पोस्ट्स

मार्च १९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS:शेख गणी यांना नाट्य भूषण पुरस्कार

इमेज
  27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने परळीत कार्यक्रमाचे आयोजन-  रानबा गायकवाड     शेख गणी यांना नाट्य भूषण पुरस्कार परळी प्रतिनिधी.  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा परळी व परळी सिने नाट्य कलावंत संघटनेच्या वतीने परळीत दिनांक 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जेष्ठ पत्रकार व नाटककार रानबा गायकवाड यांनी दिली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे परळी शाखाध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ सिने नाट्य कलावंत शेख गणी यांना याच कार्यक्रमात नाट्य पोषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.    दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा.म.  नाट्य परिषदेचे परळी शाखाध्यक्ष बाजीराव ( भैय्या) धर्माधिकारी हे राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून परळी श्रीनाथ कलावंत संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भोकरे, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे परळी सचिव प्रा. डॉ. विनोद जगतकर तसेच नाट्य कलावंत संघटनेचे सचिव तसेच प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक,

MB NEWS:परळीत रेल्वे उ्डाणपुलावर अपघात, एक तरुण ठार एक गंभीर जखमी.

इमेज
 ------------- परळीत रेल्वे उ्डाणपुलावर अपघात, एक तरुण ठार एक गंभीर जखमी -------------- परळी वैजनाथ, दि.24,  येथील श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर मोटारसायकल व रिक्षाच्या धडकेत एक तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी (दि.25) सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणाची माहिती अशी की, परळी तालुक्यातील डाबी येथील संपत्ती पारवे व निकम इंगळे हे दोन तरुण मोटारसायकलवरुन थर्मल परिसरातील संभाजीचौकातून उड्डाणपुल मार्गे परळी शहरात येत होते. पुलावर त्यांच्या मोटारसायकलला भरधाव वेगात येणार्‍या अ‍ॅटोरिक्षाने पाठीमागून  जोराची धडक दिली. यामुळे संपत्ती पारवे (वय 26, रा.डाबी) हा तरुण गंभीर जखमी झाल्यामुळे जागीच ठार झाला. त्याच्या डोक्याला मोठी जखम झाल्याचे दिसले. जखमेतून रस्त्यावर दूरपर्यंत रक्तस्त्राव पसरला होता. त्याचा जोडीदार निकम इंगळे  हा ही या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यास अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

MB NEWS:डॉ राठोड, डॉ शेप, डॉ चाटे यांची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड

इमेज
  डॉ राठोड, डॉ शेप, डॉ चाटे यांची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड  परळी प्रतिनिधी- जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमधील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.रमेश राठोड, इतिहास विभाग प्रमुख, डॉ.बाबासाहेब शेप , मराठी विभागातील डॉ.रामेश्वर चाटे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरच्या समाजशास्त्र, इतिहास व मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर, डॉ प्रमोद येवले यांनी नुकतीच निवड केली. त्याबद्दल वैद्यनाथ कॉलेजचे प्राचार्य, डॉ जे व्हि जगतकर , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, विद्यापरिषद सदस्य ,डॉ. पी एल कराड, अधिसभा सदस्य,डॉ मुंजाभाऊ धोंडगे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा हरिष मुंडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ.राठोड ,डॉ. शेप, डॉ.चाटे यांचे अभिनंदन केले आहे

MB NEWS:वीरशैव समाजाचा सामुहिक विवाह सोहळा: रविवारी महत्वपूर्ण बैठक

इमेज
  वीरशैव समाजाचा  सामुहिक विवाह सोहळा: रविवारी महत्वपूर्ण बैठक परळी वैजनाथ/प्रतिनिधी वीरशैव समाजातील सर्व पोटजाती यांचा भव्य सामुहिक विवाह सोहळा परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात येणार असून या संदर्भात वीरशैव बांधव-भगिनींची महत्वपूर्ण बैठक रविवार दि.26 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता संतश्री गुरूलिंग स्वामी मंदिर (बेलवाडी) येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी वीरशैव समाजातील सर्व पोटजातींचा भव्य सामुहिक विवाह सोहळा परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भात उद्या रविवारी संतश्री गुरूलिंगस्वामी मंदिर (बेलवाडी) येथे सकाळी 10 वा. महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  या बैठकीस जेष्ठ मार्गदर्शक दत्ताप्पा इटके गुरूजी, सोमनाथअप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे यांच्यासह समाजातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस वीरशैव समाजातील महिला, पुरूष यांनी मोठया संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन वीरशैव समाज परळीच्या वतीने करण्यात आले आहे.         Video news 

MB NEWS:चैत्री वारी: श्री.संत जगमित्रनागा महाराज पायी दिंडी व पालखीचे प्रस्थान

इमेज
चैत्री वारी: श्री.संत जगमित्रनागा महाराज पायी दिंडी व पालखीचे प्रस्थान परळी वैजनाथ दि.२४ (प्रतिनिधी)        गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेली श्री संत जगमित्रनागा यांच्या पालखीचे गुढी पाडव्याच्या दिवशी श्री संत जगमित्रनागा मंदिरातून प्रस्थान केले.      प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी वर्षप्रतिपदा गुढीपाढवा बुधवारी (ता.२२) संत श्री. जगमित्र नागा महाराज यांचे चैत्रमास पंढरपुर वारी साठी हजारो भाविकांच्या उपस्थित दुपारी ३ वाजता पंढरपुर पायी वारीस प्रस्थान झाले. पायी पालखी दिंडीचा मार्ग परळी ते गिरवली पहिला मुक्काम, गिरवली, आकोली, ते गादवड, पळशी, उस्मानाबाद ते उंडेगाव, मोहीते वस्ती, अंजनगांव,रामनवमीला (ता.३०) मुक्कामी असेल. तर सोमवार (ता.०३) एप्रिल दिंडीचा परतीचा प्रवास सुरू होतो.१४ एप्रिल ला परत श्री संत जगमित्रनागा मंदिरात येणार आहे. Video news 

MB NEWS:भिमवाडी येथील बौद्ध विहारात गौतम बुद्धांचा अस्थिकलश दाखल; उपासकांनी घेतले दर्शन

इमेज
  भिमवाडी येथील बौद्ध विहारात गौतम बुद्धांचा अस्थिकलश दाखल; उपासकांनी घेतले दर्शन परळी प्रतिनिधी -  जगाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय  तथागत भगवान गौतम बुद्ध यांचाअस्थिकलश शुक्रवार दिनांक 24 मार्च रोजी दुपारी तीन वाजता भिम वाडी येथील बौद्ध विहारात दाखल झाला होता. लातूर येथील धम्म परिषदेसाठी अस्थी कलश रवाना होण्यापूर्वी भीमवाडी येथे बौद्ध उपासकांना दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.      शहरातील भीमवाडी मित्र मंडळाच्या विनंतीला मान देऊन लातूर येथील धम्म परिषदेसाठी जाणारा तथागत भगवान गौतम बुद्धांचा अस्थीकलश भीमवाडी येथील बौद्ध विहारात  उपासक   उपासिकांच्या दर्शनासाठी आज दिनांक 24 रोजी सकाळी 12वा. ठेवण्यात आला होता.         या  आस्थिकलशाचे भीमवाडी येथे असंख्य उपासक, उपासिका,बालक,बालिकांनी दर्शन घेतले. Video news 

MB NEWS:प्लॉटची फेरफार नोंद ऑनलाईन करण्यासाठी ३ हजाराची लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात

इमेज
  प्लॉटची फेरफार नोंद ऑनलाईन करण्यासाठी ३ हजाराची लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात ………. लाठ्याला तीन हजार रूपयांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. गेवराई.. गेवराई.खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाईन नोंद करण्यासाठी अमित नाना तरवरे (वय ३२ रा. नाईकनगर तांडा, गेवराई) या तलाठ्याला तीन हजार रूपयांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी गेवराईत करण्यात आली. अमित तरवरे हा गेवराई तालुक्यातील दैठण सज्जाचा तलाठी आहे. परंतू त्याच्याकडे तलवाडा सज्जाचा अतिरिक्त पदभार होता. याच भागातील एका व्यक्तीच्या खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाईन नोंद करण्यासाठी तरवरे याने तीन हजार रूपयांची लाच मागितली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने बीड एसीबीकडे तक्रार केली. त्याप्रमाणे शुक्रवारी सापळा लावण्यात आला. त्यानंतर पंचासमक्ष तीन हजार रूपये घेताच एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे,  उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, अंमलदार भारत गारदे, अविनाश गवळी आदींनी

MB NEWS:मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा अध्यक्षांची कारवाई

इमेज
  मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा अध्यक्षांची कारवाई Rahul Gandhi :  काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदारराहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. मोदी आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर केला. या निर्णयानंतर आता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, जर कोणत्याही परिस्थितीत खासदार आणि आमदारांना 2 वर्षांहून अधिकची शिक्षा ठोठावण्यात आली असेल तर त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभा) रद्द केले जाते. इतकेच नव्हे तर शिक्षेची मुदत पूर्ण केल्यानंतर त्यांना सहा वर्षांपर्यंत निवडणुका लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळे सध्या त्यांची खासदारदी रद्द करण्यात आली आहे.  या विधानामुळे अडचणीत आले राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकात बोलताना एक वक्तव्य केले होते. 'सर्व चोरांचे आडनाव  मोदी का असते?' असे राहुल म्हणाले होते. राहुल यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार पुर्निश मोदी यांनी त्यांच्यावर एक खटला दाख

MB NEWS:श्रीराम नवमी निमित्त श्री गोराराम मंदिरात अध्यात्म रामायण व संहिता पारायण : नऊ दिवस चालणार धार्मिक कार्यक्रम

इमेज
  श्रीराम नवमी निमित्त श्री गोराराम मंदिरात अध्यात्म रामायण व संहिता पारायण : नऊ दिवस चालणार धार्मिक कार्यक्रम परळी वैजनाथ:  प्रतिनिधी...  श्रीराम नवमी निमित्त  गणेशपार भागातील श्री गोराराम मंदिर येथे पारंपरिक पद्धतीने अध्यात्म रामायण व संहिता पारायण तसेच रामजन्मोत्सव सोहळा होणार आहे. या निमित्ताने नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.समर्थ रामदास स्वामी संस्थापित गोराराम मंदिर येथे दरवर्षी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या निमित्ताने पाडव्या पासून रामनवमीपर्यंत दररोज   रामायणाचार्य मनोहरबुवा जोशी कान्हेगावकर यांच्या वाणीतून अध्यात्म रामायण होणार आहे. सकाळच्या सत्रात सहिंता पारायण होणार आहे. त्याचबरोबर रामाचे नवरात्र साजरे केले जाणार आहेत.रामनवमी दिवशी  रामजन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.या जन्मोत्सव सोहळयास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वैद्यराज रामदासबुवा (दादा) रामदासी,लक्ष्मणबुवा रामदासी व नंदकुमार रामदासी यांनी केले आहे.

MB NEWS:वैद्यनाथ कारखान्याचे संचालक दत्ताभाऊ देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

इमेज
  वैद्यनाथ कारखान्याचे संचालक दत्ताभाऊ देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, ॲड.राजेश्वर चव्हाण यांची उपस्थिती परळी (दि. 23) - भाजपचे नेते माजी नगरसेवक तथा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक,परळी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री.दत्ताभाऊ देशमुख यांनी आज माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.        राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री जयसिंगकाका गायकवाड, राष्ट्रवादी बीड जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर आबा चव्हाण, राष्ट्रवादीचे युवक नेते अजयजी मुंडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, परळी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दत्ताभाऊ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेशअण्णा टाक,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वैजनाथ सोळंके,युवक तालुकाध्यक्ष गोविंद कराड,राष्ट्रवादी महिला काँग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष संगीताताई तुपसागर,महिला आघाडी शहराध्यक्षा

MB NEWS:कन्हेरवाडी सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक उत्साहात

इमेज
  कन्हेरवाडी सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक उत्साहात  प्रतिनिधी : परळी वै. : दि. २२ मार्च २०२३ रोजी परळी वै. तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी गावातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवात समितीची बैठक संपन्न झाली. या जयंती उत्सव समितीच्या बैठकीचे अध्यक्ष भास्कर नाना रोडे, गंगाधर अप्पा रोडे , प्रभाकर गवळी, आदी जेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीमध्ये जयंती उत्सवात समितीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी दि. २८ एप्रिल २०२३रोजी कन्हेरवाडी येथे साजरी होणार्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या कन्हेरवाडीच्या अध्यक्षपदी उपा. आयु. सिध्दोधन छाया भारतराव घाटे, कोषाध्यक्ष उपा. आयु.   महादेव  वाघमारे,सचिव  उपा. आयु. रवि प्रभाकर रोडे उपाध्यक्ष उपा. आयु. आमोल वसंत रोडे, सहकोषाध्यक्ष उपा. आयु. सचिन लांडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत सम्राट अशोक नगर येथील लहान थोर आणि जेष्ठ मंडळींनी उपस्थित राहुन जयंती उत्सव समितीची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.

