पोस्ट्स

ऑगस्ट २८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-अजय अतुल गोपीनाथ गडावर

इमेज
  अजय अतुल  गोपीनाथ गडावर अंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम गायक-संगीतकार अजय-अतुल यांनी परळी येथे धनंजय मुंडे यांच्या निमंत्रणानुसार नाथ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त आले असता माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिस्थळी भेट देऊन स्व. मुंडे साहेबांना अभिवादन केले. यावेळी धनंजय मुंडे यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याबद्दल अजय व अतुल गोगावले यांना माहिती देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

MB NEWS-*गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या गौरी - गणपती स्पर्धा महोत्सवासाठी २हजार ३९१ स्पर्धकाची नोंदणी*

इमेज
  गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या गौरी - गणपती स्पर्धा महोत्सवासाठी २हजार ३९१ स्पर्धकाची नोंदणी *पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे घरोघरी जाऊन करणार देखावा, सजावटीची पाहणी* _तज्ज्ञ महिला परिक्षकांची टीम  स्पर्धा परिक्षणासाठी सज्ज_ परळी । दिनांक ०३। गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि द टर्निंग पॉईंट यांच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या गौरी - गणपती स्पर्धा महोत्सवासाठी सुमारे दोन  हजार ३९१ स्पर्धकांची विक्रमी नोंदणी झाली आहे. येत्या सोमवारी ५ तारखेला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे स्पर्धकांच्या घरोघरी जाऊन देखाव्याची पाहणी करणार आहेत.  तज्ज्ञ महिला परिक्षकांच्या देखरेखीत स्पर्धेचे परीक्षण होणार आहे.     शहरातील स्थानिक कलाकार व गृहिणींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने हा स्पर्धा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे हया स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या पण यंदा कोरोनाचे सावट दूर झाले आणि सर्वत्र उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असल्याने हया स्पर्धा देखील मोठया उत्साहाने पार पडत आहेत.    या स्पर्धा महोत्सवासाठी

MB NEWS -धर्मापुरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीमेचे आयोजन

इमेज
  धर्मापुरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीमेचे आयोजन  धर्मापुरी । प्रतिनिधी धर्मापुरी येथील प्राचीन भुईकोट किल्ला व केदारेश्वर मंदिर येथे  दि.४ सप्टेंबर रोजी दुर्ग संवर्धन व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्ग संवर्धन कार्यासाठी देशभरात कार्यरत असलेल्या राजा शिवछत्रपती परिवार व बा रायगड परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मोहिमेत किल्ल्याच्या तटबंदीवरील गवत, मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढले गेलेले अवशेष काढणे, प्लास्टिक कचरा गोळा करणे इत्यादी कामे आणि पुरातन वस्तू व वास्तू जतन करण्यासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे.  बा रायगड परिवार, राजा शिवछत्रपती परिवार बीड व लातूर विभाग, इतिहास संकलन समिती आणि सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनसह नागरिक या मोहिमेस उपस्थित राहणार आहेत. या मोहिमेत इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे असे आवाहन राजा शिवछत्रपती परिवार व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे करण्यात आले आहे.

MB NEWS: गोपाळ आंधळे यांचा विशेष लेख:विघ्नहर्ता श्री.गणेशाचे जन्मस्थान प्रभाकर क्षेञ म्हणजेच आजचे परळी वैद्यनाथ!

इमेज
  विघ्नहर्ता श्री.गणेशाचे जन्मस्थान प्रभाकर क्षेञ म्हणजेच आजचे परळी वैद्यनाथ! -----------‐---------------------- ✍️ विशेष लेख:गोपाळ आंधळे,परळी वै.  -----------‐---------------            सर्व विद्यांचा अधिपती म्हणजे श्री गणेश भगवान ते समूळ सृष्टी चे विघ्नहर्ता आहेत. बुध्दिची देवता म्हणून सर्व देवतांनी आणि ऋषीमूनींनी गणरायांना प्रथम स्थान दिले आहे. कुठलेही कार्यसिध्दी करण्यासाठी प्रथम श्री गणेशाची आराधना करावी लागते. असे धर्मशास्ञ सांगते. अशा या विघ्नहर्त्या गणेशांची जन्म भूमी ही दुसरी तिसरी कोठे नसून वैवस्वत मन्वंतरात ज्या तिर्थक्षेत्रात प्रभाकर क्षेञ म्हणून उल्लेख येतो ते तिर्थक्षेत्र म्हणजेच  आजचे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र हेच होय.       भगवान श्री गणेशाची जन्म कथा पुराणात अशी आलेली आहे की,एकदा ब्रम्हदेव अत्यंत क्रोधित असतांना त्यांचा संबंध महाजृभेशी झाला. त्यातून एक अपत्य जन्मास आले. तो दिसायला खूप सुंदर होता. त्याचा वर्ण शेंदराप्रमाणे लाल असल्यामुळे त्यास सिंदूर म्हणून संबोधले जाऊ लागले. ब्रम्हदेवाने या आपल्या मुलाला प्रसन्न होऊन वर दिला की,तू ज्या कोणाला मिठीत घेशी

MB NEWS-जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर:परळीतील दोघांचा समावेश

इमेज
  जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर: परळीतील दोघांचा समावेश बीड – जिल्हा परिषदेच्या वतीने यावर्षी दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.जिल्ह्यातून अकरा प्राथमिक, दहा माध्यमिक आणि एका विशेष शिक्षकाचा गौरव करण्यात येणार आहे. बीड जिल्हा परिषदेने यावर्षी सीईओ अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारासाठी निवड समिती गठीत केली होती.या समितीने जिल्ह्यातील अर्ज केलेल्या शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर जिल्ह्यातून या बावीस शिक्षकांची आदर्श शिक्षक म्हणून निवड केली आहे.यामध्ये सय्यद हशमोद्दीन अंबाजोगाई,लाड गोरक्षनाथ आष्टी,उशाबाई ढेरे बीड,गणेश नरके धारूर,भगवान फुंदे गेवराई,धम्मदीपा दरबारे केज,पाचनकर सुनंदा माजलगाव,सौदागर कांदे परळी,अण्णासाहेब खंडागळे पाटोदा,सुभाष सांगळे शिरूर,सुवर्ण सुतार वडवणी यांना प्राथमिक विभागातून तर संजय तांदळे अंबाजोगाई,संजय कोळी आष्टी,रवींद्र देवगावकर बीड,चांदबा वाघमारे धारूर,विष्णू साळुंके गेवराई,रामकृष्ण भारती केज,बाळासाहेब सोनसळे माजलगाव,पठाण इमरान परळी,विजयकुमार साळुंके पाटोदा,राम वाघूम्बरे शिरूर यांना माध्यमिक विभागातून तसेच अमोल शिं

MB NEWS-बनावट सोने देऊन केली 14 लाखाची फसवणूक; सराफा व्यापाऱ्याला गंडा

इमेज
  बनावट सोने देऊन केली 14 लाखाची फसवणूक;  सराफा व्यापाऱ्याला गंडा परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      सिरसाळा येथील एका सराफा व्यापाऱ्याला सोन्या चांदीची खरेदी विक्री करून विश्वासात घेऊन बनावट सोन्याची नाणी देऊन चौदा लाख रुपयाला गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सिरसाळा पोलीस करीत आहेत.          याबाबत सिरसाळा पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार दिनांक  24 6 2022  रोजी शिवम ज्वेलर्स सिरसाळा येथे फिर्यादी समाधान अशोकराव उबाळे रा. वाघाळा यांच्या सोन्या-चांदीच्या दुकानी आरोपी रामसिंग डांगुर रा. वांगी ता. माजलगाव व अन्य दोन अनोळखी इसम आले. फिर्यादीच्या शिवम ज्वेलर्स या दुकानी जाऊन सोन्या चांदीची खरेदी विक्री करून विश्वास संपादन करून सराफा व्यापाऱ्याला पंधरा नाणी ज्याचे वजन 298 ग्रॅम सोन्याची आहेत म्हणून दिली. फिर्यादीकडे त्याची विक्री करून फिर्यादी कडून 14 लाख रुपये घेऊन निघून गेले. फिर्यादीने या नाण्याची खात्री करण्यासाठी सोन्याचे नाणे गरम करून उकळून खात्री केली असता हि नाणी सोन्याची नसून मिश्रधातूची असल्याचे ल

MB NEWS-'न्यूज मेकर' भाजपा नेत्या पंकजा मुंडे बनल्या 'न्यूज अ‍ॅंकर'

इमेज
'न्यूज मेकर' भाजपा नेत्या पंकजा मुंडे बनल्या 'न्यूज अ‍ॅंकर' मुंबई, 1 सप्टेंबर :  भाजप नेत्या पंकजा मुंडे या आज अँकरच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या. यानिमित्ताने पंकजा मुंडेंमधील विविध कलांची जनतेला ओळख झाली. न्यूज मेकर पंकजा मुंडेनी आज पत्रकारांना प्रश्न विचारले. आणि पत्रकारांनीही खुलेपणाने त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. आज ठिकठिकाणी दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन सुरू आहे. यादरम्यान पंकजा मुंडेंनी पुणे आणि मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधला आणि तेथील परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या बस बाई बसच्या मंचावर दिसल्या होत्या. यावेळीही त्यांनी खुलेपणाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली. याशिवाय झी मराठीच्या उंच माझा झोका या कार्यक्रमातही त्या दिसून आल्या होत्या. यावेळी त्यांनी सूत्रसंचालन केलं. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे अशा विविध प्लॅटफॉर्मवर सक्रिय झाल्याच्या दिसून येत आहे.

