पोस्ट्स

फेब्रुवारी २६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS:नांदेडचे लोन बीडपर्यंत राष्ट्रवादीचे आमदार केसीआर यांच्या भेटीला

इमेज
 आ. प्रकाश सोळंके यांनी घेतली तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची भेट  ------ माजलगाव - मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी हैद्राबाद येथे तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची भेट शुक्रवारी भेट घेतल्याचे समोर आले आहे. या त्यांच्या भेटीमुळे राज्यात मोठी राजकीय खळबळ उडाली असून आ.सोळंके मागील काही महिन्यापासून के.सी.आर. यांच्या पक्षात जाण्याच्या सूचक वक्तव्याला दुजोरा मिळत आहे. आमदार प्रकाश सोळंके हे मागील दोन तीन महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा होती. त्यातच एका पत्रकार परिषदेत ही त्यांनी मी भाजप, शिंदे गट किंवा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या पक्षात जाऊ शकतो असे सांगितले होते. त्यातच शुक्रवारी आमदार सोळंके यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची हैद्राबाद येथे भेट घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे आमदार प्रकाश सोळंके हे आत्ता के.सी.आर. यांच्या पक्षात जाणार का ? कधी प्रवेशाचा मुहूर्त काढणार या ना अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत. आमदार सोळंके यांची फेसबुक पोस्ट  प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या सोश

MB NEWS: अभिष्टचिंतन:परळीतील आजातशत्रू व्यक्तिमत्व तथा वृक्षमिञ गोविंद (भैया) चांडक....!

इमेज
  परळीतील आजातशत्रू व्यक्तिमत्व तथा वृक्षमिञ गोविंद (भैया) चांडक....!       आ पल्या प्रमाणिक मेहनतीच्या जोरावरती इच्छित यश प्राप्त करता येते मग क्षेत्र कुठलेही असो ते क्षेत्र सामाजिक असेल किंवा उद्योजकीय असेल मनापासून केलेल्या कृतीमुळे किंवा कार्यामुळे कोणत्याही क्षेत्रात प्राविण्य व नावलौकिक मिळवता येतो. निष्ठा, सातत्य, कष्ट करण्याची तयारी व आपल्या कामाप्रती प्रामाणिक हेतू जपत आपणही समाजाप्रती काही देणे लागतो या उदात्त भावनेतून आपल्या व्यवसायाच्या रहाटगाड्यातून वेळ काढत समाजासाठी शक्य होईल तेवढी मदत तथा कार्य करणारे व वृक्ष संगोपनासाठी अविरत कार्य करणारे वृक्षमित्र तथा परळी शहरामध्ये भैय्या या नावाने सर्व सुपरिचित तथा अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक कार्यकर्ते श्री गोविंद (भैया) चांडक हे होय.     आज आपण जाणून घेणार आहोत परळीच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील यशस्वी उद्योजक, मयुरी मल्टी सर्विस व झेरॉक्सचे संचालक तथा प्रमाणिक व सर्वसुपरिचित व्यक्तिमत्व असणाऱ्या गोविंद(भैया) बालाप्रसाद चांडक यांच्या विषयी. परळी शहरातील नावाजलेल्या पद्मावती भागात राहणारे गोविंद भैया चांडक हे उच्चशिक्षित अ

MB NEWS:मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा परळीत तीव्र निषेध-वैजनाथ कळसकर

इमेज
  मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा परळीत तीव्र निषेध-वैजनाथ कळसकर परळी वैजना, मनसेच्या वतीने मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर आज दि. ०3 मार्च रोजी मुंबई दादर शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असतांना त्यांच्यावर अज्ञात ४ते ५ जणांनी हल्ला केला . या हल्ल्यात संदीप देशपांडे जबर जखमी झाले. या भ्याड हल्ल्याचा तिव्र निषेध करत परळी वैजनाथ येथे मनसेच्या वतीने निदर्षने करण्यात आली तसेच उपजिल्हाधीकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांसह, ग्रहमंत्री देवेंद्र फडणविस यांना निवेदन पाठवुन सदरील हल्ल्याची पुर्ण चौकशी करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करून हल्ल्यामागील गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कार्यवाही करावी, या ह्ल्ल्याचा मास्टरमाईंड शोधुन काढावा, संदीप देशपांडे यांना पोलीस संरक्षण सुरक्षा पुरवावी आदी मागण्या करण्यात आल्या या वेळी मनसेचे पदाधीकारी ता.अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहरअध्यक्ष वैजनाथ कळसकर ता. उपाध्यक्ष विठ्ठल दादा झीलमेवाड श.उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, ऋषिकेश बारगजे, मनविसे शहरअध्यक्ष हनुमान सातपुते, माणिक लटिंगे,अशोक सुरवसे,विजय बकरे आदींसह महाराष्ट्