MB NEWS:मोठी घरफोडी: एक नव्हे दोन नव्हे तब्बल चार घरे फोडली

इमेज
  मोठी घरफोडी: एक नव्हे दोन नव्हे तब्बल चार घरे फोडली गेवराई.... गेवराई तालुक्यात घरफोडीचे प्रमाण वाढले असून काल मध्येरात्री अज्ञात चोरट्यांनी सावरगाव येथे धुमाकूळ घालत एक नव्हे दोन नव्हे तब्बल चार घरे फोडले. चारही घरातून सोन्याचांदीसह रोख असा दोन लाखाचा मुद्देमार चोरट्यांनी लंपास केला. या घटनेने सावरगाव सह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संदिप वसंत वाघमारे, पांढुरंग कान्होबा मिसाळ, शरद नारायण लोंड, व लक्ष्मण लहूजी मिसाळ यांचे सावरगावमध्ये एकाच गल्लीत घरे आहेत. अज्ञात चोरट्यांनी 22 मार्च रात्री 1 ते 5 च्या दरम्यान बंद घरे फोडून घरातील रोख रक्कम लंपास केली. त्यामध्ये रोख एक लाख 54 हजार रुपये, 7 ग्रॉमचे झुंबर, 4 ग्रॉमची ठुसी, 9 ग्रॉमची अंगठी, 2 ग्रॉमचा बदाम, 2 ग्रॉमची नथ यासह पांडूरंग मिसाळ, लहुजी मिसाळ, शदर लांडे यांच्याही घरातून सोन्याचे दागिणे व रोख रक्कम लंपास झाली आहे. या प्रकरणी संदिप वसंत वाघमारे यांच्या फिर्यादीवरु गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यता आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

MB NEWS: सृजनशील व्यक्तिमत्वाचा पाया हा उत्तम संस्कारावर अवलंबून - सु.दे.लिंबेकर गुरुजी

इमेज
  शानदार उद्घाटन: बालसंस्कार केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात झाले २८० प्रवेश सृजनशील व्यक्तिमत्वाचा पाया हा उत्तम संस्कारावर अवलंबून - सु.दे.लिंबेकर गुरुजी परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        सृजनशील व्यक्तिमत्त्वाचा पाया हा संस्कारावरच अवलंबून असतो. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या विळख्यात अडकलेल्या या बालमनांना संस्कारशील बनवणे हे खरंतर आजच्या काळातील आव्हान आहे. स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टने हे आव्हान स्वीकारले असून अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा हा बाल संस्कार केंद्राचा उपक्रम असल्याचे प्रतिपादन आदर्श शिक्षक सु.दे. लिंबेकर गुरुजी यांनी केले. परळीत बालसंस्कार केंद्राचे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.         स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्ट व नरवाडकर कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने ३ री ते ७ वी मधील शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल संस्कार केंद्राचे उद्घाटन आदर्श शिक्षक सु.दे.लिंबेकर गुरुजी यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गुढी पाडवा शुभमुहूर्तावर अतिशय उत्साहात संपन्

MB NEWS:नंदलाल बियाणी यांचे निधन;जयप्रकाश(बारीक) बियाणी यांना पितृशोक

इमेज
  नंदलाल बियाणी यांचे निधन;जयप्रकाश(बारीक) बियाणी यांना पितृशोक परळी, प्रतिनिधी  परळी येथील प्रतिष्ठित व्यापारी नंदलाल बियाणी यांचे आज सकाळी 6 वाजता वयाच्या 80 व्यावर्षी  निधन झाले आहे जयप्रकाश (बारीक),ओमप्रकाश, संतोष बियाणी यांचे नंदलाल बियाणी वडिल होत.चंदुलाल बियाणी,सतिष बियाणी व जगदीश बियाणी यांचे ते काका होते.  स्व.नंदलाल बियाणी हे अतिषय धार्मीक व सुस्वभावी होते यांचे आज सकाळी 6 वाजता  निधन झाले असुन त्यांची अंत्ययाञा गणेशपार येथुन निघुन राजस्थानी मुक्ती धाम येथे दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर विधीवत अंत्यसंस्कार होणार आहेत. नंदलाल बियाणी यांच्या पश्चात भाऊ,2 बहिणी,पत्नी,3 मुले,1मुलगी,जावई,नातवंड असा मोठा परिवार आहे.बियाणी परिवाराच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS:माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड ,ॲड. राजेश्वर चव्हाण यांची उपस्थिती

इमेज
  परळी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गुरुवारी महत्वपूर्ण बैठक माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड ,ॲड. राजेश्वर चव्हाण यांची उपस्थिती *सर्व आघाडी व फ्रंटल सेलच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याची आवाहन* परळी (दि. 22) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी, सदस्य यांची गुरुवार दिनांक २३ मार्च रोजी दुपारी ठिक ३:०० वाजता आ.धनंजय मुंडे साहेब यांच्या जगमित्र संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री श्री. जयसिंगरावकाका गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होवू घातलेल्या निवडणुका, बूथ रचना तसेच विविध संघटनात्मक विषयांवर व माजी मंत्री आ.धनंजय मुंडे साहेब यांनी पक्षास दिलेल्या विविध सूचना, आगामी काळातील विविध रचना याबाबत या महत्वपूर्ण बैठकीत आढावा घेतला जाणार असून बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर आबा चव्हाण बैठकीस मार्गदर्शन करणार आहेत. सदर बैठक धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालय येथे दुपारी 3.00 वा. आयोजित करण्यात आली असून,  राष्

MB NEWS:खरिपातील अतिवृष्टीची मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

