रकार; चक्क करोनादेवीची केली स्थापना* -----------------------------------  करोनाचा वाढलेला कहर रोखण्यासाठी एकीकडे शासन व प्रशासन अहोरात्र झटत आहेत. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात बार्शीसारख्या व्यापारीपेठेत करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पारधी समाजातील भोळ्याभाबड्या मंडळींनी 'करोना'देवीची स्थापना केली आहे. या करोनादेवीला प्रसन्न करण्यासाठी कोंबडे, बोकडांचाही नैवेद्य दिला जात असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. दरम्यान, या घटनेची दखल घेत पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. बार्शीत सोलापूर रस्त्यावर असलेल्या पारधी वस्तीत करोनादेवी स्थापनेचा आणि त्या माध्यमातून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी सोमनाथ परशुराम पवार (वय ४२) व ताराबाई भगवंत पवार (वय ५२) या दोघांविरूध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाच्या कलम ५२ खाली गुन्हा नोंदविण्यात आल्याचे बार्शीचे तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी सांगितले. सध्या संपूर्ण जगभरासह देशात सर्वत्र करोनाचा प्रादुर्भाव वाढला असून सोलापूर जिल्ह्यात

MB NEWS:*◼️LPG सिलेंडरवर या महिन्यातही नाही मिळणार सबसिडीची रक्कम*

इमेज
  *◼️LPG सिलेंडरवर या महिन्यातही नाही मिळणार सबसिडीची रक्कम* नवी दिल्ली, 02 सप्टेंबर : या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये देखील सरकारकडून मिळणारी सबसिडी (Domestic Gas Subsidy) देण्यात येणार नाही आहे. तुमच्या लक्षात आले असेल की गेल्या 4 महिन्यात तुमच्या खात्यामध्ये Gas Subsidy चे पैसे आले नाही आहेत. सरकारने गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी मे महिन्यापासून रद्द करण्यात आली आहे. असा निर्णय का घेण्यात आला असावा हा प्रश्न सामान्यांना पडला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात एप्रिल महिन्यात एलपीजीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली, त्यामुळे मे महिन्यात घरगुती सिलेंडरचे बाजार मुल्य 162.50 रुपयांनी कमी करून 581.50 रुपये करण्यात आले. ज्यानंतर सबसिडी आणि बिना सबसिडीच्या सिलेंडरची किंमत सारखीच झाली. दरम्यान सप्टेंबर महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. *◼️खात्यामध्ये का येत नाही आहे LPG घरगुती गॅसच्याच्या सबसिडीची रक्कम?* इकॉनॉमिक टाइम्समधील बातमीनुसार, केंद्र सरकारने मे महिन्यापासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये बदल केला आहे. हा बदल करतानाच सरकारने सबसिडी रद्द करण्

MB NEWS:*◼️दहावी-बारावीच्या ऑक्टोबरमधल्या परीक्षा पुढे ढकलल्या*

इमेज
 🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 *◼️दहावी-बारावीच्या ऑक्टोबरमधल्या परीक्षा पुढे ढकलल्या*  मुंबई : कोरोना व्हायरसमुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची दरवर्षी ऑक्टोबरमध्ये परीक्षा होते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  पुढे ढकलण्यात आलेल्या या परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यावेळी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन दहावी-बारावीच्या एटीकेटीच्या परीक्षांचा निर्णय घेण्यात येणार आहे.  राज्यामध्ये कोरोनाचा प्रसार वाढण्याआधीच बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्या होत्या. तर कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोलाचा पेपर होऊ शकला नाही. कोरोना नियंत्रणात येत नसल्यामुळे अखेर दहावीचा भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना भुगोलाचे सरासरी मार्क देण्यात आले.

