पोस्ट्स

एप्रिल १४, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समाजाचे हित लक्षात घेऊनच ज्योतीताईंचा निर्णय -कैलास नाईकवाडे पाटील

इमेज
  समाजाचे हित लक्षात घेऊनच ज्योतीताईंचा निर्णय - कैलास नाईकवाडे पाटील परळी वैजनाथ, प्रतिनिधी           समाजाचे सर्व व्यापक हित लक्षात घेऊनच डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी निर्णय घेतला असून हा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयाचे समाजातून स्वागत होत असून या निर्णयाने समाजाचे सर्व व्यापक हित साधले जाणार असल्याची प्रतिक्रिया शिवसंग्राम तालुकाध्यक्ष कैलास नाईकवाडे पाटील यांनी दिली आहे.          बीड लोकसभेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी निवडणूक आहे. शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे यांनी आपण बीड लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांची भेट ही घेतली होती. परंतु ज्योतीताई मेटे यांना उमेदवारी मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर ज्योतीताई मेटे यांनी संवाद दौरा बीड जिल्ह्यात केला. हा संवाद दौरा झाल्यानंतर समाज बांधवांशी चर्चा करून त्यांनी बीड लोकसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे अशी प्रतिक्रिया शिवसंग्राम तालुकाध्यक्ष परळी वै

बीड आकाशवाणीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांची मुलाखत

इमेज
  बीड आकाशवाणीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांची मुलाखत बीड, दि.20:(जिमाका) बीड आकाशवाणीवर बुधवारी 24 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता 39 बीड लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. आकाशवाणी बीड केंद्राच्या 102.9 मेगाहर्टस् वर बुधवारी दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता ही मुलाखात प्रसारित केली जाईल. ही मुलाखात आकाशवाणीचे निवेदक गोपाल ठाकूर घेणार आहेत.   39 बीड लोकसभा मतदार संघात निवडणुकीविषयक प्रशासनाने केलेली तयारी. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून राबवत असलेले विविध जागृतीपर उपक्रमांची माहिती या मुलाखतीत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी देतील.  बीड आकाशवाणीवरून प्रसारित होणारी ही मुलाखत मतदारांनी ऐकावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आतापर्यंत चार उमेदवारी अर्ज दाखल

इमेज
  39 बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक तिसऱ्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल  आतापर्यंत चार उमेदवारी अर्ज दाखल बीड, दि.20 : (जिमाका) 39 बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या तिसऱ्या  दिवशी आज 1  उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.   39  बीड लोकसभा मतदारसंघातून आज भारतीय जवान किसान पार्टी( इंडिया) पक्षाचे रामा खोटे यांनी  उमेदवारी अर्ज दाखल केला.   शुक्रवारी 11 इच्छुक उमेदवारांना 25 नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले. तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण 80 इच्छुक उमेदवारांना 185 नामनिर्देशन पत्राचे वाटप झाले.  39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत चार उमेदवारी अर्ज  दाखल झाले आहेत. 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी दि. 18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 25 एप्रिल 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 26 एप्रिल2024 रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 29 एप्रिल 2024 ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.   सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी केली जाईल. निवडणूक आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत राहील.

परळीत २१ एप्रिल पासून डॉ आंबेडकर जयंती निमित्त फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन

इमेज
  परळीत २१ एप्रिल पासून डॉ आंबेडकर जयंती निमित्त फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन परळी(प्रतिनिधी):-     परळीत कर्मचारी, पेंशनर्स व व्यवसायिक यांनी एकत्र येऊन विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक आदर्श जयंती उत्सव समितीची स्थापना करून 14 एप्रील रोजी परळी शहरातून ' महात्मा फुले- डॉ बाबासाहेब आंबेडकर ' संयुक्त जयंती काढून शहरातील लोकांपुढे एक आदर्श निर्माण केला, आणि आाता आज दिनांक 21 एप्रिल पासून व्याख्यानमाली सुरुवात होणार आहे.     फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेतून दिनांक 21 एप्रील ते 26 एप्रील या काळात शहरातील वैद्यनाथ औद्योगिक वसाहत, सभागृह येथे दररोज सांय. 7:00 ते 9: 00 यावेळेत विविध विषयावर व्याख्यान देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते यांना निमंत्रित करण्यात आले आहे.यामध्ये दि21 एप्रील रोजी संभाजीनगर( औरंगाबाद) येथील फुले-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक मा अरविंद खैरनार हे ' डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत सत्यशोधक चळवळीचे योगदान' या विषयावर व्याख्यान देणार आहेत तर दि23 एप्रील रोजी प्रा डॉ मनोहर सिरसाट यांचे ' डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट

बजरंग सोनवणेंचं ठरलं!

