पोस्ट्स

एप्रिल १७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-दुःखद वार्ता: न.प.चे सेवानिवृत्त कर्मचारी सुभाषराव महालिंगे यांचे निधन

इमेज
  दुःखद वार्ता: न.प.चे सेवानिवृत्त कर्मचारी सुभाषराव महालिंगे यांचे निधन परळी वैजनाथ प्रतिनिधी... नगर परिषद चे निवृत्त लिपिक सुभाषराव महालिंगे वय वर्ष 72 यांचे आज दुपारी दीड वाजता अल्पशा आजाराने राहते घर महात्मा बसवेश्वर कॉलनी येथे दुःखद निधन झाले संध्याकाळी त्यांच्यावर सात वाजता सार्वजनिक स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी जावई असा परिवार आहे हे देखील वाचा/पहा🔸 क्लिक करा:  🏵️ *अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा मागणी घेऊन आंदोलन: यावेळी परळीत नेमकं घडलं असं की.......* क्लिक करा:  🌑 *दुर्दैवी: वडिलांना घरातून हाकलून देण्यासाठी मुलाकडूनच शिवीगाळ व मारहाण; परळीतील घटना* क्लिक करा:  ⭕ *विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव* क्लिक करा:  *प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेड विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान* जाहीरात/Advertis --------------------------------------------- 🔸 MB NEWS/माझी बातमी🔸 बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे  7709500179  , प्रा.रविंद्र जोशी  9850642717 . ---------------------

MB NEWS- *हनीट्रॅपर रेणू शर्मा हिला ब्लॅकमेलिंग आणि खंडणी मागणी प्रकरणी आणखी दोन दिवस पोलीस कोठडी*

इमेज
हनीट्रॅपर रेणू शर्मा हिला ब्लॅकमेलिंग आणि खंडणी मागणी प्रकरणी आणखी दोन दिवस पोलीस कोठडी न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली मुंबई (प्रतिनिधी) - हनी ट्रॅप त्यातून अनेकांना ब्लॅकमेलिंग आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कथित रेणू शर्मा या महिलेच्या पोलीस कोठडीत मुंबई न्यायायलाने आज आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  धनंजय मुंडे यांना 5 कोटी रुपये नगदी व 5 कोटी रुपयांचे दुकान घेऊन द्या नाहीतर केस करून व सोशल मीडियावरून बदनामी करेन, असे धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुंबई पोलिसात तक्रार दिली होती. मुंबई क्राईम ब्रँच ने रेणू शर्मा हिला दि. 21 रोजी मुंबई न्यायालयासमोर हजर केले होते. मुंबई न्यायालयाने रेणू शर्माला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, आज सदर महिलेस दोन दिवसांची मुदत संपल्याने पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ केली आहे.  *रेणू शर्मा हिच्या वकिलांनी रेणू ही करुणा शर्मा यांची बहीण असून, करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत

MB NEWS-पीएम नरेंद्र मोदी, सीएम उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या एकाच व्यासपीठावर ?

इमेज
  पीएम नरेंद्र मोदी, सीएम उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या एकाच व्यासपीठावर ? मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा उद्या (दि. 24 एप्रिल) मुंबईत पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही यावेळी अपस्थित असतील अशी चर्चा आहे. त्यामुळे हे तिन्ही दिग्गज नेते उद्या एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असल्याची माहिती समोर येत आहे. क्लिक करा व वाचा:🔸 *अंबाजोगाई: भीषण अपघात सविस्तर बातमी....* मास्टर दिनानाथ प्रतिष्ठान आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा सन्मान केला जातो. गेल्या ३२ वर्षांपासून हा सोहळा पार पडत आहे. उद्याचा पुरस्कार सोहळा षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित केला आहे. उद्या संध्याकाळी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा पहिला पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला असून तो

MB NEWS- सविस्तर बातमी: बर्दापुरच्यापुढे दुधडेअरी जवळील आपघातात सात जण ठार तर १०जण जखमी ; मावंद्याच्या कार्यक्रमाला जात होते राडीलआ:

इमेज
  बर्दापुरच्यापुढे दुधडेअरी जवळील आपघातात सात जण ठार तर १०जण जखमी ; मावंद्याच्या कार्यक्रमाला जात होते राडीला अंबाजोगाई.....       अंबा कारखाना ते लातूर रोडवर बर्दापुरच्यापुढे नंदगोपाल डेअरी जवळ आज सकाळी भीषण अपघात घडला आहे.या अपघातात मोठी जिवीत हानी झाली आहे. या आपघातात ७ जण  मयत झाले तर १० जण जखमी झाले आहेत.  क्रुजर गाडी व ट्रकचा हा अपघात झाला असुन हे लोक राडीकडे मावंद्याच्या कार्यक्रमाला जाणार होते.          अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे आज मावंद्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील साई आणि आर्वी येथून नातेवाईक क्रुझर गाडीतून निघाले होते. ते बर्दापूरच्या पुढे नंदगोपाल डेअरीजवळ आले असता त्यांच्या क्रुझरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात क्रुझरमधील सात जण ठार झाले तर १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये निर्मला सोमवंशी (३८), स्वाती बोडके (३५), शकुंतला सोमवंशी (३८), सोजरबाई कदम (३७), चित्रा शिंदे (३५), खंडू रोहिले (३५, चालक) आणि अनोळखी एकाचा समावेश आहे. तर, राजमती सोमवंशी (५०), सोनाली सोमवंशी (२५), रंजना माने (३५), परिमला सोमवंशी (७०), दत्ता

MB NEWS- 🔸अजित पवारांनी दिला टोकवाडीत सहा तासांचा वेळ..

इमेज
 सरपंचांनी लोकसेवक म्हणून गावाच्या विकासासाठी काम करावे -जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार टोकवाड येथे सरपंचांची कार्यशाळा उत्साहात संपन्न  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          सरपंच हे खूप मोठे पद असून विकासात्मक बदलासाठी या पदावरील व्यक्ती गावाचा कायापालट करू शकते. खऱ्या अर्थाने लोकसेवक म्हणून सरपंचांनी गावाच्या विकासासाठी काम करावे असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केले. टोकवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सरपंचांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.          टोकवाडी येथे सरपंचांची एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद बीड चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे, पंचायत समिती परळीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे, पंचायत समिती माजी सभापती बालाजी मुंडे,वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजाराम मुंडे, इंजिनीयर चांदवडकर आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी "माझा गाव सुंदर गाव" या विषयाचा आराखडा सरपंचासमोर मां

MB NEWS-BREAKING NEWS -अंबा कारखाना रोडवर भीषण आपघात ;मोठी जिवितहानी

इमेज
  BREAKING NEWS -अंबा कारखाना रोडवर भीषण आपघात ;मोठी जिवितहानी अंबाजोगाई..... अंबा कारखाना ते लातूर रोडवर नंदगोपाल डेअरी जवळ भीषण अपघात घडला आहे.या अपघातात मोठी जिवीत हानी झाली आहे. या आपघातात आठ जण  मयत झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.५ महिला,दोन पुरुष, एक लहान मुल असा समावेश आहे. क्रुजर गाडीचा हा अपघात असुन हे लोक राडीकडे जाणार होते अशी माहिती समोर आली आहे.घटनास्थळी पोलीस पोहचले आहेत.तसेच अपघातस्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली आहे........     🔸सविस्तर बातमी थोड्याच वेळात.... हे देखील वाचा/पहा🔸 क्लिक करा:  🏵️ *अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा मागणी घेऊन आंदोलन: यावेळी परळीत नेमकं घडलं असं की.......* क्लिक करा:  🌑 *दुर्दैवी: वडिलांना घरातून हाकलून देण्यासाठी मुलाकडूनच शिवीगाळ व मारहाण; परळीतील घटना* क्लिक करा:  ⭕ *विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव* क्लिक करा:  *प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेड विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान*

MB NEWS-दुःखद वार्ता: शाम दलाल यांचे निधन

इमेज
  दुःखद वार्ता: शाम दलाल यांचे  निधन  परळी (प्रतिनिधी)- स्नेहनगर येथील रहिवाशी असलेले शाम भाऊसाहेब दलाल यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी दुपारी उपचारा दरम्यान  निधन झाले.मृत्यूसमयी ते 46 वर्षांचे होते.त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि. 23 रोजी सकाळी 10 वाजता परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.            वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथील शेतकी विभागात मुख्य क्लर्क म्हणून ते काम पाहात होते. अत्यंत मनमिळाऊ, मित्रत्व जपणारा व्यक्ती म्हणून ते सर्व परिचित होते. शाम दलाल यांना गुरुवारी दुपारी परळी येथील राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. परळी येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचार सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना दि. २२ एप्रिल २०२२ शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. परळी न.प.चे नगरसेवक दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे ते भाच्चे होते. दलाल कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.  उद्या अंत्यसंस्कार .... शाम दलाल यांच्या पार्थिवावर शनिवार दि. २३ रोजी शहरात

MB NEWS-दुर्दैवी: वडिलांना घरातून हाकलून देण्यासाठी मुलाकडूनच शिवीगाळ व मारहाण; परळीतील घटना