MB NEWS:सरस्वती नदीशेजारील रस्त्यावरील ढाप्याचे काम करा-सुशील हरंगुळे

इमेज
  सरस्वती नदीशेजारील रस्त्यावरील ढाप्याचे काम करा-सुशील हरंगुळे परळी वैजनाथ अंबेवेस भागातील सरस्वती नदीशेजारील रास्तवरील ढाप्याचे काम करण्यासाठी मागील 4 दिवसांपासून खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण झाली आहे. हा ढापा त्वरित तयार करून रस्ता पूर्ववत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवक नेते सुशील हरंगुळे यांनी दिला आहे. मिलिंद विद्यालयासमोरून अंबेवेस कडे येणारा रस्ता हा मोठ्या प्रमाणात रहदारीचा आहे. वैद्यनाथ मंदिर, नेहरू चौक, मोंढ्याकडे जाण्यासाठी या रस्त्याचा प्रामुख्याने उपयोग होतो. भाजी मंडई या रोड वर असल्याने अनेक शेतकरी या रस्त्याचा उपयोग करतात. दहावी बारावीच्या परीक्षा चालू असल्याने विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाली आहे हा रस्ता तीन वेळा केला गेला व बिले उचलली गेली. परंतु केलेल्या बोगस कामांमुळे दोन वेळा केलेला ढापा पडला आहे. मागील चार दिवसांपासून पुन्हा ढाप्याचे काम करण्यासाठी तिसऱ्या वेळेस रस्ता खोदून ठेवला आहे.  या ढाप्याचे काम त्वरित पूर्ण करून रस्ता पूर्ववत चाली करावा अन्यथा नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवक नेते सुशील हरंगुळे यांनी

MB NEWS:पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत कौडगाव हुडयाच्या सरपंच लताबाई रंजवे भाजपात

इमेज
  पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत कौडगाव हुडयाच्या सरपंच लताबाई रंजवे भाजपात _भाजपचा गमचा घालून केले पक्ष प्रवेशाचे स्वागत_ परळी वैजनाथ । दिनांक ०४। कौडगाव हुडा येथील सरपंच लताबाई संभाजी रंजवे यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी भाजपचा गमचा घालून त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले.   नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत लताबाई रंजवे हया अपक्ष म्हणून उभ्या होत्या. ग्रामस्थांच्या विश्वासाच्या बळावर त्या  सरपंच म्हणून निवडून आल्या. पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व मान्य करत गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, रमेशराव कराड, नितीन ढाकणे, पप्पू चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री दिलीप राठोड, कलावती पवार, कौसाबाई चव्हाण, बालासाहेब राठोड आदी उपस्थित होते. ••••

MB NEWS:जनतेच्या विकास अन् सुख-शांतीला नख लावण्याचा प्रयत्न सहन करणार नाही

इमेज
 परळीला भूषण वाटेल असेच काम माझ्या हातून होईल ; तुम्ही साथ द्या, मतदारसंघाची पुन्हा नव्याने बांधणी करू पंकजाताई मुंडेंच्या हस्ते लोणी, कौठळीत झाले जलजीवन मिशनच्या ६ कोटीच्या कामाचे थाटात भूमिपूजन सत्ता असताना एक वीटही लावता आली नाही, आता श्रेय घेण्यासाठी मात्र आटापिटा जनतेच्या विकास अन् सुख-शांतीला नख लावण्याचा प्रयत्न सहन करणार नाही परळी वैजनाथ ।दिनांक ०४। लोकनेते मुंडे साहेबांनी इथल्या लोकांसाठी चाळीस वर्षे खस्ता खाल्ल्या, त्यांना जावून आज नऊ वर्षे झाली पण आजही परळी त्यांच्याच नावानं ओळखली जाते कारण त्यांनी इथल्या लोकांचा सन्मान वाढवण्याचं काम केलं, अगदी तसंच काम माझ्या हातून होईल. माझ्या परळीची मान मी  कधीही खाली जावू देणार नाही असं सांगत आता तुम्हीच मला दत्तक घ्या, तुमच्या साथीने मतदारसंघ पुन्हा नव्याने बांधू अशी साद भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जनतेला घातली.    सत्ता हातात असताना ज्यांना गावच्या विकासाची एक वीटही लावता आली नाही ते आता भाजपच्या सत्तेत आम्ही मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मात्र पुढे येत आहेत. जनतेच्या विकासाला आणि सुख-शांतीला नख लावण्याचा प्र

