MB NEWS:परळीत गावठी पिस्तूल जप्त ;आरोपी अटक

परळीत गावठी पिस्तूल जप्त ;आरोपी अटक परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... परळीत एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस पोलीसांनी जप्त केले आहे. हे गावठी पिस्तूल बाळगणार्या आरोपींविरुद्ध कारवाई करत अटक करण्यात आली आहे.संभाजीनगर पोलीसांनी ही कामगिरी केली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी राहुल सुदाम चाळक वय ३० वर्षे रा.दर्गा रोड परभणी हा गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस बाळगलेल्या स्थितीत परळी बस स्थानक परिसरात आढळून आला. या आरोपीने अनाधिकृतरित्या याची खरेदी हिरासिंग प्रेमसिंग जुन्नी या.फुलेनगर याच्याकडून केली होती. सुमारे १५हजार५०० रुपयांचा ऐवज पोलीसांनी ताब्यात घेऊन आरोपीना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक विष्णु बाजीराव सानप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पो.नि. बी.एन.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली असून अधिक तपास पो.ह.आर.एम.राठोड हे करीत आहेत .