पोस्ट्स

जानेवारी २४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS- *न.प.गटनेते वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त बाजीराव धर्माधिकारी यांच्या वतीने गुरुदास सेवा आश्रमाला सौरदिवा भेट* • _सोलार हायमास्टमुळे आश्रमाला मिळणार अखंडित प्रकाश;आश्रमात वीज उपलब्धतेसाठी मोठी उपयुक्तता_ •

इमेज
 *न.प.गटनेते वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त बाजीराव धर्माधिकारी यांच्या वतीने गुरुदास सेवा आश्रमाला सौरदिवा भेट* • _सोलार हायमास्टमुळे आश्रमाला मिळणार अखंडित प्रकाश;आश्रमात वीज उपलब्धतेसाठी मोठी उपयुक्तता_ • •  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      न.पचे गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेवाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त बाजीराव धर्माधिकारी यांच्या वतीने गुरुदास सेवा आश्रमाला सौरदिवा (सोलार हायमास्ट) भेट देण्यात आला. सामाजिक जाणिवेतून वाढदिवसाच्या निमित्ताने देण्यात आलेल्या या सौरदिवा (सोलार हायमास्ट) मुळे आश्रम व परिसर उजळून निघाला आहे.          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगर परिषद गटनेते वाल्मीक कराड यांच्या वाढदिवासनिमित्त माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या वतीने "गुरुदास सेवा आश्रम" घाटनांदुर येथे "सौर दिवा" बसविण्यात आला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मानवता आणि सर्वधर्म समभाव या विचारांच्या मूल्यावर "गुरुदास सेवा आश्रम" चालतो.या आश्रमास अनेक मूलभूत गरजा अत्यावश्यक असून यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड चे

MB NEWS-*अनुदान प्रश्न मार्गी लावण्यासाठी आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचा एल्गार; परळीत सहविचार सभा* ---------------------------

इमेज
  *अनुदान प्रश्न मार्गी लावण्यासाठी आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचा एल्गार; परळीत सहविचार सभा* --------------------------- * परळी*( प्रतिनिधी )  विना अनुदानित व अंशत:अनुदानित शाळेचा दि.१३ सप्टेंबर २०१९ नुसार घोषीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अनुदान मंजुर २० टक्के व वाढीव ४० टक्के चा निधी वितरणाचा आदेश तात्काळ काढावा व अघोषित सर्व शाळा कॉलेज निधीसह घोषीत करावे, या साठी शुक्रवार दि २९ पासुन आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे व आमरण उपोषण आंदोलन करण्यात येणार असून या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकवटण्यासाठी सोमवार दि.२५ रोजी परळी येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.         गेल्या २० वर्षापासुन होत असलेली पुरोगामी महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षकांची हेळसांड अजुन सुरूच आहे. १ सप्टेंबर २०१६ ला शासनाने २० टक्के अनुदान वितरित केले. परंतु टप्प्या टप्याने प्रचलित नियमानुसार अनुदान न देता गेल्या पाच वर्षांपासून शिक्षक २० टक्के प्रमाणे आजही पगार उचलत आहे. तसेच १३ सप्टेंबर २०१९

MB NEWS-औंढा, घृष्णेश्वर येथे अभिषेक अगोदरपासूनच सुरू मात्र परळीत होती "अभिषेकबंदी" ! वैजनाथ मंदिरात निजगाभारा सोडून छोट्या पिंडीवर अभिषेक करण्याची जिल्हाधिकार्यांची परवानगी; आता देवल कमिटीच्या निर्णयाची प्रतिक्षा