MB NEWS:केज-बीड रोडवर अपघातात माजी नगरसेवकाचा मृत्यू ; एक पोलीस कर्मचारी जखमी

इमेज
  केज-बीड रोडवर अपघातात माजी नगरसेवकाचा  मृत्यू ; एक पोलीस कर्मचारी जखमी केज :- केज-बीड रोडवर कोरेगाव जवळ अपघातात कार पलटी होऊन अपघात झाला. त्या अपघातात माजी नगरसेवक गजमफर उर्फ पप्पू (आण्णा) इनामदार यांचा मृत्यू झाला. तर पोलीस जमादार सय्यद चाँद हे जखमी झाले आहेत. या बाबतची माहिती अशी की, दि २ मार्च रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास माजी नगरसेक तथा विद्यमान नगरसेविका इनामदार यांचे पती गजमफर उर्फ पप्पू अण्णा इनामदार आणि केज पोलिस ठाण्यातील पोलीस जमादार सय्यद चाँद हे दोघे स्विफ्ट डिझायर क्र (एम एच ०४/ ई एफ ७५५७) गाडीने बीडच्या दिशेने जात असताना केज-बीड रोडवर कोरेगाव जवळील तांदळे वस्ती जवळ समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना कार रस्त्याच्या खड्ड्यात जाऊन ती पलटी झाली. त्यात गजमफर उर्फ पप्पू आण्णा इनामदार यांच्या डोक्याला गंभीर मार लागला त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेले पोलीस कर्मचारी सय्यद चाँद हे जखमी झाले असून जखमी पोलीस कर्मचारी सय्यद चाँद यांना बीड येथील दवाखान्यात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच केजचे नगरसेवक अझरोद्दीन इनामदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन

MB NEWS:शेतकरी कीर्तन महोत्सव हे क्रांतिकारी पाऊल-शेतकरी कवी इंद्रजित भालेराव

इमेज
  शेतकरी कीर्तन महोत्सव हे क्रांतिकारी पाऊल-शेतकरी कवी इंद्रजित भालेराव परळी / प्रतिनिधी शेतक-यांना न मागता कर्जमुक्ती देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त कान्नापूर ता:धारुर जि. बीड या ठिकाणी दि.०३ मार्च ते दि. ०९ मार्च हे सात दिवस परिसरातील चौदा गावांनी मिळून शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कीर्तन महोत्सवाची सुरवात०३ मार्च रोजी आयुष्याभर शेतक-यांच्या व्यथा-वेदना कवितेतून मांडणारे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, वारकरी कीर्तन परंपरेचा अविभाज्य भाग असणाऱ्या पखवाज या  वाद्याला अंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून देणारे उद्धवबापू आपेगावकर यांच्या उपस्थितीत झाली. या सोहळ्याला संबोधित करताना वरील उद्गार इंद्रजीत भालेराव यांनी काढले. 900 वर्षांपूर्वी ज्या उद्देशाने वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली तो उद्देश आता मात्र बाजूला राहून त्याची जागा दांभिकता, कर्मकांड आणि पाखंडाने घेतलेली आहे; म्हणून समाजातील जागरूक व्यक्तींनी पुढाकार घेऊन अशा कीर्तन महोत्सवाचे आयोजन करणे हा एक क्रांतिकारक उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगतानाच त्यांनी संत नामदेवापासून, बसवेश्वर, चक्रधर ते स

MB NEWS:अनावश्यक खर्च टाळून गोरगरीब रूग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिरं घेणं केव्हाही चांगलं

इमेज
  अनावश्यक खर्च टाळून गोरगरीब रूग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिरं घेणं केव्हाही चांगलं पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते  माजलगांवात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं  उदघाटन  शिबिरातील रूग्णांना दिल्या सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा माजलगांव ।दिनांक ०३। आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या वातावरणात आरोग्याचा  विषय गंभीर बनला आहे. प्रत्येक जण आरोग्याविषयी जागृत झाला आहे. गोर गरीबांना महागडे उपचार घेणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते त्यामुळे अशा शिबीराचा त्यांना उपयोग होतो.  वाढदिवस, समारंभावर अनावश्यक खर्च टाळून अशी शिबीरं जास्तीत जास्त घेतली जावीत, त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा  असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी येथे केले. डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील हाॅस्पीटल अहमदनगर आणि विजया अर्बन मल्टिस्टेट माजलगांव यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उदघाटन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते  आज झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.  केले. माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, आर टी देशमुख, मोहनराव जगताप, रमेश आडसकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, अरूण बर

MB NEWS:दीनदयाळ बँकेला 100 ते 500 कोटी ठेवी वर्गवारीतील मानाचा पुरस्कार: उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांनी स्विकारला गौरव

इमेज
  दीनदयाळ बँकेला 100 ते 500 कोटी ठेवी वर्गवारीतील  मानाचा पुरस्कार: उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांनी स्विकारला गौरव परळी वैजनाथ, प्रतिनिधी......     100 ते 500 कोटी ठेवी वर्गवारीतील  मानाचा समजला जाणारा पुरस्कार दीनदयाळ नागरी सहकारी बँकेला मिळाला आहे.महाबळेश्वर येथे आयोजित एका समारंभात दीनदयाळ बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांनी बँकेच्या वतीने हा गौरव स्विकारला.             बँको (नियतकालिक) प्रकाशनाकडून प्रतिवर्षी पुरस्कार दिले जातात. बँकिंग क्षेत्रात हा पुरस्कार मानाचा समजला जातो. यावर्षीचा ₹100 ते ₹500 कोटी ठेवी वर्गवारीतील मानाचा पुरस्कार दीनदयाळ नागरी सहकारी बँकेला मिळाला आहे.   महाबळेश्वर येथे एका समारंभात बँकेच्या वतीने  उपाध्यक्ष- अँड. राजेश्वरजी देशमुख यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी  ज्योतींद्रभाई मेहता, (राष्ट्रीय संरक्षक, सहकार भारती)  अविनाशजी शिंत्रे (मुख्य संपादक ,बँको प्रकाशन, कोल्हापूर.) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दीनदयाळ नागरी सहकारी बँकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