इमेज
  धनंजय मुंडेंच्या सभागृहातील दणक्यानंतर प्रशासन खडबडून जागे, अनुदान वितरण करण्यास सुरुवात! खरिपातील अतिवृष्टीची मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात बीड (दि. 21) - अवकाळीची मदत तर दूरच, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे 410 कोटी अद्याप मिळाले नाहीत असा आरोप करत धनंजय मुंडे यांनी विधानसभा सभागृह दणाणून सोडले होते. त्यानंतर अवघ्या 24 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी काळातील मदतीचे वितरण सुरू झाले आहे.  खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने जे नुकसान केले, त्या नुकसानीच्या भरपाई पोटी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनास सादर केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे शासनाने 410 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती, मात्र याला चार महिने उलटले, दिवाळी तर सोडाच पण आता पाडवा आला तरी त्या मदतीचे अद्याप वितरण नाही, कधी सॉफ्टवेअर तर कधी डेटा तर कधी काही अडचणी सांगितल्या जातात, यावरून धनंजय मुंडे यांनी सोमवारी सरकारला धारेवर धरले होते.  यावेळी अवकाळी पावसामुळे सध्या जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे तर करू

MB NEWS:शेततळ्यामध्ये बुडून तीन बालकांचा मृत्यू

इमेज
  शेततळ्यामध्ये बुडून तीन बालकांचा मृत्यू केज - तालुक्यातील पैठण सावळेश्वर येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून तीन बालकांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. केज पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पैठण सावळेश्वर येथे असलेल्या शेतामध्ये शेततळ्यात मंगळवारी (दि. २१) दुपारी बुडून स्वराज जयराम चौधरी, पार्थ श्रीराम चौधरी आणि श्लोक गणेश चौधरी या तीन 5 ते 8 वर्षीय बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. सदरील घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. मात्र सदरील घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान, सदर घटनेची माहिती युसुफ वडगाव चे एपीआयश्री खाले त अन्य पोलिस कर्मचायांनी घेतली असुन घटनास्थळी पोहचले आहेत. 

MB NEWS:दि. २३ मार्च रोजी एका लग्नाची पुढची गोष्ट' या कौटुंबिक नाटकाचे आयोजन

इमेज
  बहुप्रतिक्षित पोदार स्विमिंग अरेनाचा भव्य शुभारंभ २६ मार्चला  दि. २३ मार्च रोजी एका लग्नाची पुढची गोष्ट' या कौटुंबिक नाटकाचे आयोजन परळी / प्रतिनिधी, राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, पोदार लर्न स्कूल, परळी येथे दि. २६ मार्च रोजी मराठवाड्यातील अत्याधुनिक जलतरण तलावाचा भव्य शुभारंभ होणार आहे. हा उद्घाटन सोहळा जलतरण स्पर्धेमध्ये विश्वविक्रम केलेली सोलापूरची कन्या कु. कीर्ती भराडिया, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपला विक्रम नोंदवलेले परभणी जिल्ह्यातील डॉ. श्री राजगोपाल कालाने आणि मा. सामाजिक न्यायमंत्री तथा विद्यमान आमदार मा. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. बहुप्रतिक्षित अशा पोदार जलतरण तलावाची वैशिष्ट्ये म्हणजे ८० फूट लांबीचा जलतरण तलाव, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तज्ञ प्रशिक्षक आणि सुरक्षारक्षकाची व्यवस्था, अतिशय उत्कृष्ट फिल्टरेशनचे व्यवस्था, निऑन लाईट द्वारे फवारे लहान मुलांसाठी बेबी पुलची व्यवस्था, महिलांसाठी स्वतंत्र बॅच व प्रशिक्षक, लॉकर रूमची व्यवस्था आणि शॉवर बाथ, रेन डान्स, प्रदूषणमुक्त निसर्गरम्य वातावरण, कॅफेटेरिया, तणाव मुक्तीसाठी अद्वितीय असं

MB NEWS:सेलू, नंदनज, सारडगांव येथे जलजीवन मिशन कामाचा थाटात शुभारंभ

इमेज
  मागील अडीच वर्षे पारतंत्र्यात गेली, आता मतदारसंघाला पुन्हा नवे दिवस आणू - पंकजाताई मुंडे सेलू, नंदनज, सारडगांव येथे जलजीवन मिशन कामाचा थाटात शुभारंभ मंत्रीपदाचा प्रत्येक क्षण गांवच्या विकासासाठी खर्च केला महिला विकास करू शकत नाही, हा अपप्रचार खोडून काढा परळी वैजनाथ ।दिनांक २१। लोकनेते मुंडे साहेबांनी गावोगांवच्या विकासाचं स्वप्न पाहिलं होतं, आता ते आपल्यात नसले तरी त्यांची उणीव भासू नये यासाठी मंत्रीपदाचा प्रत्येक क्षण तुमच्या विकासासाठी खर्च केला. तुमची मागील अडीच वर्षे पारतंत्र्यात गेली, हाती काहीच लागलं नाही पण आता मतदारसंघाला पुन्हा नवे दिवस आणायचेतं, त्यासाठी मला दत्तक घेऊन आशीर्वाद द्या असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ग्रामस्थांना केलं.    सेलू परळी, नंदनज आणि सारडगांव येथे सुमारे चार कोटी रूपयांच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण   पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते काल मोठया थाटात झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.    पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, लोकनेते मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं ते क