इमेज
  बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शन न करता दाखल करणार   बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून  पंकजा मुंडे  यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार  बजरंग सोनवणे  यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बजरंग सोनवणे हे दि. 22 एप्रिलला दुपारी एक वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कुठलंही शक्तीप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय बजरंग सोनवणे यांनी घेतला आहे.          त्यांचा अर्ज भरण्यासाठी  जयंत पाटील  तसेच शिवसेनेतील  एक मोठे नेते आणि रजनी पाटील यांची उपस्थिती असणार आहे. तर बीड जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील प्रमुख नेते देखील बजरंग सोनवणे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत. बीडमध्ये उन्हाची तीव्रता लक्षात घेता 22 एप्रिल रोजी कुठलीही सभा घेणार नसल्याचे सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तसेच पत्रकार परिषदेत बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यावरदेखील जोरदार टीका केली आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून करून दिला संवाद

इमेज
  काम करते रहो, लडते रहो; आपके बलिदान का आपको जरुर फल मिलेगा - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला राजेश दादा विटेकर यांना शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून करून दिला संवाद मोदी फडणवीस विटेकर यांच्या संवादाची क्लिप समाज माध्यमावर व्हायरल परभणी (प्रतिनिधी) - परभणी लोकसभेत निवडणूक जिंकण्याची क्षमता असूनही पक्षनिष्ठेसाठी माघार घेतलेल्या राजेश विटेकर यांचे आज परभणी येथील सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंडभरून कौतुक केले. *तुम्ही लढत रहा, तुमच्या या त्यागाचे फळ तुम्हाला नक्किच मिळेल, असे मोदीजी राजेश विटेकर यांना म्हणाले. या संवादाची क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.* परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीकडून उमेदवारी मिळाली होती, या ठिकाणी जवळपास राजेश विटेकर यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री महादेव जानकर यांना मिळाल्यामुळे या ठिकाणचे उमेदवार राजेश विटेकर यांना माघार घ्यावी लागली. अजितदादा पवार यांच्यावर असलेल्या निष्ठेप

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवाचार्य महाराजांनी धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडेंना दिले आशीर्वाद

इमेज
  लिंगायत समाजाच्या सात धर्मगुरूंची धनंजय मुंडेंनी घेतली आशीर्वादपर भेट आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवाचार्य महाराजांनी धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडेंना दिले आशीर्वाद बीड (दि. 19) - लिंगायत समाजात आदराचे स्थान असलेल्या विविध 7 मठांच्या धर्मगुरू शिवाचार्य महाराजांची आज बीड शहरात धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी सातही शिवाचार्य महाराजांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांना आशीर्वाद दिले. यावेळी श्री. शांतीलिंग शिवाचार्य महाराज औसेकर, श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर, श्री राजलींग शिवाचार्य महाराज परांडकर, श्री कांचबसवेश्वर शिवाचार्य महाराज पाथरीकर, श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर, श्री चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर, श्री चंदबसव महालिंगेश्वर महाराज बरदापुरकर या सातही शिवाचार्य महाराजांचे आज धनंजय मुंडे यांनी बीड शहरात एकत्रित दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी धर्म रक्षणासाठी राजाश्रय नितांत गरजेचा असल्याचे मान्यवर शिवाचार्य महाराज यांनी म्हटले. आम्ही नाथरेकर म्हणजे शिवाचे सेवक, आम्हाला महादेवाच्या सेवेचे व्रत आहे. आजही प्

लोकसभा निवडणुकीसाठी Google चे खास डूडल

इमेज
  लोकसभा निवडणुकीसाठी Google सुद्धा सज्ज; डूडल सादरीकरणातून मतदानाचे आवाहन सर्च इंजिन गूगल (Google) नेहमी एखादा खास दिवस असेल, तर शुभेच्छा देत डूडल तयार करतं आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतं. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आजपासून सुरू झालं आहे. आज २१ राज्यांमधील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर गूगलनंही त्यांचं खास डूडल सादर केलं आहे आणि मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. गूगलनं आज १९ एप्रिलपासून सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात करण्यासाठी मतदान चिन्हासह एक विशेष डूडल जारी केलं आहे. डूडलमध्ये भारतातील लोकशाही निवडणूक प्रक्रियेचं प्रतीक असलेल्या शाईचं बोट चित्रित केलं गेलं आहे. या डूडलवर क्लिक करताच तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रमुख बातम्यांची यादी दिसेल. गूगलच्या होम पेजवर गेलात की, तुम्हाला गूगलच्या नावात भारतातील लोकशाही निवडणूक प्रक्रियेचं प्रतीक दिसेल. आजच्या गूगल डूडलमध्ये मतदान करताना एका हाताचं बोट दाखवलं आहे. इंग्रजी अक्षरात लिहिलेल्या गूगलच्या स्पेलिंगमध्ये ओ (O) या अक्षराच्या जागी हाताच

