MB NEWS:बीडमधील महाप्रबोधन यात्रेला मोठा प्रतिसाद

भाजपचे हिंदुत्व गरिबांची घरे पेटवणारे: सुषमा अंधारे बीडमधील महाप्रबोधन यात्रेला मोठा प्रतिसाद बीड, : आम्ही महागाईवर बोलू लागलो की, मोदी हिंदू खतरे मैं है म्हणता. तुमचे हिंदुत्व हिंदुत्व नाही तर गोरगरिबांची घरे पेटवणारे आहे, अशी घणाघाती टिका सुषमा अंधारे यांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोप सभेत उपनेत्या सुषमा अंधारे बोलत होत्या. पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणल्या, लोकनेते मुंडे राहिले नाहीत, युती राहिली नाही अन् भाजपा सुद्धा पहिल्या सारखा राहिला नाही. भाजपने स्व. विनायकराव मेटे यांचा वापर करून घेतला, जानकर यांचा वापर केला, खोत यांचा वापर करून घेतला. आता सेनेतून फुटून गेलेल्या शिंदे गटाला वापरून घेत आहेत. महप्रबोधान यात्रा कोणावर टीका करण्यासाठी नाही तर जातीयवाद, धर्मांधता पसरवणाऱ्या भाजपच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आहे. 450 चे गॅस सिलेंडर 1200 रुपयावर गेले. 30 रुपये किलो मिळणारे पाम तेल 175 रूपयांपेक्षा अधिक झाले. आम्ही महागाईवर बोलू लागलो की मोदी हिंदू खतरे मै है, सांगतात. आम्हाला मोफत का...