MB NEWS:पहाटे 5 वाजता स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

इमेज
  पिंपळनेर हद्दीमध्ये घोडका राजुरी शिवारात गुटख्याच्या गोदामावर छापा  52 लाख रुपयांचा गुटखा जप्त  पहाटे 5 वाजता स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई   पिंपळनेर - बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बीड -परळी महामार्गावर घोडका राजुरी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेची रात्री अलर्ट ऑपरेशन करत असताना गुप्त  माहिती मिळाली होती त्या माहिती नुसार पाहाटे 5 वाजता घोडका राजुरी फाट्यावर बाजूला असणाऱ्या गोदाम मध्ये गुटख्याची खुलेआम गोदाम मध्ये गुटक्याची भोताची व गोण्याची आवक जावक करत असताना बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश वाघ यांच्यासह पीएस‌आय भंगतसिग दुलत ,  पोलीस कर्मचारी मनोज वाघ प्रसाद कदम विकास वाघमारे सोमनाथ गायकवाड सचिन आंधळे नारायण कोरडे अशोक कदम अतुल हराळे यांनी गोदाम वर छापा मारून एकूण 94 भोते गुटखा व 94 तंबाखूच्या  गोण्या स्कार्पिओसह मुद्देमाल एकूण 52 लाख 9 हजार रुपये जप्त करून गुटखा गुटखा विक्री करणारा गुटखा किंग महारुद्र मुळे  रा.घोडका राजुरी  व सत्यप्रेम घुमरे‌ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर बाळासाहेब वरेकर फरार आहे यामुळे पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धं

MB NEWS:अभूतपूर्व नोंदणी:मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

इमेज
 ● परळीत गुढीपाडव्यापासून सुरु होतेय बाल संस्कार केंद्र: आदर्श शिक्षक सु.दे. लिंबेकर गुरुजींच्या हस्ते होणार उद्घाटन अभूतपूर्व नोंदणी:मोठ्या संख्येने उपस्थित रहावे परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....     सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने परळीत बाल संस्कार केंद्र सुरु करण्यात येत आहे. गुढीपाडव्यापासून हे बाल संस्कार केंद्र नियमित सुरु होत असुन आदर्श शिक्षक सु.दे. लिंबेकर गुरुजींच्या हस्ते  उद्घाटन होणार आहे. अभूतपूर्व नोंदणी झाली असुन उद्घाटन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.      स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्ट व नरवाडकर कोचींग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने गुढी पाडव्यापासून "बाल संस्कार केंद्र" सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांची बालमनं जपून त्यांच्या कलेने घेऊन संस्कारमूल्य रुजविण्याचा तसेच विद्यार्थ्यांच्या बालमानसशास्त्र लक्षात घेत त्यांच्यावर संस्कार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या केंद्राद्वारे होणार आहे.या बाल संस्कार केंद्रामध्ये नोंदणी विनाशुल्क आहे.        बाल संस्कार केंद्राम

MB NEWS:नाथ प्रतिष्ठानचा उपक्रम

इमेज
  पाडव्याला धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून नमामी वैद्यनाथम या विशेष संगीत शिवपूजनाचे आयोजन *हर हर शंभू फेम अभिलिप्सा पांडा, आर्या आंबेकर, बेला शेंडे, स्वप्नील गोडबोले, प्रतीक सोळसे यांच्या उपस्थितीत रंगणार शिवस्तुती व चित्तथरारक शिवतांडव!* *नाथ प्रतिष्ठानचा उपक्रम* मुंबई (दि. 20) - गुढी पाडव्याच्या निमित्ताने प्रथमच परळी वैद्यनाथ येथे आ. धनंजय मुंडे यांनी ते अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत नमामी वैद्यनाथम या खास संगीतमय शिवपूजनाचे आयोजन केले आहे. हर हर शंभू या देशभरात लोकप्रिय ठरलेल्या गीताच्या गायिका अभिलिप्सा पांडा या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.  गुढी पाडव्याच्या दिवशी (बुधवारी) नाथ प्रतिष्ठाण च्या वतीने नमामी वैद्यनाथम या विशेष संगीतमय कार्यक्रमाचे वैद्यनाथ मंदिर परिसरातील पार्किंग प्रांगणात या कार्यक्रमाचे आ.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. आग्रा येथील क्रेझी हुपर्स ग्रुप सादरीत चित्तथरारक शिवतांडव देखील या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरणार आहे.  या कार्यक्रमात शिवस्तुती, शिवभजन, व चित्तथरारक शि