MB NEWS:प्रतिकस् मेकअप स्टुडिओचे पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शानदार उदघाटन

इमेज
  प्रतिकस् मेकअप स्टुडिओचे पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शानदार उदघाटन  सौंदर्य क्षेत्रात प्रतिक सुरवसेचा नावलौकिक होऊन प्रतिकस् मेकअपचा (PM) ब्रॅण्ड राज्यात नाव करील - पंकजाताई मुंडे  नविन व्यवसायाला सर्वस्तरावरातुन नागरीकांच्या भरभरून शुभेच्छा  परळी वैजनाथ         सौंदर्य क्षेत्रात पुरूषांनी पुढाकार घेऊन काम करणे हे कौतुकास्पद आहे आणि प्रतिक सुरवसे याच क्षेत्रात नावलौकिक मिळवण्याचे स्वप्न घेऊन काम करणार असल्याने त्याला उज्ज्वल भविष्य आहे. त्याचा प्रतिकस् मेकअप (PM)  हा ब्रॅण्ड राज्यात नाव करील अशा शुभेच्छा देत प्रतिकस् मेकअप केवळ परळी शहरात न राहता त्याच्या राज्यात शाखा होतील असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला. दरम्यान या नवीन व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.          "प्रतिकस् मेकअप स्टुडिओचा उदघाटन समारंभ आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला. यावेळी पंकजाताई मुंडे यांनी मेकअप स्टुडिओची पाहणी करून सर्व माहिती घेतली. समसेट्टी निवास, प्रेमपन्ना नगर, आयसीआयसीआय बँकेच्

MB NEWS:आंतरराष्ट्रीय पखवाज वादक उद्धवबापू आपेगावकर, कवी इंद्रजित भालेराव यांच्या उपस्थितीत शेतकरी कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन

इमेज
 ●आंतरराष्ट्रीय पखवाज वादक उद्धवबापू आपेगावकर, कवी इंद्रजित भालेराव यांच्या उपस्थितीत  शेतकरी कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन परळी / प्रतिनिधी चौदा गावातील शेतकरी, कष्टक-यांनी एकत्र येऊन जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त आयोलेल्या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 3 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता, कान्नापूर बस स्टॅण्ड जवळील भव्य मैदानात संपन्न होणार असून या शेतकरी कीर्तन महोत्सव उदघाटन प्रसंगी शेतक-यांच्या व्यथा-वेदना मांडणारे प्रसिद्ध कवी, संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजित भालेराव आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाज वादक उद्धवबापू आपेगावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. शेतक-यांना न मागता कर्जमुक्ती देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त होत असलेल्या कीर्तन महोत्सवासाठी चौदा गावातील शेतक-यांनी घेतलेला पुढकार एक आदर्श निर्माण करणारा आहे. अशा महोत्सवासाठी आयुष्याभर शेतक-यांच्या व्यथा-वेदना मांडणारे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव येत आहेत, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. वारकरी कीर्तन परंपरेचा अविभाज्य भाग असणा-या पखवाज या  वाद्याला अंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून देणारे उद्धवबापू आप

MB NEWS:आभा गणेश मुंडेने पहिल्या राज्यस्तरीय दिव्यांग योगासन स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

इमेज
  आभा गणेश मुंडेने पहिल्या राज्यस्तरीय दिव्यांग योगासन स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र योगासन क्रीडा संघटना व बृहन महाराष्ट्र योग परिषदेने पुणे येथे २५ फेब्रुवारी रोजी पहिली राज्यस्तरीय दिव्यांग योगासन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत परळी वैजनाथ तालुक्यातील डाबी गावची कन्या कु. आभा गणेश मुंडेने सुवर्णपदक मिळवून अस्थिव्यंग प्रवर्गातील २० वर्षांपेक्षा लहान गटात पहिला क्रमांक पटकावला. हा पुरस्कार दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख, तसेच सकाळ माध्यम समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आभा व इतर विजेत्यांना प्रदान करण्यात आला. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे लहानपणापासून आभास तिचे काका शरद मुंडे यांनी कोणत्या स्पर्धेसाठी योगासने शिकविले नाही तर तिच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक विकासासाठी तिच्यावर योगसंस्कार केलेत. या स्पर्धेत यश मिळवून आभासह बीड जिल्ह्यातील यश नीलकंठ कापसे, कोमल दिगंबर लाड, संध्या आबासाहेब ढेम्बरे, रितुजा उमेश डिघुळे यांची मध्यप्रदेशमधील चित्रकूट येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येथील विद