MB NEWS:वनरक्षक दैवशाला वाघमारेंना व्हरकटवाडीकरांचा सानंद निरोप

इमेज
 वनरक्षक दैवशाला वाघमारेंना व्हरकटवाडीकरांचा सानंद निरोप दिंद्रुड प्रतिनिधी धारुर वनपरिक्षेत्रातील मोहखेड नियत क्षेत्राच्या  वनरक्षक दैवशाला वाघमारे यांची नुकतीच तालुका अंतर्गत बदली पहाडी पारगाव नियतक्षेत्रात झाली. गेली पाच वर्ष मोहखेड बिटातील डोंगर हिरवागार करण्यासाठी मोलाची भुमीका बजावल्याने व्हरकटवाडीकरांनी दैवशाला वाघमारे यांचा निरोप समारंभ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत केला.       गेल्या पाच वर्षांत धारुर वनपरिक्षेत्राच्या मोहखेड नियत क्षेत्रातील व्हरकटवाडी,मोहखेड च्या बालाघाट डोंगरावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चार लक्ष रोपांची निर्मीती करत बालाघाट डोंगरावर एक लक्ष वृक्षारोपण करत ओसाड डोंगराची हिरवागार डोंगर करण्यासाठी वनरक्षक दैवशाला वाघमारे यांची मोलाची भुमीका राहिली आहे.वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन व संगोपन योग्य रितीने केल्यामुळे बालाघाट चा डोंगर आज हिरवागार झाला आहे. मोहखेड बिटातील अतिक्रमण काढत जहाल कामगिरी निभावताना बिटातीलच मोलमजुरी करणार्या मजुरांना रोजगार उपलब्ध करत हाताला काम मिळवुन दिल्याने व्हरकटवाडी व मोहखेड ग्रामस्थांत वाघमारेंची विशेष क्रेझ होती. पानी

MB NEWS:पत्रकार पांडुरंग रायकर* *मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार

इमेज
*पत्रकार पांडुरंग रायकर*  *मृत्यू प्रकरणाची चौकशी* *होणार*  मुंबई : योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून पुण्यातील एक तरूण पत्रकार पांडुरंग रायकरचा हाकनाक बळी गेला.. पांडुरंगला अ‍ॅम्ब्युलन्स मिळाली नाही, ऑक्सिजन मिळाला नाही.. त्यामुळे एक तरूण पत्रकार आपणास सोडून गेला.. व्यवस्थेच्या या गलथान कारभाराची आता चौकशी होणार आहे.. तसे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.. पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी आणखी एक भीषण वास्तव मान्य केलं आहे.. श्रीमंत लोक दबाव आणून आयसीयूतील बेड अडवून ठेवतात.. जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.. माध्यमकर्मी हे कोरोना यौध्दे असतील तर त्यांच्यासाठी सरकारी आणि चॅरिटी कमिशनर अंतर्गत येणारया खासगी रुग्णालयात पत्रकारांसाठी ऑक्सिजनसह काही बेड राखीव ठेवले जावेत अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.. कारण राज्यात आतापर्यंत किमान शंभरावर पत्रकार कोरोना बाधित झाले आहेत आणि मराठी पत्रकार परिषदेकडे जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्यानुसार अकरा पत्रकारांचे कोरोनानं निधन झालं आहे..

MB NEWS:*विश्वव्यापी कोरोना संकटकाळातील विधायक व सर्वस्पर्शी सेवाकार्याबद्दल बाजीराव धर्माधिकारी यांना 'राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान* • *_भरीव कार्य करणाऱ्या देशभरातील निवडक सेवाकर्मींचा डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशनकडून गौरव_* •

इमेज
 *विश्वव्यापी कोरोना संकटकाळातील विधायक व सर्वस्पर्शी सेवाकार्याबद्दल बाजीराव धर्माधिकारी यांना 'राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान* • *_भरीव कार्य करणाऱ्या देशभरातील निवडक सेवाकर्मींचा डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशनकडून गौरव_* • परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       विश्वव्यापी कोरोना संकटकाळातील विधायक व सर्वस्पर्शी सेवाकार्याबद्दल बाजीराव धर्माधिकारी यांना 'राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान' देऊन गौरविण्यात आले आहे.भरीव कार्य करणाऱ्या देशभरातील निवडक सेवाकर्मींचा विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशनकडून गौरव करण्यात आला आहे.यामध्ये ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  परळी शहरात कोरोना सेवाकार्य अविरतपणे करणार्या व सर्वस्तरात अत्यावश्यक सर्व कार्ये पोहचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असलेल्या माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या कार्याची दखल या राष्ट्रीय सन्मानासाठी घेण्यात आली.हा एकप्रकारे तमाम परळीकरांचा सन्मान आहे.     बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी लॉकडाऊनच्या संपुर्ण काळात अविरतपणे विविध सेवा  पोहचविण्यासाठी योगदान दिले. पिण