MB NEWS-डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांची पुण्यतिथी साजरी: समाजबांधवांचा सन्मान

इमेज
  डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांची पुण्यतिथी साजरी: समाजबांधवांचा सन्मान  परळी/प्रतिनिधी श्री.संत गुरूलिंग स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा सप्ताहचा तिसरा दिवस तसेच राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांची दि.1 सप्टेबर रोजी तारखेनुसार पुण्यतिथी यानिमित्त राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती व लिंगायत समाज बांधवांच्या वतीने श्री.संत गुरूलिंग स्वामी व राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नामांकीत जी.के.फाऊंडेशन पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल दैनिक लोकमतचे पत्रकार श्री.संजय खाकरे, काशीपीठाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.चेतनाताई गौरशेट्टे,परळी ईनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ.उज्वलाताई आलदे तसेच सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर श्री.गणपतअप्पा हरंगुळे, श्री.जगदीशअप्पा मिटकर यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच श्री.प्रकाशअप्पा खोत व सप्ताहातील अन्नदाते श्री.विजय नरवणे,अ‍ॅड.गिरीष नरवणे यांचा सत्कार श्री.संत गुरूलिंग स्वामी मंदीर,बेलवाडी येथे  करण्यात आला.

MB NEWS- *महाराष्ट्र विद्यालयाचा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र*

इमेज
 *महाराष्ट्र विद्यालयाचा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र* परळी / प्रतिनिधी परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालयाचा विद्यार्थी शुद्धोधन अशोक शिंदे हा (एन एम एम एस ) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ग्रामीण भागातील नामांकित व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य शाळेतील 2  विद्यार्थी एन.एम.एम.एस या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून   शुद्धोधन अशोक शिंदे हा विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण होत एन एम एम एस राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्तीकरिता तो पात्र ठरला आहे. त्याला केंद्र शासनाची प्रतिवर्ष 12000 याप्रमाणे सलग चार वर्ष एकूण 48 हजार अशी शिष्यवृत्ती मिळणार आहे.तर शाळेची दुसरी विद्यार्थिनी सायली प्रल्हाद राजमाने ही देखील या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाली असून केवळ 2 गुणाने तिचा गुणवत्ता यादीत समावेश न झाल्याने शिष्यवृत्ती मिळण्यापासून वंचीत राहिली.शालेय विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गु

MB NEWS-शनैश्चर अर्बन निधी लिमिटेड चा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ

इमेज
 * श्री.शनैश्चर अर्बन निधी लिमिटेड ग्राहकांचा विश्वास नक्कीच जिंकेल असा विश्वास प.पू.गुरुवर्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांनी व्यक्त केले.* *ग्राहकांचा विश्वास हीच विकासाची गुरुकिल्ली...बाजीराव धर्माधिकारी*  शनैश्चर अर्बन निधी लिमिटेड चा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ परळी वैजनाथ दि.०१ (प्रतिनिधी)           येथे श्री.शनैश्वर प्रतिष्ठान संचलित श्री. शनैश्चर अर्बन निधी लिमिटेडचा गुरुवारी (ता.०१) भव्य शुभारंभ श्रीगुरु वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर व बाजीराव धर्माधिकारी बोलत होते. क्लिक करा व पहा:   धनंजय मुंडेंचा शायराना अंदाज            येथील श्री.शनैश्वर प्रतिष्ठान सामाजिक संस्था विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असते.या संस्थेने गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर श्री शनैश्चर अर्बन निधी लिमिटेडचा शुभारंभ श्रीगुरु वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या हस्ते व वैद्यनाथ बँकेचे माजी अध्यक्ष अशोक सेठ जै

मिरवट ग्रामस्थांचा आदर्श:जिल्हा परिषद शाळेसाठी जमा केले साडेतीन लाख रुपये!

