MB NEWS-न्यायालय परिसरात भांडण करु नका सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे पडले महागात: ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
.jpeg)
न्यायालय परिसरात भांडण करु नका सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे पडले महागात: ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... येथील न्यायालय परिसरात भांडण करु नका असे सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे चांगलेच महागात पडले असुन ५ जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Click &watch: *⭕...... म्हणून रिझर्व्ह बँकेने बीड जिल्ह्यात बंद केलाय १० रुपयांच्या नोटांचा पुरवठा.* #mbnews #subscribe #like #share #comments याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, दि. 14/12/2022 रोजी 12.15 वा. परळी कोटचि गेट समोर परळी वै. येथे असतांना यातील फीर्यादी पोह भास्कर गंगाधरराव केंद्रे हे आरोपींना येथे भांडण करु नका असे म्हणाले असता तुम्ही कोण पोलीस आम्हाला सांगणारे ,आमच्या घरातले भांडण आहे असे म्हणुन फिर्यादीचे अंगावर धावुन जावुन फिर्यादीचे शर्टला धरून त्यांचे शर्ट फाडले व फिर्यादीचे अंगाला झटापट करुन नखाने बोचकुरे घेतले. म्हणुन आरोपी 1 ) दिपक अंकुशराव घुगे वय 34 व...