इमेज
दुर्दैवी: वडिलांना घरातून हाकलून देण्यासाठी मुलाकडूनच शिवीगाळ व मारहाण; परळीतील घटना परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       घराबाहेर हाकलून देण्यासाठी पोटच्या पोरानेच आपल्या जन्मदात्या पित्याला मारहाण केल्याची घटना परळी शहरातील प्रिया नगर भागात घडली. या प्रकरणी सेवानिवृत्त वयोवृद्ध वडिलांवर पोलिसांकडे धाव घेण्याची वेळ आली. याबाबतीत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार, महावितरण कंपनी मधून निवृत्त झालेले सिताराम दाजीबा वरपे ( वय ७३ वर्ष ) हे शहरातील  प्रिया नगर भागात राहतात. बुधवार दि 20 रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर सायंकाळी 5 च्या सुमारास त्यांचा मुलगा याने सीताराम वरपे यांना शिवीगाळ करुन तू येथे राहायचे नाही. मुंबईला निघुन जा असे म्हणुन मारहाण केली.तसेच लोखंडी बकेट तोंडावर मारुन दुखापत केली.म्हातारडया तुझ्यामुळे तर अस व्हायलय असे म्हणुन शिवीगाळ केली. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुरनं ७२ /२०२२ कलम ३२४,३२३, ५०४, ५०६ भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना गंडले हे करीत आहेत. हे देखील वाचा/पहा🔸 क्लिक करा:  🏵️ *अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा मागणी घेऊन

MB NEWS-प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेड विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान

इमेज
  प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेड विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान अंबाजोगाई: येथील बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी महाविद्यालयातील  प्राध्यापिका श्रीमती तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेडच्या  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने  वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखे  अंतर्गत वाणिज्य या विषयात नुकतीच डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली.        “परळी औष्णिक वीज निर्मिती कंपनीचा अभ्यास  जिल्हा- बीड”. या विषयावर त्यांनी संशोधन केले. संशोधनासाठी त्यांना कै. रमेश वरपूडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनपेठ येथील वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे संशोधन मार्गदर्शक  प्रा. डॉ. अशोक उर्फ इंद्रजीत चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.  प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांनी त्यांचा संशोधन प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता. विद्यापीठात नुकत्याच झालेल्या मौखिक परीक्षेमध्ये त्यांना ही डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन मंडळाचे अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर वसंतराव

MB NEWS- BREAKING NEWS -पोलीस ठाण्यात ठिय्या: परळीतील हिंदुधर्मीय नागरिक आक्रमक; अमोल मिटकरी वर गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन

इमेज
पोलीस ठाण्यात ठिय्या: परळीतील हिंदुधर्मीय नागरिक आक्रमक; अमोल मिटकरीवर गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...     परळीतील हिंदुधर्मीय नागरिक व ब्राह्मण समाजाने आज पोलिस ठाण्यात ठिय्या धरला असून धर्मद्रोही असलेल्या अमोल मिटकरी वर जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे.        शहरातील विठ्ठल मंदिर येथून मोठ्या संख्येने मूक मोर्चा काढण्यात आला. हे आंदोलन शहर पोलीस ठाण्यात आले. या ठिकाणी पोलीस निरीक्षकांना अमोल मिटकरी याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या प्रमुख मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी दिले मात्र मात्र जोपर्यंत अधिकृतपणे एफ आय आर नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत पोलिस ठाण्यातून आम्ही जाणार नसल्याची भूमिका या आंदोलकांनी घेतले आहे. हे देखील वाचा/पहा🔸 क्लिक करा:  🏵️ *अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा मागणी घेऊन आंदोलन: यावेळी परळीत नेमकं घडलं असं की.......* क्लिक करा:  🌑 *दुर्दैवी: वडिलांना घरातून हाकलून देण्यासाठी मुलाकडूनच शिवीगाळ व मारहाण; परळीतील घटना*

MB NEWS-विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव

इमेज
  विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव परळी : दि 21 प्रतिनिधी        सिरसाळा परिसरातील ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने सिरसाळा येथील विजवितरणच्या अभियंत्यास गुरूवारी घेरावा घालण्यात आला.   विजेचे वाढीव भारनियमन रद्द करण्यात यावे, वीज पुरवठा चोवीस तास सुरळीत करावा, शेतीसाठी बारा तास वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकरी ग्राहकांना कोटेशन देण्यात यावे, आवश्यक ठिकाणी पोल, तार यांची व्यवस्था करण्यात यावी, वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंतानी मुख्य कार्यालय ठिकाणी मुक्कामी असावा या मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिरसाळा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर अभियंता अभिजीत राठोड व श्री निंबाळकर यांना घेराव घालून  गुरुवारी(ता.21) आंदोलन केले. गेल्या दोन महिन्यापासून सिरसाळा व परिसरातील गावांमध्ये वीज वितरण कंपनीकडून मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्याने नागरिक ऐन उन्हाळ्यात त्रस्त झाले आहेत. तसेच शेतीसाठी ही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने पिके करपत आहेत. शेतामध्ये अवघ्या दोन ते तीन