इमेज
मिरवट ग्रामस्थांचा आदर्श: जिल्हा परिषद शाळेसाठी जमा केले साडेतीन लाख रुपये! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        जिल्हा परिषदेची शाळा ही खऱ्या अर्थाने गावची शाळा असते आणि या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा विकास म्हणजे गावच्या भविष्यातील पिढ्यांचा विकास असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही शाळेसाठी आमच्या सर्वांच्या खिशातून रुपये 3 लाख 50 हजार रुपये मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करत आहोत असे म्हणत मिरवट तालुका परळी वैजनाथ येथील गावकऱ्यांनी शाळेप्रती आपली आपुलकी व्यक्त केली. क्लिक करा व पहा:   धनंजय मुंडेंचा शायराना अंदाज जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काही भौतिक सुविधा आणि शैक्षणिक सुविधा यांच्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे असे मुख्याध्यापक श्री हाडबे  टी. एन. आणि शिक्षकांनी गावकऱ्यांकडे व्यक्त केल्यानंतर गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन शाळेसाठी निधी जमा केला. आपल्या गावचे सर्व शिक्षक अतिशय तळमळीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी काम करत असून त्यांना काही भौतिक सुविधा कमी पडत आहेत असे लक्षात आल्यानंतर मिरवट येथील गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शाळेच्या विकासासाठी निधी जमा केला.  Click&watch :
इमेज
 *सेलू (परळी) सेवा सोसायटी  पंकजाताई मुंडेंच्या ताब्यात ; १३ पैकी ११ संचालक विजयी*  *जनसेवा शेतकरी विकास पॅनलने मारली बाजी ; पंकजाताईंनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन* परळी  । दिनांक ०२।    तालुक्यातील सेलू परळी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे.   पॅनलच्या  १३ पैकी ११ उमेदवारांनी बाजी मारत विजय खेचून आणला. विजयी उमेदवारांचे पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.  Click&watch : ● पंकजा मुंडे-भाजप आणि महादेव जानकरांचं सूचक विधान.   सेलू परळी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या १३ पैकी ११ जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. दोन संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले असल्याने उर्वरित जागांसाठी मतदान झाले. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा शेतकरी विकास पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलचा पराभव करत सर्व ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला.  या निवडणुकीत पॅनलचे विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे - संतराम केंद्रे, दत्तात्रय गुट्टे, बालासाहेब घोडके, रामचंद्र फड, रमेश
इमेज
  वैद्यनाथ विद्यालयाचा पंकज नाईकवाडे एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठी पात्र  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       येथील वैद्यनाथ विद्यालय (मा) शाळेचा विद्यार्थी पंकज नाईकवाडे हा (एन एम एम एस) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. क्लिक करा व पहा:   धनंजय मुंडेंचा शायराना अंदाज        वैद्यनाथ विद्यालय (मा) परळी वैजनाथ शाळेतील विद्यार्थी पंकज बालासाहेब नाईकवाडे याने एन एम एम एस राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा घवघवीत यशाने उत्तीर्ण केली असून तो शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. त्याला केंद्र शासनाची प्रतिवर्ष 12 000 याप्रमाणे सलग चार वर्ष एकूण 48 हजार अशी शिष्यवृत्ती मिळणार आहे .या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून शाळेच्या वतीने त्याचा आई-वडिलांसह सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते . Click&watch : ● पंकजा मुंडे-भाजप आणि महादेव जानकरांचं सूचक विधान.
इमेज
" त्या" लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा:  पिडीता आठ महिन्याची गरोदर  गेवराई .... गेल्या दोन दिवसांपुर्वी अपहरण करूण तिच्यावर बीड याठिकाणी एका कॉफीशॉफ मध्ये बलात्कार केला असल्याची फिर्याद गेवराई पोलिसांंत दोन दिवसांपुर्वी दाखल करण्यात आली होती या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या तसेच तपासांत यामध्ये मोठा खुलासा झाला आहे पिडीत अल्पवयीन मुलगी ही सात ते आठ महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक बाब समोर आली असल्याने या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे . Click : ● पंकजा मुंडे-भाजप आणि महादेव जानकरांचं सूचक विधान.      आपल्या चुलती सोबत गेवराई याठिकाणी कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या एका ( १६ वर्षिय ) मुलीचे दोन मुलांनी अपहरण करूण तिच्यावर बीडच्या  एका कॉफीशॉप मध्ये  अत्याचार केला.  या प्रकरणात दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत दोन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी वाढणार असल्याचे शक्यता नाकारता येत नाही या प्रकरणी कसून तपास करूण योग्य ती कार्यवाई करू असे पोलिस उप अधीक्षक स्वप्निल राठोड यांनी सांगितले आहे .
इमेज
