MB NEWS:महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून पवार साहेबांनी लोकशाहीची ताकत दाखवून दिली - धनंजय मुंडे*

* महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून पवार साहेबांनी लोकशाहीची ताकत दाखवून दिली - धनंजय मुंडे* *भाजपला आता 'जय' चालत नाहीत, जयसिंगराव गायकवाड यांच्या राजीनाम्यावरून मुंडेंची भाजपला टोलेबाजी* परभणी (दि. २१) ----- : ५६ आमदार असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री, ५४ आमदार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री, ४४ आमदार असलेल्या काँग्रेसचे मंत्री आणि सर्वाधिक १०५ आमदार असलेला भाजप विरोधी पक्षात ही केवळ लोकशाहीची ताकत असून ही किमया करणारे खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी भाजप नेत्यांमधून आत्मविश्वास काढून घेतला आहे, पराभूत मानसिकतेत भाजप पदवीधरची निवडणूक लढवत आहे, असे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परभणी येथे आयोजित पदवीधर व कार्यकर्ता मेळाव्यात ना. मुंडे बोलत होते. धनंजय मुंडे यांच्या आधी नव्यानेच भाजपला सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मंचावर येऊन आपल्या भाषणातून आपल्या व्यथा मांडल्या. श्री गायकवाड या...