पोस्ट्स

जून ५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते लावण्याई पब्लिक स्कूल स्थलांतर , शुभारंभ आणि प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

इमेज
  ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते लावण्याई पब्लिक स्कूल स्थलांतर , शुभारंभ आणि प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      शहरातील नावाजलेल्या लावण्याई पब्लिक स्कूल स्थलांतर व शुभारंभ आणि प्रवेशोत्सव कार्यक्रम राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शालेय समितीचे अध्यक्ष अनंत कुलकर्णी यांनी केले आहे.              अंबेबेस, डॉ. टिंबे हॉस्पिटल शेजारी, हनुमान व्यायाम शाळेजवळ, परळी वैजनाथ. येथे रविवार, दिनांक १२ जून २०२२ रोजी  सायं. ५.०० वा.लावण्याई पब्लिक स्कूल स्थलांतर व शुभारंभ आणि प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, परळी वै. बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी हे राहणार आहेत.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जेष्ठ नेते दत्ताप्पा ईटके गुरूजी ,जेष्ठ पत्रकार श्रीकांत मांडे ,माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख  डॉ. आनंद टिंबे,अनंत भातांगळे जेष्ठ पत्रक

MB NEWS-⬛ आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता

इमेज
⬛ आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता --------------------------  मुंबई- राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं असतानाही त्या ठिकाणी भाजपच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली. मात्र शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले.  राज्यसभा निवडणुकीत शुक्रवारी मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटली असल्याचे समोर आले आहे. पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली. राज्यसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता आगामी २

MB NEWS-गिरवली सेवा सहकारी सोसायटी पंकजाताई मुंडेंच्या ताब्यात ; सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय

इमेज
  गिरवली सेवा सहकारी सोसायटी पंकजाताई मुंडेंच्या ताब्यात ; सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलला धुळ चारत श्री शितलदास जनसेवा शेतकरी विकास पॅनलने मारली बाज अंबाजोगाई  । दिनांक ११।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील श्री शितलदास जनसेवा शेतकरी विकास पॅनलने तालुक्यातील गिरवली सेवा सहकारी सोसायटीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत.  राष्ट्रवादीच्या पॅनलला धुळ चारत पॅनलने सोसायटीवर एकहाती सत्ता मिळवली आहे.  पंकजाताई मुंडे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*    गिरवली सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नेत्यांनी त्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती परंतू नुकत्याच जाहीर झालेल्या  निकालानंतर या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील श्री शितलदास जनसेवा शेतकरी विकास पॅनलने बाजी मारत सर्व जागांवर विजय मिळवला. विजयी उमेदवारांत सर्वश्री काशिराम आपेट, प्रतापराव आपेट, लक्ष्मण आपेट, सुधीर आपेट, संतोष

MB NEWS-महाविकास आघाडीची 10 मते फुटली

इमेज
  राज्यसभा निवडणूक : धनंजय महाडिक यांनी मैदान मारले; संजय पवार चितपट; शिवसेनेला धक्का  महाविकास आघाडीची 10 मते फुटली मुंबई :  उमेदवारांबरोबरच नेत्यांचीही धाकधुक वाढविणार्‍या राज्यसभेच्या चुरशीच्या लढतीत सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. या आखाड्यात त्यांनी आपले प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय पवार यांना चितपट करून अस्मान दाखविले. शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरविल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. Click:  •  🌑 महत्वाची माहिती जाणुन घ्या🌑 बारावीनंतरच्या विविध संधी,प्रवेश, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वपूर्ण वेबसाइट्स अपेक्षेप्रमाणे भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत व काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी हे निवडून आले. तब्बल 8 तासांच्या प्रदीर्घ नाट्यानंतर रात्री पावणेदोन वाजता मतमोजणी सुरू झाली.जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी आपली मतपत्रिका अधिकृत प्रतिनिधीशिवाय इतरांना दाखविल्याचा आक्षेप भाजपने घेतला.     राज्य निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळल्यानंतर भाजपच्या नेत्यांन

MB NEWS-सुट्टीवर आलेला सैन्यदलातील जवान बेपत्ता

इमेज
  सुट्टीवर आलेला सैन्य दलातील जवान बेपत्ता केज :- सैन्य दलातील सुट्टीवर गावी आलेला जवान हा घरगुती कारणा वरून घरातून निघून गेला असून तो बेपत्ता असल्याची नोंद पोलीसात करण्यात आली आहे. Click:  •  🌑 महत्वाची माहिती जाणुन घ्या🌑 बारावीनंतरच्या विविध संधी,प्रवेश, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वपूर्ण वेबसाइट्स  केज तालुक्यातील उमरी येथील प्रदीप सोनवणे हा सैन्य दलातील जवान गावी सुट्टीवर आला होता. त्या दरम्यान घरगुती वादातून रागाने प्रदीप हा  दि. ९ जून रोजी दुपारी १:३० वा च्या दरम्यान मोटार सायकल क्र.(एम एच-४४/क्यू०६३७) वरून घरातून निघून गेला आहे. त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद असून प्रदीप याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. म्हणून त्याची आई श्रीमती नंदूबाई सोनवणे हिच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात सैन्य दलातील जवान प्रदीप सोनवणे बेपत्ता असल्याची नोंद केज पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.  या बातम्या देखील वाचा/पहा........ क्लिक करा व वाचा:- •  *नुपूर शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर*  ------