  अचानक पाउस सुरु;वीज पडून महिला ठार तर नवरा जखमी केज (दि. ३१) :-  केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे सायंकाळी ७:०० च्या दरम्यान वीज पडून एक महीला दगावली आहे तर तिचा पती जखमी झाला आहे. या बाबतची माहिती अशी की, बुधवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:०० च्या दरम्यान रामचंद्र चंद्रकांत आगे त्यांची पत्नी शिला रामचंद्र आगे आणि आत्माराम माणिक आगे व अन्नपूर्णा आत्माराम आगे हे शेतातील कामे आटोपून गावातोल गावाकडे येत असताना अचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आणि अचानक विजेचा कडकडाट होऊन शिला रामचंद्र आगेवय (३५ वर्ष) हिच्या अंगावर विजेचा लोळ पडला यात तिचा जागीच मृत्यू झाला तर तिच्या शेजारी असलेले तिचा नवरा रामचंद्र चंद्रकांत आगे वय (४० वर्ष) हे जखमी झाले आहेत तर आत्माराम माणिक आगे व अन्नपूर्णा आत्माराम आगे हे मात्र सुखरूप आहेत. दरम्यान या नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळताच तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी तलाठी सोनवणे यांना पंचनाम्याचे आदेश दिले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार राजू गुंजाळ यांनी उत्तरीय तपासणी व सहवं विच्छेदन करण्यासाठी मृतदेह उपजिल्हा रु
इमेज
 *परळीची जनता म्हणजे माझे प्राण - धनंजय मुंडे* * तेरे लष्कर के मुकाबले मे अकेला हूं, मगर फैसला मैदान मे होगा, की मरता कौन है? - धनंजय मुंडेंचे खास शायरीतून आव्हान* *नाथ प्रतिष्ठाणच्या माध्यमातून जनसेवेची व सांस्कृतिक सेवेची परंपरा अखंडित ठेवणार - मुंडेंची घोषणा* धनंजय मुंडेंसह सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, हेमांगी कवी, तेजा देवकर, प्राजक्ता गायकवाड, पूनम कुडाळकर यांचीही उपस्थिती *नाथ प्रतिष्ठाणच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाचे शानदार उद्घाटन* *नाथ प्रतिष्ठाणच्या सर्व गणेशोत्सवात मी उपस्थित, धनुभाऊ बोलावतील तेव्हा पुन्हा उपस्थित राहणार - सोनाली कुलकर्णी* परळी (दि. 31) - परळीच्या मातीशी माझी नाळ घट्ट जोडलेली आहे, इथल्या माणसाचे सुख-दुःख हे माझे आहे असे समजून मी सेवाकार्य करत आलो आहे, माझ्या प्रत्येक लढाईत माझ्यासाठी लढणारी माझी ही जनता हा माझा प्राण आहे, असे उद्गार माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहेत.  धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाणच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाचे धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शानदार सोहळ्यात उद्घाटन संपन्न झा
इमेज
  वैद्यनाथ बँकेत गणरायांचे आगमन! परळी (प्रतिनिधी) परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ अर्बन को ऑप बँकेच्या मुख्य शाखेत श्री गणरायांचे थाटामाटात आगमन झाले. बँकेचे व्हा. चेअरमन रमेशराव कराड व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुचिता रमेशराव कराड यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी वैद्यनाथ बँकेत गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षीही विधिवत श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. रमेशराव कराड व सौ. सुचिता कराड यांच्या हस्ते पहिल्या दिवशीची स्थापना पूजा संपन्न झाली. यावेळी बँकेचे सर्व संचालक, पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
  शनैश्चर अर्बन निधी लिमिटेड चा मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या शुभारंभ परळी वैजनाथ दि.३१ (प्रतिनिधी)           येथे श्री.शनैश्वर प्रतिष्ठान संचलित श्री. शनैश्चर अर्बन निधी लिमिटेडचा गुरुवारी (ता.०१) भव्य शुभारंभ श्रीगुरु वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या शुभारंभ कार्यक्रमास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष वैजनाथ बेंडे व संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे.                    येथील श्री.शनैश्वर प्रतिष्ठान सामाजिक संस्था विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असते.या संस्थेने गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर श्री शनैश्चर अर्बन निधी लिमिटेडचा शुभारंभ श्रीगुरु वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या हस्ते व वैद्यनाथ बँकेचे माजी अध्यक्ष अशोक सेठ जैन यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सेठ सामत, राजस्थानी मल्टिस्टेटचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, लोकमान्य पथसंस्थेचे अध्यक्ष पी.एस.घाडगे, सावरकर पथसंस्थेचे चेअरमन बाजीराव धर्माधिक
इमेज
 सोनिया गांधी यांच्या मातोश्रींचे निधन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या आई श्रीमती पाओला माइनो यांचे शनिवारी 27 ऑगस्ट, 2022 रोजी इटलीतील त्यांच्या घरी निधन झाले. त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत दिली आहे.
इमेज