MB NEWS: आजारी असूनही पंकजाताई मुंडे नियोजित कार्यक्रमासाठी परळीत दाखल

इमेज
  समोरच्या व्यक्तीचा मान रहावा आपल्या न जाण्याने त्यांचे चारचौघात हसू होऊ नये म्हणून कार्यक्रम करणे क्रमप्राप्त -पंकजाताई मुंडे आजारी असूनही पंकजाताई मुंडे नियोजित कार्यक्रमासाठी परळीत दाखल आल्या आल्या लगेच  त्यांनी घेतला  जनता दरबार परळी वैजनाथ, प्रतिनिधी......        भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आजारी असूनही आज नियोजित कार्यक्रमांसाठी शहरात दाखल झाल्या. आल्या आल्या लगेच  त्यांनी जनता दरबार घेऊन सर्व सामान्य जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेत जागेवरच समस्या मार्गी लावल्या. दरम्यान याबाबतचे ट्विट त्यांनी काही वेळापुर्वीच केले होते.यामध्ये समोरच्या व्यक्तीचा मान रहावा आपल्या न जाण्याने त्यांचे चारचौघात हसू होऊ नये म्हणून कार्यक्रम करणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.     पंकजाताई मुंडे यांना दोन तीन दिवसापूर्वी फुड पाॅयजनिंग झाले होते, इन्फेक्शन मुळे त्यांना अधिकच त्रास होऊ लागला. त्यातच मतदारसंघात नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणे देखील तितकेच महत्वाचे होते. त्यामुळे आजारी असूनही दुपारी त्या परळीत दाखल झाल्या. आल्या आल्या त्यांनी लगेच निवासस्थानी जनता दरबार सुरू केला. त्य

MB NEWS:कै.ल.दे.महिला महाविद्यालयात 'रोजगार मेळावा '

इमेज
  पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे नोकरी उपलब्ध करून देण्याचा महाविद्यालयाचा स्तुत्य प्रयत्न - श्री.योगेश उबाळे कै.ल.दे.महिला महाविद्यालयात 'रोजगार मेळावा ' परमस्कील छत्रपती संभाजीनगर व कै.ल.दे.महिला महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम परळी , दि. ०२ मार्च २०२३     येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व परमस्कील छत्रपती संभाजीनगर  यांच्या संयुक्त विद्यमाने आज कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 10:30 वाजता रोजगार मेळाव्याचे ( campus interview and selection ) आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी बोलत असताना परम स्किल प्रा.लिमिटेड कंपनीचे श्री योगेश उबाळे यांनी महाविद्यालयाने राबवलेल्या या उपक्रमाबद्दल बोलताना , "पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांकरिता नोकरीची संधी हे महाविद्यालय उपलब्ध करून देत आहे. निश्चितच त्यांचा हा प्रयत्न स्तुत्य स्वरूपाचा असल्याचे " उद्‌गार त्यांनी यावेळी काढले. "महाविद्यालय यापुढेही विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनाकरिता सातत्याने प्रयत्नशील राहील ." अशी भूमिका यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगतातून संजयजी देशमु

MB NEWS:रामदास आठवलेंच्या पक्षाला नागालँडमध्ये यश : दोन जागांवर विजय

इमेज
  रामदास आठवलेंच्या पक्षाला नागालँडमध्ये यश : दोन जागांवर विजय     नागालँड विधानसभा निवडणूक छोट्या पक्षांनीही आपलं अस्तित्व दाखवून दिले आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने नागालँड विधानसभा निवडणुकीत दोन जागा जिंकल्या आहेत.    नागालँड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप२, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) युती आणि नागा पीपल्स फ्रंट यांच्या महत्त्वाची लढत असली तरी अनेक पक्षांनी यश मिळवले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजप- एनडीपीपी युतीने 32 जागांवर आघाडी घेतली असून, 60 पैकी 2 जागा जिंकल्या आहेत. नागालँडमध्ये युती सरकार सत्तेत येण्याचे चित्र दिसत आहे. NDPP 1 जागा जिंकून 25 जागांवर आघाडीवर आहे, भाजपने 2 जागा जिंकल्या आहेत आणि 12 जागांवर आघाडीवर आहे आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) 3 जागांवर आघाडीवर आहे. भाजपा-एनडीपीला पुन्हा बहुमत ? २०२३ च्या नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजपा-एनडीपीपी युतीची वाटचाल बहुमताकडे सुरु झाली आहे. नागालँडचे सध्याचे मुख्यमंत्री नेफिओ रिओ यांनी नॉर्थन अंगामी मतदारसंघातून निवडणू

