पोस्ट्स

अंबाजोगाई लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्काराने औषधनिर्माता वर्षाताई ढगे यांचा गौरव

इमेज
  आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्काराने औषधनिर्माता वर्षाताई ढगे यांचा गौरव अंबाजोगाई (वार्ताहर) येथील औषधनिर्माता वर्षा भगवानराव ढगे (रा.बोधिघाट,अंबाजोगाई) यांचा "आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्कार २०२१-२२" ने लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत गौरव करण्यात आला. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत लातूर शहर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जागतिक आरोग्य दिनानिमित्त "औषधनिर्माता" या पदावरून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल औषधनिर्माता वर्षा भगवानराव ढगे (रा.बोधिघाट) यांना "आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्कार २०२१-२२" हा बहुमान लातूर परीमंडळाचे उपसंचालक डॉ.एकनाथराव माले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि परीमंडळ उपायुक्त डॉ.मयुरा शिंदेकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजयराव ढगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन लातूर येथे नुकताच प्रदान करून सन्मानित करण्यात आले.सदरील कार्यक्रमास आरोग्य विभाग महानगर पालिका लातूरचे आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत माले,शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.रामेश्वर कलवले,शहर लेखा व्यवस्थापक शिवकुमार तेली,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनिता कद

MB NEWS- *पंढरपूर कडे निघालेल्या दिंडीतील अॅटोला परळी जवळ अपघात!* *एका वारकरी महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी*

इमेज
  *पंढरपूर कडे निघालेल्या दिंडीतील अॅटोला परळी जवळ अपघात!* *एका वारकरी महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...                 वाशिमहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीतील वारकऱ्यांच्या सोबत असणाऱ्या एका अॅटोला परळी जवळील दादाहरी वडगाव जवळ अपघात झाला. या अपघातात एक वृद्ध वारकरी महिला मृत्युमुखी पडली असून अन्य चार जण जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे. या अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीला भाजपा नेते राजेश गित्ते तात्काळ धावून आले व त्यांनी जखमींच्या उपचारासाठी मदत केली. Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._     वाशिम येथील मुगसाजी महाराज यांचा पायी दिंडी सोहळा वाशिमहून पंढरपूर कडे जात असतांना परळी जवळील दादाहारी वडगाव येथे अँटोला  अपघात झाला. पायी दिंडी परळी वैजनाथ मार्गे पंढरपूर कडे निघाली होती.परळीजवळ वारकऱ्यांच्या दिंडीतील अॅटोला अपघात झाला.ही घटना दादाहारी वडगाव जवळ दुपारी 2.30 वा.सुमारास घडली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल

MB NEWS-८ वर्षिय बालिकेवर बलात्कार ; आरोपीला कठोर शासन व्हावे- पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र

इमेज
८ वर्षिय बालिकेवर बलात्कार ; आरोपीला कठोर शासन व्हावे- पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र *पिडित बालिकेच्या कुटुंबियांनी घेतली पंकजाताईंची भेट* परळी ।दिनांक २६। डोंगर पिंपळा (ता. अंबाजोगाई)  येथील आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्काराची घटना अतिशय संतापजनक आणि घृणास्पद आहे, यातील आरोपींवर जास्तीत जास्त कठोर शासन व्हावे आणि संपूर्ण गुप्तता पाळुन  याचा वेगाने तपास करावा अशी मागणी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, पिडित बालिकेचे वडिल व कुटुंबातील अन्य सदस्यांनी नुकतीच पंकजाताईंची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*    डोंगर पिंपळा येथील आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेला  गावातील तरुण किरण रामभाऊ शेरेकर (वय २३) याने १९ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घरात बोलावुन तिच्यावर बलात्कार केला.   एका गरीब व अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय, संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या घटनेनंतर सदर मुलगी व तिचे आई वडील प्रचंड तणावाखाली