MB NEWS:राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार विधींचे फेसबुक पेजवरून लाईव्ह प्रक्षेपण

इमेज
  राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार विधींचे फेसबुक पेजवरून  लाईव्ह प्रक्षेपण  _कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर कृपया कोणीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी करू नये -लातुर जिल्हाधिकारी यांचे आवाहन_ • जाहीर आवाहन• राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे दु:खद निधन झाले आहे. लातूर जिल्हा प्रशासनाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अहमदपूर येथे आजच त्यांच्यावर शासकीय इतमामात विधीवत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर कृपया कोणीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी करू नये, ही नम्र विनंती.   https://www.facebook.com/108731624105525/posts/181202760191744/ फेसबुक पेजवरून अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार विधींचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, लातूर

MB NEWS:डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाने समाजाची अपरिमित हानी - धनंजय मुंडे*

इमेज
  *डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाने समाजाची अपरिमित हानी - धनंजय मुंडे* परळी दि. ०१ ---- : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून त्यांच्या जाण्याने समाजाची अपरिमित हानी झाली आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. अहमदपूरकर महाराज यांचे नुकतेच निधन झाले असून मृत्यूसमयी त्यांचे वय १०४ वर्षे होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू होते. महाराजांच्या निधनाने महाराष्ट्रासह विविध राज्यातील त्यांच्या अनुयायांवर शोककळा पसरली आहे. महाराजांचे ८२वे श्रावणमास तपोनुष्ठान वैद्यांचा नाथ असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीत झाले होते, त्याचे स्वागताध्यक्ष म्हणून महाराजांचा सहवास मला लाभला. स्वातंत्र्यपूर्व काळात एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केलेल्या अहमदपूरकर महाराजांनी आपले संपूर्ण जीवन लोककल्याणकारी, समाजाभिमुख तसेच राष्ट्रभक्ती शिकवणारे सामाजिक काम करण्यात घालवले. वयाच्या १०४व्या वर्षी देखील ते कार्यात व्यस्त असत, त्यांचे जीवन आदर्शवत व प्रेरणादायी ह

MB NEWS:डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांची सर्वधर्म समभावाची शिकवण सदैव प्रेरणा देत राहिल* *पंकजाताई मुंडे यांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली*

इमेज
 *डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांची सर्वधर्म समभावाची शिकवण सदैव प्रेरणा देत राहिल*  *पंकजाताई मुंडे यांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली*   मुंबई दि. ०१ ----- वीरशैव समाजातील थोर संत डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाने धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, त्यांनी समाजाला दिलेली सर्वधर्म समभावाची शिकवण सदैव प्रेरणा देत राहिल अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.   डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे थोर संत तर होतेच पण एमबीबीएस डाॅक्टरही होते, त्यामुळे समाज सुदृढ व एकोप्याने रहावा यासाठी त्यांनी आपल्या प्रवचानातून कार्य केले. समाजातील अंधश्रद्धा आणि वाईट रूढी परंपरा यावरही त्यांनी प्रहार केले. महात्मा बसवेश्वर यांचे विचार जोपासताना त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना आपल्या प्रवचनातून समानतेची शिकवण दिली. पर्यावरण वाढीसाठी त्यांनी वृक्ष लागवड व जल संवर्धनावर भर दिला होता, यात त्यांना विशेष ॠची होती. प्रखर देशाभिमानी असलेल्या शिवाचार्य महाराजांचा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावर विशेष स्नेह होता

MB NEWS: चौदा वर्षिय शाळकरी मुलाची आत्महत्या

इमेज
   चौदा वर्षिय शाळकरी मुलाची आत्महत्या !   आॅनलाईन अभ्यासाचा ताण घेतल्याची शक्यता परळी वैजनाथ....      परळीतील एका शाळकरी मुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.परंतु ऑनलाईन अभ्यास जमत नसल्याने या अभ्यासाचा ताण घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.       याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की शहरातील हिंद नगर भागात राहणाऱ्या १४ वर्षिय शाळकरी मुलांने गळफास लावून आत्महत्या केली आहे.शहरातील एका इंग्लिश स्कूल मध्ये हा मुलगा शिक्षण घेत होता. शशिकांत राजकुमार साखरे असे या मयताचे नाव आहे.      