इमेज
  औंढा, घृष्णेश्वर येथे अभिषेक अगोदरपासूनच सुरू मात्र परळीत होती "अभिषेकबंदी" ! वैजनाथ मंदिरात निजगाभारा सोडून छोट्या पिंडीवर अभिषेक करण्याची जिल्हाधिकार्यांची परवानगी; आता देवल कमिटीच्या निर्णयाची प्रतिक्षा परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      मराठवाड्यातील ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंग मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली झाल्यानंतर अभिषेक,पुजा करण्यास परवानगी मिळण्याची श्रद्धाळु भाविक भक्त व ज्यांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे अशा पुरोहित वर्ग,पुजा, अभिषेक साहित्य छोटे व्यावसायिक यांना प्रतिक्षा होती. औंढा नागनाथ व घृष्णेश्वर या ठिकाणी अभिषेक अगोदरपासूनच सुरू झाले मात्र परळीत "अभिषेकबंदी" आहे.याबाबत आतावैजनाथ मंदिरात निजगाभारा सोडून छोट्या पिंडीवर अभिषेक करण्याची जिल्हाधिकार्यांची परवानगी मिळाली असुन यावर वैद्यनाथ देवल कमिटीच्या सकारात्मक निर्णयाची प्रतिक्षा आहे.           कोरोना संकटात असलेले धार्मिक स्थळे तब्बल अकरा महिन्यानंतर उघडण्यात आले यादरम्यान मंदिरातील पुरोहित वर्ग तसेच बेल फुल विक्रेते आणि प्रसाद विक्रेते यांच्यावर आलेले आर्थिक संकट दूर होण्याचे चिन

MB NEWS-महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ तालुका कार्यकारणी जाहीर

इमेज
  महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ तालुका कार्यकारणी जाहीर तालुका अध्यक्ष पदी प्रा.डॉ. जगदीश कावरे तर उपाध्यक्ष पदी सोपान चाटे यांची निवड  परळी वैजनाथ. महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ परळी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन तालुका अध्यक्ष पदी प्रा.डॉ. जगदीश कावरे तर उपाध्यक्ष पदी सोपान चाटे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. गणेश मानगुडे यांनी परळी वैजनाथ तालुका कार्यकारणी जाहीर केली असुन *तालुका अध्यक्ष* पदी प्रा.डॉ.जगदीश कावरे *उपाध्यक्ष* पदी सोपान चाटे,श्रीहरी गित्ते *संपर्कप्रमुख* शिवशंकर कराड,नितीन मुंडे *संघटक* कल्याण गित्ते, राजाभाऊ मुंडे, *प्रवक्ता* विलास अरगडे,नितीन मुळे *तांत्रिक समिती प्रमुख* महादेव दहिफळे *पैलवान सह्यता कक्षप्रमुख* विजय मुंडे,राहुल तिडके *प्रसिद्धी प्रमुख* माऊली मुंडे,देवराव कदम *मार्गदर्शक* दत्ताअप्पा ईटके,देवीदास कावरे,सुभाष नानेकर,नारायणदेव गोपणपाळे,सुरेश टाक,प्रा.अतुल दुबे  *सल्लागार* ऍड. अश्विन साळवे, गोविंद गित्ते,त्रिंबक तांबडे, *सदस्य* अजय गित्ते,अवधूत आयाचित,धन

MB NEWS-*पंकजाताई मुंडे यांच्या मध्यस्थीनंतर हिवरा येथील शेतकऱ्यांचे उपोषण मागे* _रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी सुरू होते उपोषण_

इमेज
  *पंकजाताई मुंडे यांच्या मध्यस्थीनंतर हिवरा येथील शेतकऱ्यांचे उपोषण मागे* _रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी सुरू होते उपोषण_  परळी । दिनांक २७ । भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मौजे हिवरा येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आज मागे घेतले. परळी तालुक्यातील मौजे हिवरा ते पारगाव या गट नंबर १७ मधील रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढावे या मागणीसाठी तेथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर दोन दिवसांपासून सुरू केले होते. पंकजाताई मुंडे यांनी आज उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या ऐकून घेतली आणि महसूलच्या अधिका-यांना या प्रकरणात अतिक्रमण करणा-या विरुध्द  तात्काळ कारवाई करण्यास सूचित केले. उप विभागीय अधिकारी नम्रता चाटे व नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांच्या आश्वासनानंतर आणि पंकजाताई मुंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले.    भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, हिवरा येथील भाजपा नेते वृक्षराज निर्मळ, बंडू निर्मळ, उपोषण कर्ते शेतकरी रघवीर रासवे, ज्ञानेश्वर म्हेत्रे, सुदाम

