MB NEWS- *धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात परळीत राष्ट्रवादी आपल्या दारी अभियानास पुन्हा सुरुवात* *रविवारी धनंजय मुंडे देणार प्रभाग क्र. 3 मध्ये गृहभेटी*

*धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात परळीत राष्ट्रवादी आपल्या दारी अभियानास पुन्हा सुरुवात* *रविवारी धनंजय मुंडे देणार प्रभाग क्र. 3 मध्ये गृहभेटी* परळी (प्रतिनिधी) - परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या 'राष्ट्रवादी आपल्या दारी, विकासाची प्रभागफेरी' या अभियानास रविवारपासून पुन्हा सुरुवात होत असून, धनंजय मुंडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह शहरातील नवीन प्रभाग क्र. 3 मधील नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधणार आहेत. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या अभियानास परळी वासीयांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. धनंजय मुंडे हे त्यांचे सहकारी, पदाधिकारी व स्थानिक प्रशासकीय कर्मऱ्यांसह घरोघरी होऊन नागरिकांशी संवाद साधतात, यावेळी नागरिकांच्या लहान मोठ्या समस्यांना घरपोच व्यासपीठ मिळत असल्याने ही प्रभाग फेरी लोकप्रिय ठरत आहे. मध्यंतरी घोषित झालेली आचारसंहिता व संततधार पाऊस यामुळे या अभियानास काही काळ खंड पडला होता, मात्र रविवार (दि. 7) पासून पुन्हा या अभियानास सुरुवात होत असून, सकाळी 8 वा. सर्व पदाधिकारी, आजी-माज...