MB NEWS:जुगलकिशोर लोहिया यांची भाजप उद्योग आघाडी प्रदेशस्तरावर नियुक्ती

इमेज
 MB NEWS:जुगलकिशोर  लोहिया यांची भाजप उद्योग आघाडी प्रदेशस्तरावर नियुक्ती भारतीय जनता पार्टी चे शहर अध्यक्ष   जुगलकिशोर  लोहिया यांची भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी प्रदेश कार्यकारणी सदस्य व कृषी प्रक्रिया उद्योग प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

MB NEWS: *रेशन दुकानांमध्ये धान्य वाटप हे केवळ ई-पॉस मशीनद्वारे* *14 आॅगस्ट रोजी आॅनलाइन नोंद असलेल्या शिधापत्रिका व लाभार्थी संख्येनुसार नियतन मंजूर*

इमेज
 *रेशन दुकानांमध्ये धान्य वाटप हे केवळ ई-पॉस मशीनद्वारे* *14 आॅगस्ट रोजी आॅनलाइन नोंद असलेल्या शिधापत्रिका व लाभार्थी संख्येनुसार नियतन मंजूर* बीड,  दि. १::-जिल्ह्यात रेशन दुकानांमध्ये अंत्योदय अन्न अंतर्गत अन्नधान्याच्या सोबत साखरेचे वितरण केले जात आहे. तसेच शासनाकडून मंजूर अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व एपीएल शेतकरी योजनेतर्गत सर्व धान्य वाटप हे केवळ ई-पॉस मशीनद्वारेच मिळेल, इतर कोणत्याही मार्गाने किंवा लेखी पावत्यांच्या आधारे कोणालाही धान्य दिले जाणार नाही  सदरील मशीनद्वारे धान्य वाटप करताना मशीन मधून जी पावती निघते ती पावती पात्र कार्डधारकांसाठीची आहे आणि ती प्रत्येक रास्त भाव दुकानदारने लाभार्थ्यांना देणे बंधनकारक आहे तसेच प्रत्येकाने स्वतःचा हक्क समजूनच मागून घेतली पाहिजे. या पावतीवर संबंधित कार्डधारकाला किती धान्य देण्यात येत आहे आणि त्यासाठी त्यांनी किती रक्कम दुकानदारांना द्यावी हे दिलेले असते. जर राशन दुकानदार ही पावती देत नाही अशी तक्रार प्राप्त झाल्यास व  तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल. जिल्हास्तरावरील अंत्

MB NEWS:परळी शहरातील 16 प्रभाग निहाय श्रीगणेश मुर्ती केंद्राद्वारे केले संकलन-सभापती किशोर पारधे

इमेज
 *शहरातील सार्वजनिक व घरातील श्री चे न.प.च्या वतिने विसर्जन* *परळी शहरातील 16  प्रभाग निहाय श्रीगणेश मुर्ती केंद्राद्वारे केले संकलन-सभापती किशोर पारधे परळी (प्रतिनीधी)  परळी शहरात स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक प्रभाग निहाय असे 16 श्री गणेश मुर्ती संकलन केंद्रात सार्वजनिक व घरोघरी स्थापन केलेल्या श्री गणेशाचे  न.प.च्या वतिने संकलन करण्यात आले व प्रभु वैद्यनाथ मंदीर परिसरात असलेल्या हरि हर तिर्थात बप्पांचे प्रशासनाच्या वतिने विसर्जन  आज करण्यात आले.   राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा पालकमंञी ना.धनंजयजी मुंडे,व न.पचे गटनेते वाल्मीक (आण्णा) कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या नियोजनात न.प.अध्यक्षा, उपाध्यक्ष, सर्व स. सभापती, सर्व स. सदस्य / सदस्या यांच्या सहकार्याने स्वच्छता, आरोग्य व वैद्यक सभापती  किशोर पारधे यांनी परळी शहरामध्ये गणेश मंडळामार्फत स्थापन करण्यात आलेली श्रीगणेश मुर्ती तसेच नागरीकांनी त्यांच्या घरी स्थापन केलेल्या श्रीगणेश मुर्ती संकलीत करण्याकरीता शहरात प्रभाग निहाय 16 श्री गणेश मुर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते.      