MB NEWS-अयोध्या श्रीराम मंदिरसाठी पंकजाताई मुंडे यांनी समर्पण केला पाच लाख रुपयाचा निधी

इमेज
अयोध्या श्रीराम मंदिरसाठी पंकजाताई मुंडे यांनी समर्पण केला पाच लाख रुपयाचा निधी माजलगाव, प्रतिनिधी....  अयोध्या श्रीराम मंदिरसाठी पंकजाताई मुंडे यांनी  पाच लाख रुपयाचा निधी आज समर्पण केला आहे. भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी श्री राम मंदिर आयोध्या मंदिरासाठी पाच लाख रुपयाचा समर्पण निधी आज माजलगाव येथे श्री. सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल कार्यक्रमात बीड जिल्हा राम मंदिर समितीकडे दिला.

MB NEWS-*कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

इमेज
  *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा* सोनपेठ दि.२६ (प्रतिनिधी) -           तालुक्यातील खडका येथील कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्था संचलित कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास खडका येथील पोलिस पाटील वैजनाथराव यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.          कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा प्रांगणात संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास मुख्याध्यापक डी.एल. सोनकांबळे, वसतीगृह अधिक्षक डी.एम.माने, शिक्षकवृंद सर्वश्री एस.डी.जालमिले, आर.बी.जोशी, एस.एम.राठोड, एस.जी.चव्हाण, ए.एस.चाटे, व्ही.पी.महाजन,एन.आर. निळे, वाय.डी. बाळके,राम देशपांडे, राहुल कुलकर्णी, धनंजय भिसेगावकर, राजु चव्हाण,बापु चव्हाण, शुभम चाकुरे, साहेब भालेराव, सोमनाथ सातपुते, दिलीप व्हावळे,लक्ष्मण आडे, मनिष चव्हाण,मंचक चाफुले,बंडु उपाडे, बाळासाहेब मोकाशे छाया मोरे, गंगाबाई चिंतलगिरे आदींच

MB NEWS-बीड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न*

इमेज
 * बीड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न* *प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिन समारंभानिमित्त दिल्या नागरीकांना शुभेच्छा* बीड, दि. २६ जानेवारी २०२०:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथील पोलीस मुख्यालय मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.  पालकमंत्री श्री मुंडे यांनी याप्रसंगी जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय प्रजासत्ताक निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या वीर शहिदांना अभिवादन करत राज्यघटना लिहिणाऱ्या संविधान कर्त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचेही यावेळी संस्मरण केले. यावेळी कोरोना आजारावर संशोधकांनी लस शोधण्यात यश मिळवण्याचा उल्लेख करून सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीची निर्मिती केली जात आहे महाराष्ट्र सरकारने यासाठी दिलेला पाठींबा महत्वपूर्ण आहे. अमेरिका, रशिया या देशांच्या बरोबरीने भारताची कामगिरी झाली असून त्याचा आनंद व्यक्त केला या पार्श्वभूमीवर आजचा समारंभ अत्यंत उत्साहाने पा

MB NEWS-पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातील जिल्ह्य़ात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक टोकवाडी ग्रामपंचायतीला प्रदान* ● _बीड येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात सन्मान_●

इमेज
  पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातील जिल्ह्य़ात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक टोकवाडी ग्रामपंचायतीला प्रदान   ● _बीड येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात सन्मान_● परळी वैजनाथ / प्रतिनिधी..         प्रत्येक सार्वजनिक कार्यात आपल्या सामाजिक जाणिवा दर्शवत काम करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रमांची जोड देत गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेल्या टोकवाडी ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या कामातह आपला ठसा उमटविलेला आहे.संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात बीड जिल्ह्यातून टोकवाडी ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे.या पार्श्वभूमीवर आज २६ जानेवारी रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात हे पारितोषिक प्रदान करण्यात आले.         टोकवाडीच्या सरपंच सौ. गोदावरी राजाराम मुंडे यांच्या माध्यमातून गावातील विविध विकासात्मक बदल मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य डाॅ. राजाराम मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली टोकवाडी येथे स