39 बीड लोकसभा मतदारसंघातून आज 03 अपक्ष उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र

इमेज
  39 बीड लोकसभा मतदारसंघातून आज 03 अपक्ष उमेदवारांनी  दाखल केले नामनिर्देशन पत्र बीड, दि.19 : (जिमाका) 39 बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या दुसऱ्या दिवशी आज 3 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. या तीनही उमेदवारांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज सादर केला. 39 बीड लोकसभा मतदारसंघातून आज 03 अपक्ष उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले . शेख तौसीफ अब्दुल सत्तार, सादेक इब्राहिम शेख, उदयभान नवनाथ राठोड अशी या अपक्ष उमेदवारांची नावे आहेत. लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नव्हते. गुरुवारी 39 इच्छुक उमेदवारांना 92 नामनिर्देशन पत्रांची वाटप झाले होते. आज शुक्रवारी 30 इच्छुक उमेदवारांना 68 नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले आहे. असे एकूण 69 इच्छुक उमेदवारांना 160 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले आहे. 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी दि. 18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 25 एप्रिल 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 26 एप्रिल2024 रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 29 एप्रिल 2024 ही अर्ज मागे

उमापूरच्या सभेत मतदारांचा एकमुखी निर्धार- पंकजाताईच आता विक्रमी मताधिक्याने खासदार

इमेज
  जातीपातीचं सोडा, सारे मिळून आता जिल्ह्याच्या मातीचं बघुया - पंकजाताई मुंडे उमापूरच्या सभेत मतदारांचा एकमुखी निर्धार- पंकजाताईच आता विक्रमी मताधिक्याने खासदार उमापुर (गेवराई) ।दिनांक १९। मी सत्तेत असताना कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही असे काम केले आहे. विकास कामात कधीही भेदभाव केला नाही. तो संस्कार आमचा नाही. अनेक वर्ष राजकारण करताना  सर्वांना सोबत घेऊन पुढे जात आहोत. मी मंत्री असताना केलेली कामे जनता मला सांगते. मात्र काही जणांकडून विनाकारण जातीपातीचा अपप्रचार केला जातोय.हे योग्य नाही आणि बीड जिल्ह्यातील सुज्ञ जनता याला बळीही पडणार नाही याची मला खात्री आहे. मी तर सर्वांना जाहीर आवाहनच करतेय की, अरे, जातीपातीचं काय घेऊन बसलात  विकासाच्या दृष्टीने सर्व जण हातात हात घालून जिल्ह्याच्या मातीचं बघुया. खासदार म्हणून संधीरुपी कर्ज द्या विकासातून त्याच्या परतफेडीचा हिशोब घ्या असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी उमापुर येथील जाहीर सभेत केले.     उमापुर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचंड जाहीर सभा त्या बोलत होत्या. सभेला पंचक्रोशीतील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर गीताभ

पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देणं हा आपल्या सर्वांचा स्वाभिमान- पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन

इमेज
  सुडाचे राजकारण कधीच केले नाही; केवळ जिल्ह्याचा विकास हाच माझा ध्यास- पंकजाताई मुंडे पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देणं हा आपल्या सर्वांचा स्वाभिमान- पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन दिलेला शब्द पाळायचा ही शिवछत्रची परंपरा; पंकजाताईंच्या विजयासाठी गेवराई मतदारसंघातील प्रत्येक घराच्या चौकटीपर्यंत जाईल-माजी आ.अमरसिंह पंडित गेवराईतून पंकजाताईंना सर्वाधिक मताधिक्य देणार-विजयसिंह पंडित गेवराई  ।दिनांक १९। भाजप आणि महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र येऊन लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. यापूर्वी मंत्रीपदाच्या कार्यकाळात मी कायम विकासाला केंद्रबिंदू ठेवले कधीच सुडाचे राजकारण केले नाही की, कोणाला त्रास दिला नाही. देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजी विराजमान होणार आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्ही सर्वजण मला प्रचंड मताधिक्यांनी विजयी कराल हा विश्वास आहे. जिल्ह्याचा विकास हाच माझा ध्यास आहे असे प्रतिपादन पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले. लोकसभा निवडणूक ही, स्वाभिमानाची लढाई जिंकण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना सर्वाधिक मतांनी निवडून आणणे हा आपल्या सर्वांच्