 * नागापूरचा ट्रान्सफॉर्मर दोन दिवसात बसविणार!* *पंकजाताई मुंडेंची वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना ; परिसरातील शेतकऱ्यांनी मांडली होती व्यथा * परळी ।दिनांक ३१।  नागापूर येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील ट्रान्स्फॉर्मर येत्या दोन दिवसांत बसविण्यात येणार असून परिसरातील शेतकरी व वीज ग्राहकांची समस्या दूर होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्याकडे शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडल्यानंतर त्यांनी वीज अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन  ट्रान्स्फॉर्मर त्वरित बसविण्यास सांगितले आहे.    तालुक्यातील नागापूर वीज  उपकेंद्रातील एक ट्रान्सफॉर्मर गेल्या दीड महिन्यांपासून  दुरुस्ती विना बंद आहे तर दुसरा जळाल्यामुळे बंद आहे, त्यामुळे नागापूर सह परिसरातील बहादूरवाडी, डाबी, दौनापूर, वानटाकळी ,अस्वलंबा, मांडखेल, नागपिंपरी, तडोळी, माळहिवरा, गोपाळपूर, आदी गावातील शेतकरी वीजेविना त्रस्त आहेत.सध्या गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिके वाळत  आहेत. वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे परिणामी उत्पन्नावर परिणाम होणार आहे. शेतामध्ये ऊस, सोयाबीन, का
इमेज
अष्टविनायक दर्शन देखाव्याचे आज 3 वा.माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचा उपक्रम   परळी/ प्रतिनिधी- दै.मराठवाडा  साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायकांची 8 मंदीरे, हुबेहुब मुर्ती, गुरुकुल व आधुनिक शिक्षण पद्धती असे देखावे सादर करण्यात येत आहेत.आज 3 वा.माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते  उद्‌घाटन होणार आहे.        मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानने या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी केली आहे. मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सजावट व देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेले परळी येथील राकेश चांडक व त्यांची शंभर जणांची टीम यावर्षी देखाव्याच्या तयारीसाठी कामाला लागली आहे. अष्टविनायक दर्शन ही यावर्षीची गणेशोत्सव देखाव्याची थीम असून एकाच मंडपात राज्यातील सर्व म्हणजे 8 प्रसिद्ध गणेश मंदीरे साकारली जात असून येथे  हुबेहुब मुर्तीसह गुरुकुल-आधुनिक शिक्षण पद्धतीने हा आगळा-वेगळा देखावाही सादर केला जात आहे. प्रत्येक श्रीगणेश भक्ताला परळीतच अष्टविनायकांचे मनोभाव
इमेज
 * परळीत श्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ* *परळी/प्रतिनिधी* वीरशैव समाज परळीच्या वतीने श्री संत श्रेष्ठ गुरुलिंग स्वामी यांचा 121 वा पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहास आज दिनांक 30 ऑगस्टपासून भाविक भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात प्रारंभ झाला आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री संत श्रेष्ठ गुरुलिंग स्वामी , संत शिरोमणी मन्मथ स्वामी,.श्री सदगुरू 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन श्री व सौ अमित चंद्रकांतआप्पा बुरांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती. प्रतिवर्षाप्रमाणे अखंड शिवनाम सप्ताह, पालखी सोहळा, भंडारा असे सर्व पारंपारिक कार्यक्रम दिनांक  5 सप्टेंबर पर्यंत होणार असून श्री सदगुरू 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम होणार आहेत. मागील दोन वर्षापासून कोरोना लॉकडाऊनमुळे होवू न शकलेला श्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव यावर्षी विविध सामाजिक, धार्मीक उपक्रम व पारंपारिक भंडारा कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होत आहे. ब
इमेज
 * प्रा.टी.पी.मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी नागापूर सबस्टेशन येथे  33 केव्ही  ट्रांसफार्मर संदर्भात आंदोलन!* *आपल्या हक्काच्या प्रश्नासाठी नागापूर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे—प्रदीप मुंडे* परळी वैजनाथ प्रतिनिधी नागापूर सब स्टेशन मधील  33 के.व्ही. ट्रांसफार्मर जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या हातची पिके वीज नसल्यामुळे पाण्याविना सुकून जात आहेत त्या संदर्भात नागापूर सबस्टेशन येथे दिनांक 2 सप्टेंबर 2022 शुक्रवार रोजी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी महावितरण कार्यालयाला दिला आहे. दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या प्रश्नासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नागापूर जि. प. गटाचे माजी सदस्य प्रदीप  मुंडे यांनी केले आहे.    दरम्यान दिनांक 23 ऑगस्ट रोजी बातमी द्वारे आणि महावितरण कंपनीतील अधिकारी यांना ई-मेल द्वारे अधिकृत पणे कळविण्यात आले होते. नागापूर गटाचे माजी जि प सदस्य प्रदीप  मुंडे  यांनी महावितरण अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि त्या संदर्भात निवेदनही दिले परंतु त्याकडे
इमेज
