MB NEWS-शिवसेना सामाजिक हित जोपासणारे संघटना-अभयकुमार ठक्कर* *55 वृक्ष भेट; 55 आरोग्य सेवकांचा सन्मान; 5555 बीज वाटप* *परळीत शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा*

* शिवसेना सामाजिक हित जोपासणारे संघटना-अभयकुमार ठक्कर* *55 वृक्ष भेट; 55 आरोग्य सेवकांचा सन्मान; 5555 बीज वाटप* *परळीत शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा* *परळी वैजनाथ (प्रतिनिधी)* हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गाने व शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व विद्यार्थी सेना/युवासेना प्रमुख ना.आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सामाजिक हित जोपासणारे व लोकसेवेचे व्रत हाती घेतलेले संघटना आहे असे मनोगत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त नंदागौळ रोडवरील वनराईला 55 वृक्षांची भेट देण्यात आली असून 55 आरोग्य सेवकांचा सन्मान व 5555 बीज वाटप करण्यात आले. परळी प्रभू वैद्यनाथांच्या भूमित शिवसेना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या आरंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात...