MB NEWS- *बोधेगाव येथे १५ एकर ऊस जळून खाक, पाच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान*
*बोधेगाव येथे १५ एकर ऊस जळून खाक, पाच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान* 🔸 _डोळ्यादेखत उभं रान जळताना शेतकर्यांचं ह्रदय तळतळलं_ परळी वैजनाथ( प्रतिनिधी) : तालुक्यातील बोधेगाव येथील शेतात उभ्या असलेल्या उसाला अचानक आग लागली. या आगीत जवळपास पाच ते सहा शेतकऱ्यांचा पंधरा एकर ऊस जळून खाक झाला.या आगीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बोधेगाव येथे शुक्रवारी (दि.२१) दुपारी सोनहिवरा रस्त्यावर तळ्याच्या लगत असलेल्या उसाला अचानक आग लागली. आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरली की, या आगीत जवळपास १५ एकर ऊस जाळून खाक झाला आहे. आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिसरातील शेतात लागोपाठ शेजारी ऊस लागवड असल्याने एका शेतातील ऊसाला आग लागल्याने ती मोठ्या प्रमाणात पसरली.यामध्ये बबलू राजेभाऊ शिंदे, सुधाकर रामभाऊ शिंदे, दशरथ नारायण शिंदे, बाळासाहेब नारायण शिंदे, मुंजाभाऊ गुणाजी गडदे आदी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आग लागताच गावकऱ्यांनी ती आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली. मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने शेतकऱ्यांना विझवणे शक्य झाले...