MB NEWS: प्रासंगिक/ केशव बडवे - *' गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला… '*

इमेज
  *' गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला… '* *अगदी सध्या व शांत वातावरणात या वेळेसचा गणेशोत्सव पार पडला आहे. दरवर्षी बाप्पाचं आगमन होणार म्हटलं की एकदम जल्लोषाच, आनंदी व भक्तिमय वातावरण सगळीकडे पसरलेलं असतं परंतु या वर्षीचा उत्सव हा थोडा वेगळाच झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बापाचं आगमन हे अगदी साध्या पद्धतीने झालं व विसर्जन सुद्धा त्याचप्रमाणे होईल.सध्याची परिस्थिती पाहता आता आपण आपली स्वतःची काळजी घेणं ही खुप महत्वाची बाब आहे. अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळे बाप्पाची मनोभावी पुजा करतात बाप्पाला आवडणारे मोदक, लाडू इ. प्रकारची नैवेद्य तयार करतात. वर्षातील हा एकमेव सण असेल ज्यात हे १० दिवस कसे जातात हे काही कळतच नाही. अनेक नावांनी बाप्पाला बोलावलं जातं कारण गणतपी हा सर्व विश्वाचं आद्य दैवत आहे.बाप्पाच्या मूर्तीला पाहुन मन एकाग्र झालेलं असतं व आपल्या सर्व चिंता व दुःख विसरून जाऊन आपण बाप्पाची सेवा करत असतो. दहा दिवस बाप्पाची मनोभावे पुजाअर्चा केल्यानंतर आता त्याला स्वगृही पाठवताना अनेकांचे डोळे पाणावलेले असतील.आपल्या बाप्पाची पाठमोरी रेखीव मूर्ती मनात साठवत प्रत्येका

MB NEWS:*आज करोना मुक्तांचे शतक ;१२६घरी जाणार*

इमेज
  *आज करोना मुक्तांचे शतक ;१२६घरी जाणार*

MB NEWS:परळी शहरात प्रभाग निहाय श्रीगणेश मुर्ती संकलन केंद्र * , आपल्या प्रभागातील श्रीगणेश मुर्ती संकलन केंद्र *

इमेज
  *परळी शहरात प्रभाग निहाय श्रीगणेश मुर्ती संकलन केंद्र * , आपल्या प्रभागातील श्रीगणेश मुर्ती संकलन केंद्र * अनु.क्र.1) मिलिंद नगर,थर्मल कॉलनी,थर्मल कॉलनी क्लब बिल्डिंग दक्षिण बाजु, सुपर  ईएफडी थर्मल कॉलनी, खतीब बेकरी, मिलिंद नगर या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र थर्मल कॉलनी मुख्य गेट वर असणार आहे. अनु.क्र.2) बरकत नगर शिवाजी नगर परिसर,सुर्वेश्वरनगर,बरकत नगर, शिव नगर,भिमानगर,सिद्धेश्वर नगर, सटवाई मळा या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र संत नरहरी महाराज मंदिर रोड, विद्युत डी.पी जवळ असणार आहे. अनु.क्र.3) उखळवेस परिसर, वैद्यनाथ  विद्यालय प्राथमिक शाळा, दक्षिण बाजूस,साठे नगर, ताटे गल्ली,रोडे गल्ली, रमा नगर,भीम नगर परिसर, अनंतपुरे गल्ली,उखळवेस गल्ली, देशपांडे गल्ली, बांगर गल्ली,गणेशपार, धनगर गल्ली, होळकर गल्ली चौक उत्तर बाजु या परिसरातील गणेश मुर्ती संकलन केंद्र  सावता माळी मंदिर कमान श्री दीपक नाना देशमुख यांच्या घराजवळ वर असणार आहे. अनु.क्र.4) गणेशपार,काळ रात्री मंदिर परिसर, देशमुख गल्ली,गणेशपार, जंगली गल्ली, गोराराम मंदिर,जगतकर गल्ली, बुद्ध विहार समोरचा भाग, बंगला गल्ली, सरकारवाडा व

MB NEWS:कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असून शहरी व ग्रामीण भागात कोविड १९ संसर्गाबाबत सतर्कता सतर्कता वाढवावी--पालकमंत्री धनंजय मुंडे*

