MB NEWS-गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आयसोलेशन सेंटर कोरोना रूग्णांसाठी ठरतेयं संजीवनी !*

* गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आयसोलेशन सेंटर कोरोना रूग्णांसाठी ठरतेयं संजीवनी !* *योगा, प्राणायाम, तज्ज्ञ डाॅक्टर्सची तपासणी, पौष्टिक आहारामुळे पांच रूग्ण ठणठणीत होऊन घरी परतले* परळी । दिनांक ०८ । नित्यनेमाने होणारे योगा, प्राणायामाचे धडे, तज्ज्ञ डाॅक्टर्सच्या टिमची मेहनत, आयुर्वेदिक काढयासह पौष्टिक आहार आणि पोषक वातावरण या सर्वांमुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरमधील कोरोना बाधित रूग्णांमध्ये दिवसेंदिवस सकारात्मक उर्जा निर्माण होत असून हे सेंटर कोरोना रूग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. याचाच परिणाम म्हणून सेंटर मधील पाच रूग्ण ठणठणीत बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत. कोरोना महामारीची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या पुढाकारातून अक्षता मंगल कार्यालयात लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित रूग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ३ मे पासून मोफत आयसोलेशन (विलगीकरण) सेंटर सुरू करण्यात आले आहे. पंकजाताई मुंडे हया स्वतः बाधित असताना देखील दररोज सेंटरचा आढावा घेऊन रूग्णांची काळजी घेण्याच्या सूचना भाजपच्या ...