MB NEWS-आ.मिटकरी यांनी हिंदू समाजाच्या बद्दल अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी* समस्त ब्राह्मण समाज संघटनांची बीड येथे मागणी

इमेज
  आ.मिटकरी यांनी हिंदू समाजाच्या बद्दल अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी   समस्त ब्राह्मण समाज संघटनांची  बीड येथे मागणी बीड (प्रतिनिधी).... राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.अमोल मिटकरी यांनी हिंदू समाजाच्या बद्दल अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी समस्त ब्राह्मण समाज संघटना यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इस्लामपूर येथे झालेल्या जाहीर सभेत आ.अमोल मिटकरी यांनी हिन्दू समाजाच्या चालीरीती, मंत्रोच्चार याबाबत अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्या बद्दल व सामाजिक द्वेष पसरवल्या बद्दल समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती बीड यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. अमोल मिटकरी यांनी इस्लामपूर येथे झालेल्या जाहीर सभेत हिंदू समाजाच्या चालीरीती व परंपरे बाबत अपशब्द वापरून टिंगल-टवाळी केल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे समाजात सर्वत्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. मिटकरी ही व्यक्ती राज्याचा जबाबदार आमद

MB NEWS-शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथील भगवानगडाच्या नारळी सप्ताहात धनंजय मुंडे यांनी घेतले दर्शन*

इमेज
  मी भगवानगडाचा निस्सीम भक्त; भगवानगडाच्या पायरीचा दगड होण्याचे भाग्य लाभले तरी आयुष्य सार्थक झाले समजेन - धनंजय मुंडे * शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथील भगवानगडाच्या नारळी सप्ताहात धनंजय मुंडे यांनी घेतले दर्शन* *धनंजयला भगवानबाबांचा आशीर्वाद आहे, कोणत्याही संकटाने त्याचे काही नुकसान होणार नाही - महंत डॉ. नामदेव शास्त्री* शेवगाव (दि. 21) - : संत भगवानबाबा यांच्या शिक्षण प्रसार, भक्ती मार्ग तसेच अध्यात्मातून प्रगतीचा मार्ग शोधणे या विचारसरणीचा मी पाईक आहे, भगवानगड हे आमचे श्रद्धास्थान असुन मी गडाचा निस्सीम भक्त आहे. या गडावर 18 पगड जातीचे लोक दर्शनासाठी येतात, त्यांना गडाची ऐश्वर्यसंपन्न महती अनुभवता यावी तसेच गडाच्या माध्यमातून उच्च शिक्षण, अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना बळकटी मिळावी व गडाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्हाला योगदान देता यावे, हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. भगवानगडाच्या पायरीचा दगड होण्याचे जरी भाग्य मला लाभले तरी माझे आयुष्य सार्थक झाले असे मी समजेन, असे भावनिक उद्गार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शिंगोरी (ता. शेवगाव) येथील 88

MB NEWS-ब्राह्मण समाज सावली सारखा माझ्या सोबत!

इमेज
  ब्राह्मण समाज सावली सारखा माझ्या सोबत! कोणाच्याही भावना दुखविण्याचा यत्किंचितही हेतू नाही - धनंजय मुंडे  बीड (  प्रतिनिधी ) आ. अमोल मिटकरी यांनी 'कन्यादान विधी',वैदिक मंत्र ,  समाज याविषयी केलेल्या  वक्तव्याने वादंग निर्माण झाले आहे, मात्र  जात -पात -धर्म याबाबतीत भेद करणे आमच्या अंगालाही शिवणार नाही , परंतु माध्यमांमधून अमोल मिटकरींनी केलेल्या व्यक्तिगत मतावरुन  प्रतिक्रिया देताना आम्ही पाठीमागे हसतोय म्हणून दोष दिला जातो हे चुकीचे आहे. ही आमच्या पक्षाची भूमिका  नाही किंवा पक्षाची भूमिका म्हणून मिटकरी बोलत नव्हते तर एका लग्नसमारंभातील प्रसंग त्यांनी आपल्या भाषणात सांगितला.  तरीही यातूनही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण खेद व्यक्त करतो असे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ऐका : धनंजय मुंडे यांनी दिलेली संपूर्ण प्रतिक्रिया- ⭕ *आ.मिटकरींचे बेताल वक्तव्य प्रकरण: धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला खेद. म्हणाले,"ब्राह्मण समाज आपल्या....*  त्याचप्रमाणे ब्राह्मण समाज दोन पिढ्या पासून या समाजातील  माझे असंख्य सहकारी सावलीसारखे आपल्या सोबत आहेत,  आणि ब्र