ख्यातनाम लोककला संशोधक डॉ.गणेश चंदनशिवे यांचे राष्ट्रीय नाटय विद्यालयात तमाशा प्रशिक्षण

इमेज
  ख्यातनाम लोककला संशोधक  डॉ.गणेश चंदनशिवे यांचे राष्ट्रीय नाटय विद्यालयात  तमाशा प्रशिक्षण नवी दिल्ली प्रतिनिधी:- आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लोककला संशोधक तथा मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे प्रमुख प्रा. डॉ.गणेश चंदनशिवे हे  भारतातील नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण देणारी सर्वोच्च संस्था अर्थातच दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील (NSD ) विद्यार्थ्यांना  महाराष्ट्राचा अस्सल रांगडा तमाशा शिकवणार आहेत.  आज पारंपरिक तमाशाला कधी दुष्काळाचा सामना करावा लागतो तर कधी पावसाच्या सावटाचा ,कधी यात्रा जत्रातील परवानगीचा तर कधी आचार संहितेचा .अशा प्रतिकूल परिस्थितीतही तमाशा टिकून आहे आपले पारंपरिक अस्तित्व घेऊन. अशा प्रतिकूल परिस्थित भारतातील इतर लोककलावंत आपल्या राज्यातील लोककला इतर राज्यात पोहचवण्यासाठी धडपडत आहेत. जसा गुजरातचा भवाई ,उत्तर प्रदेशची नौटंकी ,ओरिसाचा छाऊ ,प. बंगालचा बाऊल ,छत्तीसगडची पांडवणी तशीच  महाराष्ट्राची अस्सल रांगडी लोककला तमाशा .आता महिनाभर या भारतभरातील मुलांना तमाशाचा इतिहास ,त्याची जडण घडण ,त्यातील कलावंतांचे योगदान ,त्यातील घटक ,तमाशाचे पूर्ववैभव ,आजच्या काळातील तमाशाच

बुध्दीभेद करणाऱ्यांना थारा देऊ नका - आ.सुरेश धस

इमेज
  माझा प्रचार सर्व सामान्य जनतेनीच हातात घेतला ; जिल्हयाला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी साथ द्या - पंकजाताई मुंडे पंकजाताई मुंडे यांची आष्टीत अभूतपूर्व सभा ; प्रचार सभेला तोबा गर्दी बुध्दीभेद करून अफवा पसरविणारांना थारा देऊ नका -आ. सुरेश धस आष्टी | दिनांक १८। प्रचारासाठी गावोगावी जाताना लोक भेटतात. पूर्वी मी केलेल्या कामांची यादी वाचतात, 'ताई तुमच्यामुळेच खूप मोठा निधी आला, कामे मार्गी लागली',असे  सांगतात. पालकमंत्री असताना केलेल्या विकास कामाचे समाधान वाटते. सर्वसामान्य जनतेनेच माझा लोकसभेचा प्रचार हाती घेतला आहे याची प्रचिती येत आहे. मागच्या निवडणुकीत या मतदारसंघाने सत्तर हजारांची मताधिक्य दिले आहे हा विश्वास यापुढेही कायम राहणार आहे. जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तुमचा हक्काचा माणूस म्हणून मी दिल्लीत काम करेल.'घडी गेली की पिढी जाते' त्यामुळे या निवडणुकीत चूक न करता जिल्ह्याच्या सर्वकष विकासासाठी प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भाजप-महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले. दरम्यान स्वतःचा पराभव दिसत असल्याने भाजपवर बिनबुडाचे आरोप करून संभ्रम निर्म

पंकजाताई मुंडे २४ तारखेला दाखल करणार उमेदवारी अर्ज

इमेज
  पंकजाताई मुंडे २४ तारखेला दाखल करणार उमेदवारी अर्ज   परळी वैजनाथ, प्रतिनिधी...            भारतीय जनता पक्ष महायुतीच्या बीड लोकसभा मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे या 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.          बीड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाच्या वतीने माजी मंत्री, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी दिलेली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच पंकजा मुंडे यांचा जनसंपर्क, संवाद व प्रचार सभा अखंडितपणे सुरू आहेत. त्यांच्या प्रचाराला बीड जिल्ह्यातील जनतेकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र आहे. निवडणुकीचे चित्र निर्माण होण्यापूर्वीच उमेदवारी जाहीर होताच एक प्रकारे विजयोत्सव असावा अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यात पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीने जनमानसात मत बिंबवायला सुरुवात झाली होती. उमेदवारी दाखल होण्यापूर्वीच संपूर्ण बीड जिल्हा व प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आणि बहुतांशी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख गावांना स्वतः उमेदवार असलेल्या पंकजाताई मुंडे या दौरा करून आलेल्या आहेत. एका बा

