परळी येथील लोकअदालत मध्ये 81 प्रकरणे निकाली तर 2 कोटी वसूल !

परळी येथील लोकअदालत मध्ये 81 प्रकरणे निकाली तर 2 कोटी वसूल ! परळी वैजनाथ:- तालुका विधी सेवा प्राधिकरण व परळी वकील संघाच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालत आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये तडजोडीने 81 प्रकरणे निकाली काढण्यात आली तर 2 कोटी रुपये वसूल झाले. दिनांक 09.09.2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये 73 फौजदारी प्रकरणे व 8 दिवाणी प्रकरणे निकाली काढण्यात आली.यामध्ये धनादेश अनादराची प्रकरणे मोठ्या प्रमाणात निकाली काढण्यात आली. यावेळी विविध बँक व पतसंस्थेच्या केसेस ठेवण्यात आल्या होत्या.तसेच 74दाखलपुर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली.एकुन 20270254/-(दोन कोटी दोन लाख सत्तर हजार दोनशे चौपन रुपये ) वसूल करण्यात आले. यामध्ये वैद्यनाथ बँकेच्या वतीने सर्वाधिक केसेस तडजोडीने निकाली काढण्यात आल्या.लोकन्यायालयास प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी बँकेच्या अधिकारी वर्गाचा प्राधिकरणाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी न्या.एस.बी.गणाप्पा न्या.डि.आर.बोर्डे न्या.डि.व्ही.गायकवाड परळी वकील संघाचे अध्यक्ष प्रदीप गिराम अँड.आर.व्हि.गित्ते अँड एच व्हि गुट्...