MB NEWS:धनंजय मुंडेंची विधानसभेत मागणी

इमेज
  12 हजार शेतकऱ्यांचे बँकखाते गोठवले:सर्व शेतकऱ्यांचे सीबील बिघडणार नाही याची काळजी घेऊन बँकखाते पूर्ववत करून द्या !  धनंजय मुंडेंची विधानसभेत मागणी मुंबई (दि. 02) - बीड जिल्ह्यातील बारा हजार शेतकऱ्यांचे बँक खाते बजाज आलियांज या विमा कंपनीने चुकीचा पीक विमा जमा झाल्याचे कारण देत गोठवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला तसेच त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या सिबिलवरही झाला. अशा प्रकारे शेतकऱ्यांचे बँक खाते बँकेला कळवून गोठवणे हे बेकायदेशीर असून संबंधित कंपनीवर शासनाने गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली आहे. खरीप हंगाम 2022 मधील विमा धारक शेतकऱ्यांपैकी सुमारे 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 12 कोटी रुपये रक्कम बजाज अलियांज विमा कंपनीने जमा केले होते. मुळात शेतकऱ्यांना पात्र असूनही विमा मिळत नाही आणि त्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले तर एवढा मोठा व्यवहार करणारी विमा कंपनी जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून पैसे आल्याचे सांगते हे अत्यंत अव्यवहार्य आहे असेही धनंजय म

MB NEWS:पंकजाताई मुंडेंनी केलं शेतकरी कन्येचं अभिनंदन

इमेज
  एमपीएससी परीक्षेतील  सोनाली मात्रेचे यश बीड जिल्हयासाठी  अभिमानास्पद पंकजाताई मुंडेंनी केलं शेतकरी कन्येचं अभिनंदन बीड । दिनांक ०१। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दैदीप्यमान यश मिळविणाऱ्या माजलगांवच्या सोनाली मात्रे हिच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केलं आहे. सोनालीचं यश हे जिल्हयासाठी अभिमानास्पद आणि मान उंचावणारं आहे अशा शब्दांत त्यांनी तिचं कौतुक केलं आहे.   यासंदर्भात पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करून सोनालीच्या यशाचं कौतुक केलं आहे.राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत माजलगाव ता. इरला मजला येथील शेतकरी श्री. अर्जुन मात्रे यांची कन्या कु.सोनाली मात्रे ही महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत तिने मिळविलेले हे यश नक्कीच अभिमानास्पद आहे असं त्यांनी म्हटलं आहे. ••••

MB NEWS:फाउंडेशन स्कूल येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

इमेज
  फाउंडेशन स्कूल येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा   आज दिनांक 27 2 2013 रोजी जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. यामध्ये भित्तिपत्रकाचे अनावरण प्राचार्य श्री नरहारे सर श्री नागझरे सर व रेझोनन्स सेंटर हेड श्री संदीप यादव सर यांच्या हस्ते करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी विषयाच्या विभागातर्फे ग्रंथ दिंडी आयोजित करून कार्यक्रमाचे वातावरण मराठीमय करण्यात आले व श्री जाधव सर यांनी गायलेले 'गरजा महाराष्ट्र माझा' या गीताने विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संहिता जोगदंड व स्नेहल जाधव या विद्यार्थिनींनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ कुलकर्णी मॅडम व श्री गुट्टे सर यांनी विशेष प्रयत्न केले तर कार्यक्रमाची सांगता श्रीमती रेड्डी मॅडम यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आली.

MB NEWS:२१ कोटी रूपये निधी खर्चून होणार योजनांची कामे

इमेज
  पंकजाताई मुंडे यांच्यामुळे ग्रामीण भागाला मिळणार आता नळाद्वारे पाणी! शुक्रवारी  लोणी, कौठळीत तर शनिवारी निरपणा, बागझरी, घाटनांदुरमध्ये होणार जलजीवन मिशन कामांचा शुभारंभ २१ कोटी रूपये निधी खर्चून होणार योजनांची कामे खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांचीही  उपस्थिती परळी वैजनाथ ।दिनांक०१। शासनाच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातंर्गत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांचे भूमिपूजन येत्या ३ मार्च  रोजी तालुक्यातील लोणी व कौठळी येथे तर ४ मार्चला निरपणा, बागझरी, सोमनवाडी, घाटनांदुर येथे  होत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत  आणि खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते  हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. उपरोक्त सर्व गावच्या योजनांवर सुमारे २१ कोटी खर्चाची कामे होणार आहेत.    ग्रामीण भागातील लोकांना घरोघरी नळ कनेक्शन उपलब्ध करून त्याद्वारे शुध्द पाणी देण्याची केंद्र व राज्य सरकारची योजना आहे. पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी परळी मतदारसंघासह जिल्हयातील जवळपास सर्वच गावे या योजनेत समाविष्ट केली आहेत. येत्या ३ मार्च रोजी सायंकाळी ५ वा. लोणी व  संध्याक