'फेक न्यूज'ची माहिती देण्यासाठी स्वतंत्र क्रमांक जाहीर

इमेज
 'फेक न्यूज'ची माहिती देण्यासाठी स्वतंत्र क्रमांक जाहीर      बीड, दि.18( जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कालावधीमध्ये 39 बीड मतदारसंघातील 'फेक न्यूज'ची माहिती देण्यासाठी 8788998499 हा स्वतंत्र क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी यावर फेक न्युज ची माहिती व्हॉट्सअप करावी.            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून आचारसंहिता लागू झाली आहे. याकाळात उमेदवारांची प्रचारा दरम्यान बदनामी करणे, अफवा पसरविणे, द्वेषपुर्ण संदेश, खोटे संदेश तसेच प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियाद्वारे प्रसारित होणाऱ्या फेकन्युजची माहिती  नागरीकांकडून मिळण्यासाठी हा 8788998499 स्वतंत्र मोबाईल क्रमांक माध्यम प्रमाणिकरण व संनियत्रन समिती आणि  मीडिया कक्षाकडून जाहीर करण्यात आला आहे. या क्रमांकावर व्हॉट्सअप करावे.

जिल्ह्यात 1 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू

इमेज
  जिल्ह्यात 1 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू                                                                           बीड, दि. 18 (जि. मा. का.) :- मराठा ओबीसी,धनगर व इतर समाजाचे विविध उपोषण,आंदोलने,सभा सद्या  सुरु असून जिल्हयात राजकीय हालचाली व घडामोडीमुळे मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे आंदोलने, रास्ता रोको या सारखे आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लोकसभा निवडणूक 2024 आदर्श आचार संहिता चालू आहे. दि. 21 एप्रिल  2024 रोजी महावीर जयंती, दि. 23 एप्रिल 2024 रोजी हनुमान जयंती  आणि दि 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिन संपन्‍ होत आहे. त्यामुळे  किरकोळ कारणावरुन तणाव निर्माण होऊन  जिल्हयात  कायदा व सुव्यवस्थेची शक्यता नाकारता येत नाही. कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी यासाठी  जिल्हादंडाधिकारी दिपा मूधोळ- मुंडे यांच्याकडून मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. दिनांक 17 एप्रिल 2024 रोजीचे 00.01 वाजेपासून ते 1 मे 2024 रोजीचे 12.00 वाजेपर्यंत  बीड जिल्हयात या कालावधीत महाराष्ट्र पोलीस कायदा 37 (1) (3) अन्वये  काढण्यात येणा-या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने,

पहिल्या दिवशी 39 व्यक्तींना 92 नामनिर्देशन पत्रांचे वाटप

इमेज
  पहिल्या दिवशी 39 व्यक्तींना 92 नामनिर्देशन पत्रांचे वाटप बीड, दि. 18: 39 बीड लोकसभा मतदारसंघात आज पासून नामनिर्देशन पत्राचे वाटप सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी 39 व्यक्तींनी 92 नामनिर्देशन पत्र घेतले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सूचनेनुसार हे नामनिर्देशन पत्र नि:शुल्क उपलब्ध करून दिले आहेत.          आज निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे.  आजच ते 25 एप्रिल पर्यंत, 11 ते 3 वाजेपर्यंत  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन कार्यालयात नामनिर्देशन पत्र वाटप सुरू असणार आहे.             जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे  या निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांकडून  भरलेले नामनिर्देशन पत्र सर्व कागदपत्रांसह  स्वीकारतील. आज कोणत्याही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले नाहीत.         नामनिर्देशन पत्रासोबत शपथ पत्र( नमुना 26 ) हा 25 एप्रिल रोजी तीन वाजेपर्यंत सादर करने आहे. शपथ पत्र अपूर्ण असल्यास दुसरे शपथ पत्र सादर करण्याची दिनांक 26 एप्रिल सकाळी 11 वाजे पर्यंत आहे.  याच दिवशी मतदार यादीची प्रमाणित पत्र दाखल करावी लागणार आहे.  फॉर्म ए व फॉ

आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघात चार सभा

इमेज
  पंकजाताई मुंडेंचा उद्यापासून जाहीर सभांचा धडाका आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघात चार सभा ; जाटनांदूर, उंदरखेल, आष्टी व मुगगावात तोफ धडाडणार बीड ।दिनांक १७। भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराचा तिसरा टप्पा जाहीर सभांच्या माध्यमातून उद्या (ता. १८) पासून सुरू होत आहे. आष्टी- पाटोदा मतदारसंघातील जाटनांदूर, उंदरखेल, आष्टी व मुगगाव येथे त्यांच्या जाहीर सभा होणार असून मतदारसंघातील विविध गावांचा दौराही त्या  करणार आहेत.  पंकजाताईंना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजपसह महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कामाला लागले असून गावोगावच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. उद्या १८ एप्रिल रोजी सकाळी ८.४५ वाजता पंकजाताई जाटनांदूर (ता.शिरूर कासार) येथे पहिली सभा घेणार असून त्यानंतर सकाळी १० वाजता उंदरखेल ता.आष्टी येथे सभा होणार आहे.  सभेनंतर पंकजाताई मुंडे दुपारी १२ ते संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत दादेगाव, देवळाली, श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड, सावरगाव मायंबा या ठिकाणी भेटी देत मतदारांची संवाद साधणार आहेत. सायंकाळी पाच वाजता आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी महारा

उद्पायासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू

इमेज
  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला संपूर्ण यंत्रणेचा आढावा उद्पायासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू      बीड ,दि. 17 (जिमाका) :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या आहेत.  39 बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदान होणार असून यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवार दिनांक 18 एप्रिल (आज) पासून सुरुवात होणार आहे. या धर्तीवर आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी करून आढावा घेतला.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत केकान, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे यावेळी उपस्थित होते. 18 एप्रिलपासून  25 एप्रिल पर्यंत 11 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन कार्यालयात नामनिर्देशन पत्र निशुल्क दिले जातील. या ठिकाणीची पाहणी केली.  उद्यापासून या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे खर्च निरीक्षक बसणार

पंकजाताई मुंडेंच्या नेतृत्वाला वाढती पसंती !

इमेज
  पंकजाताई मुंडेंच्या नेतृत्वाला वाढती पसंती ! धनगरवाडीचे शेकडो कार्यकर्ते भाजपात बीड ।दिनांक १७। आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात सर्वसामान्य व्यक्ती व त्याचा सर्वांगीण विकास हाच केंद्रबिंदू मानून लोकनेते मुंडे साहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन पुढे चालणाऱ्या संघर्ष कन्या तथा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाला पसंती देत धनगरवाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला.    केवळ विकास हाच आपला मुद्दा घेऊन  बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या पंकजाताई यांची लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बीड येथे भाजपा प्रचार कार्यालयात कॉर्नर मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये धनगरवाडी (ता. बीड) येथील तुळशीराम लकडे, सरपंच बारीकराव भावले, उपसरपंच सुखदेव भावले, ग्रा.प. सदस्य बाबुराव बंगाल, अमोल कोकरे, यदाबा भावले, केरबा भावले, तानाजी भावले ,माजी सरपंच ग्यानबा भावले, युवा कार्यकर्ते परमेश्वर भावले, कालिदास ठोकळ रामदास भावले ,यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे

रामगडावरून हजारो भाविकांना दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा

इमेज
  श्रीरामनवमी दिवशी रामगडावर येता आले हा श्रीरामांचाच मला आशीर्वाद श्री क्षेत्र रामगडावर पंकजाताई मुंडेंनी घेतले मनोभावे दर्शन रामगडावरून हजारो भाविकांना दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा गडाचे महंत स्वामी योगीराज महाराजांच्या हस्ते पंकजाताईंचा सत्कार बीड | दिनांक १६। जिल्ह्याची पालकमंत्री असताना श्रीक्षेत्र रामगडासाठी विकास कामे करता आली, असे असले तरी या गडावर आजपर्यंत येण्याची संधी मिळाली नाही परंतु आज श्रीरामनवमीच्या पावन पर्वादिवशी मला रामगडावर येऊन दर्शन घेता आले, हे प्रभू श्रीरामांचेच मी आशीर्वाद मानते, अशा शब्दांत भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  पंकजाताई मुंडे आज श्रीराम नवमीनिमित्त बीड तालुक्यातील क्षेत्र रामगड येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपप्रसंगी गडाचे महंत स्वामी योगीराज महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाला आवर्जून उपस्थिती राहिल्या. याप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर श्रीक्षेत्र रामगडाचे महंत स्वामी योगीराज महाराज यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आदी मान्यवर आणि हजारों

