MB NEWS- अजित पवारांच्या वक्तव्याचा पंकजा मुंडे यांनी घेतला समाचार

अजित पवारांनी शिल्लक ऊसाला मदत जाहीर करायची सोडून फक्त टिकाच केली -पंकजा मुंडे *सोयाबीन, ऊस मित्र मेळाव्यात पंकजाताई मुंडेंनी घेतला समाचार* *शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करावी असं वातावरण निर्माण व्हावं* _सोयाबीन, ऊसासाठी शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू_ अंबाजोगाई ।दिनांक ०८। अजित पवार राज्याचे अर्थमंत्री आहेत, वाटलं होतं जिल्हयात येऊन शिल्लक ऊसाला तसेच इथल्या शेतकऱ्यांना काहीतरी अनुदान, मदत जाहीर करतील. पण, तसं काही झालं नाही, फक्त त्यांनी टिकाच केली. शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलं नाही, त्यांची घोर निराशा झाली. सरकार म्हणून जे बोलता ते करून दाखवा , उगाच गप्पा मारू नका अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी समाचार घेतला. जागृती व्यवसाय मंचच्या वतीने शहरातील मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित सोयाबीन, ऊस मित्र मेळाव्यात त्या बोलत होत्या. आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. Click;*अंबाजोगाईतील ऊस व सोयाबीन उत्पादक शेतकरी मेळाव्यातील पंकजा मुंडे यांचे संपूर्ण भाषण.* _MB N...