  माजी मंत्री धनंजय मुंडे, सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत नाथ प्रतिष्ठाणच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाचे आज उद्घाटन परळी (दि. 30) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण मार्फत यावर्षी वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाचे जोरदार नियोजन करण्यात आले असून या गणेशोत्सवात, श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व उत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासह कला, सांस्कृतिक, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  उद्घाटन संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्राच्या तारका हा लावण्यवतींचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, वैशाली जाधव, पूनम कुडाळकर, तेजा देवकर, प्राजक्ता गायकवाड आदी तारका आपल्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहेत.  गणेशोत्सवात पुढील 10 दिवस कला, सांस्कृतिक, सामाजिक आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून परळीकरांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार असून, नाथ प्रतिष्ठाणचा यंदाचा गणेशोत्सव राज्यात गाजाव
इमेज
पंकजाताईंच्या संकल्पनेतून स्थानिकांच्या कलागुणांना वाव : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने गौरी - गणपती महोत्सव स्पर्धा: आकर्षक बक्षिसं  परळी वैजनाथ....... स्थानिक कलाकार आणि गृहिणींच्या कलागुणांना वाव देणारा गौरी गणपती स्पर्धा महोत्सव  यावर्षी पुन्हा नव्या जोमाने सुरू होत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवातंर्गत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेसह विविध आकर्षक बक्षिसं मिळणार आहेत.   शहरात चांगल्या प्रकारे सांस्कृतिक चळवळ रूजावी तसेच स्थानिक कलाकार आणि महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पंकजाताई मुंडे यांनी गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम  सुरू केलेला आहे. मध्यंतरी कोरोना महामारीमुळे हा उपक्रम घेता आला नव्हता पण आता यावर्षीपासून पुन्हा नव्या जोमाने हया स्पर्धा घेण्यात येत आहेत.         या स्पर्धा महोत्सवा अंतर्गत बाल गणेश मंडळ, घरगुती गणेश सजावट, महालक्ष्मी मखर सजावट आणि देखावा, मंगलमूर्ती मिरवणूक देखावा या स्पर्धा होणार आहेत. महालक्ष्मी देखावा स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस  डबल डोअर फ्रिज, द्वितीय मायक्र
इमेज
  थर्मलजवळील जिलेटिन स्फोट: आणखी एक आरोपी अटक परळी : थर्मलजवळील जिलेटिन स्फोट प्रकरणी आणखी एक आरोपी आज अटक करण्यात आला आहे. परळी ग्रामीण पोलिसांनी  मंगळवारी आणखी एकास अटक केली. पोखराज सुखदेव गुजर ( रा. लोणी ता परळी मुळगाव राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी  दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. राख उपसा करण्यासाठी  जिलेटिन वापरून ब्लास्टिंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आता अटक आरोपीची संख्या तीन झाली आहे. दरम्यान, सोमवारी एटीएसच्या मुंबई, औरंगाबाद व बीड येथील अधिकाऱ्यांनी व बॉम्ब शोध व नाशक पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे. 
इमेज
  परळी वकील सघांच्या अध्यक्षपदी अँड.नागरगोजे तर सचिवपदी अँड पारेकर यांची निवड   परळी वैजनाथ, प्रतिनिधी......        परळी वकील संघाच्या अध्यक्षपदी जेष्ठ विधीज्ञ श्री. अँड. व्हि.बी.नागरगोजे यांची बहुमताने फेरनिवड करण्यात आली.          परळी वकील संघाचे सन 2022-2023 या वर्षी करिता वार्षिक निवडणूक घेण्यात आली.निवडणूकीत अध्यक्षपदी श्री. व्हि.बी.नागरगोजे यांनी बाजी मारली.यावर्षी पहिल्यांदाच अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. यावेळी सचिवपदी  अँड. गजानन पारेकर व उपाध्यक्ष पदी अँड.बुद्धभुषण उजगरे यांची निवड करण्यात आली.कोषाध्यक्षपदी अँड व्हि बी घुले तर सहसचिव पदी अँड ए.ए.शेख यांची निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड.एच.व्ही.गुट्टे यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अँड. राहुल सोळंके यांनी काम पहिले. विजयी पदाधिकारी यांचे अँड.आर.व्हि.गित्ते अँड.प्रकाश मराठे  अँड.मिर्झा मंजुर अली अँड.माधवराव मुंडे अँड.दिलीप स्वामी अँड.डि.एल.उजगरे.अँड.नागापूरकर अँड.जीवनराव देशमुख अँड.अनिल मुंडे  अँड.डि.पी.कडबाने अँड अविनाश पवार अँड विलास बडे अँड.प्रदिप गिराम. अँड लक्षमण अघाव अँड.
इमेज
  श्री राधाकृष्ण वेशभुषा स्पर्धेत कु. स्वरा लांडगे ने पटकाविला प्रथम क्रमांक परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...        परळी शहरातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या संस्कार प्राथमिक विद्यालयाच्या वतीने गोकुळाष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री राधाकृष्ण वेश वेशभूषा स्पर्धेत संस्कार प्राथमिक विद्यालयातील पहिलीची विद्यार्थीनी कु. स्वरा श्रीराम लांडगे हिने प्रथम येण्याचा बहुमान मिळवत सुयश संपादन केले.          याविषयी अधिक माहिती अशी की, परळी शहर व तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या तथा सदैव नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या संस्कार प्राथमिक विद्यालयाने श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधत शाळेतील पहिली व दुसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी दहीहंडी महोत्सव व श्री राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते. या वेशभूषा स्पर्धेमध्ये शाळेतील पहिली व दुसरीच्या जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी श्री राधाकृष्नाच्या मनमोहक, बहुरंगी वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदवला. यावेळी परीक्षकांनी सर्व सहभागी चिमुकल्यांच्याआकर्षक वेशभूषांचे निरीक्षण करत प्रथम द्व