शरद पवार बीड जिल्ह्यात घेणार तब्बल तीन सभा ; मराठवाड्यातील चार सभांपैकी तीन सभा बीडसाठी

इमेज
  शरद पवार बीड जिल्ह्यात घेणार तब्बल तीन सभा ; मराठवाड्यातील चार सभांपैकी तीन सभा बीडसाठी बीड | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या प्रचार सभांचा झंजावात मराठवाड्यात सुरू होणार आहे. पुढील आठवड्याच्या 23 तारखेपासून शरद पवार हे मराठवाडा दौऱ्यावर येत असून 25 एप्रिल ते 11 मे दरम्यान शरद पवार यांच्या मराठवाड्यात चार सभा होणार आहेत. पैकी तीन सभा एकट्या बीड जिल्ह्यात तर एक सभा छत्रपती संभाजीनगरात होणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव, बीड आणि अंबाजोगाई या तीन ठिकाणी शरद पवार सभा घेणार आहेत.शरद पवार, अजित पवार हे नेते बारामतीत अडकून पडल्याची टीका होत असतांना आता शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा जाहीर झाला आहे. या दौऱ्यात शरद पवारांच्या मराठवाड्यात चार सभा होणार आहेत. पैकी तीन सभा एकट्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी तर एक सभा छत्रपती संभाजीनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी होणार आहे. 25 एप्रिल रोजी शरद पवारांची पहिली सभा बीड लोकसभा मतदारसंघात माजलगाव येथे होणार आहे. त्यानंतर 1

बीड तालुक्यातील मतदारांच्या प्रितमताई मुंडे यांनी घेतल्या भेटी

इमेज
  पंकजाताई मुंडे यांनी केलेला विकासच विजयाची नांदी ठरणार ; सन्मानजनक मताधिक्यासाठी परिश्रम घ्या खा. प्रितमताई मुंडे यांचे मांजरसुंभा,लिंबा गणेश, ढेकनमोह गणातील पदाधिकाऱ्यांना आवाहन बीड तालुक्यातील मतदारांच्या प्रितमताई मुंडे यांनी घेतल्या भेटी बीड | दि. १६ | बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जवाबदारी सांभाळत असताना पंकजाताई मुंडे यांनी अभूतपूर्व विकास निधी आणला होता, तेंव्हापासून आजपर्यंत केलेली लोकाभिमुख विकासकामे हीच पंकजाताईंच्या विजयाची नांदी ठरणार आहेत, पंकजाताईंचा विजय त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे निश्चित आहे. या विजयात पंकजाताईंच्या उंचीला शोभेल असे मताधिक्य देऊन पंकजाताईंना सन्मानजनक विजय मिळवून देण्यासाठी परिश्रम घ्या असे आवाहन खा.प्रितमताई मुंडे मांजरसुंभा,लिंबा गणेश, ढेकनमोहा गणातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. भाजप आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी मांजरसुंभा, लिंबा गणेश,ढेकनमोहा पंचायत समिती गणातील बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला संबोधित करताना खा.प्रितमताई मुंडे बोलत होत्या. भाजपचे

गीता परिवारच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन

इमेज
  गीता परिवारच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        गीता परिवारच्या वतीने परळीत विविध स्पर्धांचे आयोजन  करण्यात आले असुन या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.      औद्योगिक वसाहत परळी-वैद्यनाथ येथे दि.१८/४/ २०२४ ला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.गट १ ली ते ४ थी (शुल्कः केवळ १० रुपये) वेळ : दु. ३.३० विषयः हनुमानाचे चित्र रंगवणे.गट ५ वी ते ७ वी (शुल्कः केवळ १० रुपये) वेळ:दु.३.३० विषयः छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र काढणे व रंगवणे. स्पर्धा : गट ८ वी ते १२ वी(शुल्कः फक्त २५ रुपये) वेळ - दुः ३.३०.विषय : पुठ्यापासून मंदिर बनवणे. (२ x २ फिट) (घरुन बनवून आणणे व मंदिर बद्दल माहिती सांगणे) स्पर्धेचे निकाल दि.२५ एप्रिल २०२४ रोजी जाहीर करण्यात येईल.      अधिक माहिती व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सौ. श्वेता आशिष काबरा( 9422329045) , सौ. राजकन्या जगदीश मंत्री( 9960705777) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गीता परिवार परळीच्या वतीने करण्यात आले आहे.