MB NEWS:छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी शिवजयंती साजरी होणार-प्रा.अतुल दुबे

इमेज
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी होणार-प्रा.अतुल दुबे परळी/प्रतिनिधी  जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मीक कार्यक्रमांनी साजरी होणार असल्याची माहिती जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा बीड जिल्हा युवा सेनेचे समन्वयक प्रा.अतुल दुबे यांनी दिली आहे. आज बुधवार दि.1 मार्च रोजी जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणच्या संपर्क कार्यालयात शिवसेना, युवा सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची शिवजयंती निमित्त बैठक जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणचे प्रमुख मार्गदर्शक तथा शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर   यांच्या अध्यक्षतेखाली व जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा बीड जिल्हा युवा सेनेचे समन्वयक प्रा.अतुल दुबे  यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. शुक्रवार दि.10 मार्च रोजी जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोेंढा मार्केट येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी विविध सामाजि

MB NEWS::परळीत गरजूंना 100 मशीनचे वाटप

इमेज
  महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त डॉ. संतोष मुंडे यांच्यावतीने  आयोजित मोफत डिजिटल श्रवण यंत्र कानाच्या मशीन वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद:परळीत गरजूंना 100  मशीनचे वाटप डाॅ.संतोष मुंडेंचे सामाजिक कार्य बहुमोल- डॉ. भास्कर खैरे असेच काम सुरू ठेवले तर एक दिवस डॉ. संतोष मुंडे पद्मश्रीला पात्र होणार- राजेश्वर आबा चव्हाण  परळी वैजनाथ, प्रतिनिधी..        डॉ. संतोष मुंडे यांचे सामाजिक कार्य हे सातत्याने सुरू असते. खऱ्या अर्थाने वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक जाणिवेतून वेगवेगळे उपक्रम ते राबवतात. त्यांचे हे कार्य बहुमोल असल्याचे कौतुक स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ .भास्कर खैरे यांनी केले. तर डॉ .संतोष मुंडे यांनी सामाजिक कार्यात एक मोठी उंची गाठलेली आहे. हे कार्य असेच सुरू राहिले तर एक दिवस ते नक्कीच पद्मश्रीला पात्र होतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांनी केले. परळीत शंभर गरजूंना मोफत डिजिटल श्रवण यंत्र कानाच्या मशीनचे वाटप करण्यात आले.          महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी

MB NEWS:आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी सुरु

इमेज
  आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी सुरु बीड दि. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25% अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया माहे फेब्रुवारी पासून राबविण्यात आली असून दि.02/03/2023 पासून पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश अर्ज ऑनलाईन रित्या नोंदणी करण्यासाठी अधिकृत रित्या वेबसाईड सुरु आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांची ऑनलाईन नोंदणी विहित कालावधीत करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया ही बीड जिल्हयातील खाजगी, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थ साहित,तत्वावरील प्राधान्याने इंग्रमी माध्यमाच्या शाळेवर राबविण्यात येते. जिल्हयातील 225 शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आलेले आहे. 1827 एवढी प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे. पालकांनी आपल्या परिसरातील उपलब्ध असलेल्या नामांकित शाळेंमध्ये आपल्या मुलांचे प्रवेश ऑनलाईनरित्या नोंदणी करुन प्रवेशाची संधी प्राप्त करुन घ्यावी यासाठी तालुकास्तरावर मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी हे या प्रवेश प्रक्रियेचे नियंत्रण अधिकारी आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली मदत कक्ष स्था

MB NEWS:भिवा बिडगर यांना मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पावतीच होय- जनिमियाँ कुरेशी

इमेज
  भिवा बिडगर यांना मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पावतीच होय- जनिमियाँ कुरेशी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांना मिळालेला विशेष गौरव पुरस्कार म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याची पावतीच होय असे प्रतिपादन परळी पंचायत समितीचे माजी उपसभापती जानीमिया कुरेशी यांनी केले.      मराठवाडा साथीच्या वतीने वर्धापनदिना निमित्त दरवर्षी परळी भूषण पुरस्कार व विशेष गौरव समारंभ येथील वैद्यनाथ औद्योगिक वसाहत सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी भूषण व विशेष गौरव करण्यात आले. या कार्यक्रमात विशेष गौरव मिळाल्याबद्दल नुकताच भिवा बिडगर यांचा जानिमिया कुरेशी  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी प्रसिद्ध पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी सत्कार केल्यानंतर जानिमिया कुरेशी यांनी भिवा बिडगर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.     याप्रसंगी पत्रकार बालासाहेब फड, अनिल गायकवाड, महादेव गीते, संतोष घुबंरे, प्रमोद औटी व इतर उपस्थित होते.

MB NEWS:महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, व्यावसायिक सिलिंडरही महागलं!