MB NEWS:पद्मश्री तालयोगी पं.सुरेश दादा तळवलकर यांना मृदंगमहर्षी पुरस्कार

इमेज
  पद्मश्री तालयोगी पं.सुरेश दादा तळवलकर यांना मृदंगमहर्षी पुरस्कार प्रदान   परळी l वै.पं.सुभाष महाराज देशमुख गुरूजी यांच्या 14 व्या पुण्यस्मरणार्थ पद्मश्री तालयोगी पं. सुरेश दादा तळवलकर यांना 2023 चा पुरस्कार स्मृतिचिन्ह माणपञ व शाल श्रीफळ देऊन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। महाराष्ट्रातील संगित क्षेत्रातील मान्यवरांना दिला जानारा पुरस्कार या वर्षी पुरस्काराचे मानकरी जगविख्यात पद्मश्री तालयोगी पं. सुरेश दादा तळवलकर  पुणे यांना ज्ञानेश संगीत विद्यालय खामगाव व पंडित सुभाष महाराज देशमुख गुरूजींचे सर्व शिष्य परिवार यांच्या वतीने पं. सुरेश दादा तळवलकर यांना पुरस्कार देतांना  आनोज सुभाष देशमुख, मनोज सुभाष देशमुख,समाजभूषण डाॅक्टर राजारामजी मुंडे,ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे,संदिपान महाराज वानखेडे,केशव महाराज जगदाळे,संदिप महाराज लोहर,संदिप महाराज काटे,गणेश महाराज ठाकुर,सर्जेराव महाराज सपकाळ,सचिन महाराज खाणेकर,विठ्ठल आबा गव्हाणे,तुकाराम पांचाळ,बळवंत पांचाळ,भरत पटाडे,माणिक महाराज गरड,,माणिक घनवट,विश्वांभर महाराज कोल्हे व हाजारो कलावंताच्या उपस्थितीत पुरस्कार बहाल करण्यात आला  पुरस्कार प्रसंगी

MB NEWS:पेन्शनचं मिशन संपलं, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

इमेज
  पेन्शनचं मिशन संपलं, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे मुंबई, 20 मार्च : जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील 7 दिवसांपासून संप पुकारला होता. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या संपावर तोडगा निघाला आहे. सरकारी कर्मचारी संघटनेनं आपला संप मागे घेतला आहे. आज राजपत्रित अधिकाऱ्यांनी 28 मार्चपासून संपात प्रत्यक्ष सामिल होण्याचा इशारा दिला होता. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांची आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनेला विधान भवनात बैठकीसाठी बोलावलं होतं. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजना लागू होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मंगळवारपासून कर्मचारी कामावर परत येणार आहे.

MB NEWS:परळी नगर परिषदेतील सेवानिवृत कर्मचाऱ्यांचे 5 एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

इमेज
  परळी नगर परिषदेतील सेवानिवृत कर्मचाऱ्यांचे 5 एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन परळीवैजनाथ: परळी नगर परिषदे सेवानिवृत कर्मचारी 7 व्या वेतनाच्या फरकाचा दुसरा हप्ता मिळावा व विविध मागण्यासाठी 5 एपीलपासून बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर  धरणे आंदोलन करणार आहेत.         परळी नगर परिषदेतील सेवानिवृत कर्मचारी रजा रोखीकरण, रक्कम व सेवाउपदानाची रक्कम मिळावी म्हणून 18 जूलै 2022 रोजी उपोषणास बसले होते. लेखी आश्वासनानुसार काही लोकांना सेवा उपदान व कर्मचाऱ्यांना राजारोखीच्या 30 टक्के रक्कम मिळाली होती . 7 व्या वेतनाचा दुसरा हप्ता दोन महीन्यात देण्याचे  आश्वासन दिले होते. तसेच सेवा उपदानाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. लेखी आश्वासन मुख्याधिकारी यांनी पाळले नाही. 30 टक्के  रक्कम ज्या सेवानिवृत कर्मचायांना मिळाली नाही त्यांना ती मिळावी म्हणून 10.8.22 रोजी सेवानिवृत कर्मचाऱ्यानी उपोषण केले होते परंतु त्यावेळी लेखी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्याधिकाऱ्यानी केली नाही.     सातव्या वेतनाचा दुसरा हप्ता मिळावा व ज्या सेवानिवृत कर्मचाऱ्यांना रजारोखीकरणाची रक्कम कमी देण्यात आली त्