श्रीरामनवमी निमित्त परळीत गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन

इमेज
  श्रीरामनवमी निमित्त परळीत गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट परळी वैजनाथ यांच्या वतीने श्रीरामनवमी निमित्त परळीत उद्या (दि.१७) गीत रामायण कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहे. सुपसिद्ध गायक  निनाद आजगांवकर आणि सहकारी यांच्या सुमधूर वाणीतून गीत रामायण बुधवार, दि.१७ एप्रिल २०२४ वेळ : सायं. ७:०० ते १०:०० यावेळेत होणार आहे. तरी सर्व भाविक भक्त रसिकांनी या गीत गायन कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन  अध्यक्ष ,सचिव व सर्व विश्वस्त मंडळ श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट परळी वैजनाथ यांनी केले आहे.

जाती-पातीच्या राजकारणापेक्षा 'ताई' चं नेतृत्व सर्वसमावेशक - आडसकर, सोळंके, जगताप

इमेज
  पंकजाताई मुंडेंच्या झंझावती दौर्‍याने धारूर डोंगर पट्ट्यात कमळाचे वादळ ताई, तुम्ही चिंता करू नका शंभर टक्के मतदान देऊ ;  विविध गावच्या ग्रामस्थांनी दिला शब्द जाती-पातीच्या भिंती उभा करणार्‍याच्या मागे जाऊ नका मतदान रूपी कर्ज द्या, महाविकासाच्या रूपाने परतफेड करू - पंकजाताई मुंडे जाती-पातीच्या राजकारणापेक्षा 'ताई' चं नेतृत्व सर्वसमावेशक - आडसकर, सोळंके, जगताप तेलगाव ।दिनांक १६।  भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई  मुंडे यांनी निवडणूक प्रचारार्थ आज धारूर डोंगर पट्ट्यात झंझावती दौरा केल्याने कमळाचे वादळ गावा-गावात निर्माण झाले. हिंगणी खुर्द ते चारदरी पर्यंत एका दिवसात तब्बल १२ गावांचा दौरा केला. ठिक-ठिकाणी उत्स्फुर्त स्वागत करताना फटाक्यांची आतिशबाजी गुलाल, पुष्पांची उधळण अनेक गावात महिलांनी औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या.  दरम्यान जाती-पातीच्या भिंती उभा करणार्‍याच्या मागे जावू नका माझे राजकारण केवळ जनसामान्यांच्या विकासासाठी आहे. मला तुम्ही मतदान रूपी कर्ज द्या, विकासाची महागंगा आणून परतफेड केल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी हेच नेतृत्व बसणार त्यामुळ

महायुतीच्या प्रचार रॅलीला परळीत उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  पंकजाताई मुंडेंना मतदान करण्यासाठी परळीत मतदारांमध्ये दिसून आला उत्साह महायुतीच्या प्रचार रॅलीला परळीत उत्स्फूर्त प्रतिसाद  परळी वैजनाथ,।दिनांक १६।  बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराला सर्वत्रच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून परळी शहरातील महायुतीचे कार्यकर्ते जोरदारपणाने प्रचार करताना दिसून येत आहेत. शहरातून पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार परळीकरांनी केला आहे.   महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ शहरात आज सकाळी हनुमान मंदिर मोंढा मार्केट येथून प्रचार फेरी सुरु होवून हालगे गल्ली,गांधी मार्केट,हमालवाडी हिंद नगर,भवानी नगर,मोंढा मार्केट आदी भागात प्रचाराफेरी काढण्यात आली. प्रचारफेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महायुतीने परळी शहरात पस्तीस हजाराहून अधिक मताधिक्याचे उद्दिष्ट ठेवले असून नागरिकांमध्ये पंकजाताई यांना मतदान करण्यासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे.पंकजाताईंच्या विजयात परळी शहराचे निश्चित मोठे योगदान असणार आहे. या निवडणुकीत  महायुतीतीला अभूतपूर्व यश  प्राप्त होणार आहे. आजच्या या प्रच

महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे २२ तारखेला दाखल करणार उमेदवारी अर्ज

इमेज
  महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे २२ तारखेला दाखल करणार उमेदवारी अर्ज बीड, प्रतिनिधी....       बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे २२ तारखेला  उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.        संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या बीड लोकसभा निवडणुकीसाठी १८ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या अनुषंगानेच बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. बजरंग सोनवणे २२ तारखेला  आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.यावेळी महाविकास आघाडीकडून मोठे शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. दरम्यान २२ तारखेला  आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे बजरंग सोनवणे यांनीच सांगितले असुन अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाकडून वरिष्ठ कोणते नेते उपस्थित राहणार याची लवकरच माहिती देऊ असेही त्यांनी सांगितले.