इमेज
 *कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असून शहरी व ग्रामीण भागात कोविड १९  संसर्गाबाबत सतर्कता सतर्कता वाढवावी--पालकमंत्री धनंजय मुंडे* बीड/ अंबाजोगाई, (जिमाका ) दि. ३१::-जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असून शहरी व ग्रामीण भागात कोविड १९  संसर्गाबाबत सतर्कता वाढविण्यासाठी जनतेमध्ये मास्कचा वापर,  सामाजिक अंतर व विविध नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत विविध विषयांची आढावा बैठक संपन्न झाली याप्रसंगी ते बोलत होते बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या शिरसाट, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संजय दौंड,  जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, आरोग्य उपसंचालक डॉ.माले, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा मिसकर,  श्री सचिन मुळीक, श्री राजकिशोर मोदी,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार आणि विविध विभागांचे  प्रमुख  शासकीय  अधिकारी उपस्थित होत

MB NEWS:माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणब मुखर्जी यांचं निधन

इमेज
 *⭕माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणब मुखर्जी यांचं निधन            नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी निधन त्यांचं निधन झालं आहे. प्रणब मुखर्जी यांचे पूत्र अभिजीत बॅनर्जी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. २०१२ ते २०१७ दरम्यान ते भारताचे राष्ट्रपती होते.    प्रणव मुखर्जी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नुकतीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.        प्रणव मुखर्जी यांना 2019 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खराब असल्यामुळे 10 ऑगस्टला त्यांना दिल्लीच्या आरआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

MB NEWS: *अखेर राज्यातील ई-पासची जाचक अट रद्द!* महाराष्ट्रात आता ई-पासशिवाय प्रवास करता येणार*

इमेज
 *अखेर राज्यातील ई-पासची जाचक अट रद्द!*  महाराष्ट्रात आता ई-पासशिवाय प्रवास करता येणार*    मुंबई : महाराष्ट्रात अनलॉक-४ संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या या नियमावलीनुसार आता जिल्हांतर्गंत प्रवास करताना ई-पासची अट्ट हद्दपार करण्यात आली आहे. आता ई-पासशिवाय राज्यात प्रवास करता येणार आहे. केंद्रानं परवानगी दिल्यानंतरही राज्यात ई-पासची अट कायम ठेवण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या टीकेनंतर अखेर राज्य सरकारनं ई-पास संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यामळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली आहेत. यामुळे प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

MB NEWS:बीड जिल्ह्यात आज ६५ तर परळीत १२ रिपोर्ट पाॅझिटिव्ह.

इमेज
 बीड जिल्ह्यात आज ६५ तर परळीत १२ रिपोर्ट पाॅझिटिव्ह.

MB NEWS: *... तर पिककर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांमधील सरकारी डिपॉझिट काढून घेऊ - ना. मुंडे*

इमेज
*पीककर्जासंदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली बँकांची झाडाझडती* *... तर पिककर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांमधील सरकारी डिपॉझिट काढून घेऊ - ना. मुंडे* अंबेजोगाई (दि. ३१) ---- : पीककर्ज वाटपा संदर्भातील तक्रारींचा विचार करत आयोजित बँकर्सच्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बँकांची चांगलीच झाडाझडती घेतली. यावेळी पीक कर्जाचे टार्गेट व वाटप करण्यास टाळाटाळ करत असणाऱ्या बँकांविरुद्ध थेट कारवाई करणार असून नोटीस पिरेड ठरवून त्या आत कर्जाचे प्रलंबित प्रकरणे निकाली न काढल्यास त्या बँकांमधील शासकीय डिपॉझिट काढून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी व नव्याने कर्ज घेऊ इच्छिणारे शेतकरी या सर्वांनाच पीक कर्ज देणे क्रमप्राप्त असून, याबाबतच्या सर्वात जास्त तक्रारी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक, स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांसह काही बँकांच्या बाबतीत अनेक तक्रारी असून ही उदासीनता संपवून कर्ज वाटपाचा वेग न वाढविल्यास तातडीने कारवाई करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना ना. मुंडेंनी दिले आहेत.  या बैठकीस आ. प्रकाशदादा सोळंक