पोस्ट्स

आग लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-आगीतून बहिण व लहान मुलांना वाचवताना गॅस टाकीच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू

इमेज
आगीतून बहिण व लहान मुलांना वाचवताना गॅस टाकीच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू  धारूर....        तालुक्यातील पिंपरवाडा येथे शेत वस्तीवरील दोन घरांना  अचानक आग लागली  त्यामध्ये घरीच उपचार घेत असलेल्या बहीण ,लहान दोन मुलांना घराच्या बाहेर काढत असताना अचानक गॅस टाकीचा स्फोट झाल्याने या स्फोटामध्ये रवी श्रीहरी तिडके वय २१ यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार रोजी दुपारी घडली. Click &Watch:महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेस आक्रमक;परळीत नायब तहसीलदार यांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन(News &video)          पिंपरवाडा गावापासून अर्धा किमी अंतरावर उत्तरेस श्रीहरी कारभारी तिडके व रामकिसन कारभारी तिडके यांचे शेतात पत्राचे शेड व गोठा आहे या गोठ्यास  दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली व घरातील बहिण व लहान मुलांना बाहेर काढून  आग विझवण्यासाठी श्रीहरी तिडके यांचा मुलगा रवी तिडके हा येथील जवळील टाकीतील पाणी घेऊन विझवत असताना अचानक घरातील गॅस टाकीचा स्फोट झाला. या स्फोटात टाकीचा  पत्रा मानेला लागल्यामुळे गंभीर जखमी होऊन रवी श्रीहरी तिडके याचा जागीच मृत्यू झाला.