इमेज
  भूमिपुत्र सन्मान सोहळा-2022 : संजय खाकरे सन्मानित दिंद्रुड : जी. के. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने आयोजित भूमिपुत्र सन्मान सोहळा-2022 या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते परळीतील पत्रकार संजय खाकरे यांचा पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.          मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत भुमिपूत्रांचा सन्मान सोहळा रंगला. यावेळी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे कर्णधार ज्योतिराम घुले (क्रीडा), जागतिक कीर्तीचे पखवाजवादक पंडित उद्धव(बापू) आपेगावकर (कला आणि संस्कृती), चित्रपट अभिनेता सुहास सिरसट (अभिनय), प्रयोगशील शेतकरी कल्याण कुलकर्णी ( कृषी), यशस्वी तरूण उद्योजक प्रदीप ठोंबरे (उद्योग),  बीडच्या शिवाजीनगर पोलिस स्थानकाच्या पोलिस उपनिरीक्षक मीना तुपे ( प्रशासन), सरपंच ललिता व्हरकटे ( ग्रामीण विकास), पत्रकार विष्णू बुरगे ( पत्रकारिता- इलेक्ट्राॅनिक मीडिया), पत्रकार संजय खाकरे (पत्रकारिता- प्रिंट मीडिया), सामाजिक कार्यकर्त्या आयेशा शेख ( समाजकार्य) या प्रतिभावंतांना जी. के. फाऊंडेशनच्यावतीने पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.        परळी शहरातील नामवंत पत्रकार व गेल्या
इमेज
  अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची परळीत बिंगोवर कारवाई  परळी वैजनाथ, प्रतिनिधी..       अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने परळीत बिंगो जुगार खेळणाऱ्या व खेळणाऱ्या वर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.       याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार ,परळी शहरातील मलिकपुरा भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन बिंगो नावाच्या जुगार खेळताना व खेळवताना आढळून आले म्हणून अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने धडक कारवाई केली. यात चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरोपींकडून सुमारे 42070 रु. ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पो.ना. तानाजी तागड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे पो.ना. गुट्टे हे करीत आहेत
इमेज
  संजय गोरे यांचा सत्कार परळी वै.ता.३० प्रतिनिधी      शिक्षण व शिक्षकांच्या प्रश्नावर संघर्षरत असलेल्या मराठवाडा शिक्षक संघाच्या शहराध्यक्षपदी संजय गोरे यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त संचालक असलेल्या श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पत संस्थेच्या वतीने संजय गोरे यांचा सत्कार करण्यात आला.       नुकतीच मराठवाडा शिक्षक संघाची परळी शहर व तालुका कार्यकारीणी निवडण्यात आली आहे. शहराध्यक्षपदी शिक्षक चळवळीत सक्रीय असलेले शिक्षक संजय गोरे यांची परळी शहराध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. निवडीबद्दल संजय गोरे यांचा परळी येथील श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष पवनकुमार जैस्वाल व सचिव लक्ष्मण वाकडे यांनी मंगळवारी (ता.३०) पतसंस्थेच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. गोरे पतसंस्थेचे विद्यमान संचालक आहेत. यावेळी पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सुनिता वाघमोडे, संचालक अक्षय मुंडलिक, राजाभाउ आढाव, सचिन मुंदडा, राजेश्वर निला, सुवर्णा जंगले, सुमन चव्हाण, व्यवस्थापक प्रकाश चव्हाण, कर्मचारी बसवेश्वर खोत, पिग्मी एजंट विष्णु लिखे, रमेश बागवाले, वैजनाथ चव्हाण, राजेश शेटे, प्रदिप राठोड, विक
इमेज
  दोन कार धडकल्या:मुलाला दवाखान्यात घेऊन निघालेली महिला पोलीस व तिचा मुलगा मृत्युमुखी तर दोन जण जखमी परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     सिरसाळा-परळी रोडवर आज सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान दोन करची समोरासमोर धडक होऊन भिषण अपघात झाला. या अपघातात दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे व त्यांचा९ वर्षाचा मुलगा यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.तर पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे तसेच डॉक्टर डॉ. इलियास गंभीर जखमी झाले आहेत.          जखमींना तात्काळ सिरसाळा पोलीसांनी व नागरिकांनी अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. दिंद्रुड येथून आलेली एम एच १४ , जि वाय ९११३, एस क्रॉस कंपनी ची पांढ-या रंगाची गाडी परळी कडे जात होती, जिच्या मध्ये दिंद्रुड पोलीस कर्मचारी होते.परळीहून एम एच ४७,०५३२६ काळवट रंगाची इंडीवर गाडी ज्यात परळी चे शासकीय डॉक्टर डॉ. इलियास असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात सिरसाळा येथील परळी रोडवरील प्रगती मंगल कार्यालया समोर घडला. अपघात एवढा भिषण होता कि दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात एकमेकावर पडल्या आहेत. • दरम्यान ,कोमल शिंदे आपल्या मुला