MB NEWS:पंकजा मुंडेंचे सुवर्णकार समाजाने भेटून मानले आभार

इमेज
  परळीतील सुवर्णकार समाजाला दिलेला शब्द पंकजा मुंडे यांनी पाळला ! श्री संत नरहरी महाराज मंदिराच्या सभागृहाला दिला २० लाखाचा निधी पंकजा मुंडेंचे सुवर्णकार समाजाने भेटून मानले आभार परळी वैजनाथ ।दिनांक२०। शहरातील सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत नरहरी महाराज मंदिराच्या सभागृहासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी २० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी दिल्याबद्दल सुवर्णकार समाजाच्या शिष्टमंडळाने आज पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत.     शहरातील श्री संत नरहरी महाराज मंदिराच्या गाभारा आणि शिखर कामाचा तसेच पुनर्निर्माण कामाचा शुभारंभ पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते जानेवारीत झाला होता. मंदिराच्या सभागृहासाठी यापूर्वी त्यांनी  स्थानिक विकास निधीतून दहा लाखाचा निधी दिला होता, ते सभागृह पूर्ण झाले आहे मंदिर पुनर्निर्माणासाठी यापुढेही संपूर्ण सहकार्य करू असा शब्द त्यांनी  याप्रसंगी दिला होता. तो शब्द पाळत त्यांनी जिल्हा विकास नियोजन आराखडय़ातून २० लाख रूपये निधी सभागृह विस्तारीकरणासाठी मंजूर करून दिला आहे.     निधी मंजूर करून दिल्याबद्दल समाजा

MB NEWS:अमर मैदानाची झाली कचराकुंडी ; रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

इमेज
  पंकजाताई मुंडे यांनी परळीच्या मुख्याधिकाऱ्यांना घेतले फैलावर! अमर मैदानाची झाली कचराकुंडी ; रहिवाशांचे आरोग्य धोक्यात परळी वैजनाथ ।दिनांक २०। शहरातील अमर मैदानाची नगरपरिषदेने अक्षरशः कचराकुंडी केल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आज या भागातील महिलांच्या शिष्टमंडळाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांचेपुढे गाऱ्हाणे मांडले. पंकजाताईंनी लगेचच मुख्याधिकाऱ्यांना फोन करून त्यांना फैलावर घेत चांगलीच कानउघाडणी केली.    झाले असे, पंचवटीनगर परिसरात असलेले अमर मैदान हे पूर्वी खेळाचे मैदान होते पण सध्या ते पालिकेचे डम्पिंग ग्राऊंड बनले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातील सर्व कचरा गोळा करून नगरपरिषद त्या ठिकाणी आणून टाकते, ज्यामुळे कचऱ्याचे मोठ मोठे ढीग मैदानात तयार झाले आहेत.  परिसरातील नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले असून त्यांना जीवघेण्या आजारांशी सामना करावा लागत आहे. हा कचरा उचलावा अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली परंतु पालिका प्रशासानाने याकडे साफ दुर्लक्ष केले. पंकजाताईंनी घेतले सीईओला फैलावर --------------- यासंदर्भात पंचवटीनगर परिसरातील महिलांच्या

MB NEWS वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून परदेशी कुटुंबियांचे सांत्वन

इमेज
  वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून परदेशी कुटुंबियांचे सांत्वन  परळी वैजनाथ (प्रतिनिधी):-येथील उपजिल्हा रुगणालयातील सेवानिवृत्त कर्मचारी जगदीश लालाजी परदेशी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी निधन झाले. शिवसेनेचे सर्व परिचित कार्यकर्ते युवासेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, बंधू राधेश्याम परदेशी आणि प्रकाश परदेशी यांचे ते वडील होते.आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  बीड जिल्हा संपर्कप्रमुख श्री धोंडूदादा पाटील, सह संपर्कप्रमुख श्री बाळासाहेब अंबुरे, जिल्हाप्रमुख श्री आप्पासाहेब जाधव, जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनीघरी जाऊन परदेशी परिवाराचे सांत्वन  केले बसवेश्वर कॉलनी भागातील रहिवाशी तथा उप जिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचारी जगदीश लालाजी परदेशी यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त करीत आहेत धोंडूदादा पाटील यांनी परदेशी परिवाराचे सांत्वन केले यावेळी सोबत उप जिल्हाप्रमुख श्री अभयकुमार ठक्कर, युवासेना जिल्हा समन्वयक श्री अतुल दुबे, माजी उप शहर प्रमुख सतिष जगताप उप शहरप्रमुख किशन बुंदेले, सुरेश परदेशी योगेश घेवारे शिवसैनिक दिसत आहेत.