MB NEWS-समाजकल्याण अधिकारी डॉ. सचिन मडावी निलंबित

इमेज
समाजकल्याण अधिकारी डॉ. सचिन मडावी निलंबित     बीड-  जिल्ह्यात समाजकल्याण विभागात सावळागोंधळ सुरू असल्याचे उघड झाले आहे.जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी डॉ सचिन मडावी यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई झाली आहे.  Click:  •  🌑 महत्वाची माहिती जाणुन घ्या🌑 बारावीनंतरच्या विविध संधी,प्रवेश, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वपूर्ण वेबसाइट्स बीड येथील सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ सचिन मडावी यांच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी होत्या.याबाबत थेट समाजकल्याण आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली. औरंगाबाद येथील समाजकल्याण उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने मडावी यांच्यावरील दोषारोपांची चौकशी केली.यामध्ये त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली.त्यानंतर समाजकल्याण विभागाचे सहसचिव दि र डिंगळे यांनी मडावी यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. या बातम्या देखील वाचा/पहा........ क्लिक करा व वाचा:- •  *नुपूर शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर*  

MB NEWS-दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्या;एक ठार दोन जखमी

इमेज
  दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्या;एक ठार दोन जखमी  गेवराई, प्रतिनिधी : गढी - माजलगाव रोडवरील टाकरवण फाटा येथे रात्री 9 वा . दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या . या भिषण अपघातात सिरसदेवी येथील एक तरुण जागीच ठार झाला तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली . Click:  •  🌑 महत्वाची माहिती जाणुन घ्या🌑 बारावीनंतरच्या विविध संधी,प्रवेश, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वपूर्ण वेबसाइट्स  जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत . अंगद सखाराम रोमण ( वय 40 ) रा . सिरसदेवी असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाने नाव आहे तर रामेश्वर तुकाराम जाधव ( वय 50 ) आणि नवनाथ अडागळे ( वय 55 ) दोन्ही रा.सिरसदेवी यांच्या दुचाकीला एका दुचाकीने समोरासमोर धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले . जखमींवर गेवराई रुग्णालयात उपचार सुरू होते . त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले . 🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑 क्लिक करा व वाचा:- •  *नुपूर शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर*   ------------------------------------------------------------ क्

MB NEWS-बैलगाडीवर मोटारसायकल आदळून दोन ठार

इमेज
  बैलगाडीवर मोटारसायकल आदळून दोन ठार अंबाजोगाई - उभ्या असलेल्या बैलगाडीला भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलने जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकल वरील दोघेजण गंभीर जखमी होऊन ठार झाले. हा अपघात शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी सात वाजता अंबाजोगाई-अहमदपूर महामार्गावर उजनीपाटी जवळ झाला. Click:  •  🌑 महत्वाची माहिती जाणुन घ्या🌑 बारावीनंतरच्या विविध संधी,प्रवेश, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वपूर्ण वेबसाइट्स सुरेश नरहरी गायकवाड (वय ४५, रा.किनगाव) व शेख जावेद शेख अल्लाबक्ष उर्फ पेंटर (वय ३८, रा. किनगाव) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. धर्मापुरी येथील लग्न आटोपून ते दोघे सायंकाळी दुचाकीवरून (एमएच २४ एझेड ९७६१) किनगावकडे निघाले होते. सायंकाळी सात वाजता ते उजनीपाटी जवळ आले असता रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बैलगाडीला त्यांनी पाठीमागून भरधाव वेगात धडक डीलुई. या अपघातात मोटार सायकल चालक सुरेश गायकवाड व पाठीमागे बसलेले शेख जावेद शेख अल्लाबक्ष हे दोघेही गंभीर जखमी झाले. •  *नुपूर शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर*  यावेळी त्या ठिका

MB NEWS-पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांचे निधन

इमेज
  पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांचे निधन  नवी दिल्ली – पाकिस्तानचे  माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांचं शुक्रवारी निधन झाल.त्यांच्या निधनाने पाकिस्तानसह भारताने देखील दुःख व्यक्त केले आहे. Click:  •  🌑 महत्वाची माहिती जाणुन घ्या🌑 बारावीनंतरच्या विविध संधी,प्रवेश, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वपूर्ण वेबसाइट्स बऱ्याच काळापासून पाकचे माजी लष्करशहा परवेज मुशरफ यांची प्रकृती खालावली होती. पाकिस्तानच्या मीडियानुसार, त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. शेवटी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. •  *नुपूर शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर* परवेज मुशर्रफ हे 2001 ते 2008 पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. याशिवाय ते पाकिस्तानचे आर्मी प्रमुखही होते. भारताविरोधात झालेल्या कारगिल युद्धासाठी मुशर्रफ यांनाच जबाबदार धरलं जातं. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वायपेयी यांच्या काळात जनरल मुशरफ हे भारताच्

MB NEWS-नुपूर शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर

इमेज
  नुपूर शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        नुपूर शर्मा यांनी मुस्लीम धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबाबत  सर्वत्र पडसाद  उमटत आहेत.  नुपूर शर्मा विरोधात मुस्लीम समाज आक्रमक झाला आहे. नुपूर शर्माच्या वक्तव्याबाबत परळी वैजनाथ येथे आज दि.10 निदर्शन करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.मोठ्या संख्येने मुस्लिम समाजबांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. Click:  •  🌑 महत्वाची माहिती जाणुन घ्या🌑 बारावीनंतरच्या विविध संधी,प्रवेश, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वपूर्ण वेबसाइट्स        परळीत मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. मुस्लिमांकडून  नुपूर शर्माला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. मोर्चा काढत उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.नुपूर शर्मा यांनी पैगंबर यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अटक करण्याची व कठोर कारवाई करावी अशी मागणी  आंदोलकांनी केली. मोठ्या संख्येने  मोर्चा काढत उपजिल