मराठवाड्यातील सर्व बाधित जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींची परळीत बैठक

द्रुतगती महामार्गापेक्षा मराठवाड्यात सिंचन अनुशेष पूर्ण करणारा प्रकल्प राबवा ■शक्ती पीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा अथवा शेतकऱ्यांच्या प्रेतावरून बनवा-संतप्त भावना ●मराठवाड्यातील सर्व बाधित जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींची परळीत बैठक परळी / प्रतिनिधी मराठवाड्यात अगोदरच सिंचनाखाली जमीन कमी आहे. त्यातच पवणार ते पत्रादेवी या शीघ्र दृतगती शक्तिपीठ महामार्ग नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातून जात असून हा मार्ग अत्यन्त सुपीक आणि बागायती जमिनीतून जाणार आहे. त्यामुळे मराठवड्यातील खूप मोठी बागायत जमीन या महामार्गामध्ये जाऊन कायमस्वरूपी शेतकरी भूमिहीन होणार आहेत.यामुळे पवणार ते पत्रादेवी या शीघ्र दृतगती शक्तिपीठ महामार्गास विरोध करण्यासाठी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील बाधित शेतकरी प्रतिनिधीची बैठक शनिवार (दि13) रोजी परळी येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर धाराशिव या जिल्हातील प्रत्येक तालुक्यातून प्रमुख प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. मराठवाड्यातील ज्या सहा जिल्ह्यातुन हा शक्ती पीठ महामार्ग हळद, केळी, फळबागा, ऊस बागायत पट्ट्यातून हा ...