MB NEWS: *भंडा-यातील घटनेने मन सुन्न झाले* *; सरकारने प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी - पंकजाताई मुंडे*

*भंडा-यातील घटनेने मन सुन्न झाले* *; सरकारने प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी - पंकजाताई मुंडे* बीड दि. ०९ ----- भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवात नवजात शिशूंच्या मृत्यूने मन सुन्न झाले, सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. यासंदर्भात एक ट्विट करून पंकजाताई मुंडे यांनी नवजात बालकांच्या कुटुंबियांविषयी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत. "भंडा-यातील अग्नितांडवात नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने मन सुन्न झाले. या घटनेने चिमुकल्यांच्या माता पित्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या कुटंबियांप्रति मी शोक व्यक्त करते. सरकारने या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी" असे ट्विट त्यांनी केले आहे. ••••