MB NEWS- Breaking:तळेगाव जवळ मोटारसायकल चा भिषण अपघात

इमेज
  तळेगाव जवळ मोटार सायकलचा भिषण अपघात    परळी वैजनाथ, प्रतिनिधी       परळीपासून जवळच बीड रस्त्यावर तळेगाव जवळ एका मोटारसायकल चा भिषण अपघात घडला आहे.या अपघातात एक जागीच ठार तर एक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.        • सविस्तर बातमी : थोड्या वेळात•

MB NEWS- *सहका-याच्या जाण्याने पंकजाताई मुंडे झाल्या भावूक !* *अभय चाटे यांच्या कुटूंबियांचे केले सांत्वन*

इमेज
 *सहका-याच्या जाण्याने पंकजाताई मुंडे झाल्या भावूक !* *अभय चाटे यांच्या कुटूंबियांचे केले सांत्वन* परभणी । दिनांक २५ । कार्यकर्ता आणि नेत्याचे नाते हे जिव्हाळ्याचे तर असतेच पण त्याला भावनिकतेचीही किनार असते याचा प्रत्यय आज आला. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले, त्यांच्या निधनाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना धक्का बसला, आज शहरात येताच त्यांनी त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन सात्वंन केले. त्यांच्या कुटुंबियांना धीर देताना त्या भावूक झाल्या होत्या. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे खंदे समर्थक असलेले अभय चाटे हे परभणी भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. जिल्हयात अतिशय चांगले काम त्यांनी केले होते, याशिवाय पंकजाताई मुंडे यांच्या संघर्षयात्रेचे एक प्रमुख शिलेदारही होते. या तरूण उमद्या कार्यकर्त्याचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. पंकजाताई मुंडे यांनी आज परभणीत येऊन त्यांच्या आई, पत्नी तसेच कुटुंबियांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. पंकजाताई यांना पाहताच त्यांचे अश्रू अनावर झाले, यावेळी अभय चाटे यांच्या आठवणीने पंकजाताई देखील भावूक झाल्या होत्या. राजकारण

MB NEWS-नागापुर येथील नागनाथ महाराज यात्रा महोत्सव रद्द

इमेज
नागापुर  येथील नागनाथ महाराज यात्रा महोत्सव रद्द  परळी l प्रतिनिधी तालुक्यातील मौजे नागापूर येथे दरवर्षी साजरा होणारा नागनाथ यात्रा महोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे देवस्थान कमिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे. तीन दिवस हा यात्रा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. या तीन दिवसांत अनेक प्रकारच्या स्पर्धा आणि कार्यक्रम होत असतात. नागापूर येथील नागनाथ महाराज यात्रा महोत्सव यंदा होणार नाहीये, यात्रे निमित्त दरवर्षी कुस्ती , पशुप्रदर्शन ,  विविध खेळ स्पर्धा व महाराज पालखी व श्री महाप्रसाद  इ कार्यक्रम होतात यावर्षी 24 ,25, 26 या तारखेला होती ती रद्द करण्यात आली आहे. नागनाथ देवस्थान कमिटीच्या वतीने विश्वस्थ बलासाहेब मिसाळ अध्यक्ष कुंडलिकराव सोळंके सेक्रेटरी, प्रभुआप्पा तोंडारे अर्जुनराव सोळंके, हणमंत कुलकर्णी यांनी माहिती दिली.

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते वैद्यनाथ साखर कारखाना येथे होणार ध्वजारोहण

इमेज
  पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते वैद्यनाथ साखर कारखाना येथे होणार ध्वजारोहण परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि., पांगरी येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंगळवार दिनांक 26/01/2021 रोजी सकाळी 09.30 वा. कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.यावेळी संचालक मंडळ व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी सर्वांनी ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन कार्यकारी संचालक वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि., पांगरी यांनी केले आहे.