इमेज
  महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, व्यावसायिक सिलिंडरही महागलं!  आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण, मार्च महिना सुरू होताच पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. भारतीय इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार, १ मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचे (Cylinder) दर ५० रुपयांनी वाढवण्यात आले आहे. याशिवाय १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही तब्बल ३५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. गॅस सिलिंडरचे नवीन दर काय? सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस (LPG Gas) सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आल्याने मुंबईत १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत आता १ हजार १०२ इतकी झाली आहे. बुधवारी सकाळपासून घरगुती एलपीजी सिलिंडर

MB NEWS:परळी जवळ भीषण अपघात मोटरसायकलस्वार ठार

इमेज
  परळी जवळ भीषण अपघात मोटरसायकलस्वार ठार परळी वैजनाथ       बीड परळी रस्त्यावर ट्रक व मोटारसायकलचा भिषण अपघात झाल्याची घटना आज दि.28 रोजी सायंकाळी 8 वा.सुमारास घडला.यामध्ये मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला आहे.       बीड परळी रस्त्यावर तळेगाव ते टोकवाडी दरम्यान आज दि.28 रोजी सायंकाळी 8 वा.सुमारासट्रक व मोटारसायकलचा भिषण अपघात घडून यात मोटारसायकलस्वार ठार झाला.मयत अंदाजे 25 वर्षिय युवक असुन अद्याप मयताची ओळख पटली नाही.घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि मारोती मुंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.

MB NEWS:शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याशी अभयकुमार ठक्कर यांची विविध विषयावर चर्चा

इमेज
  शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याशी अभयकुमार ठक्कर यांची विविध विषयावर चर्चा परळी वैजनाथ/प्रतिनिधी शिवसेना उपनेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर या आज मंगळवार दि.28 फेब्रुवारी रोजी माजलगाव जि.बीड येथे शिव गर्जना मेळावा प्रसंगी आल्या असता त्यांची आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी भेट घेवून विविध विषयावर चर्चा केली. आज मंगळवारी शिवसेना उपनेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर माजलगाव येथे शिव गर्जना मेळाव्यासाठी आल्या होत्या. यावेळी अभयकुमार ठक्कर व त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांची भेट घेवून त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.  याप्रसंगी शिवसेना जेष्ठ नेते सतिशअण्णा जगताप, शहर संघटक संजय कुकडे, संजय सोमाणे किशन बुंदेले,श्रीनिवास सावजी, मनिष जोशी, अमित कचरे, लक्ष्मण मुंडे, बबन ढेंबरे,योगेश घेवारे, प्रकाश देवकर, योगेश जाधव, प्रा.जगदीश कावरे, नरेश मैड,सचिन लोढा, नवनाथ वरवटकर, बजरंग औटी  आदी शिवसैनिक उपस्थित होते.

MB NEWS:कर्मचाऱयांच्या हितासाठी न्याय लढाईसाठी कटीबद्ध - ॲड के.एस तूपसागर

इमेज
  मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे कार्य उल्लेखनीय - मुख्य अभियंता मोहन आव्हाड   कर्मचाऱयांच्या हितासाठी न्याय लढाईसाठी कटीबद्ध - ॲड के.एस तूपसागर  परळी प्रतिनिधी  मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी आयोजित सत्कार समारंभात केले. ते मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित संचालक आणि सेवानिवृत्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ के एस तूपसागर यांच्या सत्कार व्हीआईपी रेस्टहाऊस परळी येथे दि २७ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय उपाध्यक्ष बी. एल. वाड्मरे हे होते. सत्कारमूर्ती सेवानिवृत्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ के एस तूपसागर, थर्मल इंजिनीअर्स सोसाटीचे संचालकपदी हिमानी शिवाजी होटकर, कोषाद्यक्ष प्रदीप बुक्तार, राष्रीय वीज कर्मचारी सह पथसंस्थेचे संचालक अशोक व्हावळे, औष्णिक विद्युत केंद्र वसाहत गॅस वितरण संचालकपदी अनंत रोडे, कल्याण अधिकारी दिलीप वंजारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ॲड के एस तूपसागर पुढे म्हणाले कि सेवापूर्तीनंतर मी माझे

MB NEWS:लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा

इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा परळी वैजनाथ दि.२८ (प्रतिनिधी)            येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात शास्त्रज्ञ डॉ सि.व्ही.रमण यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.                लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विज्ञान विभागाच्या वतीने विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे, प्रा.डॉ.राजकुमार जोशी, प्रा.डॉ. रंजना शहाणे, प्रा.डॉ विवेकानंद कवडे, कार्यालयीन अधिक्षक अनिल पत्की यांच्या हस्ते शास्त्रज्ञ डॉ सी.व्ही रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ विवेकानंद कवडे यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य मुंडे म्हणाले की,  आजचे आधुनिक युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. या विज्ञान व तंत्रज्ञानाने जगात क्रांती घडवून आणली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आवश्यक असल्याचे मत डॉ मुंडे यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मनोगते व्