MB NEWS-राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन! सरकार च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केला निषेध!

इमेज
  राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन! सरकार च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केला निषेध! प्रतिनिधी(परळी)- राज्यशासनाने मराठा समाजाच्या युवकांना डावलून पोलीस भरती व आरोग्य खात्याचे नोकरभरती सुरू केली असून याच्या निषेधार्थ बीड जिल्ह्याच्या परळी येथे मराठा क्रांती ठोक मोर्च्याचे राज्य समन्वयक अमित घाडगे व देवराव लुगडे, संतोष सोळंके, शिवराज जोगदंड,ओम काळे, अरुण सपाटे, निकेश पाटील व इतर उपस्थित होते. राज्यसरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन छत्रपती संभाजी चौकात करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.  यावेळी सारकारच्या आडमुठ्या धोरणाबाबत उदासीनता दाखवीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सरकारने याकडे गांभीर्याने नाही घेतले तर लवकरच आंदोलन करणार असल्याचा मराठा क्रांती ठोक मोर्च्याचे समन्वयक अमित घाडगे यांनी इशारा दिला आहे.

MB NEWS-प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण.

इमेज
  प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे  यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण बीड, दि. 25 :- (जि.मा.का.) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 वा वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दि.26 जानेवारी 2021 रोजी बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे. याच बरोबर जिल्हयात विविध ठिकाणी ध्वजारोहण केले जाणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण जिल्हाधिकारी राजेद्र जगताप यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी सकाळी 8.25 वाजता होणार आहे तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील ध्वजारोहणाचा कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी बीड यांच्या हस्ते सकाळी 7.45 वाजता संपन्न होणार असून दोन्हीही ध्वजारोहण समारंभ संपल्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हा पोलीस मुख्यालय मैदान बीड येथील ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभास सकाळी 8.45 पूर्वी शासकीय गणवेषात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परिपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

MB NEWS-*लोकनेते मुंडे साहेबांची अपूर्ण लढाई लढायचीयं - पंकजाताई मुंडे* *जनगणनेची मागणी ओबीसींना न्याय देण्यासाठीच*

इमेज
  *लोकनेते मुंडे साहेबांची अपूर्ण लढाई लढायचीयं - पंकजाताई मुंडे* *जनगणनेची मागणी ओबीसींना न्याय देण्यासाठीच*  औरंगाबाद । दिनांक २५ । जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. याच्यात प्रत्येत गोष्टी रडारवर येतील आणि स्पष्ट होतील. ओबीसींना आणि वंचित समुदायाला न्याय देण्यासाठी आपण जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे, लोकनेते मुंडे साहेबांची ही अपूर्ण लढाई मला लढायचीयं असा पुनरूच्चार भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केला.    या प्रश्नांवर पुढे बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या,   ओबीसी समाजाच्या जनगणनेची मागणी मी केली आहे. कोणत्याही पदावर नसताना ही चळवळ मला लढायची आहे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही भूमिका मुंडे साहेबांनी वेळोवळी मांडली. खासदार डाॅ. प्रीतमताई मुंडे यांनी देखील संसदेत आवाज उठवला आहे. आता जनगणना होणार आहे, जनगणना होत असताना ती पाऊलं सकारात्मक पडली पाहिजेत. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. याच्यात प्रत्येक गोष्टी रडारवर येतील आणि स्पष्ट होतील. त्या समुदायाला न्याय देण्यासाठी मदत होईल,” असं त्या म्हणाल्या. जालना येथील ओबीसी मोर्चातील अनुपस्थिती बद्द

MB NEWS-अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद परळीच्या कायदेविषयक सल्लागार पदीअॅड.आर.व्हि. गित्ते, अॅड.पी.एम.सातभाई तर वैद्यकीय विभाग प्रमुख पदी डॉ.राजाराम मुंडे*

इमेज
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद परळीच्या कायदेविषयक सल्लागार पदीअॅड.आर.व्हि. गित्ते, अॅड.पी.एम.सातभाई तर वैद्यकीय विभाग प्रमुख पदी डॉ.राजाराम मुंडे* परळी वैजनाथ (प्रतिनिधी)      पत्रकार संघटनांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या परळी शाखेची नुतन कार्यकारीणी निवडण्यासाठी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत सर्वानुमते नविन कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद परळीच्या कायदेविषयक सल्लागार पदी प्रसिद्ध विधिज्ञ अॅड.आर. व्हि. गित्ते, अॅड.पी.एम.सातभाई तर वैद्यकीय विभाग प्रमुख पदी प्रसिद्ध डॉ.राजाराम मुंडे यांची निवड करण्यात आली आहे.ही संपुर्ण निवड प्रक्रिया समन्वयक धनंजय आरबुने यांनी पार पाडली.           परळीत आज दि.२४ रोजी अ.भा.मराठी पत्रकार परिषदेची नविन कार्यकारीणी निवडण्यासाठी बैठक घेण्यात आली. संपादक सतिष बियाणी, संपादक राजेश साबणे, जेष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे, प्रशांत प्र.जोशी, संपादक आत्मलिंग शेटे, मोहन व्हावळे, ओमप्रकाश बुरांडे, प्रा.रविंद्र जोशी, प्रकाश चव्हाण,बालासाहेब फड, विश्वास महाराज पांडे, नरसिंग अन्नलदास आदी जेष्ठांच्या प्रमु

MB NEWS- *अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची परळी कार्यकारीणी जाहिर* तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, शहराध्यक्ष जगदीश शिंदे तर कार्याध्यक्षपदी अनंत कुलकर्णी यांची निवड_

इमेज
 *अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची परळी कार्यकारीणी जाहिर* तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, शहराध्यक्ष जगदीश शिंदे तर कार्याध्यक्षपदी अनंत कुलकर्णी यांची निवड_    परळी (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या परळी शाखेची नुतन कार्यकारीणी निवडण्यासाठी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत सर्वानुमते नविन कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी दै.मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक दत्तात्रय काळे, तर शहराध्यक्षपदी दै.गावकरीचे तालुका प्रतिनिधी जगदीश शिंदे तर दै.झुंजार नेताचे तालुका प्रतिनिधी अनंत कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. तालुका सचिवपदी स्वानंद पाटील तर शहर सचिवपदी प्रा.प्रविण फुटके यांची निवड करण्यात आली. निवडीची सर्व प्रक्रिया समन्वयक धनंजय आरबुने यांनी पार पाडली. साथी सभागृह येथे आज दि.२४ रोजी अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे व जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर व जिल्हा कार्यकारीणीच्या मार्गदर्शनाखाली परळी शाखेची नविन कार्यकारीणी निवडण्यासाठी बैठक घेण्यात आली. संपादक सतिष बियाणी, संपादक राजेश साबणे, जेष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे, प्रशांत प्र.जोशी, संपादक आत्मलिं

MB NEWS- *ओबीसींची जनगणना करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी* *मुंडे साहेबांच्या लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ केला ट्विट*

इमेज
  *ओबीसींची जनगणना करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी*  *मुंडे साहेबांच्या लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ केला ट्विट* मुंबई दि. २४ --- आम्हीही याच देशातील आहोत, आमचीही जनगणना करा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. ओबीसींची जनगणना आवश्यक आणि अनिवार्य असल्याचे ट्विट करत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ त्यांनी ट्विट केला आहे.    आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असतानाच भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. एक ट्विट करून त्यांनी ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सन 2010 मध्ये लोकसभेत केलेल्या भाषणाचा व्हिडीओ देखील त्यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीसोबत पंकजाताई मुंडे यांनी ‘आम्हीही याच देशातील आहोत, आमचीही जनगणना करा… ओबीसींची जनगणना आवश्यक आणि अनिवार्य आहे’, अशी कॅप्शन लिहिली आहे. येणारी 2021 सालची जनगणना ही जातीनिहाय करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.  ••••